Рет қаралды 120,374
PART 2 Link :- • कोकणातील खेकडे पकडण्या...
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच आपल्या कोकणाला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. (720km) साहजिकच मासेमारी हा कोकणातल्या प्रमुख व्यवसायांपैकी एक आहे. भात मासे, खेकडे हे येथील मुख्य अन्न आपल्याला बोलता येईल.
आपल्या कोकणात मासेमारी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आमच्या आंबोळगड vlog आम्ही तुम्हाला त्यापैकी एक अनोखी पद्धत दाखवली होती. तो विडियो तुम्ही पाहिला नसल्यास त्याची लिंक खाली देत आहोत.
Ambolgad link: • मासे पकडण्याची अनोखी प...
तर आजच्या विडियो मध्ये आपण खेकडे (ज्याला आमच्या कडे कुरल्या बोलतात) पकडण्याची एक पद्धत पाहणार आहोत. खेकडे पकडण्याच्या खूप सार्या पद्धती पूर्वापर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. त्यात हल्ली नवीन काही कल्पना वापरून, नवीन काही वस्तू वापरून त्यात काळानुसार बदल केलेला आढळून येतो. ह्या विडियो मध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला आमच्या गावातील जाणकर व्यक्ति सहदेव बाने आणि त्यांच्या जोडीला गावातील आमचे काही मित्र यांनी कशा प्रकारे कुरल्या पकडल्या आहेत हे दाखवले आहे. विडियो पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला ही पद्धत समजेल काही जणांना याबद्दल माहिती असेल तरी मुलांचे प्रयत्न मुलांनी केलेली मजा तुम्हाला या विडियो मध्ये आणि या विडियोच्या दुसर्या पार्ट मध्ये पाहायला मिळेल. दुसर्या पार्ट मध्ये गावातील लहान मुलांनी विशेषता आपला लहान मित्र चैतन्य ऊर्फ चिंटूकली याने खूप धम्माल केली आहे. त्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे तो विडियो नक्की पहा तुम्हाला विडियो पाहून खूप मजा येईल..
लिंक: • कोकणातील खेकडे पकडण्या...
अशाच प्रकाराचे माहिती देणारे तसेच मजेशीर विडियो आम्ही पुढे बनवणार आहोत.. त्यामुळे आमच्या चॅनेल ला जरूर Subscribe करा म्हणजे येणारे विडियो तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच विडियो आवडल्यास like, comment आणि share करायला विसरू नका. तर आता भेटूया पुढच्या विडियो मध्ये...
.
.
#खेकडे
#कोकण
#YesMaharaja