फारच छान! कालच्या लोकसत्तेच्या पुरवणीत आलेला आवडत्या कवयित्री इंदिरा संत यांच्या विषयीचा लेख वाचून त्यांच्या आवडलेल्या कविता आठवल्या. नेटवरून ही त्यातलीच एक सापडली. स्पृहाच्या सुंदर सादरीकरणानं आणखीनच भावली. आमच्या मुलासाठी बायकोने साडेतीन दशकांपूर्वी आणलेली भातुकली आठवली. तो तिला भातुक्की.... भात आणि तुक्की म्हणायचा हे आठवलं. पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आलं. आता स्पृहा आणि संकर्षणचा कार्यक्रम केव्हा आहे हे शोधणं आलं! 😊
@poonamkulkarni1691 Жыл бұрын
भातुकली, इंदिरा संत आणि स्पृहा ही नावे वाचून मला ताबडतोब लग्नाची तिसरी गोष्ट आठवली. ही सिरियल माझी खूपच आवडती आहे. मी ती किती वेळा पाहिली, याला अंतच नाही. त्यात कोणीही खल भूमिका करत नाही, यामुळे मला जास्त भावली. स्पृहा ला प्रत्यक्ष भेटून सांगितले होते. कविता सुरेखच आहे. ऐकताना डोळ्यात पाणी आलं.
@SnehaOdhekar11 ай бұрын
खूप छान आहे ही कविता, तुझं काव्य वाचनही खूप सुंदर आहे. ऐकून पुन्हा बालपण आठवलं. आम्ही लहानपणी डाळीच्या पिठात चिंचेचा कोळ आणि साखर घालून श्रीखंड बनवायचो. आज आठवले तर हसू येते पण त्यावेळी ती चव ही छान वाटायची.
@neetathanedar761811 ай бұрын
खूपच सुंदर कविता आहे आणि स्पृहा जोशीचे सादरीकरण पण छान केले. खरच आपल बालपण आठवलं. आम्हीं तर खरी खुरी भातुकली खेळायचो.
@prashantdeshpande28164 ай бұрын
अत्यंत अप्रतिम कविता आणि सुंदर सादरीकरण... मला इंदिरा बाईंची घरावर केलेली कविता ऐकायची इच्छा आहे... शीर्षक आठवत नाही पण एक ओळ अशी आहे.... विमानात बैसविले चहावरील वाफांनी ... प्रशांत देशपांडे, डोंबिवली.
@deepalideshmukh471511 ай бұрын
खूप छान ग स्पृहा तू कवितेची पार्श्व भूमी, एखादी आठवण सांगतेस न ते खूप आवडत अशीच छान छान कविता म्हणत रहा आमच्या कडे पितळ, आणि लाकडाचें खेळ भांडे होते. लोखंडाची छोटी कढई आणि शेगडी होती ज्यात आजी दोन निवे घालून दयायची आणि गूळ गरम करून तो फुटाण्यात भरून बाहुलीच्या लग्नाचे लाडू करायचो आम्ही खूप भातुकली खेळलो
@mangeshdeo8767 Жыл бұрын
खुपच मनस्वी सादरीकरण. कविता वाचून संपेपर्यंत प्रगल्भ वगैरे वाटणारी स्पृहा, लहानपणीच्या भातुकलीच्या आठवणी सांगताना झटकन परकरी पोर झालेली बघताना मजा वाटली. लहानपण कायमच हवंहवंस वाटत राहतं. लाडकी बाहुली होती माझी एक.. ही कविता पुनःपुन्हा ऐकण्यासारखी आहे. ती ऐकव जमलं तर.
@purushottampeshave317 Жыл бұрын
खुप खुप सुंदर कविता छान वाटले
@snehagarate940111 ай бұрын
❤
@ShailaSarode-xc8vr11 ай бұрын
👌👌स्पृहा, किती सुंदर सादरीकरण!! अगदी बालपण आठवले व भातुकलीचा सगळा खेळ डोळ्यापुढे आला, खरच डोळे पाणावले!!रम्य ते बालपण!!👍
@bhaskarbhandari783211 ай бұрын
खूपच छान कविता.विषय आणि आशय छानच आहे.पण सादरीकरण त्याहून अधिक छान.अशाच छान छान कविता ऐकताना मन प्रसन्न होते.
