नैसर्गिक जलव्यवस्थापनाचे ब्रिटिशकालीन मॉडेल| पाणीसमृद्ध गाव |Natural Water source Management

  Рет қаралды 200,958

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

तळ कोकणातील पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या एका पाणी संपन्न गावाची ही गोष्ट..
ह्या गावात एकूण वर्षभर प्रवाही असणारे ५३नैसर्गिक झरे आहेत .. सह्याद्रीतील प्रत्येक गावात ऊगमा कडे असे झरे आढळतील..ह्या गावाने मात्र ह्या झऱ्यांच्या पाण्याचे नीट व्यवस्थापन करून ते पाणी घरा घरात पोचवले...ह्या गावात कधीच पाणी टंचाई होत नाही ..गावात अगदी क्वचित विहिरी सापडतील त्यामुळे भूजल सुद्धा भविष्यासाठी संवर्धित राहिले आहे...
आज आपण पाहतो की डोंगराळ गावांमध्ये धरणे बांधून लाखो करोडो रुपये खर्च करून लोकांचे विस्थापन करून पाणी अडवले जाते.. . पाण्याचे हे असे नियोजन कधीच शाश्वत नाही...
ब्रिटिश काळात तयार केलेले सावंतवाडी संस्थान परिसरातील तांबुळी ह्या गावाचे पाणी व्यवस्थापनाचे मॉडेल कोकणातील सह्याद्री पट्ट्यातील इतर गावांमध्ये सुद्धा उभे करून उन्हाळ्यातील पाणी टंचाई दूर केली जाऊ शकते...गरज आहे ती पर्यावरण पूरक विचारांची आणि इच्छाशक्तीची..
निसर्ग जीवनशैली ला अबाधित ठेवून शाश्वत विकासाचे स्वप्न पाहूया...कोकणचे कोकणपण जपुया ❤️🙏
...रान माणूस
Follow us on
Fʙ: / konkaniranmanus
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
/ konkaniranmanus
#watermanagement #sustainableliving #कोकण

Пікірлер: 244
@vijayanandsalunkhe
@vijayanandsalunkhe 3 жыл бұрын
विडिओ बघून मस्तच वाटलं. पाणी ही गोष्ट किती महत्वाची आहे हे त्या लोकांना विचारा ज्या गावात पाणी आणायला पाच पाच किलोमीटर चालायला लागते. कोकणातली ही गावं बघून अत्यंत समाधान वाटलं की ही लोक निसर्गाला सांभाळतात आणि निसर्ग त्यांना सांभाळतो. मायनिंग चा विषय ऐकल्यावर अत्यंत वाईट वाटले, ही थोडी लोक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारायला निघालेत, अशाच काही लोकांमुळे आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न उभा आहे. ज्या लोकांनी उपोषण करून मायनिंग थांबवलं त्या लोकांच अभिनंदन.💐💐 मी बेळगाव ला राहतो कधी जर वेळ मिळाला तर नक्कीच या गावांना भेट देईन. धन्यवाद.
@bhushanparab8700
@bhushanparab8700 3 жыл бұрын
आज आमचं गाव यूट्यूब वर दाखवल खूप अभिमान वाटला स्थापेश्वर धबधबा सुध्दा खूप छान आहे आम्ही घरात बसलो की खालून वाहणाऱ्या ओहलाचा खळखळून आवाज येतो एवढी नीरव शांतता आहे आमच्या बागेत पण धबधबा आणि झरे आहेत घरासमोर हरीण आणि मोर आजसुद्धा नाचतात अभिलाष काका पण खूप छान काम करतात देवा पुन्हा जन्म देशील तर याच गावात कोंकणात महाराष्ट्रात जन्म दे हेच मागणे आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
@abhijitshinde6466
@abhijitshinde6466 3 жыл бұрын
Khup sundar comment❤️
@vandanapuranik9176
@vandanapuranik9176 3 жыл бұрын
शाश्वत आणि पर्यावरणपुरक पर्यटनाचा अतिशय नेटाने प्रसार करणाऱ्या प्रसाद आणि टीमला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 👍
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 3 жыл бұрын
प्रसाद, आज गुढीपाडव्याच्या दिवशी इतका सुन्दर तांबुळिचा नैसर्गिक व्हीडिओ पाहून नववर्षाची पर्वणीच मिळाली. या गावाच्या बाजुच्याच गावात राहून फक्त गावांचे नावाशिवाय कांहिच माहित नव्हते. तुझ्यामुळे तळकोकणाचे निसर्गवैभव सर्वांपर्यंत पोहचत आहे. तांबुळीकरांनो मायनिंग येउ देउ नका. कळणे माइनमुळे त्या परिसराचिच नव्हे तर ते जे रेडिपर्यंत नेताना पुर्ण रस्त्याची आणी बाजुच्या परिसराची दुर्दशा पाहू शकता. प्रसाद , तुला पुन्हा धन्यवाद . देव बरें करो.
