Рет қаралды 131,398
#BolBhidu #DonaldTrump #IndiaDeportationFromUSA
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना अमेरिकेतून डेपोर्ट करण्यात आलय. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्कराचं सी१७ विमान पंजाबच्या अमृतसरमध्ये बुधवारी दाखल झालं. या विमानातून अमेरिकेनं भारतात परत पाठवलेल्या भारतीयांत सर्वाधिक पंजाब, हरियाणा आणि गुजरातचे आहेत. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि चंडिगढच्या काही जणांचा समावेश आहे. ही भारतात परत पाठवलेली पहिली तुकडी असून अजून काही जणांना परत पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. इथपर्यंत सर्व ठीक होत पण याचवेळी विमानातील प्रवाशांचा साखळदंड बांधलेला एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटो भारतीय नागरिकांचा असल्याचा दावा केला जातोय. काँग्रेसनेही या फोटोवरून भाजपावर टीका केली.
भारताने कोलंबिया प्रमाणे किंवा त्यांच्या राष्ट्राध्यक्षप्रमाणे का कृती केली नाही असा प्रश्न विचारला जातोय. इथे २ प्रमुख मुद्दे आहेत. या deport केलेल्या भारतीयांना लष्करी विमानाने पाठवलय आणि साखळदंड बांधून त्यांना अपराधी लोकांप्रमाणे वागणूक दिली आहे आणि भारत सरकारने अजूनही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या कोलंबियन नागरिकांना दोन विमानांनी कोलंबियाला पाठवले पण, कोलंबियाने ही विमाने उतरू दिली नाहीत, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संतापले आणि त्यांनी कोलंबियाविरुद्ध कारवाई करत अनेक निर्बंध लादले. अमेरिकेच्या कारवाईला प्रतिसाद देत कोलंबियानेही अमेरिकेवर २५% शुल्क लादण्याचा आदेश जारी करून ट्रम्प यांना आव्हान दिले. पण भारताने अशी भूमिका अद्यापही घेतली नाही. आज आपण माहिती घेउ ट्रम्प यानी लष्करी विमानाने हि माणसे का पाठवली याची तसेच कोलंबियाप्रमाणे भारत भूमिका का घेऊ शकत नाही याची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/