माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा नाही पसरला कर, कधी मागायास दान स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
@SnehanKurDeshing3 жыл бұрын
Thanks a lot 👍
@ameechitalia43543 жыл бұрын
@@SnehanKurDeshing I am reciting this poem in school for marathi divas celebrations 🙏 Although my mother tongue is Gujarati, I like some marathi songs☺️