Рет қаралды 115,324
श्री अभिजित प्रल्हाद धुमाळ
प्रगतिशील शेतकरी ..युवा उद्योजक
मु पो.मुखई ता शिरूर जि पुणे
मोबाइल नंबर 9527787171
9881346650
सफरचंद लागवड
18 नोव्हेंबर 2018 मध्ये हरमन 99 या वाणाची केली. सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आली. सफरचंदाच्या लागवडीसाठी सहा पीएच असणारी जमीन असावी, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले ,असावे उत्तम निचरा होणारी जमीन असावी, जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण असल्यास लागवड करून नये .
लागवडीच्या आधी ताग पेरून घेतला , ताग फुलोऱ्यात आल्यावर नांगरणी करून शेत तयार केले. 12 बाय 12 फूट अंतरावर बेड तयार करून लागवड केली. लागवडीनंतर सेंद्रिय आणि ऑरगॅनिक खतांचा वापर केला, या सफरचंदाच्या मुळांची साल अत्यंत नाजूक असल्यामुळे मुळे त्यांना इजा होणार नाही याची काळजी घेणे
तणनाशकाचा वापर टाळावा.
किडी व रोगांचे नियंत्रण शक्यतो जैविक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने करावे.
सफरचंदाच्या बागेत चौथ्या वर्षापासून फळांचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. तसे फळे येण्यास सुरुवात 18 महिन्यांनी होते. सफरचंदाच्या फळांना पक्ष्यांपासून जास्त त्रास होतो त्यामुळे झाडांना क्रॉप नेटने झाकण्याची गरज भासते.
महाराष्ट्र मधील वातावरणात सफरचंदाचा बहार धरण्याचे नियोजन. जुलै महिन्यामध्ये सेंद्रिय खतांचा बेसल डोस भरून घेऊन बागेला विश्रांती दिली. जानेवारी मध्ये पहिले पाणी देऊन घेतले. फेब्रुवारी मध्ये फुले दिसून मार्चमध्ये फळांचे सेटिंग पूर्ण झाले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून फळांच्या तोडणीस सुरुवात होते.
सफरचंदाच्या बागेत चौथ्या वर्षापासून प्रति झाड दहा ते पंधरा किलो फळांचे उत्पादन मिळते. बागेतील सफरचंदाच्या झाडाचे वय आणि झाड जसे मोठे होत जाईल त्याप्रमाणे प्रति वर्ष दहा किलो फळांचे उत्पादन वाढत जाते .दहाव्या वर्षी बागेतील प्रत्येक झाडाला शंभर किलो पर्यंत फळांचे उत्पादन मिळू शकते...
श्री अभिजीत धुमाळ सरांच्या ओम शिव हायटेक नर्सरी मध्ये सर्व प्रकारच्या उसाची दर्जेदार आणि उच्च गुणवत्तापूर्ण रोपे मिळतात. उत्कृष्ट मार्गदर्शन ,उत्तम दर्जा आणि रास्त किंमत यामुळे धुमाळ सरांच्या 'ओम शिव हायटेक ' नर्सरी चा नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. उसाच्या 86032,,265,,8005,,10001,,3102,, इत्यादी वाणांची रोपे सरांच्या नर्सरी मधुन मिळतात..
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
www.instagram....
ट्विटर
Di...