@pradnyeshkanade303
@pradnyeshkanade303 3 жыл бұрын
सुधाकर सर अगदी बरोबर आहे तुमचं मत कोकणात मायनीग प्रोजेक्ट नकोच, कोकणचा कलिफोर्निया नाही झालं तरी चालेल पण आहे ते टिकवून ठेवणे आवश्यक आहे
@kesargondal4898
@kesargondal4898 3 жыл бұрын
निसर्ग खरंच जेथे ज्याची गरज आहे ते ते भरभरून देत आहे पण आपली झोळी च अपुरी पडत आहे आपणच आपले कुठेतरी जगण्याची पद्धत बदलायला हवे संपूर्ण जीवनपद्धती बदलली तर कुठेही गुलाम म्हणून नोकरी करण्याची गरज नाही एवढे समृद्ध आहोत फक्त आपणच स्वतः ला कमी लेखत आहोत.....जे जे चांगले आहे त्याला अजून चांगले करून आपली प्रगती करता येईल म्हणून आता खेड्याकडे वळण्याची काळाची गरज आहे प्रत्येक गावात काही ना काही त्याचे वैशिष्ट्य आहे तीच खरी संपत्ती दादा तुझ्या अथक प्रयत्नांना यश मिळू दे तुझ्यामुळे आपल्या आजच्या पिढीला कोकण अनुभवायला मिळते आहे.....
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
प्रसाद सर आणि दिलीप कदम काका यास अभिवादन....!!🙏🙏 ❤️ओघवती वाणी, प्रवाही विचार , छान सुंदर विश्लेषणात्मक विवेचन आणि मंत्रमुग्ध करणारे आरस्पानी पारदर्शक चित्रीकरण सातत्याने पहावयास मिळते असे माध्यम म्हणजे यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत असणारे सर्वेसर्वा, जनक आणि मार्गदर्शक प्रसाद गावडे सर यांचे ऑन अँड ओन्ली कोकणी रान माणूस..निव्वळ अप्रतिम...!!!❤️💪✌️🎥✌️💜💕❤️🥰💃💃💃💃💃 ❤️👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास जगप्रसिद्ध फिरकी गोलंदाज सर शेन वॉर्न यांनी आपल्या शैलीत गोलंदाजी करताना नेहमी चार ते पाच पावले पुढे यायचे आणि अचूक अप्रतिम रित्या कोणत्याही संघाच्या मातब्बर फलंदाजाला अवगत न होण्यासारखे फ्लायटर, बीमर, यॉर्कर, गुगली, फ्लिपोर अशी आपल्या भात्यातील अमोघ अस्त्रे यांचा छान कल्पक वापर करून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडवून एक प्रकारे आपली हुकूमत वर्चस्व किंबहुना आपली अफाट ताकद शक्ती याचे प्रदर्शन करून नेहमीच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला विजयी करावयाचे..👍❤️...तसेच मी इथे आवर्जून म्हणीन की सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत असलेल्या रान माणूस माध्यमाचे तथा चॅनेल चे सर्वेसर्वा, जनक आणि मार्गदर्शक प्रसाद सर vblogging क्षेत्रातील तथा त्या अनुषंगाने येणाऱ्या क्षेत्रातील किंबहुना जगतातील शेन वॉर्न आहे त्यांनी टाकलेले यॉर्कर आणि flipper कोणालाही सहसा खेळता येणार नाहीत ..अशक्यप्राय आहे. खेळायला गेलात तर कधी जशी माईक gatting कर्णधार असलेल्या इंग्लंड चे क्रिकेट संघाची बिकट दारुण अवस्था झाली होती तशीच होऊ शकते..अंतिम विजेता कोकणी रान माणूस ..✌️🎥✌️💃💃Keep it up Prasad Sir..👍Yo... Bravo गावडे सर...✌️🎥✌️💪 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@nileshpednekar4283
@nileshpednekar4283 3 жыл бұрын
विश्वास बसण्याच्या पलीकडे आहे हे सगळं. तुला आणि तूझ्या पूर्ण टीम ला लाख लाख धन्यवाद की हे तू शोधून काढलस💐
