एका रेल्वे प्लॅटफॉर्म वरती घडलेली ही सत्य कथा आज माझ्या आवाजात नक्की ऐका.
Пікірлер: 292
@vijayanagtilak40782 жыл бұрын
खरंच अतिशय हृदयस्पर्शी कथा🙏सर मला काही वर्षांपूर्वी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा राग यायचा,किळस वाटायची त्या बायकांची,पण आज मी त्यांच्याच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाकार्य करत आहे.स्वेच्छेने कुणी वाईट बनत नाही मजबुरी माणसाला चांगल्या वाईटाच्या पलीकडे पोहचवते.मला मंगल मनापासून आवडली आणि तिच्या असण्यावर प्रेम करणारा खरा प्रियकर बच्चन सुध्दा.कविवर्य सर👏तुम्ही तर कमाल के बादशहा,अतिशय सुंदर सादरीकरण,आणि काळजाला पाझर फोडणारी कथा केवळ ऐकलीच नाही तर मनाच्या डोळ्यांनी पाहिली अन चल चित्रपटासारखी डोळ्यासमोर अजूनही तरळते आहे.
@pramodkamble49294 жыл бұрын
खूपच ह्रदयाला भिडणारी कथा नितीनजी आपल्या तोंडून ऐकताना प्रत्यक्ष रेल्वे फलाट तो कविता म्हणताना असलेला हाॅल व मंगल ,बच्चन नजरेसमोर उभे राहतात नव्हे आपण उभे करुन दिलेत. खूपच अप्रतिम कथन. सविनय जय भीम नितीन चंदनशीवेजी.
@ranjeetmalage37514 жыл бұрын
सर, माझ्या आयुष्यातील पहिली कविता ज्या कवितेने मी इतका कामात असताना हि माझा अर्धा तास घेतला. सर, मला तुमच्यात... आमचे... आण्णा भाऊ साठे दिसले. 👌👌👌
@dilipthool85372 жыл бұрын
खुपखूप हृदयस्पर्शी 👌👌👌👍🌹
@pradipgayakwad1094 жыл бұрын
चंदनशिवे, तुमची ही कथा मी कितीतरी वेळा वाचली. पण आज तुमच्याच तोंडून ऐकतांना खरचंं गहीवरून आलं. जियो मेरे यार!
@kiranbhalerao65074 жыл бұрын
Mi pan sir
@mandakharat97583 жыл бұрын
Khup chhan Sir 🙏👌👌👍👍
@sunilsasane96074 жыл бұрын
नितीन दादा हि कथा (आत्मकथा) वाचून कित्येक वेळा झाली मात्र आज ऐकली नेहमी प्रमाणे एकच प्रतिक्रिया निशब्द...
@विशालधनकर4 жыл бұрын
कायम तुमच्या कविता माणसाला कोमात घालतात.....उर भरून आलं राव
@kachrusatpute86974 жыл бұрын
कथा ऐकताना समोर पहात आहे आसे वाटने. हीच सादरीकरणाची ताकद आहे. खुपच छान
@ravirajhatekar41312 жыл бұрын
न रडता पूर्ण आयकने शक्य नाही खरंच किती मन भिडऊन टाकणारा प्रसंग आहे
अतिशय सूंदर ...वास्तवतेचे अप्रतिम सादरीकरण सर... कवितेत प्राण ओतून सादर ....सलाम 👌👌👌👍👍👍
@dnyaneshwargadekar85204 жыл бұрын
दंगलकार मी तुम्हाला समोरासमोर ऐकले आहे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे हे मी माझं भाग्य समजतो खरंच सर तुम्ही एक दुर्मिळ कवि आहात ऐसा दंगलकार पुन्हा होणे नाही 🙏🙏 गाडेकर डी. एन. नांदेड 9607586250
@rohitkamat15133 жыл бұрын
मनाचा खोलवर ठाव घेणारी कथा. उत्कृष्ट लेखन शैली आणि सादरीकरण. नितीन चंदनशिवे यांना अनेक शुभेच्छा.
