Рет қаралды 18,095
"आपण घरात साधारणपणे दहा प्रकारचा कचरा तयार करतो. पण तो तयार होणं टाळूही शकतो आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाटही लावता येऊ शकते" असं ठामपणे प्रतिपादन करताना, आपण 'आपल्या घरातून गेल्या सोळा वर्षांत कुठलीही गोष्ट कचरा म्हणून बाहेर टाकलेली नाही' हे आवर्जून सांगणारे कौस्तुभ ताम्हनकर हे एक अजब व्यक्तिमत्त्व! "येथे कचरा तयार होत नाही" अशी पाटीच घरावर लावून ती यथार्थ ठरवणारे ताम्हनकर कचऱ्याला "वापरलेल्या वस्तू उर्फ वाव" म्हणत ‘वाव’चं व्यवस्थापन कसं करायचं यांच्या युक्त्या सांगतायत !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks