झऱ्याकाठी असलेलं एक नितांत सुंदर मंदिर-'विमलेश्वर मंदिर'

  Рет қаралды 188,832

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Жыл бұрын

कोकणातील देवगड मध्ये वाडा नावाचं एक सुंदर गाव आहे. या गावात विमलेश्वर हे एक नितांत सुंदर मंदिर आहे. समोर झरा वाहतो. आजूबाजूला उंच झाडी आहे. देवगड मधला हा एक सुंदर भाग पावसाळ्यात आपलं खरं सौंदर्य दाखवतो. त्याचाच हा एपिसोड.
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...

Пікірлер: 465
@yogeshpaykar4199
@yogeshpaykar4199 Жыл бұрын
मुक्ता ताई तुमचा आवाज खूप छान आहे बोलण्याची पदत पण छान आहे तुमचा मुळे आमाला कोकण दर्शन होतो तुमाला पुढचा वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा... 🙏🙏
@prashyakulkarni281
@prashyakulkarni281 Жыл бұрын
वटवाघूळ food chain चा एक अविभाज्य भाग आहे. त्याने टोळधाड control मध्ये येते. युरोप मध्ये एका जागेतून अशी वटवाघळे जाणूनबुजून हलवली आणि त्या वर्षी टोळधाडी मुळे आसपासच्या पिकांचे खुप नुकसान झाले होते अशी नोंद आहे. त्यांना पुन्हा restore करण्यात आलं. पण व्हिडिओ खुप छान आहे, informative आहे. Best wishes
@advaitthakur9934
@advaitthakur9934 Ай бұрын
मुकता , मी तसा उशीराच तुझे चॅनेल बघू लागलो आहे त्यामुळे हे वर्षभरापूर्वीच विडिओ आत्ता पाहतोय . अक्षरशः स्वप्नवत ठिकाण आहे हे. माझ्याकडे शब्दच नाहीत . येथे जायलाच पाहिजे मला .
@DrVijayRaybagkar
@DrVijayRaybagkar Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओचे यश या गोष्टीत सामावले आहे की आजूबाजूच्या प्रसन्न निसर्गाचे चित्रण दाखवताना तुम्ही आपले संभाषणसुद्धा प्रवाही,ओघवते व अकृत्रिम ठेवलय.माझ्यासारख्या देशावर राहणाऱ्या व्यक्तीला आता कार काढून ८-१५ दिवस कोकणात भटकंती करावेसे वाटू लागले आहे. स्थान-दर्शनाचे हे व्रत जोमाने सुरु ठेवा,महाराष्ट्राचे सौंदर्य जगाला कळू द्या. 🤩
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏
@lkchougule6055
@lkchougule6055 Жыл бұрын
नमस्कार कधीही कितीही वेळा कोकणात भ केला तरी कंटाळा हा येत नाही शक्यतो मोटरसायकल ने केलेला प्रवास खूपच रोमांचकारी अनुभव देत असतो
@ketangodbole5973
@ketangodbole5973 Жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला आमच्या कुलदैवतेच र्दशन झाले ते सुद्धा श्रावण महिन्यात खूप खूप धन्यवाद हर हर महादेव
@mushroompointfarm8052
@mushroompointfarm8052 Жыл бұрын
शेवटी त्या पुलावर तु बसुन केलेला द्रोण शॉट खरंच अप्रतिम होता. सोबत ते छान संगीत आणि तुझा मंजुळ आवाज... शब्दच नाहीत. मी माझी दोन्ही मुले, बायको यांनी मस्त TV वर अनुभवला हा व्हिडिओ. शेवटी कोकण ते कोकण 👌🏻 खुप खुप सुंदर आणि तुझे आभार 🙏🏻
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏आणि सगळी family एकत्र मिळून पाहत आहात,हे वाचून खूप आनंद झाला
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 Жыл бұрын
ओम नमः शिवाय!
