सलीलजी.. Hats off Gossip करताना लोकांचा सूर कसाही असो.. तुम्ही सूर ढळू दिला नाहीत.. इतरांचे बोलणे मनावर ना घेता, राग ना धरता.. संगीतातल्या रागाशी एकनिष्ठ राहिलात, लोक लय बोलतील.. तुम्ही लय बिघडू दिली नाही.. संगीतातली आणि आयुष्यातली देखील.. म्हणून आज माणूस म्हणून मोठे बनलात.. Gossip करणारे त्याच जागी आहेत.. तुम्ही ध्येय गाठू शकलात.. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! सौमित्र जी.. तुमचे विशेष अभिनंदन.. कार्यक्रमात आमंत्रित व्यक्तींना बोलतं करताच.. ते तुमच्यासमोर मोकळे होतात.. पण कुठेही तुम्ही त्यांच्या दुखऱ्या मनाला डिवचत नाही.. किंवा.. काहीही ब्रेकिंग news त्यातून तयार होतं नाही.. हे तुमचे विशेष कौतुक.. सौमित्र.. नाव सार्थ आहे तुमचं.!!
@aratidsawant1 Жыл бұрын
सलीलजी यांच्यासारखे प्रतिभावंत कलाकार आम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतात हे आमचे अहोभग्य..ते सहज बोलून जातात तोही आमच्यावर झालेला एक संस्कार असतो. सलीलजी म्हणजे संपूर्ण संस्कारवर्ग.
@mitramhane Жыл бұрын
आभार ❤
@neelamkirloskar9140 Жыл бұрын
😅😊❤❤❤❤❤😊 ❤❤❤❤
@sumedhajalgaonkar5674 Жыл бұрын
Ek number.
@seemashirodkar7959 Жыл бұрын
डाॅ राम राम मी आपली फार मोठी चाहती आहे संदिप खरे व आपली जोडी अप्रतिम आहे मला गजानन वाटवे ह्याची गाणी ऐकता आली तर खुप आवडेल आता आपण मला लिटील चॅम्प्स मध्ये भेटता धन्यवाद
@sarojkale6769 Жыл бұрын
111111111111111111111111¹11¹¹¹¹¹¹1¹1¹1¹¹¹¹
@amolmistry5472 Жыл бұрын
खूप मस्त मुलाखत झाली... दोघांचे आभार.. सलीलजी आमचा हा चित्रपट पहायचा राहून गेला.. ह्या चित्रपटाला पुन्हा रिलीज करा.. अथवा OTP प्लॅटफॉर्म तरी आणा... नाही तर अश्या सुंदर कलाकृती पहायची राहून जाईल...🙏🏼🙏🏼🙏🏼
@varshanirkhe6116 Жыл бұрын
अश्या खरया कलाकार माणसांची मुलाखत होणे आज खूपच गरजेचे आहे. सलिलजिंचे राष्ट्रीय पुरस्कारा साठी मनापासून अभिनंदन. सौमित्र तुमच्या सर्वच मुलाखती खूप छान असतात.
@jyotibhave6001 Жыл бұрын
खूप छान मुलाखत आणि गप्पा. सलिल यांनी सांगितले ते अगदी खरे आहे आई किंवा वडिल वेगळे zale असतील तर आपला समाज मुलांना आणि पालकांना टोचून आणि खोचक प्रश्न विचारुन हैराण करतो. ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
@rameshdhumal95282 ай бұрын
Chan mulakat zali ,khup mahiti milali,Thanks a lot sir
@nehadhar9141 Жыл бұрын
सौमित्र जी, डाॅ. सलिल कुलकर्णी हे एक अतिशय संवेदनशील, प्रामाणिक आणि सच्चा माणूस आहेत याचा पुनःप्रत्यय या मुलाखतीतून आला. अतिशय विचारपूर्वक आणि निष्ठापूर्वक प्रत्येक काम करणा-या या कलाकारास अनेक हार्दिक शुभेच्छा💐🙏 हि मुलाखत माणूस म्हणुन कसे जगावे यासाठी खुप प्रेरणादायी आहे. अशी मुलाखत सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे आभार 🙏💐
@createwithwatercolor Жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत, खरंतर गप्पा. सौमित्र ने म्हटल्या प्रमाणे नक्कीच खूप काही मिळालं यातुन. एक माणूस, एक बाबा, एक मुलगा, नवरा म्हणून खूप काही शिकायला मिळालं. Dr सलील कुलकर्णी यांच्या बद्दल एक कलाकार म्हणून खूप आदर होता, पण एक माणूस म्हणून पण आदर निर्माण झाला आजपासुन. गॉसिप बद्दल खूप वाईट वाटलं. एक कलाकार हा सुद्धा माणूस असतो आणि त्याला पण challanges असतातच. लोकांनी समंजस आणि सहानुभतीपूर्वक वागायला हवे. नॅशनल अवॉर्ड बद्दल Dr सलील यांचे मनपूर्वक आभार 🎉
@bharatikale3338 Жыл бұрын
सलील मधले हळवेपण फार स्पर्शून जाते. शांताबाईंबरोबरचा त्यांचा संवाद फार आवडला होता. त्याच्याकडे ते लोलक कायम राहो ही सदिच्छा.... राष्ट्रीय पुरस्काराबद्दल अभिनंदन 🎉 एकदा काय झालं...हा सिनेमा आता कुठे बघायला मिळेल?
@subhashkulkarni2199 Жыл бұрын
सलीलजी, खरं सांगायचं तर तुम्ही खूपच संवेदनशील आहात. मुलाखत केंव्हा संपतीय असं वाटण्या ऐवजी का संपली असं वाटल. किती छान बोलता. ऐकत राहावं असं वाटतं. एका वाक्यात तुमचं वर्णन करायचं झालं तर बाबा असणारा बाप माणूस. काय सुंदर पद्धतीने वाढवलंत दोन्ही मुलांना. तुमच्या सारखे वडील असतील तर उत्तरोत्तर मुलांची खूपच प्रगती होणार. मोठे आहातच, अजून मोठे होत रहा.मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे शुभेच्छा बरोबर आशीर्वाद देतो. खूप चांगलं भविष्य आहे तुमच्या सर्व कुटुंबीयांच. दुसरा चित्रपट लवकर येऊ द्या. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👍
@neetawadke3549 Жыл бұрын
खूप छान…प्रगल्भ …भावस्पर्शी…अस्वस्थ मन “शांत” करणारी भेट 💐👌
@sujatasant3165 Жыл бұрын
मस्तच! चकचकीतपणा आज्जीबात नसलेली अगदी छान मनमोकळ्या आणि तितक्याच matured बरच काही शिकवून देणारी छान मुलाखत झाली.....सलील कुळकर्णी हा आधीपासूनच एक छान substance असलेला कवी, लेखन अस माझ एक reading होत ते बरोबर असल्याची खात्री झाली....आणि सौमित्र तर नेहमी प्रमाणे छानच ❤ दोघांना खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा💐
@vpanse2009 Жыл бұрын
What a touching interview. Dr Saleel Kulkarni - sastang namaskar 🙏 🙏🙏 . “Don’t leave the rope” what an inspirational quote”.
@suhastiwatane Жыл бұрын
Thank you so much Saumitra ….. ह्या साठी की सलिल जी ऐक मोठे गायक , लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आम्हाला माहिती आहेत त्याबरोबरच ते माणूस म्हणून पण खूप मोठे आहेत आणि ते तुम्ही आम्हाला छान उलगडून दाखवलेत इतक परफेक्ट नितळ मनाचा सज्जन माणूस ह्या काळात असण हे आपल्या सगळ्यांसाठी खूप स्फुर्तीदायक आहे खूप खूप शुभेच्छा !!!
@asawarikulkarni2386 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत! एक संवेदनशील मुलाचा संवेदनशील बाप होतानाचा प्रवास , वैवाहिक जीवनात अपयश आल्यावर दिलेला लढा, इतक मोठं यश मिळाल्यावरहि ते डोक्यात जाऊ न देण्याचा केलेला spiritual प्रवास सर्वकाही मनाला भिडलं आणि एक उत्तम माणूस म्हणून सलीलबद्दलचा आदर आणखीनच वाढला!🙏
@Email-mu1mv11 ай бұрын
हॅलो 😊
@radhamohite31 Жыл бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी अशी मुलाखत! डॉ.सलील कुलकर्णी हे आवडते व्यक्तिमत्त्व....आता अधिक आवडते झाले. खूप मनापासून आनंद झाला. त्यांच्याकडून टिप्स मिळाल्या... जराही forward न करता कार्यक्रम पाहिला ...ऐकला... पुनश्च दोघांचेही आभार आणि अभिनंदन....अनेक शुभेच्छा!!❤❤❤
@yoginideshmukh2060 Жыл бұрын
सलील दादाला ऐकताना खूप चांगल्या गोष्टी कळतात, कायम चांगला माणूस होण्याकडे, समृध्दपणे जीवन जगण्याकडे, लहान मुलांच्या भावविश्वाचा विचार करत ते भावविश्व जपण्यामागे सलील दादाचे विचार खूप खूप खूप सुंदर असतात..., त्याच्या कुठल्याच फिल्म मधे निगेटिव्ह charector च नसेल हा साधा सुधा विचार अजिबातच नाहीये अश्या विचारांच्या फिल्म्स ची, गाण्यांची, पुस्तकांची, क्रिएटिव्हीटी ची आजच्याच नाही तर पुढे येणाऱ्या अनेक पिढयांमधल्या प्रत्येक माणसासाठीची सात्विक गरज आहे. सलील दादा ह्याच interview मधे नाही तर प्रत्येक interview मधे खूप छान चांगल्या गोष्टी सांगतो., ह्या गप्पांमधून पण खूप गोष्टी कळल्या, समजून घेता आल्या. Thank you so much saumitra dada ❤😊
@ketakivaibhavkulkarni1696 Жыл бұрын
पालक म्हणून माणूस म्हणून जगताना आपण काय चूक करतो कस जगायला हवं हे शिकायला मिळत सरांची मुलाखत ऐकताना ...तुमची प्रत्येक मुलाखत किंवा अगदी सा रे ग म मधील सांगणं सुद्धा आम्हाला खुप काही शिकवून जात .....खूप संवेदशील आणि भावस्पर्शी मुलखात ....🙏🙏
@shubhadagaidhani68923 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली. तुमचे सगळे कार्यक्रम मी पहाते. सलील यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कडे येणारे काहि ना काही सुंदर माहिती / किस्से सांगतात व समृद्ध करतात. 🎉 🎉 तुम्हाला शुभेच्छा.