@Big....B19763 жыл бұрын
खरच ,खूप छान कथा सादर केलीत ,नितीन भाऊ डोल्यातील पाण्याला वाट करून द्यावी लागली 😢😢😢👌👌
@Shekharkhairnar01 Жыл бұрын
अप्रतिम ....हृदयाला स्पर्श करून जाणारी मार्मिक कविता...
@kavitashirbhate28023 жыл бұрын
प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात घडलेला हा हृदय स्पर्शी प्रसंग आहे असे वाटून गेले.शेवटी अश्रू अनावर झाले. खूपच मार्मिक कथा ... वाचन पार आत भिडणारं...
@somaraut53444 жыл бұрын
1नंबर सर
@udayniture4 жыл бұрын
एक मन खिन्न करणारी कथा व व्यथा वास्तविक लेखन
@prakashhapse93402 жыл бұрын
नितीनभाऊ जीवनाची गाथा रेल्वे रटेशन चा प्रवास खुपच सुरेख माडला ऐकनारे चे शुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही जय भिम
@RahulKamble-hy5pb4 жыл бұрын
खरच सर सलाम..!! 😥 उर भरून आलं.. कविता ऐकताना अस वाटत होतो की मी त्या स्टेशन वर उभा राहून हे सगळ पाहतोय की काय..!! अप्रतिमच.!!
@amolmorefunknowledge72429 ай бұрын
अप्रतिम कथा आणि सादरीकरण, मनाला भावणारी..., खुप छान, भोगले जे दुःख, मज सुख म्हणावे लागले, मी इतके भोगले की मज हसावे लागले...! असेच सारे काही (कवी:अमोल मोरे, अनगर )
@suryakantabhang65614 жыл бұрын
खरंच नितिन सर ऐकल्यावर गहिवरून येतं, एक मात्र खरं आपल्या ह्या घडलेल्या कहानीतून सिध्द होते की सच्चा कलाकाराचा जन्म अशा कठीण परिस्थितितूनच जन्माला येतो हे मात्र ठामपणे पटले, परंतु आता कुठे आहेत ती तुमची मित्र मंगल आणि बच्चन, ज्यांनी तुम्हाला आई, बहीण व भावाचे प्रेम दिले, नाही एक उत्सुकता म्हणून विचारतो! असो अप्रतिम आहे.
@bhavraosangolkar26782 жыл бұрын
तुमची कविता ऐकावी आणि ऐकतच राहावी इतकी सुंदर कविता अप्रतिम सुंदर अशाच कविता करत रहा ऑल द बेस्ट
@diptishewale1079 Жыл бұрын
खूप हृदय स्पर्शी कथा मनात साठवलेल दुःख दादा तुम्ही शब्दांतीत केल. अभिनंदन दादा 🍫🍫🌹🌹 दादा तुमचे शब्द मनाला स्पर्श करून गेले.
@sunilbagade38542 жыл бұрын
हृदयाला स्पर्श करून जाणारी कविता अप्रतिम 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@sarodechandrakant72912 жыл бұрын
निःशब्द ! जय भीम जय पँथर जय शिवराय !
@venkatrajpanke39543 жыл бұрын
अरे वाह.. दादा खुपच अप्रतिम व भावनिक नंबर वन सादरीकरण.. 🌹🙏👍
@DSubhashMandale4 жыл бұрын
मी ही कथा वाचली होती, तरीही ऐकण्याची इच्छा होती, आता ऐकून मनात अजून खोल रूतून बसली. पुन्हा एकदा मन पिळवटून टाकलंत, खूप 'भावस्पर्शी दंगलकार'🙏🌹
@namusavant34234 жыл бұрын
नितीन सर काळजाला भोक पडली कविता आयकुन डोळे भरले तुमी मना पासुन जिव वोतला कवितेत
@bhushanmoon79162 жыл бұрын
सर वर्षा आधी वाचली होती ही कथा, आज तुमच्या तोंडी ऐकतो.तेव्हाही डोळ्यातून पाणी आले आणि आजही रडलो.खूप अप्रतिम salute sir
@pmandilay15652 жыл бұрын
जबरदस्त लिखाण आणि जबरदस्त सादरीकरण.... ❤❤
@satyamevjayate64153 жыл бұрын
मन सुन्न करणारी कविता 👌👌💐💐 खूपच वास्तव जगलेला कवी आहे
@ranjanamangle40122 жыл бұрын
निशब्द..मी काय बोलू तुझ्या सादरीकरणाला खुप खुप छान 💐💐💐💐💐💐
@komalhuddar-khandekar3333 Жыл бұрын
अप्रतिम कथा डोळ्यात पाणी यावं अशी 👌🏻😊😭 आणि खूप दिवसांनी आवाज ऐकला
@pravinmhetre73792 жыл бұрын
भावस्पर्शी अनुभवाचं उत्तम सादरीकरण,डोळे ओलावले
@prabhukhupase60302 жыл бұрын
अतिशय सुंदर कथा सांगितली आहे, आपले मनापासून आभार मानतो. खुपच भावनिक कथा आहे. छान
@ashoksurvase49282 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही अप्रतिम शब्द रचना .
