Рет қаралды 4,349
जाऊदे घट भरण्या यमुनेला |मला रे अडवू नको नंदलाला ||धृ||
यमुनेचा तो अवघड घाट | चढता चढता दुखती पाठ
कृष्णा ओढू नको रे पदराला | कान्हा ओढू नको रे पदराला ||१||
पिचकारी मधुनी भरुनी रंग | रंगा माझी भिजले अंग
कृष्णा ओढू नको रे पदराला काना | ओढू नको रे पदराला ||२||
एका जनार्दनी गोप गोपिका तल्लीन | झाल्या हरी चरणाला
कृष्णा ओढू नको रे पदराला काना | ओढू नको रे पदराला ||३||