Рет қаралды 4,714
#BolBhidu #MahayutivsMVA #MaharasahtraElection2024
चार-पाच महिने मागं गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत होत्या. महायुतीचं सरकार कोंडीत सापडलं होतं. मराठा आरक्षणाची मागणी तीव्र झाली होती. मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढला होता. ओबीसी समाजही आक्रमक झाला होता. पक्षफुटीचं नरेटीव्ह, संविधान बदलाचं नरेटीव्ह युतीच्या अगेन्स्ट गेलं होतं. उद्धव ठाकरे आणि आणि शरद पवारांच्या बाजुनं सहानुभूतीची लाट होती. हेच वातावरण कायम राहिलं तर विधानसभेला महाविकास आघाडी सहजपणे जिंकेल, असं बोललं जात होतं. पण आताची परिस्थिती बघितली तर महायुतीनं प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतं.
जे जे मुद्दे विरोधात जातील, असं वाटत होतं. त्या त्या मुद्द्यांवर महायुतीनं तोडगा काढल्याचं दिसतं. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊनही मराठा समाजाची नाराजी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर महायुतीनं ओबीसी केंद्रीत राजकारणाला सुरुवात केलीय. मराठेतर वोटबँक आपल्याकडं वळवण्यासाठी सरकारनं निर्णयांचा धडाका लावलाय. यामुळं महाराष्ट्रात भाजपकडून हरियाणा पॅटर्न राबवला जात असल्याची देखील चर्चा आहे. पण ओबीसी मतांसाठी भाजपनं काय निर्णय घेतलेत? या निर्णयांमुळं खरंच महायुतीचा विजयाचा मार्ग सोपा होतो का? नेमक्या अडचणी काय येऊ शकतात ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/