@smitagadekar9362 Жыл бұрын
तुझ्याकडे पाहिलं तरी fresh वाटते...त्यातून तुझ सादरीकरण म्हणजे वा....क्या बात है ❤
@Marathi-Audiobooks Жыл бұрын
स्पृहा, ...ज्यांना खरंतर मी 'ईशा' म्हणूनच जास्त चांगलं ओळखते..!! ....आणि अचानक शांती गवसावी आणि आपण चिंतनाच्या अनाहुत जगात हरखून जावं असा तो तिसऱ्या गोष्टीचा सुंदर भाग...!! कृतज्ञ.🙏🏽
@manishajadhav215410 ай бұрын
मस्त कविता... nostalgic माझ्याकडे सुद्धा होती लहानपणी भातुकली..आम्ही तिघी बहिणी मिळून खेळायचो.मी दीदी असल्यामुळे बॉस गिरी करायचे. गंमत म्हणजे मुलींनाच नाही मुलांना देखील भातुकली आवडते.माझ्या मुलाला मी खूप आवडीने भातुकली चे सामान आणून दिली होती....तो मस्त छोटुकल्या मिक्सर वर ज्यूस बनवायचा आणि आम्हाला सर्व्ह कराचा...कधी इडली कधी भात आणून द्यायचा...तो बोबड्या बोलानी ऑर्डर घ्यायला यायचा तेव्हा खूप मजा वाटायची. अशा सगळ्या आठवणी जाग्या केल्याबद्दल thanks स्पृहा..love you❤
@sunitawani129 Жыл бұрын
खूपच सुंदर. खूपदा वाचलेली कविता तुझ्यामुळे पुन्हा ऐकायला मिळाली आणि बालपणीचं अवघे भावविश्व् हलवून गेली. कधी पाटाच्या तर कधी दोन उशीच्या भिंती, तरीही भक्कम आणि ऊबदार. चूल बोळकी इवली अन भातुकलीचा खेळ. पण खरं सांगते स्पृहा, तेव्हाच्या त्या लुटूपुटीच्या संसाराची परतून आलीय वेळ. मुलगा सून परदेशात आणि आम्हा दोघांसाठी आता सुद्धा मी त्याच इवल्या इवल्या भांड्यात जेवण बनवते. मोठी भांडी लागतंच नाही दोघांना. भातुकली तेव्हाची अन आताची सुद्धा. भक्कम आहेच पण ऊबदारपणा धरून ठेवावा लागतोय एवढंच. तूझं वाचन नेहमीप्रमाणे प्रसन्न ☺️
@archanadurve10211 ай бұрын
खूपच गोड कविता...बालपणात नेणारी , मी तर खूप खेळली ग भातूकली ...माझ्या जवळ लाकडी सेट होता पूर्ण...आणि बाहुला..बाहुली चे लग्न...तिन चाकी सायकल सजवून त्यांची वरात...खूप भारी ..मस्तच होत ग सगळ...आठवणी डोळ्यासमोर ऊभ्या राहील्या...
@archanatidke724011 ай бұрын
मस्तच होती ही कविता..! तुझ्या लक्षात आलंय, किती सहज मला पुर्ण करतोस .. माझ्या मधल्या रिकाम्या जागा किती अलगद भरून काढतोस.. ह्या कवितेचा विडिओ करा प्लीज ❤
@shrutipatki3952 Жыл бұрын
फारच सुंदर कविता आहे , कविता ऐकतांना लहाणपणीचे दिवस डोळ्यासमोरून गेले . खुप जुन्या आणि सुंदर आठवणी ताज्या झाल्या . स्पृहाताई खूप खुप धन्यवाद , तुमच्यामुळे अश्या सुंदर कविता परत ऐकायला मिळतात.
@sayalithete2614 Жыл бұрын
खरय, अगदी जिव्हाळ्याचा विषय, ऐकताना लहानपणीची भातुकली डोळ्यासमोर येते
@aartikingi292411 ай бұрын
खूप गोड कविता आणि स्पृहा tu🙏ती भावपूर्ण होऊन सादर केलीस. त्यामुळे जुन्या आठवणू जाग्या झाल्या
@swatilele8727 Жыл бұрын
स्पृहा खूपच सुंदर कविता आणी सादरीकरणही! लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या! त्यावेळी बाहुली आणी भातुकली माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता. अजूनही भातुकली म्हटलं की त्या दिवसांच्या आठवणीनी मन मोहरून जाते. धन्यवाद!