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम त्यांनी पाणी पुरवठ्याची जुनी पद्दत अजूनही जपून ठेवली आहे. आणि तू असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस. आणि मित्रा माझ्या गावलापण राजापूरला पण सेम अशीच पद्दत आहे पण ह्या नेत्यांनी आमच्या गावातील झऱ्या कडील ९१ एकर जमिनी ४ डोंगर पूर्ण हिरवीगार जंगलांनी भरलेले डोंगर सपाट करून काजूची लागवड केल्यामुळे आमच्या गावातील झरे आटत आहे आणि त्या डोंगरांला भेगा पडत आहे. आणि माझ गाव मुंबई गोवा महामार्गापासून ३,४ किलोमीटर आत आहे. आणि कोकणात जंगल तोडण्यास बंदी असल्यामुळे ह्या नेते आणि दलाल लोकांनी आतल्या जमिनी विकत घेऊन बागायत बनवायला सुरवात केली आहे. म्हणून माझा ह्या प्रकल्पानला आणि ह्या लोकांला नेहमीच विरोध आहे. आणि मी वाडीतल्या , गावातल्या लोकांला तरुण मुलांला जागरूक करत असतो
@rushikeshaherofficial2799
@rushikeshaherofficial2799 3 жыл бұрын
माणसा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे 🙏
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 3 жыл бұрын
प्रसाद गुढी पाडव्याच्या तुला शुभेच्छा. असे झरे मोकळे केले तर खूप चांगले. अगदी मिनरल वॉटर.
@bhimraochavan7686
@bhimraochavan7686 3 жыл бұрын
प्रसाददादा कोकणी रानमाणुस टीमला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा mh09 Kolhapurkar
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
According to me these people are the real heroes. I salute for their hardwork; patince and determination. And a very happy Gudipadwa. For all.
@rupalipatil9595
@rupalipatil9595 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ, आसेच पाणी राहू दे गावात,
@digambardalvi6868
@digambardalvi6868 3 жыл бұрын
प्रसादजी आपली माती व संस्कृतीच्या संवर्धनाचा आपला प्रयत्न खूप स्तुत्य आहे. खूप खूप शुभेच्छा
@jsumit647
@jsumit647 3 жыл бұрын
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@mamtamane
@mamtamane 3 жыл бұрын
खूप छान प्रसाद. तुझ्यामुळे कोकणातल्या लोकांचं जगणं आणि मंत्रमुग्ध करणारं तिथलं वातावरण अनुभवायला मिळतं. यात तुझ्या कथनशैलीचा देखील मोलाचा सहभाग आहे. तुझ्या प्रयत्नांमुळे कोकण अजूनही छान सुखसमृद्ध व्हावा ही शुभेच्छा.
@vishalbhalerao123
@vishalbhalerao123 3 жыл бұрын
गावचो सरपंच नंबर 1
@sganesh777
@sganesh777 3 жыл бұрын
प्रसाद तुझ्या या उपक्रमाला माझ्या परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा !
@kirandabke1956
@kirandabke1956 3 жыл бұрын
प्रसाद तुला तुझ्या व तुझ्या सर्व टीम च्या परिवाराला हिंदू नववर्ष आणि गुडीपडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा🚩🙏
@ujwalchakradev295
@ujwalchakradev295 3 жыл бұрын
मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🥰🙏🙏🙏
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 3 жыл бұрын
खूप छान सुंदर माहिती
@manishramdas
@manishramdas 3 жыл бұрын
प्रसाद आणि संपूर्ण रानमाणूस टिम च खुप खुप कौतुक की आपण खरंच खुप छान माहिती आमच्या पर्यंत पोचवत आहात 🙏 तांबुली गाव च विशेष कौतुक करायला हवे 👏👏👏👏👏 आपल्या संपूर्ण टिमला "गुढीपाडव्याच्या चैत्र पालवी सारख्या शुभेच्छा" 🌿🌺🌸
@baburaobabmbudkar7137
@baburaobabmbudkar7137 3 жыл бұрын
लेका खूप चांगली माहिती ..👌 कोकणाला मिळालेली ही एक नैसर्गिक देणगी हाय बघ ..
