Рет қаралды 58,471
सध्या महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असुन शेतकरी राजा पेरणीची लगबग आणि खत- बी बियाणे, कीटक नाशके खरेदीत व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान मराठवाड्यात आधीच दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीने शेतकरी मेटाकुटीला आला असताना आता खत बियाणे, कीटक नाशक कंपन्या ह्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून चढ्या दरानेच नाही तर तब्बल तिप्पट दराने खत, बी बियाणे व कीटक नाशके विक्री करत असल्याचे बिंग खुद्द कृषी सेवा केंद्र असणाऱ्या एका व्यापाऱ्यांनी उघड केलंय. दरम्यान 150 ml कीटक नाशक 2700 एम आर पी अथवा दर असणारे, शेतकऱ्यांनी खरेदी करताना यात मोल भाव करून नियमानुसार 900 रुपयांना विक्री करता येते,तर एक लिटरचे सूक्ष्म अन्न द्रव्य 1800 रूपये एमारपी असनारे मोलभाव करून केवळ 650 रुपयांना विक्री व्हावे असा नियम आहे. पण नांदेड येथील व्यापारी 150 मिली चे कीटक नाशक शेतकऱ्यांना थेट 2500 ते सूक्ष्म अन्न द्रव्य थेट 1500 रुपयांना चढ्या दराने विक्री होत असल्याची आर्थिक लूट कृषि उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी सचिन कासलीवाल यांनी उघडकीस आणलीय.