@shailajavaidya8007 Жыл бұрын
सौमित्र नेहमीसारखाच अप्रतिम मुलाखत झाली.सलीलचे खूप खूप अभिनंदन.तुम्ही घेत असलेली मुलाखत संपूच नये असे वाटते.म्हणून पुढच्या मुलाखतीची आतुरतेने वाट बघते.
@mitramhane Жыл бұрын
मनः पूर्वक आभार
@shubhadaabhyankar7874 Жыл бұрын
एका प्रतिभावान ! समंजस आणि संवेदनशील कलाकाराची मुलाखत , मनाला स्पर्शून गेली ! 🙏
@mitramhane Жыл бұрын
💛
@sanjivtannu7550 Жыл бұрын
सलिलने आपल्या कुचेष्टेची वेदना जाहीररीत्या सांगण्याची संधी दिल्याबद्दल मित्रम्हणे चे आभार. जितकी प्रसिद्धी तितकी कुचेष्टा जास्त हा सार्वत्रिक अनुभव आहे. चूकभूल देणे घेणे.
@varshadeshpande2006 Жыл бұрын
माणसानं आयुष्यभर तळमळीने काय सांभाळावं, तर ती भगवंताने दिलेली संवेदनशीलता , सलिलदा तुम्ही जशी सांभाळली तशीच सांभाळावी. खूप सुंदर विचार, खूप सुंदर मुलाखत. ❤
@MEDHAKAMBLE Жыл бұрын
सलील खुप मनातले बोलला, त्यामुळे ऐकायला छान वाटले. प्रत्येक माणसाच्या मनात एक हळवा कोपरा असतो,त्यामुळे त्याच्या अंतरंगात पारदर्शकपणे डोकावता आले. मुलाखत पण छान घेतली, सौरभजी धन्यवाद.
@urmilaapte9853 Жыл бұрын
खूप भावस्पर्शी झाली मुलाखत!!! मनावर फुंकर घालणाऱ्या कवितेच्या ओळी खूप भावल्या. दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद!!! ❤🎉
@dr.ruchavaidya2204 Жыл бұрын
Saleel Kulkarni is simply great...his journey is motivating not only as far as his career is concerned but also on the emotional front👍👍
@pritisawale8529 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत झाली,डॉ सलील यांनी जितकी संवेदनशील गाणी केली,तितकेच ते स्वतः ही संवेदनशील आहेत,एक गायक,संगीतकार म्हणून ते जितके great आहेत,तितकेच् चांगला माणूस,मुलगा,बाबा आहेत हे जाणवले
@madhavidharankar5 ай бұрын
I always love to listen to u Saleel Kulkarni, but this one is very special. The analysis of the song “Tum kahate ho” is just amazing! I keep listening to it many many times.
@nehashende78838 ай бұрын
Kamal kamal kamal interview aaheee love you saleel❤
@indiancitizen8297 Жыл бұрын
Thank you 🙏 great video.... मी पण आयुष्यात खूप धक्के खाल्ले आहेत.... सलील जी ची मुलाखत ऐकताना मन भरून येत होते.... आपला डाऊन फॉल असताना जे नक्की मदत करतील असे वाटते तेच पाठ फिरवतात आणि दुसरेच कोणी तरी मदत करून जातात .