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 3 жыл бұрын
वाह , खुप सुंदर माहिती मिळाली, नैसर्गिकरीत्या मिळणारं हे पाणी ज्यांना लाभलंय ते खरेच भाग्यवान, आपलं कोकण अजुनतरी समृद्ध आहे आणि राहो, प्रसाद तुला आणि तुझ्या सर्व परिवारास नविन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹❤️👍🏻
@vinitadas7485
@vinitadas7485 3 жыл бұрын
खूप छान निसर्गाचे संरक्षण करत आहेत स्थानिक 🙏
@shantuss
@shantuss 3 жыл бұрын
प्रसाद आणि कोकणी राणमाणुस टिमला गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 खुप छान छान गोष्टी घेऊन येतोस तू.🙏
@hitenrane343
@hitenrane343 3 жыл бұрын
Farch sunder
@vilasraul9613
@vilasraul9613 3 жыл бұрын
तांबोळी गावा बद्दल सांंगेली गावातली जाणती मांणसा सांगत त्या गावात पाण्याची तदात नाय. आज प्रसाद तीया ही माहिती दील्या बद्दल धन्यवाद. तूका आणि तूझ्या सहकार्‍यांका गुढीपाडव्याच्या आणि मराठी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@chayakamble3917
@chayakamble3917 3 жыл бұрын
अजुनही निसर्गाची कृपा असलेली आणि या निसर्गाची जपणूक करणारी मंडळी आहेत हे पाहून खूप समाधान वाटले,खुप खुप शुभेच्छा!
@rohittnathpurtra6605
@rohittnathpurtra6605 3 жыл бұрын
तुम्ही जे दाखवत आहे ते अप्रतिम कोकणातील सौदर्य आहे, आसाच आपल्या कोकणातील निसर्गाचे सौदर्य दाखवा, व तुम्ही हे ज्या कविता बोलता कोकणातल्या त्या कोनाच्या आहे त
@1Naturalsolutions
@1Naturalsolutions 3 жыл бұрын
समर्थ रामदास स्वामींची आहे ती कविता. गीरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालिली बळे । धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥ गर्जतो मेघ तो सिंधु । ध्वनि कल्लोळ उठीला । कड्यासी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २॥ तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले । वात मिश्रीत ते रेणु । सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥ दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी । निबीड दाटली छाया । त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥ गर्जती स्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे । गडद होतसे रात्री । ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥ कर्दमु निवदेना तो । मनासी साकडे पडे । विशाळ लोटली धारा । ती खाली रम्य विवरे ॥ ६॥ कपाटे नेटक्या गुंफा । तापसी राहती सदा । नेमस्त बांधली नाना । उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७ ॥ विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे । कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ८॥
@sahilpatil7010
@sahilpatil7010 3 жыл бұрын
खुप छान माहिती 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 3 жыл бұрын
खूप छान. झर्‍यांचा गावाचा शोध मस्तच. तळागाळातील लोकांचा तुझ्यामुळे परिचय होतोयं. मी कुङाळची. पण तुझ्यामुळे कोकणचा खरा परिचय होतोयं. धन्यवाद.
@dhananjaysawant9168
@dhananjaysawant9168 3 жыл бұрын
Sawantwadi is the crown of all KOKAN region. I heartily request all of sawantwadikars to please keep this natural (God gifted) water resources till the end of planet. It is quoted by someone that next world war will be happened because of water. Thanks a lot Prasad dada for showing us this kind of water management system. Mining is a cancer of KOKAN. Let's we all Remove it as early as possible from our heavenly KOKAN.
@xtreemblink
@xtreemblink 3 жыл бұрын
हॉर्नबिल....(धनेश) डोळ्यात मावेना. एवढा मोठ्ठा...... मस्त काढलाय.
@balkrishnasawant452
@balkrishnasawant452 3 жыл бұрын
प्रसाद आणि टीमचं मनपूर्वक अभिनंदन.. खरंच कोकणास निसर्गानं अगदी भरभरून दिलंय पण वाईट एकंच वाटत तरुण मंडळींनी कोकणाकडे पूर्ण पाठ फिरवलीय... आजची तरुण पिढी जर शेती आणि पुरक व्यवसाय करतील तर कोकणाच नाव जगात होईल आणि हो सावंतवाडीतील केसरी गाव ही असाच पाण्याने समृद्ध आहे तिथे जाऊन या
@desaibandhu
@desaibandhu 3 жыл бұрын
प्रसाद खुपच सुंदर , अरविंद देसाई यांना गावी आलो कि भेटत असतो, तुलाही आक्टोंबर नंतर भेटेन आमची सांगेली येथिल जमिनी संदर्भात, तुझी मदत आवश्यक आहे. आनिल देसाई पुणे.
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
प्रसाद दादा खुप छान नविन नविन खुप छान 💐 प्रसाद दादा तुला गुढीपाडवा व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 तुझ चॅनेल खुप यश गाठो 💐💖
@ketanchavan5879
@ketanchavan5879 3 жыл бұрын
Nice vlog👍 Guddipadwa chya Hardik shubechya
@ajaypathak3237
@ajaypathak3237 3 жыл бұрын
Tu kharach bhava ek no aahes,yevdha sundar jaga ani tya gosticha vyasisth sangun amhala tyachi changli information detoy,tya Badal dhanywad.
@prashantjoshi8580
@prashantjoshi8580 3 жыл бұрын
गुढी पाडवा व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@sachinkhambe3054
@sachinkhambe3054 3 жыл бұрын
अप्रतिम पाण्याचे नियोजन , निसर्गानी समृध्द असलेल तांबुळी गाव खुपच छान निसर्गानी गावाला दिलेल्या पाणी रूपी आमृताचा ठेवा जपवुन ठेवा. आपल्यामुळे निसर्गाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे
@sonuchavan2538
@sonuchavan2538 3 жыл бұрын
गुढीपाडव्याच्या खुप खूप शुभेच्छा.. आणि तुझ स्वप्न लवकर पूर्ण होवू .. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎊
@uttareshwarsakhare7096
@uttareshwarsakhare7096 3 жыл бұрын
हेवा वाटतो अश्या रानमाणसाचा
@vamanzende8340
@vamanzende8340 3 жыл бұрын
Nice vedio..appreciate the effort taken to make it...Good work... Good content 👌
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
Very nice information ❤️❤️❤️❤️❤️
@aniketraul6990
@aniketraul6990 3 жыл бұрын
Jitke sundar jhare, Titke sunder gaav😍
@ravindrapotdar5910
@ravindrapotdar5910 3 жыл бұрын
कोकण खूप सुंदर ठिकाण आहे. नैसर्गिक जलस्रोत या विषयावरील चांगली माहिती या व्हिडिओमधून तुम्ही दिली. निसर्ग आणि पर्यावरण याविषयी तुम्ही नेहमी भरभरुन बोलता. फोटोग्राफी सुंदर आहे. तुम्हाला व तुमच्या टीमला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
@rupalimagdum9847
@rupalimagdum9847 3 жыл бұрын
किती किती सुंदर ...तो रस्ता ती सुंदर कौलारू घरं किती छान आहे ...I love kokan ...मला नेहमी कोकणातच फिरायला खूप आवडतं
@joyshingadia3117
@joyshingadia3117 3 жыл бұрын
Ranmanus you are doing very great work great 👍. Keep doing. Very nicely scripted, polished and well done work.
