No video

४३एकरातील "खाजगी अभयारण्या"ची सफर| Humans of Konkan :Nandu Tambe

  Рет қаралды 236,914

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

जंगल वाचवून निसर्ग पर्यटन करणाऱ्या अवलिया कोकणी सुपुत्राला भेट देण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा...
+91 99225 87001

Пікірлер: 313
@radhateli3837
@radhateli3837 2 жыл бұрын
असा निसर्गप्रेमी माणूस पहिल्यांदाच पहिले मी.. प्रसाद दादा तुम्ही लोकांना या धावपळीच्या जीवनापासून थोडं बाजूला सारून निसर्गावर प्रेम करणं शिकवता.. या तुमच्या प्रयनाला खूप खूप धन्यवाद ..
@mukeshkamble3983
@mukeshkamble3983 2 жыл бұрын
या भाई च्या विचारांशी, कार्याची,मी पूर्ण सहमत व समरस आहे. मी पनवेलमधील खैरवाडी येथे आदिवासी जागा नऊ गुंठे घेतली आहे. या ठीकाणी असलेली जैवविविधता मी जपून ठेवली आहे.
@sumitk2753
@sumitk2753 2 жыл бұрын
Ashe loka pratyek koknatlya gavat asayla havet Watlyat tyani paise nastil tar crowd funding(last option) karun kahihi krun jungle gheun protect kela pahije. Maharashtra khup pramanat commercialised hot aahe tourism(if overpopulated with restaurants like goa) or MIDC sathi.
@authenticswad923
@authenticswad923 2 жыл бұрын
खूप चांगली गोष्ट आहे.
@ramdaskale1444
@ramdaskale1444 2 жыл бұрын
Good Job ...दादा
@sarjeraoichake6154
@sarjeraoichake6154 2 жыл бұрын
वन जमिनी आहेत का त्या ... घेता येतील का ... मला पण झाडे लावायची खूप आवड आहे
@tejaskondgekar5509
@tejaskondgekar5509 Жыл бұрын
Kiti rupees la vikat ghetlit tumhi sangu sahkta ka
@ranjananarvekar2062
@ranjananarvekar2062 2 жыл бұрын
प्रसाद, खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर जंगलाची सफर घडवून आणल्याबद्दल. नंदूजींचं काम खूप कौतुकास्पद आहे. त्रेचाळीस एकर जंगल जोपासणं हे सोपं काम नाही. त्यांच्या या कामगिरीला त्रिवार वंदन.
@15__.xyz__.
@15__.xyz__. 2 жыл бұрын
नंदुजींच खुप खुप अभिनंदन आणि पुढिलवाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@pravinsannake1779
@pravinsannake1779 2 жыл бұрын
👍
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 2 жыл бұрын
प्रसाद मीत्रा, खरंच खुप ग्रेट आहे नंदुचं जंगल. जंगल जपण्यासाठी त्याची जी तडफ आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. सलाम या अवलीया माणसाला आणि तुझे खुप खुप आभार तु आमची भेट घडवून दिल्याबद्दल.
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 жыл бұрын
पैशांच्या मोहापासून दूर जाऊन मनाचा आवाज ऐकून निसर्ग जपण खरंच ग्रेट माणूस... नंदू दादा खूपच छान काम करत आहात तुम्ही...
@sundeepmujumdar
@sundeepmujumdar 2 жыл бұрын
४ वर्षांपूर्वी आम्ही नंदू तांबेला भेटलो आणि तिथे राहून त्याच्या बरोबर जंगलात भटकंती केली होती. अविस्मरणीय अनुभव.
@ramhanuman1111
@ramhanuman1111 2 жыл бұрын
🙏🌹अशी माणसं म्हणजे निसर्गाची सेवा करणारे संतच आहेत 🌹🙏
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 2 жыл бұрын
कोकण वाचवायचं असेल तर नुसतं बोलून नाही तर ते वाचवण्यासाठी असे प्रयत्न खुपचं मोलाचे आहेत आणि इतर तरुणांनी यातून प्रेरणा नक्की घ्यावी आणि आपलं कोकण वाचावं आणि पर्यटन व्हावं छान उपक्रम
@Scorpio-on1sl
@Scorpio-on1sl 2 жыл бұрын
त्या कोकणवास्तू चॅनलला कोकणातील लोकांनी डोक्यावर चढवलय...मी स्वतः शेतकरी आहे .. मागच्यावेळी माझ्या बाबांनी कोकणवास्तूला कॉल केला होता ..कारण माझी जमीन विकायची होती ...या कोकणवास्तूने जागा न पाहता फोनवरूनच आमच्या जागेची किंमत पाडून मागत होते ..आमच्या जागेत काजू , साग , आंबा कलमे रतांबा अशी झाडे आहेत ..हे सगळ सांगून सुद्धा माझ्या जागेची किंमत कमी करत होते ..25 हजार रुपये गुंठा .???? ही माझ्या जागेची किंमत ठेवली या कोकणवास्तूने ...पण मी स्वत जर Valuation केली तर झडांसहित 55 हजार रुपये गुंठा दर होतो ...या कोकणवास्तू मुळे कोकणातील जमिनींना किंमत राहिली नाहीय ..म्हणून हेंच्यासारख्या एजंट लोकांमुळे परप्रांतीय घुसलेत कोकणात ...अरे शेतकरी जगायला नको का.?? शेतकऱ्याला पैसे नको का..!?? 15-20 लाखांची गाडी घेऊन फिरणारे कोकणवास्तूचे ग्राहक ..जमिनी कवडीमोल दराने 5 -6 लाखांत विकत घेतात...या लोकांना जमिनीसाठी 20 लाख घालता येत नाही का..??? यांच्या गाड्यांचे life 10 वर्ष येणार ..आणि आमच्या जमिनी या कोकणवास्तू चे ग्राहक पिढ्यान् पिढ्या खाणार ...मग आमच्या जमिनीची किंमत किती असायला हवी??? या कोकणवास्तूमुळे जमीन खरेदीदार जास्त पैसे द्यायला बघत नाहीत ..कारण या चॅनल ने आधीच कोकणच्या जमिनीची किंमत स्वस्त करून ठेवलीय...😠 एक शेतकरी जमीन विकतो कारण त्याला गरज आहे ...25 हजार रुपये गुंठा या थुकरट दराने कोकणातील जमिनीचा दर ठरवता.?? तुम्हाला लाज वाटत नाही.?? हीच जमीन मुंबई मध्ये असती तर काय दर लावला असता.??चॅनल ला view आणि customer मिळावा म्हणून आमच्या जमिनीचे दर कमी करणारी कोकणवास्तू गँग ...लक्षात ठेवा असे गरीबांचे पैसे जास्त दिवस राहणार नाहीत तुमच्याकडे ...नेहमी ग्राहकांचा विचार करता पण कधी कधी विक्रेत्यांचा पण विचार करा... कोकणातील जमिंनींची किंमत कोकणवास्तूमुळे कमी झालीय ...आम्ही इतर चॅनल पाहिले पण ते असं कोकणवास्तू सारखी थुकरट काम करत नाहीत ...😠😠
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 2 жыл бұрын
@@Scorpio-on1sl प्रत्येकाला योग्य आणि अयोग्य जे काही वाटतं त्या प्रमाणे तो प्रतिक्रिया देतो ,तुझा प्रॉब्लेम कोकण वास्तू वाल्याशी आहे त्यामुळे तो त्याशीच बोलून सुटणार आहे त्यामुळे तू त्याच्याशी बोल
@Scorpio-on1sl
@Scorpio-on1sl 2 жыл бұрын
@@rajeshsawant2924 हा माझा problem नाही...हा कोकणातील प्रत्येक जमीन विक्रेत्यांचा प्रॉब्लेम आहे ... कोकणवास्तूने कोकणातील जमिनीचे दर कमी केलेत...आणि याचा फायदा परप्रांतीय लोक घेत आहेत ...कोकण स्वस्त दरात विकायला काढल आहे कोकणवास्तू ने...जरा एक असाच कॉल करून बघा तुम्ही त्यांना ...त्यांना बोला माझी जमीन विकायची आहे ...काय सांगतात बघा ...कसा दर पाडून मागतात ... अहो माझ्या जमिनीत साग आंबे काजू आहेत ...एका सागाची किंमत 15 हजार होतेय असे 26 झाडे आहेत फक्त सागाची ...मी यात आंबा काजू पकडतच नाही आणि कोकण वास्तू ने माझ्या जमिनीचा दर 25 हजार गुंठा ठेवला ...असच तो प्रत्येक शेतकऱ्यांसोबत का करत नसेल..??? हा प्रॉब्लेम कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याचा आहे ....अगदी तुमचा सुद्धा ..