@vaishalishenai143 Жыл бұрын
Excellent interview..he is very emotional and sensitive human being handling life with maturity.. right from the time his father passed away when he was only 3 yr old
@shrirangbhave10 ай бұрын
As an Artist and Human we all are fortunate to know Salil Kulkarni, कमाल मुलाखत, Lot of Inspiring Take aways from Saleel Dada, त्याच्या नावात Ease आहे...सलील - Take A Bow Saleel Dada and Congratulations Saumitra for recent Silver Button and we look forward for mire such learning experiences here on MitraMhane
@kshitijkhatavkar8039 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत... नात्यांची उकल करणारा जादुई डॉक्टर आहेत सलील दादा आणि राष्ट्रीय पुरस्कार ते पुरस्कार ह्यामध्ये विविध विषय उलगडणारे आपण....फारच सुदंर 🙏🙏👍👍👌👌
@shilpa455 Жыл бұрын
सौमित्र Thank you 🙏🙏 अप्रतिम मुलाखत घेतोस. खूप छान बोलत करतोस या कलाकारांना. इतका छान संदेश मिळतो या महान कलाकारांकडून की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात ते apply करू शकता.
खूप छान व्हिडिओ आहे, आम्ही सुधा खूप गॉसिप ऐकले होते. सर्व clear झाले व्हिडिओ मुळे
@jyotijoshi9351 Жыл бұрын
निशब्द व्हायला झाल सगल ऐकुन. एक बहाद्दूर व्यक्तिमत्व.एक मोठे कलाकार आहात पण तितकेच सेंसिटिव बाबा पण आहात,एक मुलगा आहात. तुमच्या बद्दल रिस्पेक्ट आणखीन वाढला. जे वाटल सगल ऐकुन ते सांगता येत नाहिए पण खूप अभिमान वाटला तुमचा.💐❤️
@mitramhane Жыл бұрын
💛💛
@Sheiitalbkadamm Жыл бұрын
हा पूर्ण interview म्हणजे एक श्रेष्ठ आणि प्रेरणादायी विचारांचे पुस्तक वाचल्या सारखे वाटले. Thank you both of you😊
@mitramhane Жыл бұрын
सलील कुलकर्णी यांचे सर्व श्रेय. आम्ही केवळ निमित्त मात्र. मनःपूर्वक आभार. चांगली माणसे जोडली जाणे महत्त्वाचे. Stay connected
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
सलीलदादा पहिल्यापासून मुलं आणि त्यांचं भावविश्व ह्याबाबतीत खूप संवेदनशील आहेत. म्हणूनच त्यांना pediyatri musician म्हटलेलं आवडतं
@manjiripalkar5817 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत सलीलजी ... आपले एक निराळेच व्यक्तित्व समोर आले ❤🎉
@vijayasathe2382 Жыл бұрын
दोघांना ही मनापासून नमस्कार, एवढी मोकळी मुलाखत काहीही आड पडदा न ठेवता, भावनेला आणि नात्याला महत्त्व देणारी, जपणारी आहे. खुप छान,खुप काही देउन जाते. धन्यवाद ❤ विजया साठे.
@Swatidixit841 Жыл бұрын
Your content is getting mature and deeper by the day. Thanks for inviting such evolved personalities who speak from their heart and soul. ❤
@prasadghangurde Жыл бұрын
सोमित्र खऱ्या अर्थाने कोजागरी साजरी झाली. पुन्हा एकदा एका अप्रतिम आणि अविस्मरणीय मुलाखती करता मनःपूर्वक धन्यवाद..🙏 सलील दादा.. निःशब्द.. तुम्हा सर्वांच खूप खूप कौतुक आणि अभिनंदन..🙏
@manjiribhosekar1485 Жыл бұрын
सलील दादा , खूपच छान बोललास ! रत्नागिरी त असताना फाटक शाळेत कार्यक्रम झाला होता त्यावेळी तुम्ही आनंद जोशी कडे उतरला होता ! त्यावेळी तुम्हाला बघितल होत ! प्रसन्न व्यक्तिमत्त्व ! माझी मुलगी फाटक शाळेत 5 वी मध्ये शिकत होती त्यावेळी ! मला म्हणाली , आई ते सलील काका खूपच छान आहेत आणि तिन तुमची वहीवर सही घेतली होती ! अजून आहे माझ्याकडे ती वही ! पुरस्काराबद्दल मनापासून खूप खूप अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! 💐 💐
@PrachiDeshpande27 Жыл бұрын
१००%✓ खरं आहे कलाकार म्हणून ग्रेट आहेतच सलिल सर पण माणूस म्हणून सुध्दा ग्रेट आहेत... सच्चा, हळवा संवेदनशील कोपरा असणारा माणूस ❤😊 मनःपूर्वक शुभेच्छा
@Maithilicoaching Жыл бұрын
खुप आवडली मुलाखत. मन:पूर्वक धन्यवाद.
@mitramhane Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत मुलाखत पोहोचवा सबस्क्राईब करा चॅनल. मी तुला एपिसोड पहा अभिप्राय कळवा
@Maithilicoaching Жыл бұрын
@@mitramhane नक्कीच! खुप छान काम आहे तुमचं. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला.🙏🙏
@veenasvaidya5521 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत !! सौमित्र Dr.सलील ला छान बोलते केले... आणि Dr. ही .. इतके संवेदनशील आणि हळवे असून ही खूप निर्व्याजपणे छान व्यक्त झाले.
@jaideepshinde7492 Жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर मुलाखत! 🙏🙏🙏 समाजातली चेष्टेखोर लोकं जे सतत इतरांच्या जखमेवरची खपली उचकटण्याचा एकप्रकारचा असुरी आनंद घेत असतात अशा लोकांनी तर ही मुलाखत तीनदा पहावी, ऐकावी आणि स्वतःला काही सुधारता आलं तर सुधारावं.
@varshasanglikar1973 Жыл бұрын
सलील जी अगदी मनाच्या गाभ्याला हात घालणार बोललात. जे या सगळ्यातून गेलेत त्यांना मानसिक खूप समाधान मिळाल. माझ्यासारखे अनेक जण यातून गेलेत. जे तुमच्या मुलाखतीत बोललात ते क्षण आम्हीही उपभोगले आहेत. त्या सगळ्याला शब्द मिळाले. धन्यवाद
@prajaktaadhotmal38014 ай бұрын
पुरस्काराप्रती नि:स्पृहता आणि कलेची साधना तुमच्या व्यक्तिमत्वातून झळकते ❤ तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार आहातच, तितकेच उत्कृष्ट शिक्षकही ...!
@anjalinaik7795 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ❤ तरल अनुभव कथन आणि अधून मधून कवितांची पखरण👌 ही मैफल संपूच नये असं वाटत होतं! सौमित्र, मित्र म्हणे ला उदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा!
@mitramhane Жыл бұрын
आभार. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मुलाखत जावी ही इच्छा. भले ते घडो. 💛
@achyutkulkarni3655 Жыл бұрын
सलील कुलकर्णी यांचे अनेक कार्यक्रम ऐकले व पाहिले. त्यांतून व या मुलाखतीमध्ये त्यांचे विचार ऐकून ते किती संवेदनशील आहेत याचा प्रत्यय येतो. असेच त्यांचे विचार आम्हाला त्यांच्या संगीत, गाणी, चित्रपट यातून सतत ऐकायला व पहायला मिळो हीच प्रार्थना
खूप छान मुलाखत . गाॅसिप - वेळ घालविण्याचे साधन असलेल्यांना कळतच नाही , आपण किती जणांना उध्वस्त करतोय .
@sandip1225 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 👌👌👌👌
@swap459 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलखात. डॉ. सलील कुलकर्णी यांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी खूप खूप शुभेच्छा. इतकी वर्ष त्यांची गाणी ऐकतोय पण आज त्यांच्या आयुष्यातला संघर्ष काय होता ते सुद्धा कळलं आणि ते आवडत तर होतेच आता त्यांच्या बद्दल चा आदर आणखीच वाढला.
@revatipatwardhan1175 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. निःशब्द व्हायला झालं काही प्रसंग ऐकले त्यावेळी. सलील सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. एकावेळी अनेक काम ते सहज करून जातात. मुलांविषयी जे बोलले ते खूप खोलवर विचार करण्या सारखे आहे. मुलांनाही भावभावना असतात त्यांचाही विचार आणि आदर करावा. सलील सरांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 👍💐🤗🥰
@dinkarmahajani4877Ай бұрын
खूप मोठा व मनस्वी कलाकार व एक सच्चा माणूस.
@sulekhatayshetye3922 Жыл бұрын
खूप छान.... भावना प्रधान कलाकार, अनुभवाचं गाठोडे नुसतंच जमवलं नाही तर दैनंदिन जीवनात वागवतो आहे.... हे एक कोडेच आहे की अश्या लोकांच्या जीवनातील एक जवळची व्यक्ती... दूर जाते... दूर करावी लागते...न पटल्यामुळे🤔असो. आयुष्यावर....हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे... अभिनंदन राष्ट्रीय पुरस्कारासाठी... सौमित्र..छान बोलतं करतोस💥
@Rohinikulkarnimusic Жыл бұрын
छान प्रवास उलगडला सलील यांचा या मुलाखती मधुन. खूप घेण्यासारखे आहे सलिल जींच्या बोलण्यातून.
@deepapujari4067 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत! सलीलजी कलाकार म्हणून ग्रेट आहेतच तितकेच ते माणूस म्हणूनही ग्रेट आहेत. ह्या मुलाखतीतून त्यांच्यातील अनेक पैलू दिसले. त्यांच्याबद्दलचा आदर आणखी दुणावला!!! 'मित्र म्हणे ' च्या माध्यमातून ही सविस्तर मुलाखत ऐकायला फार छान वाटलं. Thank u for this enriching experience!!