@kuldeepzore3647
@kuldeepzore3647 3 жыл бұрын
स्वर्ग......😍👌👌👌🙏🏻
@ganeshshelavaleGS1318
@ganeshshelavaleGS1318 3 жыл бұрын
Mast happy gudhipadva
@damodarchavan1947
@damodarchavan1947 3 жыл бұрын
खूप चांगली आणि उपयुक्त माहिती आहे,तांबुली गावाचं नाव जसं माहितीपूर्ण आहे ,तशीच पाण्याच्या झऱ्यांच्या उगमाबद्धल अधिक माहिती असावी,गावाचं अस्तित्व जाणवत नाही,फक्त तळी आणि थोडा परिसर दिसतो,निसर्गाचं भव्यपन जाणवत नाही,तसच गावचं सुद्धा, गैरसमज नसावा, जे जाणवलं ते लिहीलं,
@bhushanparab8700
@bhushanparab8700 3 жыл бұрын
Gavat Jaun pahav ekda mag Samjel Bhavypan Nahi pan aaj Sudha Gard jangal ahe anolkhi gela tr nakki chukel pach minittat gavch Bhavypan ky samjnar 100 ghranch Gav ahe AJ Sudha ithlya mandirat vagh yetat rastyavar haran sambarshing AJ suddha distat dhabdhbyach Gav mhnun prasiddha aahe satvahankalin Mandir ahe gavch Matra phkt BSNL cha 1signal milel evdhach network aahe mhnun baherchyanshi jast sambandh yet nahi
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
@@bhushanparab8700 network nahi te br ahe. kama purta bsnl yet ahe na.
@moreshwarchougule8621
@moreshwarchougule8621 3 жыл бұрын
This village people are real heros who are preserving such natural gifts from environment..nice 👌
@chetanghadigaonkar9292
@chetanghadigaonkar9292 3 жыл бұрын
अशी बाकीच्या गावणी हि पाणी ची संकल्पना केल्यानी तर गाव आजून समृद्ध होतीत ।। आभारी असावं प्रसाद गावडे तुमचे आम्ही यावर व्हिडीओ केलात त्या बदल👌👌👌👌
@archanaparab1534
@archanaparab1534 3 жыл бұрын
Ase zare amchya kaju chya baget ahet. Pan te zare naturally vahate thevle ahet. Yacha main reason wild animals na easily water available asave. Zolambe Dodamarg gavi suddha ase barech zare ahet Omprasad Gavas hya Ranvedya Taruna ne yacha video banwale ahe . Apratim ahe.
@siddhibange1196
@siddhibange1196 3 жыл бұрын
Jabarjast . Khupach chhan idea
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 3 жыл бұрын
हे सगळं अदभुत आहे आणि हो ही सगळी मंडळी नशीबवान आहेत.
@ajaypalande
@ajaypalande 3 жыл бұрын
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
@arpitaghawali886
@arpitaghawali886 3 жыл бұрын
प्रसाद खूप छान उपक्रम आहे तुमचा.अशीच उत्तरोतर प्रगती करत रहा.रान माणूस टिम ला खूप खूप शुभेच्छा 🙏
@pradnyasawant1778
@pradnyasawant1778 2 жыл бұрын
वा..खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...माझं माहेर आहे हे...त्यामुळे तर खूपच अभिमान वाटला आणि आनंद ही झाला...🙏🏻🙏🏻
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@sulbhasoman6569
@sulbhasoman6569 3 жыл бұрын
तुमचं सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं वाटतं. हे असं असेल अशी कल्पना सुध्दा नव्हती. शतशः धन्यवाद !! अनेक शुभेच्छा !!🙏🙏
@shraddhalad8472
@shraddhalad8472 3 жыл бұрын
Hello prasad खूप छान पद्धतीने तू कोकण दाखवतो मस्त . ही जी पाणी साठवायची पध्दत आहे ना साधारण अशीच माझ्या बाबा चे मित्र आहेत सावर्डे या गावात त्यांच्या वडिलांनी स्वतः विहीर खोदून पुर्ण गावाला पाण्याची सोय करून दिली खूप भारी आहे ते मला असं तुझ्यासारखा explain नाही करता येत but ते जे काही त्यांनी बनवलं ना खरच मानलं पाहिजे त्याना. तू खूप छान काम करत आहेस असाच करत राहा तुझ्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा🙂👍
@ashitoshvhanawade5460
@ashitoshvhanawade5460 3 жыл бұрын
स्वर्गातून सुंदर सौन्दर्य आणि जीवन 😊
@vinayrane5022
@vinayrane5022 3 жыл бұрын
Khupach chan. Mining la virodh karun gavacha shaswat vikas karnarya lokana kharach salam....