@madhurimafadnis6428 Жыл бұрын
खूपच सुरेख कविता. मनाला भिडणारी,बालपणात घेऊन जाणारी. संकर्षण via स्पृहा या साठी तुमच्या टिमचं खूप खूप अभिनंदन 💐
@vasudhajoshi8469 Жыл бұрын
बालपणीचं विश्व रमणीय होतं!सगळ्या आठवणी ताज्या झाल्या!छान सादरीकरण....
@susmitaparanjape Жыл бұрын
अत्यंत ह्रदयस्पर्शी कविता आणि अप्रतिम सादरीकरण स्पृहा ताई❤ इंदिराबाई संतांनी अगदी सुयोग्य आणि नेटक्या शब्दात केलेलं हे वर्णन मला फार च भावलं!! तुझ्या सादरीकरणामधून या आठवणींना अधिकच उजाळा मिळाला! बालपणाचा भातुकली हा खेळ किती आवडीचा भाग होता, सगळ्यांना मित्र मैत्रीणीना आणि बहिणींना घेऊन घर - घर खेळण्यात मज्जा होती खरंच!
@bhaktinaik9425 Жыл бұрын
खरंच इंदिरा संतांची कविता ऐकली भातुकली उत्तम सादरीकरण ताई बालपणीची आठवण जागी झाली भातुकली आठवली खरोखर बंद पेटाऱ्यात लपलेली भातुकलीची आठवण पुन्हा एकदा आपल्या सादरीकरणाने जागी झाली
@prabhakarapte58124 ай бұрын
आताच्या नाही पण आमच्या लहानपणी आम्ही खेळत असलेली भातुकली खरंच अशी होती तिचीआठवणझाली फारच सुंदर संजीवनी आपटे
@nehabhatkar35269 ай бұрын
इंदिरा संतांची संगत सोबत ही कविता तुमच्या आवाजात ऐकायला नक्कीच आवडेल. वाट बघते या कवितेची
@gayatrisomvanshi4078 Жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण... तुझे सादरीकरण ऐकून तर जास्त मनाला भिडतात या सुंदर कविता.. तू अगदी अलगद मला माझ्या बालपणात घेऊन घेलीस... लहानपणी वाड्यात मातीच्या चुलीवर केलेली भातुकली, मातीचेच बनवलेले नवरा नवरी ... त्यांचे लग्न सार काही आठवल. Thank you so much स्पृहा😊❤❤❤
@kumaripunamkishordhutadmal12134 ай бұрын
Mla tu far avdtes spruha tai .. ❤ love you so much... Mummy papa nanter avdnari tisri peson ahes tu ❤
@anitabhide647611 ай бұрын
खूप छान वाटली कविता सादरीकरण छान झालं आहे. संकर्षण व स्पृहा कार्यक्रम २दिवसाआधी बोरीवली येथे बघितला खूप आवडला
@sukhadadanave2824 Жыл бұрын
किती गोड ...... आम्हाला थेट आमच्या भातुकली मध्ये घेऊन गेलीस की तू .... ❤❤ , किती निखळ वर्णन केले आहे इंदिराबाई यांनी .... अगदी लहानपणीचे चित्र डोळ्यासमोर आले .... स्पृहा , तुझे सादरीकरण तर मस्तच .... ❤❤❤❤
@mohangokhle3020 Жыл бұрын
खूपच सुंदर कविता .सादरीकरणही अतिशय गोड तुझ्यासारखेच . राधा गोखले
@vaishalinimkar9225 Жыл бұрын
कविता आणि तुझं सादरीकरण, दोन्ही खूप भावलं. तुझी "कुहू " आणि आमचं बालपण. .... दोन्हीची आठवण करून गेलं!! "पृथ्वी चे प्रेमगीत " तुझ्या प्रगल्भ दृष्टीकोनातून ऐकायला आवडेल.
@ravindrakute855911 ай бұрын
एकदम सुंदर काव्यवाचन असतं तुमचं ! व्वा! फारच छान!