@adsulmadhuri5814 Жыл бұрын
किती सुंदर❤ असे माणसे फार कमी असतात. 😢 बाप म्हणून हा माणूस फार यशस्वी आहे.
@Kaustubh_Dixit Жыл бұрын
किती सुंदर झाली मुलाखत !!! नाजूक विषयही खूप अलगदपणे हाताळला आहे 😊 Bravo ✌🏼 Always looking forward to 'Mitra Mhane'
@mitramhane Жыл бұрын
💛💛
@neetawadke3549 Жыл бұрын
खूपच छान ….दुःख येणार..प्रत्येकाच्या आयुष्यात..विविध मार्गांनी..त्याला सामोरे जात *हसत* जगता यायला हवे..आणि *चित्रपटांद्वारे आपल्याकडून फक्त सकारात्मकता दाखवणे* हा सलिलजींचा विचार खूपच भावला. अभिनंदन आणि शुभेच्छा 💐🍫🌹🙏
@truptiwalavalkar5520 Жыл бұрын
इतकी संवेदनशील मुलाखत पहिल्यांदा ऐकली.नि: शब्द
@shraddhadeo92 Жыл бұрын
मुलाखत खूपच छान आणि भावस्पर्शी झाली...मला एक प्रश्न पडला की सलिलजी इतके दुसऱ्यांचा विचार करतात तर मग त्यांनी बायकोला समजून घेतले नसेल का? कोणी वेगळे झाले की मुलांसाठी खूपच वाईट वाटते...कितीतरी नट आणि नटी ह्या एका कारणामुळेच मनातून उतरली आहेत..
@maeshh8027 Жыл бұрын
समजून घेतलं असणारच तरीपण लोकं यावर विश्वास ठेवणार नाहीत कारण लोकांना वाटतं पुरुष (च) चुकीचे असतात कारण की त्यांना रडता येत नसतं.
@shraddhadeo92 Жыл бұрын
@@maeshh8027 ह्यात पुरुष आणि स्त्रीचा प्रश्न नाहीये...ज्या बाईंनी तुमच्या मुलांना जन्म दिला आणि तुम्हाला सांभाळायचे सुख दिले..तिच्या नावाचा उल्लेखही करता येवू नये ही दुर्दैवी बाब आहे
@pallavimurudkar9488 Жыл бұрын
चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे... मित्र म्हणे ! धन्यवाद ! सौमित्र
@anaghalondhe9850 Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत.. सलील दादांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या कलाकृती, एखाद्या पारदर्शी आरशासारख्या वाटतात .. आयुष्याकडे आणि कलेकडे पाहण्याच्या त्यांच्या निखळ सुंदर दृष्टिकोनामुळे, हा आरसा देखील सर्वच ठिकाणच्या चांगल्या गोष्टी focus मध्ये आणण्याची नजाकत मिळवून देणारा ठरतो... एक कलाकार आणि माणूस म्हणून, ही खूप मोठी गोष्ट ते कळत नकळत करून जातात, त्यांना मनस्वी धन्यवाद, भरभरून शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन 🙏🏻👍🏻💐💐💐👏🏻 दिवसाचे, काळाचे छोटे छोटे तुकडे घेऊन त्या त्या क्षणाला समर्पण करणे, कृतज्ञता, gimmicks च्या जाळ्यात न गुरफटता खोली गाठणे, संवेदनशीलता जपणे, आजूबाजूच्या politics चा स्वतःवर आणि कामावर अथवा कलेवर प्रभाव न पडू देणे अशा अनेक गोष्टी कायम लक्षात राहतील. आपापली वाट चालताना अनेकांना योग्य वाट दाखवतील . 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
@savitawaingankar744 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत... Dr. Salil ji आणि सौमित्र जी तुमची मैत्री अशीच राहुदेत... आणि Dr. Salil jina अजून असेच सर्वोतम पुरस्कार मिळोत... तुमच्या मुलांचं खुप नावलौकिक होऊ दे... जलने वाले जलने दो... 😊
@preranamardhekar9056 Жыл бұрын
Saliljinchi Aaj paryant gani iykat aale aaj ya program mule te kalale.🙏👌
@mrunalkulkarni845 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत झाली. सलीलजी अतिशय संवेदनशील कलाकार आणि माणूस म्हणून देखील अतिशय थोर आहेत. परंतु जशा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे दुसरी बाजू देखील ऐकून घेतली पाहिजे. असे वाटते.
