Рет қаралды 126,807
६०हजार subscribers च्या निमित्ताने...
आज पर्यंत कोकणचे स्वर्गीय सौंदर्य दाखवणारे आम्ही अनेक व्हिडिओ केले.. सगळ्यांना कोकण किती संवेदनशील आणि समृद्ध आहे ते दाखवले..
आज तुम्हाला आमच्या तळ कोकणचे एक धगधगते वास्तव दाखवणार आहोत..
तुमच्या साथीने रान माणूस परिवार हळूहळू मोठा होतोय त्यामुळे आता आमच्या मूळ प्रश्नांना आणि भूमिकांना आपल्या समोर मांडायची वेळ आली आहे..
कोकण सुंदर आहे आणि हेच शापित सुद्धा.... ह्या नैसर्गिक सौंदर्य वती भूमी ला पैश्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेल्या हावरट मनोवृत्तीच्या लोकांनी लुटायला सुरुवात केलीय
होय मी बोलतोय " कळणे - रेडी" मायनिंग विषयी... गणपतीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका स्वर्गवत गावाला उध्वस्त करणाऱ्या मायनिंग लॉबी ला आमच्या भविष्याची काही पडलेली नाही पण आम्हाला आमचा कोकण उध्वस्त करायचा नाहीये...
आज पर्यंत आलेल्या अनेक विनाशकारी प्रकल्पांना इथल्या निसर्ग पुत्रांनी भविष्यातील दूरगामी परिणाम बघून प्राण पणाने विरोध केला पण मायनिंग लॉबी समोर आम्ही सगळे हरलो आहोत..
आमच्या राजकारण्यांना जनतेचे शाश्वत सुख कोकण चा निसर्ग इथल्या मुलांचे भविष्य आणि तरुणांच्या priorities काय असायला हव्यात ह्याचे देणे घेणे नाही...इथला तरुण स्व बळावर उभा न राहता तो गोव्यात मुंबईत किंवा डंपर चालुवन पोट भरेल इतकीच त्याची स्वप्ने सीमित नाहीत...
रेडी बंदर MINING ला दिला ,शिरोडा ताज ला दिला, आरवली फोमेंटो ला असे करत निवती भोगवे पर्यंत च्या जवळपास सर्व मोक्याच्या कोस्टल जमिनी काबीज झाल्या आहेत म्हणजे समुद्र किनारा पण आमचा नाही..
उरल्या सुरल्या नदी ,धरणे ,पाट बंधारे लगतच्या जागा केरळ वाल्यांनी घेऊन तिकडे जंगल साफ करून Monoculture आणले ..
डोंगर पोखरून खडी क्रशर सुरू झालेत ..म्हणजे डोंगर आपले नाहीत
वाळू वाल्यांनी वाळू काढून नद्या संपवल्या, चिरे वाल्यांनी सडे संपवले
तस्करी करून दुर्मिळ प्राणी संपवले..LED पर्ससीन वाल्यांनी मासे संपवले
अरे मग कोकण वाचवा म्हणजे काय वाचवा??
काय आहे ना मूळ मुद्द्यावर कोणी बोलतच नाही, अमेझॉन तोडायला घेतल म्हणून हळहळ व्यक्त करणारे स्वतःच्या गावातल्या नद्या आणि डोंगर वाचवू शकत नाही आणि म्हणे आम्ही कोकण चे वाघ..
(निसर्ग वाचवून कोकण ला जागतिक वारसा स्थळ म्हणून जपायला हवे..मानव जातीच्या शाश्वत भविष्यासाठी कोकण सारखे स्वर्गीय प्रदेश जपणे फार महत्त्वाचे आहे..आपले जीवन किती सुंदर आणि स्वर्गीय आहे ह्याची जाणीव स्थानिकांना करता यावी आणि कोकण चे कोकण पण जपण्यासाठी नव्या पिढीला शाश्वत दिशा देता यावी यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे हि अपेक्षा आहे......शक्य त्या परीने प्रयत्न करू...जे उध्वस्त झालंय ते पुन्हा मिळणार नाही पण जे शिल्लक आहे ते वाचवायला हवय..ह्यात माझा स्वार्थ खूप मोठा आहे 😊मला माझे संपूर्ण जीवन स्वर्गातच जगायचे आहे मेल्या नंतर तो मिळाला नाही तरी हरकत नाही)