@rajeshsawant2924
@rajeshsawant2924 2 жыл бұрын
वाड वडिलांनी राखलेल्या जमिनी विकायच्या कशाला ,तो दुसऱ्याच्या विकत घेतो आणि आपण आपली राखू शकत नाही याच्या पेक्षा वाईट काही असू शकत नाही वाड वडिलांनी राखलेल्या जमिनी विकून सोन्याच्या अंडी देणारी कोंबडी आपण कापून खातोय ,जो हाडाचा शेतकरी असेल तो पैसा साठी कधीच जमीन विकणार नाही जमीन ते विकतात त्यांना काही कष्ट न करता आयत हवं ,जमीन विकून गाड्या घ्यायचा आणि मोठेपणा करायचं किंवा जमिनीचे दलाल आज विकत घ्यायची आणि चड भाव मिळाला तर उद्या विकायची ,आपली जमिन न विकता मेहनत करून काही करावं अशी इच्छा नाही ,परप्रांतिय विकत घेतायत ते मूर्ख म्हणून घेत नाहीत त्यांना भविष्यात त्याच्या काही तरी फायदा आहे म्हणूनच घेत आहेत हे आपल्या अति शहाण्या लोकांना कधी कळणार
@dr.sanjaypatkar2527
@dr.sanjaypatkar2527 2 жыл бұрын
कोकणवास्तू Properties सोबत आलेला एक माझा अनुभव इथे लिहितो ...जो फार गंभीर आहे आपल्या कोकणासाठी ..कारण मी कोकणप्रेमी आहे... मी एकदा कोकणवास्तुला fake Call केलेला ..आमचं संभाषण हिंदी मधूनच होत ..त्यांना विचारल हॅलो सर मी गुजरात हून बोलतोय..मला कोकणात 70-80 एकर एक क्षेत्री जागा हवी आहे ती सुद्धा कमी किमतीत ...कोकणात कुठेही मिळाली तरीही चालेल पण हायवे , स्टेशन , बाजारपेठ यापासून 30 km च्या आसपास असेल तर उत्तमच ...आणि आम्ही सर्व ग्रुप ने जमिनी खरेदी करणार आहोत..तर अशी जागा कमीतकमी किमतीत आहे का तुमच्याकडे??? त्यावेळी कोकणवास्तू मला म्हणाले ..सर आमच्या कडे तुमच्या बजेटमध्ये सुद्धा जमिनी उपलब्ध आहेत तर आपण site व्हीजिट केव्हा करत आहात .? त्यानंतर एक प्रश्न केला मी कोकणवास्तूला की तुमच्या कोकणात असं काही नाही ना की कोकणातील जमिनी परप्रांतियांना विकायच्या नाहीत .. असं काही आहे का तुमच्या कोकणात.??.तेव्हा कोकणवास्तू ने छान अस उत्तर दिलं की कोकणवास्तू Bussines मध्ये जात पात पाहत नाही ...आमचा ग्राहक आनंदी तेव्हा आम्ही आनंदी ..मग तो ग्राहक कोणताही असो ..तर सर आपण site visit केव्हा करत आहात.?? मी धन्यवाद बोललो आणि कॉल कट केला ..याच रेकॉर्डिंग त्यांच्याजवळ नक्कीच असणार ...कदाचित हा msg वाचल्यावर ते चेक पण करतील ..असो त्यामुळे मला हे त्यांचं बोलन आवडलही आणि थोड खटकल सुद्धा ..कारण कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा ठरलेली असते त्यामुळे सगळीकडे पैसाच पाहायचा नसतो ... मी हा प्रयोग कोकणवास्तु वरच केला नाही तर आपल्या कोकणात कोकणवास्तू सारखे फार सुंदर चॅनल आहेत ज्यांचा मला इथे अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो .. जसं की कोकण प्रॉपर्टी expo , Pride Kokan या चॅनल ने तर सरळ सरळ मला नकार दिला...म्हणाले आम्ही परप्रांतियांना जागा विकत नाही ..इतकं सरळ सरळ मला स्पष्ट सांगितलं या दोन्ही चॅनलने ..कोकणात आणखी काही छोटे छोटे प्रॉपर्टी चॅनल आहेत त्यांना सुद्धा मी कॉल केला तर त्यांनी मला होकारच दिला ..म्हणाले सर आमच्याकडे 100-200 एकर जमिनी विक्रीसाठी उपलब्ध आहेत...मला आता त्या चॅनलची नावं आठवत नाहीत ...पण त्यात एक सिंधुदुर्ग properties चॅनल होता ..ते एक नाव मला आठवतय कोकणवास्तूला व इतर चॅनलला एक विनंती आहे की अश्या कवडीमोल दरात जमिनी विकू नका ...त्यामुळे कोकणच्या जमिनीच महत्व हे तुमच्या चॅनलद्वारे कमी होत आहे ..हे कुठेतरी थांबायला हव..पैसा काय येत जाईल पण जमिनी परत येणार नाहीत .. 🙏कृपया पैश्यासाठी परप्रांतियांना जमिनी विकू नका 🙏