@MukundBhaleraoMukundayan Жыл бұрын
मला माझ्या मुलीने मला हा मुलाखतीचा व्हिडीओ पाठविला व आग्रहाने ऐकायला सांगितला. तिला ही मुलाखत ऐकल्यावर मी पण माझ्या नातवासाठी तो काय विचार करत असेल यावर कविता लिहावी असे वाटले. अस्तु. डा सलील कुळकर्णींनी मी प्रत्यक्ष कधी भेटलो नाही, असेच मोबाईल संदेशामधुन संपर्क झाला. ह्या मुलाखती वर लिहीण्यासारखं खूप आहे, पण शब्दांची खूप गर्दी आहे सध्या डोक्यात. स्वतंत्रपणे सलईललआ ईमेल पाठवीन.
@rashmigodbole6625 Жыл бұрын
khuup छान अनुभव,,hats off to Salil kulkarni ,,🎉trivar abhinandan.
@jyotsnadass1021 Жыл бұрын
Salil tumhi sarvach babtit great aahat.Singer, writer,music Director ani Film maker.pan ya saglyapekshahi tumhi tumchya donhi lahan mulanna jya padhatit vadhavl.Hatsoff.Meehi ek kalakar aahe asha phase madhun jatanna kay tras hoto yachi purn kalpana aahe mala.Pan tumhi te khoop chan ritine pelalat.Aahat tyapekshahi khoop mothe vha.Aankhin khoop yashachya payarya chadhayachya aahet tumhala.Tevdhe saksham aahat tumhi.All the for everything.❤❤❤❤❤❤
@suruchiwagh2746 Жыл бұрын
सौमित्र ही मुलाखत खरंच खूप छान झाली. डॉ.सलील कुलकर्णी यांच्या व्यक्तित्वाचे अनेक कंगोरे पाहयला मिळाले. तुझ्या गप्पांमधून एखाद्या क्षेत्रातलं व्यक्तिमत्व माणूस उमगायला मदत होते हे फार महत्वाचं आणि तेच कायम जपत राहशील🙏... अनेक शुभेच्छा आणि सदिच्छा 👍
@AnupamaGaikwad-f6r Жыл бұрын
Thanks...मुलाखत एकूण स्वतःला बदलायचा निर्णय बदलाला. तुम्ही म्हटलं तसं आपण आहोत तसेच राहावे. खूप बरं वाटलं
@abhishekgadgil1146 Жыл бұрын
अतिशय सुंदर झाली मुलाखत. लहानपणी सलीलजींची बालगीतं फार ऐकली आहेत. त्यांना ऐकणे हा विविध अनुभवांनी भरलेला वस्तुपाठ असतो. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! सौमित्र जी छान घेतलीत मुलाखत.
@smitagodbole8709 Жыл бұрын
आपल करियर करताना मुलांकडेपण प्राधान्याने सलीलजी लक्ष देतात हे ऐकून खूप बर वाटल अस जर सर्वच पालकांनी केल तर महाराष्ट्र भाग्यवान होईल
@madhurisohoni1899 Жыл бұрын
सलीलजींना ऐकताना त्यांच्या बोलण्यात पण एक गेयता आहे! अगदी समृद्ध छान भाषा ऐकण्याचे भाग्य मिळते! सौमित्रजींनी आमखीनच रंगत त्यात आणली आहे! 👌👌 अभिनंदन 👌👌👏👏👏🌹
@mitramhane Жыл бұрын
आभार. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मुलाखत जावी ही इच्छा. 🎉
@nilimavaishnav9572 Жыл бұрын
भारी एक बाबा मुलांना किती छान घडवू शकतो हे मुलाखतीतुन आपल्या सगळ्यांनाच शिकण्या सारख आहे
@savitapatankar2714 Жыл бұрын
किती छान मैत्री आहे तुम्हा दोघांची! सलील कुलकर्णी यांच्याविषयी तर बोलायला तर शब्दच सापडत नाहीयेत. फार प्रगल्भ आणि तितकच हळवं व्यक्तिमत्त्व! हा तुमचा गप्पांचा कार्यक्रम संपूच नये असं वाटतं. प्रत्येक वाक्य कुठेतरी मनाला भिडतं आणि हे माझ्यासाठीच म्हंटलं जातंय असं वाटत राहतं.
@supriyapitale6484 Жыл бұрын
सलील कुळकर्णी प्रतिभावंत आहेत हे वादातीत आहे पण माणूस म्हणून ही समृद्ध आहेत. मुलाखत खूप छान आणि प्रेरणादायी वाटली. आयुष्या कडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप भावला. छान मुलाखत.
@smitapatil3607 Жыл бұрын
उत्तम! सलील तुझा प्रामाणिक स्वभाव मनाला भिडतो. तुझी creativity अशीच बहरत राहू देत या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद ! तुझी प्रगल्भता पाहून खूप आनंद वाटला.