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 Жыл бұрын
मुक्ता नर्वकर .तुमची बोलन्याची शेंयली चागली आहे ..तुमी आमला मोहीक करून टाकता .. ..तुमी खुश रहा आन्नदीत राहा .तुमचे फिरन्या च टिकान चंगल दाकवता🙏तुमि हुशार अहात तुमची बोली चंगली आहे राज घर्यान्या सारकी आहे ..़(धन्यावाद) तुमि आसेच हासत रहा आमस बरे वाटते जय म्हलार🙏
@avinashdangare6676
@avinashdangare6676 Жыл бұрын
नमस्कार मुक्ता विमलेश्वर मंदिरा जवळील दृश्य खूपच विलोभनीय आहे. सर्व मंदिरे सुंदर आहे .तुझे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@anandgokhale3830
@anandgokhale3830 Жыл бұрын
खूप छान आणि सुंदर असे अजून एक देऊळ, आणि कोकण. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला असे अनुभव घेता येतात आणि तुम्ही ते असे सर्वांना अगदी सहज वाटत असता. खूप आनंद मिळतो आम्हाला त्यामुळे. मी आभारी आहे तुमचा. असेच फिरत राहा आणि काळजी घ्या.
@bhagyashreebivalkar1902
@bhagyashreebivalkar1902 Жыл бұрын
माझं माहेरचं कुलदैवत आहे हे धन्यवाद मुक्ता तुझ्यामुळे दर्शन झालं. मंदिराबाहेरचे हत्ती मूळचे जांभ्याचेच आणि कोरलेले आहेत माझ्याकडे 2000 सालचे त्यांचे ओरिजनल फोटो पण आहेत ....सर्व दर्शकांना विनंती की या ठिकाणी जा पण या प्राकृतिक सौंदर्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या म्हणजे आपला हा खजिना सांभाळला जाईल.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
😊🙏🙏
@sujataamberkar
@sujataamberkar 11 ай бұрын
व्वा मस्तच ❤ सनातन संस्कृती चा विजय असो 🎉
@mahadevthakur5601
@mahadevthakur5601 Жыл бұрын
श्री देव विमलेश्वर देवळाच्या बाहेर जे हत्ती पाहीलेत ते संपूर्णपणे कोरलेले आहेत. फक्त पुढील भाग प्लास्टर केलेला आहे कारण ते व्यवस्थित टिकून राहावे म्हणून. जय देव विमलेश्वर 🙏🙏
@mrunmayganesh605
@mrunmayganesh605 Жыл бұрын
बुद्ध लेणी आहेत
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
@@mrunmayganesh605 absolutely correct...
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 Жыл бұрын
@@mrunmayganesh605 tumhi lok jithe jaal tithe hich comment aste... Jas kay buddha janama aadhi kahich navat khuthe 🙄🙄🙄 Evdhach aahe tar afganistan la buddh murti todli tevha ka naay gele jaab vicharayla talibani na tumhi lok bhimseni 😏😏😏
@vikashastro
@vikashastro Жыл бұрын
Aamche Gaav
@spcreation4661
@spcreation4661 Жыл бұрын
@@ketkipadvi2476 💯
@shitalmane7674
@shitalmane7674 Жыл бұрын
देवादि देवा महादेवा सुंदर मंदिर , परिसर आणि तुम्ही केलेले वर्णन . खूप आवडला व्हिडिओ.