@prasadk6204
@prasadk6204 2 жыл бұрын
मी सहकुटुंब इथे गेलोय.खूपच भारी आहे. पण काही गोष्टी कोकणच्या पर्यटन व्यावसायिकानी बदल कराव्यात,त्यामध्ये हे सगळं पाहण्याचे जे दर आहेत ते अवाच्या सवा आहेत,समजू शकतो की मेंटेनन्स असतो पण तरीही अतिशय महागडे आहे हे.शिवाय आपण एवढे रेट्स घेता तर दुपारी ट्रीट म्हणू पिठलं-भाकरी एवढा साधा आहार द्यायला काहीच हरकत नाही.हे गाव,जंगल अत्यंत दूरवर आहे,जवळपास हॉटेल नाही.अशावेळी चहा,पाणी,नाश्ता किंवा फक्त झुणका-भाकरी देणे ही गरजेचं आहे. ज्याला परवडते त्यानं यावं,नसेल त्यांनी येऊ नये हा दृष्टिकोन न ठेवता अतिशय सामान्य माणूस,त्याचं कुटुंब,मुलं याना घेऊन योग्य दरात पाहण्याची सोय असेल तर निसर्गाच्या रक्षणाची खरी जबाबदारी ज्या अतिसामान्य नागरिकांवर जास्त आहे त्याच हेतू सफल होईल.
@ramhanuman1111
@ramhanuman1111 2 жыл бұрын
अगदी बरोबर समाजसेवा म्हणून मानसिकता असावी, तरच खरी समाज सेवा
@rajansakharkar4200
@rajansakharkar4200 2 жыл бұрын
i agree with both your comments only catering to the uber class is a turn off.
@ashishpingle9812
@ashishpingle9812 2 жыл бұрын
Good comment.
@shantanukaduskar6414
@shantanukaduskar6414 2 жыл бұрын
Great नंदू भाऊ आणि प्रसाद जीवनाचे सार आणि वृत्ति दोन्ही अतिशय कमी शब्दात सांगितले,प्रत्येकाला जीवनात कसलातरी हव्यास असतो
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 2 жыл бұрын
आपल्या कार्यात भरपूर मनःपूर्वक प्रगती होत राहो हीच सदिच्छा,
@trivenimedicalgen.storce704
@trivenimedicalgen.storce704 2 жыл бұрын
खूप छान वाटले जंगल परिसरातील जैवविविधता पक्षाचे आवाज तसेच विविध झाडे व माहिती प्रत्यक्ष जंगलात फिरायला आलो असा भास झाला
@manodnyamhatre5912
@manodnyamhatre5912 2 жыл бұрын
अप्रतिम. जंगल आहे तसेच रहावे नाही तर ते जपण्यासाठी आपले असावे it's great thinking 👏👏👏
@shyampawar700
@shyampawar700 2 жыл бұрын
पक्ष्यांची किलबिल ऐकून कान धन्य झाले खरच खुपच छान 🙏
@radhateli3837
@radhateli3837 2 жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात माणसाच्या जीवनाचं सार्थक आहे हे या निसर्गप्रेमी माणसाकडून शिकायला मिळालं..
@vikramdesai5632
@vikramdesai5632 2 жыл бұрын
This is perfect destination and hats off to Nadu Dada for living such life in reality with self made sanctuary👍👍👍
@vishnubargode3825
@vishnubargode3825 2 жыл бұрын
प्रसाद प्रथम तुला धन्यवाद, आपल्याला असून दिसेना अशीच आजकाल प्रत्येक माणसांच झालंय, बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. तुझ्या विचारात असलेला निसर्ग जर लोकाना दिसला तर कोकणात नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही.आपण फक्त माझ माझ म्हणतो पण निसर्ग नियमांनुसार वागणूक ठेवत नाहीत. नंदूजी जे काय करतायत त्याचे थोडे जरी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तरी फार मोठं काम होईल. सुंदर विडिओ आणि सफर.
@vireng4304
@vireng4304 Жыл бұрын
Jo Nisarg Vachvto To khara DevManus!! Nandu Tambe dada Tula kharach Salaam!!!👍❤️🙏
@Mohak123-i4u
@Mohak123-i4u 2 жыл бұрын
कोरोना मध्ये जग झोपले होते तेव्हा मी झाडे लावत होतो वा दादा छान
@swapnilagiwale6078
@swapnilagiwale6078 2 жыл бұрын
जंगलावर इतकं प्रेम करणारा माणूस पहिल्यांदा पाहिला किती मोठ काम करत आहेत पण थोडाही अभिमान नाही पण आम्हाला तुमचा अभिमान नक्की आहे नंदू दादा सलाम तुम्हाला
@medharaorane4503
@medharaorane4503 2 жыл бұрын
खूपच छान .जंगल ही सुंदर वाटत जेव्हा शांतता हवी असते. जंगलाला स्वताचा वेगळा आवाज असतो. न पाहिलेल्या पाखरांचे आवाज ऐकून कीती शांत वाटत. Great job 👍
@harshaldicholkar4419
@harshaldicholkar4419 2 жыл бұрын
खूप बरं वाटतं जेव्हा आपल्या सारखे विचारांची माणसे भेटतात. आणि अभिमान वाटतो की मी माझे विचार अवलाभण्या पूर्वीच कोणी समविचारी माणूस त्या योजना पूर्ण्यावेस नेतो. अभिनंदन मित्रा.
@deepakkadam4423
@deepakkadam4423 2 жыл бұрын
खुप छान काम करत आहात.पुढील वाटचालीसाठी नंदू यांना अनेक शुभेच्छा.
@nandakumarmhapsekar4477
@nandakumarmhapsekar4477 2 жыл бұрын
नंदू sabaka बंधू चालू ठेव तुझे काम तुझ्या पाठीशी आहे राम! ग्रेट जॉब, salute to नंदू आणि प्रसाद z.
@bhushanpendhar4555
@bhushanpendhar4555 2 жыл бұрын
मला वाटलं निसर्गावर प्रेम करणारे फक्त आदिवासी लोकच आहे . आज तुमची व्हिडिओ पाहून मनाला आनंद झाला . कोणीतरी निसर्ग वाचवण्यासाठी झटत आहे. वेळ मिळाला तर नक्की आमच्या आदिवासी भागात या. विविध जातीचे असंख्य झाडे आहेत जी तुम्ही तुमच्या जंगलात लावू शकता. निसर्गच सर्व काही आहे
@yogidude1
@yogidude1 2 жыл бұрын
स्तुत्य..अप्रतिम👌 अश्या लोकांना सरकारने मदत केली पाहिजे
@shreekrushnagaykar4416
@shreekrushnagaykar4416 2 жыл бұрын
अद्भुत,थोड्या वेळासाठी जंगलात गेल्याचा अनुभव आला.
@vedikazunjarrao7582
@vedikazunjarrao7582 2 жыл бұрын
Tumhi khup chhan prakalpa hati ghetla aahet. Punya karma aahe. Lots of blessings
@jatutube123
@jatutube123 2 жыл бұрын
नंदुभाऊचं काम आणि ज्ञान अफाट आहे. तसंच तुमच्या हातात श्री. दिलीप कुलकर्णी यांचे 'निसर्गायण ' पुस्तक पाहून अतिशय आनंद झाला. मी या पुस्तकाचे 3/4 वेळ वाचन केले आहे. अगदी पारायणे केले म्हणालात तरी चालेल.
@shivprasadgavli8204
@shivprasadgavli8204 2 жыл бұрын
नंदू सर खूप ध्येय वेडआहे तुमच्याबद्दल खूप आदर वाढला आणि प्रसाद अश्या माणसांची ओळख करून देतो त्यामुळे त्याचेही आभार
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Жыл бұрын
नंदु नंदनवन बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी आपण आपल्या कोकणात पर्यावरण जपली आहे याचा अभिमान आहे निष्ठावंत निसर्ग प्रेमी मानाचा मुजरा करतो,,
@amolpatil9016
@amolpatil9016 2 жыл бұрын
Great work Nandu Dada . Thanks Prasad awdhya chan nisarga asach dakhwat raha. Doghanna khup khup shubhecha.