@smrutiyadwadkar7635 Жыл бұрын
खूप काही शिकायला मिळणारी मु्लाखत आहे सलीलजी तुम्हाला मनापासून धन्यवाद
@sousaritabakshi52157 ай бұрын
वा वा फारच ,छान,एका महान फिलासफर नी म्हणल आहे आपली गाणी तीच होतात,जीआम्हाला कुठल्यातरी दुख्खात बुडवून एक तारणारा विचार आपल्या हाती देतात .
@niveditapatil9316 Жыл бұрын
Khup mast zalay episode.
@deepagosavi8183 Жыл бұрын
एका चांगल्या कलाकाराची, चांगल्या व्यक्तिची मनमोकळी मुलाखत ऐकुन खुप छान वाटले. सलिलची प्रत्येक कलाकृति फार सुंदरच असते. त्यांच्या गाण्याचा वर्कशॅाप चिंचवड येथे अटेंड केला होता, तेव्हा ते ऊत्तम शिक्षक आहेत याची प्रचिती आली. त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन!! तुमच्या टीमचे आभार!!
@anujaphadke3082 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@rupalina9563 Жыл бұрын
Sensible and Sensitive Soumitra and Saleel 💐💐 Sundar jhali mulakhat. 👍🏼 जगायला नविन बळ मिळालं. 🙏🏼
@mitramhane Жыл бұрын
Fantastic comment. Happy us.
@jyotivaidya5626 Жыл бұрын
या मुलाखतीत तुम्हा उभयतांचे संवाद आम्हाला खूप बौध्दिक गोष्टी आत्मसात करण्यास उपयुक्त ठरणार आहेत.धन्यवाद
@shalalakaduskar Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.... अप्रतिम व्यक्तीत्व....
@nilakshibelan9450 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सलीलजींची मुलाखत घेतल्या बद्दल. ज्या ज्या लोकांच्या आयुष्यात दु:ख वेदना आहेत त्या सर्वांसाठी ही मुलाखत मनाला उभारी देणारी आहे, सकारात्मकता देणारी आहे. सलीलजी तुम्ही खरंच आमचं खूप मोठं प्रेरणास्थान आहात. मनापासून धन्यवाद 🙏.
@mandani1030 Жыл бұрын
सलील सरांचे सर्वात पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन आणि दुसरे म्हणजे सौमित्र चे वेगळे विचार आणि विषय समजतात मुख्य म्हणजे मनसे समजायला मदत होते...
@sujatagore7709 Жыл бұрын
सलील तुझ्या आयुष्यावर च ऐक सिनेमा होईल. खूप सुंदर मुलाखत. तुझ्या कडून अजून खूप छान सिनेमा होतील आणि अनेक बक्षिसे मिळू देत अनेक आशिर्वाद.
@dipeekarawal5982 Жыл бұрын
Mala ek chanse jivan pravaas che pustak vachan kelyacha aanand zala. Mi salil dada chi gani khup aikli aahe. pan vaiyaktik kahich mahit navte.Thank you team.
@nehakulkarni7522 Жыл бұрын
सलील दादा तुम्हाला खरं सांगते...तुमच्या बद्दल इतका विश्वास होता की जेव्हा मी चुकीच्या अफवा ऐकत होते तेंव्हा मी आमच्या घरी ठाम पणें सांगितले की हे खोटं आहे..माहीत नाही कसा विश्वास निर्माण झाला.. तुम्ही इतके समृद्ध भाव जीवन जगता...भावनेला महत्व देता...हे खुप महत्वाचे आहे..भावना नाही तर जीवन नाही..तुम्ही खुप छान बोलता..
@gajanandeo2555 Жыл бұрын
I am proud of you Salil.तुझे लहानपण मी बघितले आहे त्यामुळे,तुझी मुलाखत ऐकतानामला गहिवरून आले,सौमित्र ,सलिलचे बाबा माझे मित्र होते.
@shobhamarathe2771 Жыл бұрын
अभिनंदन सलीम जी,मनशक्ती मध्ये पण तुम्ही छान विचार मांडले होते, आपल्या दोघांनाही धन्यवाद🙏
@girijakhaladkar9441 Жыл бұрын
निःशब्द ... अतिशय सुंदर 👌👌
@anaghabidkar4293 Жыл бұрын
खूप च सुंदर मुलाखत.. सौमित्र तुझेही मनापासून अभिनंदन... कारण तू सलील ला जास्तीत जास्त बोलू दिलेस ... बऱ्याचदा मुलाखत घेणारेच इतके मधे मधे बोलतात नं की बस रे बस 😊
@sachinkanhere6907 Жыл бұрын
सलिलजी खुपच मोकळेपणे आणी स्पष्ट बोलले आहेत. सुंदर मुलाखत...