Рет қаралды 2,313
BMM 2024 of North America has created this forum- “Children in foreign land, parents in mother land “ to address the big elephant in every immigrant’s living room - transnational caregiving ! Everyone has to traverse this path; sharing these experiences would impart awareness, wisdom, peace of mind to the other members of the community. The goal of this discussion is to help allay anxiety, calm down psychological turmoil and to lessen the pangs of guilt that every immigrant faces when it comes to taking care of his or her elderly parents living thousands of miles away.
This discussion is divided into five parts.
The title of the first episode is - “Long distance caregiving- a tangle of relationships !”
The second episode will be on “ Long distance caregiving in dementia”
The forthcoming episodes will be on living will, palliative care, etc.
"मुलं परदेशी, आईवडील मायदेशी" उपक्रमा मागचा विचार-
स्थलांतरीतांच्या नशिबी येणाऱ्या ओढाताणीत, ताटातुटीत, त्यांचे वय वाढत जाते तशी भर पडते
(long distance caretaking) दूरस्थ काळजीवाहकाच्या भूमिकेची ! हा प्रवास आपण सगळेच करतो.
पण वाटेत आलेल्या खाचखळग्यांची वाच्यता किंवा चर्चा होतेच असं नाही. ह्या अनुभवांची देवाण-घेवाण होणं आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आई-वडिलांचे आणि परदेशस्थ मुलांचे आयुष्य सुकर होईल. आपल्यातील काही जणांनी हा प्रवास केलेला आहे. त्यांना रस्त्यातील खाचखळगे माहिती आहेत. तसेच भारतातील (महाराष्ट्रातील) वृध्दव्यक्ती केंद्रित सेवा देणाऱ्यांचा या विषयीचा दृष्टीकोन आपल्याला बरंच काही शिकवेल, शहाणं करेल, सावध करेल.
तर या सर्व व्यक्तींना एकत्र आणून त्यांचा याबाबतीत सल्ला घेण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ म्हणजे हे चर्चासत्र- "मुलं परदेशी, आईवडील मायदेशी".
ही चर्चा उत्तर अमेरिकेतील रहिवाश्यांच्या गरजा लक्षात घेऊन सादर केली जाईल पण कुणीही त्याचा लाभ घेऊ शकेल. ज्या मुलांनी अमेरिकेत राहून आपल्या आईवडिलांची काळजी घेतली त्यांनी या चर्चा सत्रात जरूर बोलावं. त्यामुळे इतरांना मदत होईल.
या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास uttarrang@bmmonline.org या ईमेलवर संपर्क साधावा.