@subhashsalvi56932 жыл бұрын
अप्रतिम रचना प्रत्यक्षात मात्र संपूर्ण व्यवस्था डोळ्यासमोर उभी केलीत 😭😭😭
@subhashchopade_19824 жыл бұрын
खूप छान सर, सादरीकरण जबरदस्त, ताशा, वेश्या आणि कवितेला सलाम
@sahilvlogs99392 жыл бұрын
सर ह्रदय हिरावुन टाकणारी ह्रदय मय कवीता आहे माझ्याकडे शब्द नाहीत मन सुन्न करणारी कविता आहे
@sunilkale15233 жыл бұрын
माननिय नितीन चंदनशिवे सर नमस्कार... आपल्या कविता रचना खुपच छान आहेत. त्यातल्या त्यात आपण आपल्या बोली भाषेत जेव्हा कविता सादर करतात तेव्हा ती कविता ऐकताना माझ्या डोळ्यासमोर त्या कवितेतील भावार्थ चे दृर्श एखाद्या चित्रपटा सारखा उभा राहतो. खपच छान कविता करता व नेहमिच अशा छान छान हृदयाला हात घालणारी कविता सादर करा। हिच मनोकामना
@harishwaghmare20502 жыл бұрын
आपल्या वास्तव जगण्याला शब्दला अनमोल हा ऐकच शब्द महान तू दंगलकार
@kiranbhalerao65074 жыл бұрын
वाचताना जेवढ मस्त वाटत ना ,त्याहुन किति तर मस्त , Mast sir
@kavishabdaswaramangrulkar50552 жыл бұрын
खरी एका कवितेची गोष्ट अंधारातल्या सावल्या अस्पष्ट
@vijaytribhuwan392 жыл бұрын
उत्तम ह्रदयस्पर्शी सत्यकथा... त्यातही सर्वोत्तम सादरीकरण.....
@dr.pragatikukade98732 жыл бұрын
हे निशब्द करणारे अनुभव 😭😭😭 तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹💐🌷
@mohanwagh51063 жыл бұрын
Nitin, खूपच छान! अप्रतिम. You are nothing but born made Writer, Orator, Actor. Superb Writing, Superb सादरीकरण.Very Good, Excellent.
@vidhyaumate89303 жыл бұрын
Khupch सवेंदांशिल सत्य कथा❤️❤️ तुम्ही लिहा sir aahmhi aaiklu🙏
@vikramkoli32344 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण ..... कथा ऐकताना मन गहिवरून आले.... हीच तुमची ताकद आहे ...भावी वाटचालीसाठी शुभेच्छा....
@akashpatilraut27094 жыл бұрын
अप्रतीम दादा हृदयस्पर्शी कविता
@surajgaikwad92442 жыл бұрын
आपला संघर्ष पाहून डोळ्यातून आश्रू वाहु लागले खुप ग्रेट आहात सर आपण आपल्या संघर्षाला सलाम ....
@rajendramirke78062 жыл бұрын
अति सुंदर अप्रतिम छान सर मी मिरके रिझर्वं बँक मुंबई आपल्या ह्या कथेने माझ्यात परिवर्तन आणले मनातले विचार कागदवर उतरवण्याचे सामर्थ्य दिले भेटू यात सर
@sukhdevsarode49704 жыл бұрын
नितीन दादा ही तुमची कथा ऐकून मी निःशब्द झालो .मन गहिवरुन आले .
