Рет қаралды 33,485
#BolBhidu #BabaSiddiqueCase #ZeeshanSiddique
१२ ऑक्टोबरला अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून घेण्यात आली. तेव्हापासून मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात २६ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणात पोलिसांना नवनवीन धागेदोरे सापडत असतानाच आता बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशान सिद्दीकी यांच्या जबाबामुळं मोठी खळबळ उडालीय. बाबा सिद्दीकींनी आपल्या डायरीत काही बिल्डर्सच्या नावांचा उल्लेख केल्याचं सिद्दींकीकडून सांगण्यात आलंय. तसंच वांद्रे परिसरातल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी या हत्येचा संबंध असून त्याचाही तपास करण्याची मागणी झीशान सिद्दीकी यांच्याकडून करण्यात आलीय.
धक्कादायक गोष्ट म्हणजे सिद्दीकींनी आपल्या जबाबात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचंही नाव घेतलं असून भाजप नेते मोहीत कंबोज यांचंही नाव बाबा सिद्दीकींच्या डायरीत असल्याचा दावा केलाय. झीशान यांच्या या दाव्यामुळं बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. झीशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबात केलेला दावा नक्की काय, बाबा बाबा सिद्दीकी डायरी सिद्दीकींच्या डायरीत नक्की कोणाकोणाची नावं आहेत, बाबा सिद्दीकींच्या हत्येचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध जोडण्यामागची नक्की कुठली कारणं सांगितली जातायंत, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/