मी स्वतः कोणाशीही बोलताना मराठीतूनच बोलतो. समोरचा हिंदीतून बोलला तरी मी माझी मराठी सोडत नाही. सध्या सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदीमध्ये संवाद चालतो. हा संवाददेखील मराठीतूनच हवा असाही नियम करायला हवा. तो झाला तरच मराठी वाचेल. अन्यथा आजकालच्या मराठी मुलांची मराठी ऐकवत नाही. मराठी हिंदी इंग्रजी ची भेळ म्हणजे आजच्या पिढीची भाषा आहे. व्यवहारात जर मराठी वापरली जात नसेल तर केवळ अभिजात भाषेची मान्यता मिळून उपयोग नाही. नव्या नियमाबद्दल सरकारचे अभिनंदन. परंतु त्याचा परिणाम दिसायला हवा, नुसत्या घोषणांचा पाऊस नको.
@drarunjoshi2088Ай бұрын
अरविंदराव, तुम्ही केलेल्या सूचना शासन आणि विद्यालयात अमलात आणणे आवश्यक आहे. 1960 पासून महाराष्ट्रात मराठी भाषेतून सर्व व्यवहार झाले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते. दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे हे मराठी भाषेच्या प्रसारासाठी उत्तम साधन आहे. आपण सर्वांनी शक्य तितके मराठीतून व्यवहार केले पाहिजे आणि अनावश्यक अश्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील शब्दांचा वापर टाळला पाहिजे. सर्व मराठी संतांची भाषा किती छान आहे, त्यात इंग्रजी आणि हिंदी शब्द नाहीत, मग आपल्याला मराठी बोलायला किंवा लिहायला काय कठीण आहे?
@radhikasawant9314Ай бұрын
आदरणीय अरविंद काका तुम्हाला साष्टांग नमस्कार
@yogeshbhanage1605Ай бұрын
Kaka aaplya sarvch suchnaa atishay changlya aahet aani ya chotya chotya vaatnaarya goshtitun udyachya Marathi chi Marathi bhashechi Marathi khadya padarthanchi pratishtha vadhvu shakto.🙏🚩👍👌
@sushamakarve8504Ай бұрын
चांगल्या आहेत सूचना. 🙏
@anitasane3903Ай бұрын
मराठी घरात आई बाबा... दादा, अण्णा हे शब्द हद्दपार झाले आहेत... मुली, मुलांना मराठी बोलायची सवय नाही असं कौतुकाने सांगितले जाते. बहीण भावंडे एकमेकांशी इंग्रजी हिंदीत बोलतात... डबा नाही लंच बॉक्स, स्नॅक्स..पदार्थ म्हणजे... बर्गर, सॅन्डविच, पास्ता हेच मराठीत राईट करतील ... अगदी मनसे वाल्यांची मुलं देखील... 😂 जो पर्यन्त परीक्षेत मराठी वा प्रादेशिक भाषेचे गूण कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक वा इतर उच्च पदांच्या परीक्षेसाठी लेखी व तोंडीही वजनदार ठरणार नाहीत तो पर्यंत सगळेच प्रयत्न फोल ठरतील.
@shobhasakorkar4750Ай бұрын
अभिजात स्थान मिळाले त्याचा आनंद आहे.पण मराठी लोकांनाच मराठीचे वावडे झाले आहे.घरांंघरांत मराठीत इंग्रजी, हिंदी ची सरमिसळ असते. पालकही त्यांत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतांना दिसत नाही (अपवाद असतात) हे खेदाने म्हणावे लागेल.
@Earthen-u2fАй бұрын
मुळात मराठी माणसांनाच मराठी भाषा बोलायला लाज वाटते, कमी पणा वाटतो आणि, राहीला प्रश्न मराठी मराठी करणार्या राज्यकर्त्यांचा १९६६ पासुन आहेत, पण मराठी भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी काहीही प्रयत्न केला नाही
@anitasane3903Ай бұрын
अगदी बरोबर... मराठी घरातील मुलं घरात देखील इंग्रजी बोलतात वर घरातील 'मम्मी पपा' त्यांच्याशी इंग्लिश बोलतात..