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 2 жыл бұрын
प्रसाद दादा धन्यवाद देतो, स्वप्नातही वाटले नव्हते की असे नंदू दादाची भेट होईल म्हणून ती प्रसाद दादांनी घडवून आणली आणि नंदू दादांच्या प्रेमात पडलो व निसर्ग वेड लागलं आहे. नंदू दादा तुमच्याबद्दल बोलायला शब्दाचं शिल्लक नाहीत आमच्याकडे मात्र तुम्ही निसर्गवेड लावले आम्हाला. खरच मनापासून आभार मानू तेवढे तुमचे कमीच आहेत. आज झोप मनापासून शांत लागेल आणि नंदू दादांचे निसर्ग प्रेम दिसेल. मान प्रसन्न होऊन स्वप्न रंगणार आज.
@madhurimendse1699
@madhurimendse1699 2 жыл бұрын
शाब्बास🙌 नंदू, तुझे अभिनंदन, कौतुक व शुभेच्छा. तुझ्या सारखे लाखो नंदू हवेत
@sachingaonkar8105
@sachingaonkar8105 2 жыл бұрын
नंदू भाऊ जबरदस्त .. प्रसाद दा धन्यवाद ..
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 2 жыл бұрын
वा खूप छान भाऊ असच तुम्ही जंगल विकत घेत रहा आणि जंगल सुरक्षीत वाढवत रहा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि प्रसादला पण असेच विडयो बनवत रहा
@siddheshteli
@siddheshteli 2 жыл бұрын
अगदी योग्य वेळी योग्य व्हिडिओ आलंय प्रसाद... Thanks 🙏 पावसाळा अगोदर रस्त्याच्या दुतर्फा काही वृक्ष लागवड करायची आहे त्यासाठी दादांचं मार्गदर्शन घेणं नक्कीच फायदेशीर ठरू शकेल 🙏
@aniruddhapendse253
@aniruddhapendse253 2 жыл бұрын
खूप छान ,उपक्रम. निसर्गात् रहा जोडलेले रहा आसा प्रकल्प भेट म्हणून पहवायस् नक्की आवडेल.धन्यवाद प्रसाद व नंदू जी।
@CodeRED008
@CodeRED008 2 жыл бұрын
Dada tumhi khup bhari kam kartay
@ajinkyajanhavi7693
@ajinkyajanhavi7693 2 жыл бұрын
अप्रतिम मित्रा अभिनंदन नंदू सर आणि प्रसाद👍 मन प्रसन्न झाले
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
प्रसाद मस्तच नंदू म्हणतो त्याप्रमाणे निसर्गामधील उत्तम ते जपलं च पाहिजे म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे शाश्वत पाहिजे छान नंदूच्या कार्याला सलाम धन्यवाद असेच चालू राहू दे
@vikrampol8896
@vikrampol8896 2 жыл бұрын
छान विडीओ अस प्रेम निसर्गाशी सर्वानी करयला पाहिजे.हा विडीओ बघून जंगल तोड करनारयांनी याच्या पासुन कांहीं शिकल पाहिजे.👌👍🙏😊🏞
@dineshpatil9850
@dineshpatil9850 2 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य आणि मैहनत 👌👌👌👌💯💯💯😍💐🥳
@priyapimprikar1970
@priyapimprikar1970 2 жыл бұрын
Thanks Prasad for introducing such wonderful people with us.
@hakunamatata8923
@hakunamatata8923 2 жыл бұрын
कीती छान बोलता तुम्ही शांत निवांत 😇
@vasundharasherkar7862
@vasundharasherkar7862 2 жыл бұрын
This man is living life which i want 😭
@kanchanpurhaighschool
@kanchanpurhaighschool 2 жыл бұрын
Vasundhara नावा प्रमाणेच 👌
@seaman.rigved
@seaman.rigved 2 жыл бұрын
You can create your own Urban forest.
@anant4637
@anant4637 2 жыл бұрын
झाडांच्या सानिध्यात मेडीटेशन...अप्रतिम. पाहतानाच एवढ छान वाटतय प्रत्यक्ष अनुभुती तर अवर्णनीयच असणार...
@band0pant
@band0pant 2 жыл бұрын
बोलायला काही शब्दच नाहीत..🙌 #अवलिया माणूस
@milindrane4995
@milindrane4995 2 жыл бұрын
सुंदर काम करत आहेत... धन्यवाद
@deepadabhne9073
@deepadabhne9073 2 жыл бұрын
खुपच छान मोलाच काम तुम्ही करत आहेत.
@ketansonavadekar3112
@ketansonavadekar3112 2 жыл бұрын
तुझे व्हिडिओ बघून नेहमी छानच वाटतं असेच व्हिडिओ बनवत जा खूप बर वाटत
@kshitijkakade9631
@kshitijkakade9631 2 жыл бұрын
Thank you . आम्हाला प्राणवायू देण्यासाठी!
@sanket2448
@sanket2448 2 жыл бұрын
जबर्दस्त काम 🙏
@indian5720
@indian5720 2 жыл бұрын
अतीशय स्तुत्य उपक्रम, आपले कार्य जंगल वाढवन्याचे मानवीय कार्य असेच अविरत सुरू राहो व यातून इतरांना ही प्रेरणा मिळावी हीच सदिच्छा व आपले अभिनंदन.
@rajkumarbiradar973
@rajkumarbiradar973 2 жыл бұрын
भाऊ तुझ्या कार्याला मानाचा मुजरा.
@prashantdeshpande8177
@prashantdeshpande8177 2 жыл бұрын
Nandu is great!! Doing wonderful and commendable work.Always love visiting and staying with him.Wishing him success and good luck in his untiring mission.
@vinayakparab04
@vinayakparab04 2 жыл бұрын
खूपच सुंदर छान.... मित्रा अजून detail मध्ये विडिओ बनवना या ठिकाणचा.खरोखर हा माणूस स्वर्गात राहतोय.खूप छान माहिती.
@prakash9782
@prakash9782 2 жыл бұрын
pakshancha aavaj ani rat kidyanchi kirkir manala bhavali , lahan asatanache jangalat firnyache divas athavale 👌👌❤️❤️❤️
@rahulmore1831
@rahulmore1831 Жыл бұрын
खूप छान काम करत आहेत दादा तुम्ही
@sauravbhat6046
@sauravbhat6046 2 жыл бұрын
Exactly hech maz jivnach lakshya hot.। Mla wataych ki swatch jungle asav.। This is like drea come true.।
@ranjeetkumbhar3758
@ranjeetkumbhar3758 2 жыл бұрын
खूप छान वाटत आपलं काम, निसर्ग जपावा हीच खरी निसर्गा ला आपली परत फेड आहे .....नंदू दादा महान् आहे त
@swatikshemkalyani3977
@swatikshemkalyani3977 2 жыл бұрын
खुप सुंदर, बोलायला शब्दच नाहीत
@hemantpathak8472
@hemantpathak8472 2 жыл бұрын
छान नक्की येउ
@vaibhavsawant3740
@vaibhavsawant3740 2 жыл бұрын
खूप छान उपक्रम
@digambarnimkar2339
@digambarnimkar2339 2 жыл бұрын
Truly forest lover Nandu Tambe
@5a14arundhatichavan9
@5a14arundhatichavan9 2 жыл бұрын
नंद कुमार साहेब तुम्ही फार मोठ . काम करता आहात🙏🌴🌳🌴 प्रसाद तुमका माय मोघाचो यवकार मोघ आसूनी🙏🌴🌳🦅🌳🌴🙏👍
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
गावा गावात नदु दिसला पाहीजे नमस्कार छान विडीओ ऊतम
@HimalyanVoyagerSpirit
@HimalyanVoyagerSpirit 2 жыл бұрын
Prasad 1 Number..... Baghun Anand Zala
@sumitk2753
@sumitk2753 2 жыл бұрын
at 10:41 point thats the same thing i feel. Whenever i see some mountain is getting messed for the soil which is furhter used for the levelling of Mumbai Goa highway i feel so bad. So i also feel that all the trees and jungles must stay otherwise if some rich man is going to buy it just for real estate purpose thats when i feel that i shud also earn so much that i will buy jungles otherwise a plen land and then will restore jungles. While watching this video i saw my future self in Nandu Tambe sir.
@vinayaksolapure2286
@vinayaksolapure2286 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली,प्रसाद इतर छंदा प्रमाणे जगलं जोपासणे हा छंद होऊ शकतो हे कोतुकास्पद आहे,कुठे आहे कसे जायचे,संपर्क कसा करायचा ही माहिती व्हिडिओत मिळाली असती तर प्लांनिंग करता येऊ शकते त्या मुळे ती माहिती पण देत रहा.परत एकदा धन्यवाद.
@swapnalisalvi5092
@swapnalisalvi5092 2 жыл бұрын
Khup chhan vatale pahun .🙏👌 manala samadhan milale.
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 2 жыл бұрын
माणूस अवलिया असेल तरच असे काम करू शकतो, keep it up
@anupritasawant8500
@anupritasawant8500 2 жыл бұрын
खुप छान आहे मस्त छान सुरेख आहे किती छान 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@shirishkulkarni2375
@shirishkulkarni2375 2 жыл бұрын
तुमची सांगण्याची पद्धत फार आवडली.
@sangamsawant7700
@sangamsawant7700 2 жыл бұрын
छान ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो नंदू तांबे जंगल वर कोण व्हिडिओ बनवत आहे की नाही
@hareshparab961
@hareshparab961 2 жыл бұрын
khup chaan kaam kartoys Mitra.
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 2 жыл бұрын
Prasad 🙏 Mi nehami aajari aasto pan tuje nisarg rammy video pahato tyaa veli khup bara vatata Tujya videocha upayog mala Tonic Sarkha hoto 🙏 Thanks Dada 👍
@yatinashar3854
@yatinashar3854 2 жыл бұрын
Kubh saras Prasad God bless 🙌 Nandu
@vedshreevichare1150
@vedshreevichare1150 2 жыл бұрын
उत्तम 👍👍👍
@janicedcunha9092
@janicedcunha9092 2 жыл бұрын
Feels good to see saplings grow in a healthy environment. Charuli, a seed we use to flavor sweets, so nice to see the plants growing. Lovely video 💜💞👌
@sagarkumarnahar8350
@sagarkumarnahar8350 2 жыл бұрын
very nice .... shabd kami padtil apala koutuk karayala.... we proud of you.. hats of nandu tambe great job
@bhagyashrinain3597
@bhagyashrinain3597 2 жыл бұрын
Jarur. Dhanyawad 🙏
@dharmendrajadhav4907
@dharmendrajadhav4907 2 жыл бұрын
Jabardast, ase Manas khoop kami bhet tat. 🙏🙏👍
@vinodworld
@vinodworld 2 жыл бұрын
फार छान व्हिडियो आहे
@samikshakale2901
@samikshakale2901 2 жыл бұрын
नंदू दादा तुम्ही एवढे छान कसे 😍😍😍😍😍😍😍🙏🙏🇮🇳
@seaman.rigved
@seaman.rigved 2 жыл бұрын
Nandu bhai. 🔥 Luckiest 💖 chap on the planet Earth 🌎💛
@saurabhp2000
@saurabhp2000 2 жыл бұрын
Great work Nandu. Thanks Prasad for bringing this to us. दोघांना शुभेच्छा
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि त्या मित्राला आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम
@surajpatole3294
@surajpatole3294 2 жыл бұрын
This is real man
@powerofsharemarket7801
@powerofsharemarket7801 2 жыл бұрын
Khup chhan
@rekhadesai1417
@rekhadesai1417 2 жыл бұрын
नंदुदादांसारख्या योगी माणसांमुळे जंगल जिवंत राहत आहेत…त्यांना मनःपुर्वक धन्यवाद🙏🙏
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 6 ай бұрын
प्रसाद तुम्हाला एक समविचारी मित्र मिळाली
@sanjaydawal6665
@sanjaydawal6665 2 жыл бұрын
मला अभिमान आहे आणि तुझं खुप अभिनंदन
@shardagupta4758
@shardagupta4758 2 жыл бұрын
खूप छान दादा
@PrachiDeshpande27
@PrachiDeshpande27 2 жыл бұрын
Hats off .. proud of you!🌿
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
नंदु दादा ला मानाचा सलाम 🙏👌👌👌👌👌👌
@neelajoshi1617
@neelajoshi1617 2 жыл бұрын
Khup vegale ved,chan dada.
@dilipbhandari7101
@dilipbhandari7101 2 жыл бұрын
मित्रा तुझा आवाज जबरदस्त आहे
@akhileshvishwasrao611
@akhileshvishwasrao611 2 жыл бұрын
Commandable and hatts off to Nandu and Prasad.....Real Nature lover...We dont have words to expres...God bless you both ..Save Konkan Save Nature...Jai Shree Ram 🙏🙏
@sureshgadge1312
@sureshgadge1312 2 жыл бұрын
सलाम नंंदूदादा तुमच्या कार्याला !!!!!!
@suvarnakadam3905
@suvarnakadam3905 2 жыл бұрын
खुपच सुंदर.
@nayaneshnaik1115
@nayaneshnaik1115 6 ай бұрын
उत्तम, possible असेल त्यांनी नक्की अशा प्रकारे forest जपाव किंवा जंगल सारखी जैवविविधता तयार करावी
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 14 МЛН
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 75 М.
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН