Рет қаралды 41,234
#BolBhidu #HondaNissanMerger #IndianAutomobileSector
हिरो आणि होंडा या कंपन्या वेगळ्या झाल्याचं आपण पाहिलंय, तसेच बजाज आणि कावासाकी हे ब्रॅंड्स सुद्धा वेगळे झाले. पण आता जमाना आहे मर्जरचा. जिओला टक्कर देण्यासाठी आयडीया वोडाफोन एकत्र आले. अगदी तसेच कार सेगमेंट मधील वाढलेल्या EVS मुळे Nissan आणि Honda एकत्र आलेले आहेत, जपानमधील या बड्या वाहन निर्माता कंपनीने अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चानंतर त्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. होंडा ही जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची तर निस्सान ही तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. सोमवारी दोन्ही कंपन्यांनी यासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. निसानची sister कंपनी मित्सुबिशी मोटर्सही या विलीनीकरणात सामील होत आहे. हा करार final झाल्यास समूहातील ही नवी कंपनी जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी बनेल. सध्याच्या जगात टोयोटा पहिल्या स्थानी तर फोक्सवॅगन दुसऱ्या स्थानी आहे. निसानने सध्या फ्रान्सच्या रेनॉल्ट एसए बरोबरचे संबंध कमी केले आहेत. तर होंडा, जनरल मोटर कंपनीपासून मागे हटून वेगळे पर्याय शोधात होती. जगभर ओळख असलेल्या जपानच्या या महाकाय कंपन्या होंडा आणि निस्सान एकत्र का आहेत? याची करणे जाणून घेऊ आणि या विलीनीकरणातून काय साध्य होणार ते पण बघुयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/