Рет қаралды 453,688
आईने बनवला कलेजी पेठा सुक्का 😍 | बुधवारचा बेत Kaleji Petha Sukka - Panvel (Navi Mumbai) आई, छोटी बहीण पूजा तिचा मुलगा अद्विक सध्या आमच्या घरी पनवेल या घरी आले आहेत. माझी मोठी बहीण प्रगती आणि तिचा मुलगा आर्यन सुद्धा आमच्या घरी राहायला आले आहेत. दोन्ही बहिणी घरी राहायला आल्या आहेत तर घरी चांगले जेवण तर बनणारच. बुधवारच्या दिवशी आम्ही कलेजी आणि पेठा घेऊन आलो होतो. कोकणात गावाला असलो की असे पदार्थ नाही खाता येत. कलेजी पेठा बहिणीला आणि घरातल्या माणसांना खूपया आवडतो. आईच्या हातचे पदार्थ खाण्यासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो. आई अतिशय झटपट साध्या सोप्या पद्धतीने कोणतेही पदार्थ तयार करत असते. आईच्या हाताला खूप छान चव आहे. पनवेल आमच्या मार्केटमधून मी जाऊन कलेजी पेठा घेऊन आलो. कलेजी पेठा सुक्का बनवण्याचे आमचे ठरले. आईने कलेजी पेठा बारीक करून कापून घेतले. चिकन सुक्का सोबत कलेजी पेठा सुक्का खूप छान बनवता येतं. घरी सध्या मुलंबाळं आहेत तर आमचं घर भरलेलं आहे. कलेजी पेठा फ्राय आणि कालवण सुद्धा बनवता येतात. आईने गोडा मसाला वापरून तिच्या पद्धतीने कलेजी पेठा सुक्का अतिशय चविष्ट बनवला होता. #KalejiPetaSukka #KalejiPethaRecipe #KalejiPethaGravy #sforsatish
कलेजी पेठा सुक्का बनवताना आम्ही एक बटाटा कापला, कांदा बारीक चिरून फोडणीला वापरला. आईने कलेजी पेठा अगोदर अर्धा तास मॅरीनेशन करून ठेवला होता.मॅरीनेट केलेला कलेजी पेठा फोडणी देताना आलं लसणाची फोडणी दिली. तेलात गोडा मसाला चांगला परतून घेऊन मग कलेजी पेठा फ्राय केला. अंदाजाने नेमकेच पाणी घातले आणि मंद आचेवर शिजायला ठेवले. कलेजी पेठा भाकरीसोबत खायला खूप चविष्ट लागतात. कलेजी पेठा बऱ्याच जणांना खायला आवडतो. आमच्या घरात रविवार बुधवार शुक्रवारी असे मांसाहारी जेवण बनत असते. कोकणी लोकांच्या जेवणात मासे आहे मांसाहारी पदार्थ जास्त असतात. आई चिकन सुक्का आणि इतर पदार्थ अतिशय चविष्ट बनवते. आर्यन, अद्विक आणि प्रांजु सोबत खेळताना दिवस अगदी मजेत जातो. आई सध्या अजून काही दिवस मुंबई पनवेलला राहील. बहीण पूजा सुद्धा अतिशय चविष्ट जेवण तयार करते. आमच्या घरात सर्वजण अतिशय मनापासून, प्रेमाने जेवण तयार करत असतात. तुम्ही सुद्धा कधी आमच्या घरी जेवायला या. कलेजी पेठा शिजल्यावर आम्ही सगळेजण पंगतीने जेवायला बसलो. एकत्र पंगतीने जेवायची मजा निराळीच असते. प्रांजु सुद्धा असं जेवण असलं की पोटभर जेवते. आम्ही बायको वर्षा आणि प्रदनुला खूप मिस करतोय. ते दोघेजण लवकरच पनवेलला आमच्या घरी गावावरून येत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आईने बनवलेलं कलेजी पेठा सुक्का दाखवलं आहे. कलेजी पेठा सुक्क्याचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar