Рет қаралды 35,367
सातारा जिल्ह्यातील अजून एक सुंदर असा गड म्हणजे वसंतगड किल्ला आहे. हा किल्ला सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी असलेल्या तळबीड या गावापाशी आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून ३ किमी अंतरावर हा किल्ला आहे.
कराडवरून एस. टी. बसेस ची सोय आहे. वसंतगड हा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते आणि त्यांची कन्या महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते.
गडावर ज्यांची ४५ ते ५० मिनिटे लागतात. गडावर पोहोचताच सुरवातीला आत जाताच डाव्या हातास गणेशाची सुंदर मूर्ती आहे. तिथून पुढे जाताच गडाचे मुख्य प्रवेशद्वार दिसते जे इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न/उध्वस्त केले आहे.
येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यास गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. मंदिर खूप जुने आणि सुंदर असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्र महिन्यातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते.
मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात तिथे ४ राजवाडे होते. मंदिराच्या डाव्या बाजून वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. तिथून सरळ पुढे गेल्यास कोयनातळे व किल्याच्या दक्षिण बाजूस कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. कोयना तळ्याच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत.
गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार खूप मोठे असे बुरूज आहेत, त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्याला पश्चिम दरवाजा किंवा नाईकबा दरवाजा सुद्धा संबोधतात ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
गडावर दक्षिण बुरुजाच्या बाजूने अवघड पायवाटेने खाली गेल्यास एक कोणालाही माहित नसलेली एक मनुष्य बसून आत जाऊ शकेल अशी चोरवाट आहे. ती पुढे तिथे निघते अजूनही कोणाला माहित नाही.
#वसंतगडमागतोयमदतीचा_हात...
किल्ले वसंतगडवर असलेल्या नाईकबा दरवाज्या शेजारील तटबंदी ढासळलेय, अजून जर आपन दुर्लक्षित केले तर तो दरवाजा पण काही दिवसात ढासळन्याच्या स्तीथीत आहे..
नुसत फोटो स्टेटस ला ठेऊन किंवा नावासमोर शिवभक्त लाऊन काय होनार नाही ,
त्यां साठी कराव लागल काय तरी..
महाराजांचा सहवास लाभलेले हे गडकिल्ले आज अखेरची घटका मोजतायत ते वाचवन्यासाठी कशी का होईना पण मदत करा..
तिथ पर्यंत येऊ शकत नाही पण आर्थिक मदत तरी करु शकतोना आपण ?
हे गडकिल्ले जर आपण वाचवू शकलो नाही तर रामायण घडले होते का असे म्हनारे उद्या महाराज होते का? त्यांच्या अस्तित्वावर पण बोट दाखवतील,त्या मुळे आपणाला हे वैभव जपल पाहिजे,
#चलातरमगसगळेमिळूनकिल्लेवसंतगडचेगतवैभवपरतआणूयावसंतगडलानवसंजीवनीदेऊयात...👏🏻🚩
टीम वसंतगड ला आर्थिक सहा्य करण्यासाठी खालील तपशील पहा
खात्याचे नावं : टीम वसंतगड
बैंकेचे नावं : बँक ऑफ महाराष्ट्र .
खाते नंबर : 60332949964
Ifscode : MAHB 0000551
गुगल पे : 9022221503
अधिक माहितीसाठी संपर्क
दत्तात्रय जामदार: +91 9082982845
शाम ताकमोगे: +91 8625912058
टीम वसंतगड च्या कार्याशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक च्या माध्यमातून व्हाट्सप ग्रुप मध्ये ऍड होता येईल
chat.whatsapp....
किल्ल्यावर आल्यावर हॉटेल आहे तिथे जर नाश्ता, शाकाहारी जेवण (शाकाहारी जेवणासाठी आधी संपर्क साधावा) आणि ३ ते ४ जणांची राहण्याची सोय हवी असेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा..
प्रकाश साळुंखे: +91 9766491329, 8080528531
Route -
From Pune -
Pune - Satara - Umbraj - Talbid (Vasantgad) (152 KM)
From Mumbai -
Mumbai - Pune - Satara - Umbraj - Talbid (Vasantgad) (296 KM)
From Kolhapur-
Kolhapur - Karad - Talbid (Vasantgad) (84.7 KM)
Follow me on Instagram
/ girishpatankarvlogs
Like me on Facebook
/ girishpatankarvlogs
Follow me on Twitter
/ girishpatankarv
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod -Marklif Flexible Gorillapod + Tripod, Gopro 3-Way Grip Arm
Music:
KZbin Audio Library