@shwetagodbole7501
@shwetagodbole7501 8 ай бұрын
किती सुंदर आहे हे श्री विमलेश्वर मंदिर, शांत आणि ध्यान लागेल अस. बघूनच अस वाटत आहे की तिथे आहोत Thanks मुक्ता ताई हे दाखवल्याबद्दल
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 Жыл бұрын
सुंदर हिरवागार प्रवास 🌱🌴🌳🌿 अदभुत आणि अवर्णनीय 😘 तुझे शब्दांकन सुरेख सुरेल ☺️
@manishaslifestylechannel9787
@manishaslifestylechannel9787 Жыл бұрын
देवगड हे माझं माहेर चे गाव. तुम्ही ज्या पद्धतीने देवगड दाखवत आहात ते खूप कौतुकास्पद. विमलेश्र्वर मंदिर मी पाहिले आहे. नितांत सुंदर गूढरम्य परिसर आहे हा. कोणत्याही ऋतूत तो सुंदरच दिसतो. पडवणे समुद्र किनारा पण सुंदर. या गावात आमचे नातेवाईक राहतात त्यामुळे अधून मधून जाणे होते. कोकणचे निसर्गसौंदर्य दाखवण्याचे खूप छान काम तुम्ही करत आहात. खूप शुभेच्छा. माझे सासर जैतापूर. ते हि कधी दाखवाल अशी आशा करते.
@sushantmisal8301
@sushantmisal8301 Жыл бұрын
श्री गणेशाचं वास्तव आहे ...अशीच ही जागा,ह्याची स्वच्छ्ता कायम अशीच राहावी ...🙏
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. Жыл бұрын
विमलेश्वर मंदिर पाहून खूप प्रसन्न वाटल श्रावण महिना सूरू आहे अशा छान मंदिराच महादेवा च दर्शन झाल खूप बर वाटल 🙏🏼
@vinayaklimaye
@vinayaklimaye Жыл бұрын
अतिशय रमणीय स्थान! तुझा वावर व बोलण किती सहज आहे ग! अजिबात अभिनय नाही! मेकअप नाही, साधी मुलगी, घरकाम करता करता उठून बाहेर पडून तिथ गेलीयेस अशीच दिसतेस तू! स्क्रिप्ट पण अगदी सहज साध, शूटिंग पण छान घेतलय! आणि अतिशय गोऽऽऽऽऽड दिसतेस, फ्रेश! म्हणजे आहेचस तू गोड व गुणी मुलगी!👍❤ छान उपक्रम आहे. खूप शुभेच्छा ग तुला! तुझा ब्लॉग पाहीन आता 🤩
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@ganeshmahadik676
@ganeshmahadik676 Жыл бұрын
ताई खूप छान तुम्ही व्हिडीओ रेकॉर्ड करता ....तुला अणि दादाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही खूप पुढे जाल ...🙏
@vijaysinhshinde473
@vijaysinhshinde473 Жыл бұрын
अद्भुत सुंदर निसर्ग... तितकंच सुंदर कातळातील मंदिर... त्याच दर्जाची मांडणी... एकुणच मन प्रसन्न करणारी अनुभूती...👌🏻👌🏻👌🏻
@deepakjkesarkarkesarkar689
@deepakjkesarkarkesarkar689 Жыл бұрын
वाह खूप सुंदर आणि धन्यवाद, तुमच्या वर्णनाप्रमाणे झुळझुळ वाहणारी हिरव्यागार शेती (आणि त्या पलीकडे दिसणारा एका सुंदर मंदिराचा कळस) श्री.विमलेश्वर क्षेत्र आमचे ग्रामदैवत प्राचीन मंदिर, याला आपण सुचल्याप्रमाणे भेट दिलीच खूप आनंद झाला, आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हे जे हत्ती आहेत माहुता बरोबर ते पूर्वी पूर्णपणे जांभ्या दगडाच्या कातळातच कोरलेले आहेत, त्यावर काही वर्षांपूर्वी सिमेंट प्लास्टर केलेले आहे, मी लहानपणी हे पूर्ण पाहिलेले आहे माझे वय आता 54 वर्षाचे आहे यावर साधारणता गेल्या शतकाच्या उत्तरार्धात यावर प्लास्टर केलेले आहे. ह्या पूर्ण अतिप्राचीन मंदिराचे स्ट्रक्चर जांभ्या दगडातच कोरलेले आहे. यावर काही वर्षांपूर्वी (काही समस्यांच्या पूर्ततेसाठी )प्लास्टरचा लेयर चढवलेला आहे. श्री. विमलेश्वर मंदिर खूप प्राचीन, निसर्गरम्य परिसरात वसलेले प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिराला प्रत्येकाने अवश्य भेट द्यावी. धन्यवाद
@udayagashe8360
@udayagashe8360 Жыл бұрын
तुम्ही खूप सुंदर वर्णन केलंय.....एखादी कथा सांगावी त्याप्रमाणे. श्री देव विमलेश्वर आणि परिसराच खरं दर्शनाला अनुभव दिलात याबद्दल धन्यवाद.
@dineshkadam5191
@dineshkadam5191 Жыл бұрын
खुपचं भाग्यवान आहात की असा गाव आपल्याला लाभला हे देवाचं देण जपण्याचि व सेवा करण्याचि संधि आपल्याला लाभलि धन्यता वाटलि,👌👌👌👌👍👍🙏🙏🙏
@sandeepghodekar4643
@sandeepghodekar4643 Жыл бұрын
मुक्ता तु नेहमीच सुंदर आणि साधेपणाने जे व्हिडिओ बनवतेस त्यातला हा सगळ्यात सुंदर व्हिडिओ आहे. अभिनंदन तुझे आणि रोहित दोघांचं
@ginis0011
@ginis0011 Жыл бұрын
डोक्याला दिसेल असं कुंकू लाव हीच एक नम्र विनंती.
@sanikaghadi226
@sanikaghadi226 Жыл бұрын
माझ आजोळ आहे वाडा गाव. अतिशय सुंदर व्हिडीओ केला तुम्ही मॅडम खुप छान 👍👍👌🏻👌🏻
@jayantphadke2436
@jayantphadke2436 Жыл бұрын
सुंदर सादऱीकरण .... ही गुम्फा बौद्ध कालीन आहे ....
@mandarvelankar64
@mandarvelankar64 Жыл бұрын
खुप सुंदर मंदिर आहे , आणि येथील निसर्ग ही. मंदिर, त्या मागची पाण्याची कुंडे आणि बाजूला असणारे झरे आणि कुळागरं पाहताना खुप प्रसन्न वाटलं. रत्नागिरी जिल्ह्यातील कोळिसरे येथील लक्ष्मी केशव मंदिर असेच रमणीय आहे. रत्नागिरीत फिरायला गेलात तर नक्की बघा.
@sneham-jo3wk
@sneham-jo3wk Жыл бұрын
वाह, किती सुंदर ठिकाण आहे! मन:शांतीसाठी उत्तम ठिकाण.
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 Жыл бұрын
एकदम तिथल्या वातावरणाचा अनुभव या व्हिडीओतून मिळाला.
@madhuraprabhu4992
@madhuraprabhu4992 Жыл бұрын
खुप सुंदर शांत निसर्ग तेवढं च तुझे सुंदर शांत सादरीकरण. 👌👌👍👍
@Shubhangi.ughade5150
@Shubhangi.ughade5150 7 ай бұрын
Khup chan tai
@sandeepj5908
@sandeepj5908 Жыл бұрын
खूपच निसर्ग रम्य ठिकाण 👌👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
हो
@vaishalibhande6719
@vaishalibhande6719 Жыл бұрын
Hi Mukta विमलेश्वर मंदिर हे माझ्या माहेराहून जवळ आहे मी दोन वेळाच या मंदिरात प्रवेश केला पण बाहेरून कारण गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही तूझ्यामूळे आज गाभाऱ्यातील विमलेश्वराचे दर्शन झाले खूप खूप आभार 🙏🙏🙏 मूक्ता तसेच हे मंदिर पांडवानी त्याच्या वनवासात असताना बांधले तेही एका रात्रीत पूर्ण केले अशी आख्यायिकेनुसार आम्हाला लहानपणापासून सांगितले होते
@dnyandeowarke
@dnyandeowarke Жыл бұрын
अतिशय सुंदर, प्रसन्न वातावरण आहे.