@Prasad_Creations1
@Prasad_Creations1 3 жыл бұрын
खूपच सुंदर! धन्यवाद प्रसाद! गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा!☺️💐💐
@chandrakantsawant4410
@chandrakantsawant4410 3 жыл бұрын
Kamal aahe yaar, wow!!
@jyteli7754
@jyteli7754 3 жыл бұрын
Mahadhanesh ha pakshi amchya gavi ajunahi aahe. Ha pakshyachya pankhacha awaj khup yeto jevha udat yeto tevha just like Fan. Khup motha aahe ha Pakshi. 🥰😍🤩😘 Mi Nashibwan kokani manus. Marathi Nav varshchya Hardik shubhechya bhau🤝🙏
@sameerjedhe5476
@sameerjedhe5476 3 жыл бұрын
खूप छान भावा. राजकारणी टप्लेलेच आहेत सगळे संपवायला .माझ्या शुभे्छा तुला ❤️
@user-vt5tw1wf6f
@user-vt5tw1wf6f 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय उत्तम व जबरदस्त काम करतोस मित्रा..... तुला शुभेच्छा... 🌹
@indianmompoonamn2111
@indianmompoonamn2111 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अप्रतिम विडिओ👌👌
@lalitaburse3346
@lalitaburse3346 3 жыл бұрын
👌कुठून शोधू2 काढतो रे पसाद दादा मस्त. किती आभार मानू जपणारे लोक व दाखवणार तु 🙏ललिता पुणे
@ramchandramohit1934
@ramchandramohit1934 3 жыл бұрын
Khup sundar prasad Thanks Asch video banvat raha
@satpaldurge7328
@satpaldurge7328 3 жыл бұрын
तुमच हे निसर्गात फिरायला जाण बघून... आम्हाला पण इच्छा होत आहे तिकडे याव... पण corona मुळे आम्ही येऊ शकत नाही... पण आम्ही नक्की येऊ तिकडे... तुम्हाला तुमच्या कार्यात खूप खूप शुभेच्छा तुम्ही जे निसर्ग दाखवत आहात त्या बद्दल तुमचे आभारी आहे 🙏🙏🙏
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 3 жыл бұрын
Kup sunder prssad aani timla paadvyachya kup kup subechaya 🙏👌👍
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 3 жыл бұрын
खूप छान Natural mineral water 👍
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 3 жыл бұрын
Kiti mast bgunch man prasnn
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 жыл бұрын
प्रसाद व्हिडिओ👍👍...खूप मेहेनत घेताय🙏
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 3 жыл бұрын
आज प्रसाद जे तू आम्हाला दाखवले आहे त्याचा आझून मला विश्वास बसत नाही असे काही आपल्या सिंधुदुर्गात असेल. म्हणून हा ब्लॉग मी तीन वेळा पहिला. माझे गाव वेंगुर्ला एप्रिल मे मध्ये विहीरीनी तळ गटलेला असतो. आणि एवढे सुंदर पाणीदार गाव माझा गावाचा शेजारी खर्च आमचा साठी एक स्वप्न आहे. Really Prasad you are great person. I like your all blog which have something new & knowledge able. God always bless you. Thank you Prasad.
@RahulPatil-fm5tr
@RahulPatil-fm5tr 3 жыл бұрын
तुझ्या व्हिडिओला अनलाईक करणाऱ्यांची खरच कीव येते चांगल्या गोष्टीला सुद्धा लोक कशी नाव ठेवू शकतात हेच समजत नाही
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 3 жыл бұрын
Pure natural environmental village water management system puree natural resources 👍👌👌👌👍
@ashishkatkar3832
@ashishkatkar3832 3 жыл бұрын
Navin varshachya hardik subheksha🙏
@amarmandlik999
@amarmandlik999 3 жыл бұрын
कोंकणी रानमाणुस टीमला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
@swatiparekhji
@swatiparekhji 3 жыл бұрын
Very happy to see this video. Please keep spreading the awareness folks, to protect the scosystem of the Sahyadris
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 жыл бұрын
जादुई आहे सगळ👍👍👍❤️
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 жыл бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद
@narayanbodke2269
@narayanbodke2269 3 жыл бұрын
This video deserv the 1000 plus comments
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 жыл бұрын
प्रसाद, नमस्कार. ताम्बुली गावातील पाणी व्यवस्थापन फारचं आवडलं. खरं तर ताम्बुली ह्या गावाशी माझ्या कुटुंबाचे गेल्या काही पिढ्याचे नातं आहे. मला आठवतं कि मी साधारण नऊ दहा वर्षाचा असताना ताम्बुलीला गेलो होतो . त्या हिरव्या गार जंगलाची व झऱ्यांची अजून आठवण येते. खरंच अभिमान वाटतो अशा वैचारिक दृष्टया प्रगत लोकांचा आणि त्यांच्या जीवनशैलीचा .
