Рет қаралды 27,583
विजयनगर साम्राज्याच्या वास्तुकलेचा. वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या हंपीत मंदिरे उभारणारे हात आज अस्तित्वात नसले तरी त्या निर्मितीचा वारसा जपणारे हात मात्र मला बघता आले ...
माझ्या हंपी च्या प्रवासात मी भेटलो पंपया मलेमठ नावाच्या एका ध्येयवेड्या माणसाला.
जंगलतोडी मुळे ओसाड पडलेल्या ज्या जागेत लोक कचरा फेकायचे त्या जमिनीत त्यांनी गेल्या दहा वर्षात मोठ्या कष्टाने जंगल उभे करून हजारो वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास पुन्हा जिवंत केला..
पहिल्या वर्षात ५० झाडे लावली होती त्यातली २तरी जगावी इतकीच अपेक्षा होती पण निसर्गानेही साथ दिली आणि सगळी च्या सगळी झाडे जगली..
आज ह्या जागेत ६० प्रकारच्या स्थानिक जातींची ८०० झाडे आहेत..
७०प्रकारचे पक्षी तसेच अस्वल बिबट्या ससे ह्यांसारखे प्राणीही इथे येतात...
आता हे जंगल स्वतःच स्वतःला वाढवत आहे...फुलत फळत बहरत आहे
आता ही केवळ झाडे नाहीत तर एक ecosystem बनली आहे..
आजूबाजूच्या जमिनीतली boring मुळे खाली गेलेली पाणी पातळी आता वाढताना दिसत आहे...
एकेकाळी फेमस वाइल्डलाइफ फोटोग्राफर्सची कॅमेऱ्याची बॅग पकडणारा पंप्पाया आज कर्नाटकातील एक सर्वोत्तम wildlife guide आहे..
खरच हम्प्तीतील मंदिरे उभे करणाऱ्या पिढीचा वारसा जपणारे हात जंगल उभे करताना बघून तुकोबांच्या ओळी आठवल्या "देह देवाचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर"
location
Malemath's Ecofarm
094491 36252
maps.app.goo.g...
Saakav Workshop Google Form Link
forms.gle/fiv8...