@jyotikulkarni9830
@jyotikulkarni9830 Жыл бұрын
तुझं वर्णन ऐकलं की ती वास्तू खूपच रमणीय वाटू लागते एवढं मात्र नक्की
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@mphadkebsp
@mphadkebsp Жыл бұрын
हे आमचे कुलदैवत आहे thanks for sharing
@sujathar3826
@sujathar3826 Жыл бұрын
अश्या जागा आणि मंदिरं बघितली की शांताबाई शेळके ह्यांच्या ओळी आठवतात.. 'भग्न शिवालय, परिसर निर्जन, पळस तरुंचे दाट पुढे बन, तरु वेली करितील गर्द झुला | जाईन विचारीत रान फुला.... Thank you for showing us such hypnotically magical places..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
आहाsss किती सुंदर❤️❤️
@sujathar3826
@sujathar3826 Жыл бұрын
हे गाणं ऐकलं नसेल तर जरूर ऐका.. किशोरीताई अमोणकरांचे स्वर कानात रुंजी घालत रहातात आणि शांतबाईंचे शब्द रक्तात झिरपतात..
@shardareddi7855
@shardareddi7855 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम सुंदर आहेत शब्दच नाहीत वर्णन करायला.
@chetankumar8392
@chetankumar8392 8 ай бұрын
खूपच सुंदर आहे हे मंदिर.. माझं सर्वांत आवडत मंदिर❤❤... एक सुचवेन तुला की जिथे कुठे मंदिरांना भेट देशील त्यावेळी तेथील संपूर्ण माहिती आणि इतिहासाची माहिती करून घेऊन व्हिडीओ मधून आम्हाला सांग म्हणजे आम्हीपण ते अनुभवू.... 👍👍
@shantinandkulkarni364
@shantinandkulkarni364 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे व्हिडिओ🎥
@prafuldeshmukh3676
@prafuldeshmukh3676 Жыл бұрын
हिरवा निसर्ग आणि झरा खरच खुप सुंदर मंदिर चा प्रसन्न परिसर
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@shashikantparab9429
@shashikantparab9429 Жыл бұрын
मुक्ता विमलेश्वर मंदिर आणि सभोवरचा परिसर खूप सुंदर,गोड मराठी भाषा आणि वर्णन ,धन्यवाद.
@rupeshgharkar1428
@rupeshgharkar1428 Жыл бұрын
आमचा कोकण असाच सुंदर जणू स्वर्गसुख
@rameshtawde4331
@rameshtawde4331 Жыл бұрын
जय श्री विमलेश्र्वर महाराज 🙏🙏
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
खूपच सुंदर देखावा आहे झरे ,मंदिर छान आहे
@bharatpatil860
@bharatpatil860 Жыл бұрын
।। ओम नमः शिवाय ।। ।। हर हर महादेव ।।
@ManasiPandharkar-rw2fh
@ManasiPandharkar-rw2fh 7 ай бұрын
तुमचे videos फारच सुंदर आहेत
@VandanaParanjape
@VandanaParanjape Жыл бұрын
माझ्या माहेरचे कुलदैवत आहे विमलेश्वर.
@rameshghadi6326
@rameshghadi6326 Жыл бұрын
👍खुपच सुंदर मंदिर,मी माझ्या भाचीच्या लग्नाला नाडण गावी गेलेलो,तेव्हा पाहिल होत अंदाजे१५ वषाऀ पूर्वी
@rameshwarkachhave2328
@rameshwarkachhave2328 Жыл бұрын
khupch sundar. Peacefull. thank you for sharing.
@prabhavatiauti4415
@prabhavatiauti4415 Жыл бұрын
Muktai Man Prasanna Karanare Manamohak VideoAhet Sarva.👍👌🌹
@vijaykumarpatil298
@vijaykumarpatil298 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण..........अशाच काहीश्या अपरिचित प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती देत चला. निश्चितच अशा नितांत सुंदर मंदिराला भेट द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल.~ एक सांगलीकर
@ujwalakulkarni1502
@ujwalakulkarni1502 Жыл бұрын
देऊळ आणि परिसर खूपच आवडला
@rajeevkasar2452
@rajeevkasar2452 Жыл бұрын
Tu chan boltes aani chan shooting aahe. Thanks...
@shubh_kadam__
@shubh_kadam__ Жыл бұрын
YOU ARE THE BEST MARATHI TRAVEL VLOGER 💯👍🏻❤️
@Walmik_Mahajan_6504
@Walmik_Mahajan_6504 6 ай бұрын
Nice information nice shering nice location ❤
@vaibhavn4336
@vaibhavn4336 Жыл бұрын
जय देव विमलेश्वर......
@dhanrajdabhade7758
@dhanrajdabhade7758 Жыл бұрын
खूप छान निसर्ग सौंदर्य आहे
@pramodambekar757
@pramodambekar757 Жыл бұрын
Video mast aahe
@dinkarpashte1202
@dinkarpashte1202 2 ай бұрын
मुक्ता तुझे फार आभार
@ghanashyam2049
@ghanashyam2049 Жыл бұрын
खुपचं छान व्हिडीओ झाला आहे ताई
@swaps1186
@swaps1186 Жыл бұрын
निव्वळ अप्रतिम.. या रस्ताला जाणं झालंय पण हे मंदिर माहीत नव्हतं.. बाकी व्हिडियो तुझ्या सारखा एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लीत... खूप खूप धन्यवाद
@user-fi3jr8qg9h
@user-fi3jr8qg9h 26 күн бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य... thanks to explore unknown konkan ..
@sanket_narode
@sanket_narode Жыл бұрын
विमल वाले ईश्वर - विमलेश्वर🤔 हर हर महादेव 🙏
@avinashpawar9927
@avinashpawar9927 9 ай бұрын
फार छान वाटलं !!! तुम्हां दोघांनाही खुप खुप शुभेच्छा. असेच एकत्र छान छान ठिकाणी फिरत रहा आणि तुमच्या माध्यमातून आम्हांला ते बघण्याचा आणि तिथे जाण्याची संधी मिळावी !!!!
@anujakelshikar4401
@anujakelshikar4401 Жыл бұрын
Kay sunder dekhava aahe.... Dhantawad.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 Жыл бұрын
Khoopach sunder vatle pahun man Prasanna Zale
@VipsCollection
@VipsCollection Жыл бұрын
सुंदर आणि रमणीय तीर्थ
@mamatachauhanchowan4468
@mamatachauhanchowan4468 Жыл бұрын
Khup Sundar....vedio baghatana Chafyach ful pavasat baghatana ji anubhuti yete tashi ali
@-Shiv3698
@-Shiv3698 Жыл бұрын
खरच खूप सुंदर व्हिडिओ .