@nielsontakke72114 жыл бұрын
वाचताना जेवढा आनंद झाला तेवढाच ऐकत असताना होतोय दादा..👍🙏
@suniljadhav4376 Жыл бұрын
खुप हृदयस्पर्शी कथा दादा जयभिम
@nitinramteke39313 жыл бұрын
अप्रतिम सर, खुपच छान, ताशा, वेशा आणी कविता
@gautammagare33593 жыл бұрын
अप्रतिम आत्मकथा, आणि अतिशय उत्तम सादरीकरण साहेब
@ashokkamble254 жыл бұрын
अप्रतिम सर , छान !सलाम !
@akchavan26453 жыл бұрын
काळजाला भिडणारे शब्द, संवाद आणि परिस्थिती
@diwakarkukade23884 жыл бұрын
खुपच छान सर कथा फक्त ऐकत नव्हतो तर कथा डोळ्यांनी पाहतच आहे असं वाटत होतं .......💐💐💐💐
@rahulkamble68762 жыл бұрын
धेय्य ,जिद्द असेल तर परिस्थिती वरती कशी मात करायची याचे उत्तम भावनिक सादरीकरण
@asmishewale12374 жыл бұрын
अप्रतिम कथा.... खरंच *दंगलकार* आहात तुम्ही सर... मनात विचारांची दंगल पेटवली तुमच्या कथेने... आणि नकळत डोळे पाणावले... हॅट्स ऑफ...
@vasantchavan54972 жыл бұрын
अभिनंदन साहेब,,, काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नाही,,,पण हि कथा माझ्या जिवनाचा उलगडा करताना दिसते,,,,, छान सादरीकरण,,,,रडलो राव ,, अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा, तुम्हांला तुमच्या कुटुंबियांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@chanchalakhandagale29242 жыл бұрын
मनाला स्पर्श करून जाणारी कविता, खूप छान खूप छान.👌👌💐💐
@pagaresandeep85592 жыл бұрын
अप्रतिम कथा सादरीकरण निशब्ध
@vasntchavan4714 жыл бұрын
अप्रतिम साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
@kadubapawar79694 жыл бұрын
अप्रतिम सर.... माझ्याकडे शब्द नाहीत दाद दयायला ....!
@surendraingale42564 жыл бұрын
अतिशय हृदय स्पर्शी ऐकून अश्रू अनावर झाले भाऊ
@padmanikam41192 жыл бұрын
माणुसकीची रित. पवित्र मैत्री. मन शून्य होऊन पुन्हा त्या रेल्वे स्टशनला त्या बाकावर तिघा शोधत रहाते.
@gautamwankhede62394 жыл бұрын
सर खरच हृदय स्पर्श आहे सर डोळ्यात पाणी आल सर
@dreams100network84 жыл бұрын
अप्रतिम वर्णन सर,शब्दच नाहीत कौतुकाला
@rudrawaghmare66787 ай бұрын
Khupch Hrudyasparshi katha ahe Sir
@futureeditz07792 жыл бұрын
अप्रतिम सर,...!काळजाला भिडलं आपलं बोलणं पापण्यांना न जुमानता अश्रूंनी गाल ओले केले.खूप खूप आदर होता आधी आपल्या बद्दल त्यात आभाळभर भर पडली.यापुढे मी बोलावं इतकी योग्यता नाही माझी.पण एक जोरदार सॅल्युट मात्र मारू शकते.💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@priyawakde55484 жыл бұрын
अप्रतिम भाऊ
@moralthoughts31934 жыл бұрын
Jabardast Chandanshive Sir
@rehanaumrani69794 жыл бұрын
अप्रतिम सर!
@anantatitare26642 жыл бұрын
निशब्द.. Excellent sirG
@aashishshelke65913 жыл бұрын
अप्रतिम ...सर ,खुप सुंदर सादरीकरण
@rajkibaat80284 жыл бұрын
Kiti vedna aahet dada tumchya kavitet
@akshayakambli72694 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण, खूप खूप संवेदनशील कवी आहात सर, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर.
@panditthorat29762 жыл бұрын
जिवनाचे वास्तव आत्मचरित्र साकारणारी कथा
@bea81aniket4 жыл бұрын
अप्रतिम सर ! वास्तव आणि विदारक चित्रं डोळ्यासमोर उभं राहीलं सर... कविता ऐकताना श्वास रोखून धरायला झालं आणि आपसूकच डोळ्यात पाणी दाटून आलं... Love You Sir...
@rankeshborse9254 Жыл бұрын
🫡
@gajanankale43294 жыл бұрын
सर तुमच्या कथा ऐकायला कधीही माझं मन विचलीत होत नाही
@madhukarsalave68862 жыл бұрын
खुप अप्रतिम सर
@ratnapingle37632 жыл бұрын
सुंदर अप्रतिम 👌👌👌
@Home_Minister_20244 жыл бұрын
मी वाचली होती.. पन तुमच्या तोंडून ऐकताना एक वेगळाच.. अनुभव मिळाला निशब्द करणारा 😊👍
@chanchalakhandagale29242 жыл бұрын
प्रथम क्रमांक नितीन चंदनशिवे.व्वा नितीन व्वा,खूप छान कविता..
@masudpatel4004 жыл бұрын
केवळ अप्रतिम नितीनजी , काळजाला भिडणारी ही कथा अनेक वेळा वाचली आहे आणि जेंव्हां जेंव्हां वाचली डोळ्यांच्या कडा हमखास पाणावल्या आहेत. आज आपल्या कथन शैलीने तर अगदी हेलावून सोडले. मनःपूर्वक अभिनंदन !
@govardhansuryawanshi75822 жыл бұрын
अप्रतिम सर....खुपच छान
@siddheshwargutte53243 жыл бұрын
नितीन सर...लाजवाब...लाजवाब शेवटपर्यंत असेच मी म्हणेन आपणास..तुमच्या कवितेने माझ्या शाळेतील दिवस आठवतात..बालपण आठवतात...माझे मित्र आठवतात...तुमची शाळेवर आधारित असलेली कविता अफलातून आहे...देवाने तुम्हाला आणखीन कविता सादर करण्यास सांगावे..खूप खूप छान व आभार 🙏🙏🙏👍👍👍👍💐🌺🌴🌲🌲💝💝
@udaysalavi65754 жыл бұрын
साहेब खुप सुंदर सदरीकरण
@writer.tushargulig4 жыл бұрын
अप्रतिम सर👌👌👌👌
@rbpofficial48904 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण सर... खूप खूप छान... 😢😢😢 रडवलेत सर.
@ShravanGaikwad-j5k2 ай бұрын
अप्रतिम सर खुप छान
@noobyoutube7694 жыл бұрын
Yes... I remember this story my favorite .... Bachaane... Mangal.,.. Writer ..... Awesome👍👍👍👍👍 than, I was call u.. Biryani in kali bag
@VijayPatil-yr1xm2 жыл бұрын
अप्रतिम ,,👌👌👌
@vikastodkar44594 жыл бұрын
खुप छान नितीन दादा
@parmeshwarkamble70632 жыл бұрын
क्या बात है सर जी बहुत बडिया
@sujatakale70044 жыл бұрын
निःशब्द 🙏🙏
@RockArnav_174 жыл бұрын
👌 Khup chhan
@nitintalpade74544 жыл бұрын
नितीनजी डोळ्यात पाणी आलं...मंगल,बच्चन, तमाशा आणि कविता.…मंगल के दिवाणे सारं काही मनात साठलेलं छान उतरलय....पुढील काव्य वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
@dhananjayzakarde26592 жыл бұрын
अनेक वेळा वाचली पण प्रत्येक वेळी नवी अनुभूती मिळते....तुमच्या आवाजात तर प्रसंग अधिक जिवंत होतात....खोल वास्तवाची जाणीव आणखीनच अस्वस्थ करते...तुमची लेखन आणि निवेदनाची अर्थगर्भीत शैली मनावर कायमची ठसून जाते राव....सलाम तुम्हाला...!!!