@snehabankar9556
@snehabankar9556 3 жыл бұрын
You are right. Really beautiful. 14 years ago I went there.
@yogeshparit6762
@yogeshparit6762 3 жыл бұрын
खरच खूप सुंदर
@shravanichawathe1358
@shravanichawathe1358 3 жыл бұрын
सावंतवाडीत नरेन्द्र डोंगरांवर मारुती मंदिर आहे तिथे हि असाच नैसर्गिक पाण्याचा नितळ झरा आहे तुम्ही तिथे असाल तर नक्की भेट द्या प्रसाद दादा इतकं सुंदर गार आणि चवदार पाणी आहे ....आम्ही बाटल्या भरून आणलं होत एकदम मिनरल water☺️
@kamleshshinde238
@kamleshshinde238 3 жыл бұрын
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ 🙏❤️
@s.g8818
@s.g8818 3 жыл бұрын
Lovely and nice
@danyshelar23
@danyshelar23 3 жыл бұрын
wow what a painting that was..
@nordicjeevan
@nordicjeevan 3 жыл бұрын
As mentioned about Finland here and research , Finland normal water quality is also better than bottled mineral water which is also proved in research. Finnish people drink water from tap and even in restaurant also which you may not see in most of the central European countries. Finland get water from snow and even Finland has lot of minerals. This i am talking from my own personal experience. Kokan learned from Finland about water, like that Finland should learn also from Kokan about mining business and people thinking to keep nature as natural as possible.
@surveysolution2992
@surveysolution2992 3 жыл бұрын
हाच सुमुरुद्ध वारसा झोपायला हवा आज कोकणामध्ये पुणे मुंबई येथील धनदांडगे लोक येऊन जागा खरेदी करून जमिनीची वाट लावत आहे.झाडे तोडून डेव्हलपमेंट च्या नावाने plotting करून विकले जातात
@yatinashar3854
@yatinashar3854 3 жыл бұрын
Kubh saras happy gudipadva
@pradeepgophane4692
@pradeepgophane4692 3 жыл бұрын
खूप चांगला विडिओ बनवला आपण
@anmolwadekar1229
@anmolwadekar1229 3 жыл бұрын
Gaav karayani ektra yeun zhilla parishade kade ek chota sa Hydroelectric plant chi mangni karuk hoyi . Jene karun gavak ji vij jaat rahvta tyacho traas phude hou naye
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 2 жыл бұрын
खूप खूप खूप छान. भाऊ मी तुझे खुप विडिओ पहिले. मन इतके सुकवले की काय सांगू. मला ओंगॅनिक जेवण आणि जीवन खूप आवडतं. पण मुंबईत ते कधीच शक्य नाही. तुला खूप छान काम करतोस. 👌👌👍👍👍
@shambhavsar7148
@shambhavsar7148 3 жыл бұрын
👌👌👌👌
@jaihind4320
@jaihind4320 2 жыл бұрын
Awesome Kokanchi lok
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
We need more n more water supply management. Thanks for sharing very fruitful info.👍👍👍👍👌👌👌👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 11 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 131 МЛН
गावाकडचा पावसाळा
11:44
SanjayDhokreVakighol
Рет қаралды 1,7 М.
Кто из девушек быстрее печатает?
0:58
Waka Waka 💦💃😁 #funnyshorts #rianashow
0:14
RianaShow
Рет қаралды 20 МЛН
Потоп из какашек??? @zackdfilms - автор анимации.
0:31
Время знаний
Рет қаралды 4,9 МЛН