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
श्री.देव विमलेश्वराचे मंदिर व परीसर लयभारी आहे.निसर्ग रम्य आहे त्याबद्दल आपले धन्यवाद
@anitaagashe247
@anitaagashe247 Жыл бұрын
आधी येथे नैसर्गिक गुहा आहे हत्ती कोरलेले प्लँस्टर लावून भयंकर केले आहेत ठिकाण छानच
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय।
@surajmagar3174
@surajmagar3174 10 ай бұрын
अप्रतिम निस्गसौंदर्य ❤❤
@hrishikeshrane6627
@hrishikeshrane6627 Жыл бұрын
आमच्या मुटाट गावातील थानेश्वर मंदिरावर विडिओ कर पावसाळ्यात फार सुंदर धबधबा असतो देवगड लाच आहे
@lataadhangle7481
@lataadhangle7481 Жыл бұрын
तुळशी वृंदावन म्हंटला की नवीन बांधकाम लेणी हे लगेच लक्षात येते
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 8 ай бұрын
Bharpur phira , nisarg japa 👌👌
@PravinPuranikVlogs
@PravinPuranikVlogs Жыл бұрын
छान video आहे ...💐💐 मी पण बनवतो vlog 🌺🌺
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@pranalirasam9970
@pranalirasam9970 Жыл бұрын
I am also from Kokan . It has natural beauty. I feel Proud to be a part of it, Kokan is a Paradise for us. Thank you for sharing this video, awaiting for further more.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@vrishalisi5147
@vrishalisi5147 Жыл бұрын
तुझं शांत सरळ बोलणं मनाला खूप भावतं. अतिशय सुंदर vlog केलास. नेहमी प्रमाणे.
@sandhyadeshmukh2361
@sandhyadeshmukh2361 Жыл бұрын
Atishay sunder👌
@gwt15
@gwt15 Жыл бұрын
khupach sunder video & narration also, best of luck for next videos, and yes more videos please...
@kshri1
@kshri1 Жыл бұрын
Khooooopch sundar 👌👌👌👌
@akshaymohite9058
@akshaymohite9058 Жыл бұрын
Khupach bhari vatal Man shant zala tai ❤️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@mugdhaarekar4106
@mugdhaarekar4106 Жыл бұрын
Nisarga apratim 👍🙏 nice video
@vrdl2842
@vrdl2842 Жыл бұрын
Khup chan thikan .. ani tyahunhi chan explain kela.. with detail vedio 👍
@yogirele3904
@yogirele3904 Жыл бұрын
LIKE UR VIDEO.. KEEP IT NEW ADVENTURES
@mahendrasangajwar1254
@mahendrasangajwar1254 Жыл бұрын
Mast ahe
@brujendrasontakey3389
@brujendrasontakey3389 Жыл бұрын
खुप छान माहीती दीली धन्यवाद
@kvjoshi15
@kvjoshi15 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट छायाचित्रण..👌👌👌. विडोयोच्या एकंदरीत गुणवैशिष्ट्यात ऐंशी टक्के हिस्सा सुंदर निसर्ग व त्याचे उत्तम छायाचित्रण.. बाकी जीथे जातो त्या मंदिराची थोडी फार तरी ओळख शुटिंग करणे आगोदर करुन घेणे गरजेचे.. नुसता च कँनव्हास...रंग कुणी भरायचे..
@sumanbhandari2633
@sumanbhandari2633 Жыл бұрын
मी पाहिलंय मंदिर. अतिशय सुंदर ठिकाण.
@sushantrewalevlogs5440
@sushantrewalevlogs5440 Жыл бұрын
मुक्ता ताई तुझा आवाज छान आहे. sushantrewalevlogs
@urmilapatil101
@urmilapatil101 Жыл бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य ❤️👌
@deepalibelhekar2572
@deepalibelhekar2572 Жыл бұрын
Khup Sundar ahe parisar
@geetathakur9351
@geetathakur9351 Жыл бұрын
Khupch sundar
@poojahatkar6133
@poojahatkar6133 Жыл бұрын
फारच सुंदर परिसर..खूप छान विडिओ..
@yatinrane6614
@yatinrane6614 Жыл бұрын
👌👌 Heavenly place, awesome video
@JG-tu3ml
@JG-tu3ml Жыл бұрын
Mukta, ani tiche sahakari ...khup sundar video kela ahe. Sagle clearly kalale. thanks a lot!
@savitamali16
@savitamali16 Жыл бұрын
Khup ch sunder ahe
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 16 МЛН
kolhapur | kolhapur darshan | kolhapur picnic spot | kolhapur places to visit | spots to visit
19:52
Manmokli vaat / मनमोकळी वाट
Рет қаралды 116 М.
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН