Рет қаралды 533
ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच असणारा किल्ला म्हणजे माहुली किल्ला. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगीरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुली गड आणि दक्षिणेला भंडारगड. सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये येणारा हा किल्ला अग्निजन्य खडका पासून बनलेला आहे.