@varshachobe4096 Жыл бұрын
आवडत्या कवीची कविता 👌मस्त सादरीकरण ❤ आमच्याकडे पोळ्याच्या दिवशी मातीचं भातकुलं आणुन पुजलं जायचं त्यामुळे ती भांडी वर्षभर पुरवावी लागत... आता मात्र ती दिसत नाहीत...यानिमित्ताने आठवलं 👍
@ashasawant948 Жыл бұрын
कविता.खूप सुंदर, भावपूर्ण, जुन्या आठवणीत रमवणारी.सादरीकरण खूप सुंदर, खूप प्रेम
@surekhadharmadhikari2352 Жыл бұрын
किती गोड सादरीकरण स्पृहा ! आमच्या लहानपणात मी विकत घ्यायची एक विशिष्ठ बाहुली प्लास्टिकची ... ❤❤ जी लाल हिरवी / केशरी रंगांची असायची पण पालथी मांडी घालून वसलेली असायची आणि मला फक्त तीच बाहुली आवडायची .... अजूनही ती आठवते पण दिसत नाही कुठे .... मग कविता आठवते लाडकी बाहुली होती माझी एक मिळणार तशी ना शोधून दुस-या लाख ... जर मिळाली कविता तर नक्कीच ऐकव ...🙏🙏🙏
@vivekjathar6352 Жыл бұрын
खूपच छान! भातुकली हे खरंच भावाविश्व आहे!👍👍
@madhaviraje605811 ай бұрын
खुपच छान , मनाला लहानपणांच्या आठवणी कडे घेऊन गेली ..ते दिवस आठवले .. दोन शेंगदाण्यात गुळ घालुन चिपकावयाचो आणि लाडु बनवायचो आम्ही..
@prabhakarapte5812 Жыл бұрын
सत्तर वर्षे मागे घेऊन गेली ही कविता. अस्सच खेळत असू.ते गहिरे दिवस आठवले आणि डोळे पाणावले!
@PratibhaKulkarni-q3f Жыл бұрын
खूप सुंदर कविता....... भावपूर्ण सादरीकरणामुळे थेट हृदयापर्यंत पोचते ......
@DeepakJoshi178 ай бұрын
दुसऱ्या कवीची कविता आणि त्यात मांडलेली शब्दरचना अतिशय भावनिक जोड देऊन म्हणणं ही साधी गोष्ट नाही ती तुम्ही लिलया पेलता,तुम्ही अशाच कविता ऐकवत राहाव ही विनंती 🙏
@ankush020217 күн бұрын
देखणे ते चेहरे .... बा. भ. बोरकर यांची सादर करा स्पृहा ताई
@anuradhainamdar4070 Жыл бұрын
भातुकली आणि बाहुली आवडली नाही लहानपणी अशी कोणी मुलगी असेल असं नाही वाटत.स्त्रीत्व असच रुजत जात लहानपणापासून आणि वाढतं जात वयाबरोबर!! ती निसर्गाची किमया तिला आई पण बहाल करत त्या बरोबरच हे देखील.फार सुंदर कविता आणि त्याचा निर्मळ आनंद आमच्या पर्यंत पोहोचवलस तू!!धन्यवाद!
@sameerjirankalgikar3590 Жыл бұрын
अतिशय सुंदर ! सादरीकरण सुद्धा कमाल! पुढच्या वेळी बोरकरांची ज्ञानदेव गेले तेंव्हा ऐकायला आवडेल.
@padmajachoudhari4713 Жыл бұрын
खूप सुंदर कविता आणि सादरीकरण.. हृदयस्पर्शी..
@rajashrimankar5119 Жыл бұрын
कविता नक्कीच आपल्या बालपणात घेवून जाते. भातुकली ही तशी सगळ्यांनीच अनुभवलेली असते. पण मला हे सांगायचे आहे की ही भातुकली खेळण्यासाठी आम्हांला दुकानातला छोट्या भांड्यांचा सेट मिळाला नव्हता तर आम्ही स्वतःच मातीची भांडी बनवून खेळलो होतो. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि खूप मस्त वाटले.धन्यवाद.🙏
@archanajoshi9991 Жыл бұрын
खूप नेटकं सादरीकरण स्पृहा ❤❤❤ नेहमीच तू आवडतेस मला ,,,, आज अजून एकदा प्रेमात पडले तुझ्या ,,तू खूपच सुंदर सादरीकरण करतेस,,,,माझ्याकडे ही चिनीमातीची भातुकली होती ,,,,,मला लाडकी बाहुली होती माझी एक ,,,,आणि ऊन ऊन खिचडी या दोन्ही कविता ऐकायच्या आहेत तुझ्याकडून मी मागच्या पर्वात ही कमेंट केली होती पण ती कविता काय ऐकवली गेली नाही
@sanjyot0710 Жыл бұрын
Ho hoyla pahije vividha sundar kavita sadar daily soaps madhe hoyla pahije . Especially spruha tai tuza ani sankarshan dada cha
@tanujadeshmukh1198 Жыл бұрын
लहानपणीची भातुकली लगेच डोळ्या समोर उभी राहिली आणी त्या लहानपणीच्या मैत्रिणीची पण खूप आठवण आली 😊
@yoginiraut5810 Жыл бұрын
खूपच सुंदर कविता. लहानपणीचे चित्रच डोळ्यासमोर उभे झाले
@JYOTI-r3k4m5 ай бұрын
APRATEEM. SPRUHAJI AAPLI EKA LAGNACHI TEESRI GOSHT ME KHOOP VELA PAHILI AAHE AJUNAHI ME PAHATE. ME AAPALI CHAHATI AAHE. KHOOP RANGUN JATE ME AAPLYA MALIKEMADHE. ME TUMCHYA KUTUMBATLICH HOOUN JATE. AAPALYALA ISHACHYA BHUMIKET ZOKUN DILELE PAHANANA MAZE BHAAN HARAPTE. SPRUHAJI I LOVE YOU ❤❤❤
@ranjanap12956 ай бұрын
भातुकली हा मुलींच्या जिव्हाळ्याचा जेवढा विषय आहे तेवढाच मुलांच्याही आहे. पण दुर्देवाने अजून सर्वच पालकांना त्याच महत्त्व कळलेलं नाहीये. बाकी कविता खूपच छान. माझी लहान मुलगीच डोळ्यांसमोर दिसत होती कविता ऐकताना.
@samruddhikadam2038 Жыл бұрын
❤❤🎉😊👌👌👌 भातुकली, आवडती लहानपणी चा खेळ. माझ्या कडे पूर्ण पितळी भातुकली चा सेट होता आणि अजूनही आहे माहेरी❤❤ खूप छान ,आणि तू खूप छान सादर केली नेहमीच सारखी हसत, अर्थ पूर्ण❤❤❤ Keep going ❤
@asmitabapat8339 Жыл бұрын
भरपूर खेळलो भातुकली!आठवणी दाटल्या !!
@yugamainkar162 Жыл бұрын
Kharach bhatukli kheltey asa vatla dolyasamor ubha rahila te chitra.. Thank you spruha dee❤
@shamalakate780510 ай бұрын
खूप छान आहे कविता. आणि सादरीकरण अप्रतिम आहे.
@ranjana624 Жыл бұрын
स्पृहा तू फार भारी - भारी कविता सादर करतेस. फार छान वाटतं
@pardipcheddu2443 Жыл бұрын
या कवितेतून मला माझे बालपण आठवले अप्रतिम सादरीकरण
@meenaltendulkar239311 ай бұрын
कविता तर छानच आहे आणि सादरीकरण देखील अप्रतिम!!❤
@supriyakamat3504 Жыл бұрын
सुंदर सादरीकरण आणि कविताही अप्रतिम बालपणात घेऊन जाणारी.❤
@congratssaharshashreyakarl495 Жыл бұрын
Spruha tu Mala khoop aawadtes aani tuzya kawita niwedan tu jyat sahabhagi Te sarwach mala Far aawadate Alka k
@bhagyashrichatti-sambare913911 ай бұрын
भातूकली मी पण खेळले बालपणी ची गोड आठवण.... खाऊ, गमंत आठवली छान सादर
@uttarathosar456 Жыл бұрын
Yes... मला अजूनही तीच आठवण लक्षात आहे त्या कवितेची.... ही कविता माहीत होती पण, त्या scean मध्ये बघितल्यावर कायमची ठसली गेली.
Khup chan spruha mam balpanat harun gele khup chan kharach
@seemabahutule9272 Жыл бұрын
कविता आणि सादरीकरण दोन्ही उत्तम 🌹
@ManaseeKasture10 ай бұрын
अगदी सुंदर मला लहानपण आठवला
@alkapradhan80611 ай бұрын
True such things of childhood we always remember, cooking imaginary recipes.
@vishalvyavhare5689 Жыл бұрын
नमस्कार . मी विशाल व्यवहारे. मला हा कार्यक्रम फार आवडतो. मला" आई " वर असलेली एखादी तुमची आवडीची कविता नक्की आवडेल.
@savitarajapurkar6714 Жыл бұрын
Khoop chan Ashach Kavita aikav 👌👌
@anantbhai21 Жыл бұрын
So elegant,so beautiful,just looking like WOW...!!!❤
@spruhaajoshi Жыл бұрын
Thank you so much 😀
@navnathmazire4626 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या महान मराठी कवयित्री इंदिरा संत यांची "या हो सूर्यनारायणा" असं शिर्षक असलेली एक सुंदर कविता आम्हाला इयत्ता आठवीत बालभारती पाठ्यपुस्तकात होती... आदरणीय शिक्षिका सौ. भाटे मॅडम ती कविता त्यांच्या भारदस्त परंतु श्रवणीय आवाजात आम्हाला म्हणून दाखवत असत... शाळेतला तो रमनीय प्रसंग आता डोळ्यासमोर उभा राहिला... अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहाजी जोशी यांच्या सुंदर आवाजात ती कविता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल... Navnath Mazire (पुणे)
@congratssaharshashreyakarl495 Жыл бұрын
Tuze naturech sunder aahe
@anjaligokhale4503 Жыл бұрын
खुप च सुंदर सादरीकरण. खुप जुन्या आठवणी ची उजळणी झाली .मी आता सीनिअर सिटिझन आहे पण माझ्या आजोळची ची भातुकली ची सर्व खेळणी डोळ्या समोरून गेली . खुप च सुंदर वाचतेस स्पृहा .
@dhruv_aquatics Жыл бұрын
खूप छान आहे कविता... तुमचा संकर्षण वाया स्पृहा हा कार्यक्रम घेऊन आमच्या गावी म्हणजे बेळगाव ला या ना.. प्लिज...
@deepakkarnik1876 Жыл бұрын
भावस्पर्शी सादरीकरण 😢❤👌👌👌
@swatijoglekar8902 Жыл бұрын
खूप छान स्पृहा
@monalideshmukh4553 Жыл бұрын
Khup Chan ....u r very pure soul and it reflects in your poem.... God bless you 😊
@spruhaajoshi Жыл бұрын
Thanks a lot 😊
@krutikapatil5172 Жыл бұрын
छान कविता आहे. माझ्याकडे स्टीलची हंडा - कळशी होती. माझ्या आईच्या मैत्रीणीने दिली होती मला.
@sanjaykhandekar41928 ай бұрын
U r great.
@vijayadeshpande7114 Жыл бұрын
कविता खूप छान. सादरीकरणही खूप छान. स्पृहा बोरकरांची चित्रवीणा ही कविता ऐकवशील का
@yogeshlokare6414 Жыл бұрын
Such A Great Again !!
@darshanakale6 Жыл бұрын
eka lagnachi teesri goshta madhye tu hi mhantali hotis as wattay, video agodarach comment kartey, thank you hi kavita sadar karnyabaddal! Mi churmuryancha bhaat aani face powder che dudh karayache , haha, arthat n pyayala..khup chhan sadar keles
@mrinalkedar3506 Жыл бұрын
खूपच सुंदर सदरीकरण....👌
@varshapansedandawate34911 ай бұрын
भातुकलीच्या खेळात एका शेंगदाण्याच्या दोन फाकळ्यांच्या मधे गूळ दाबून चिकटवलेले छान लाडू करायचो आम्ही ....त्यांची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे , तुमच्या या कवितेने ती चव नव्याने आठवली.
@sanjyot0710 Жыл бұрын
Khup sundar kavita❤
@supriyakane4958 Жыл бұрын
फारच सुंदर कविता ❤
@darshanaathavale237 Жыл бұрын
स्पृहा ताई तुमच्या कविता खूपच चांगल्या पण मी कधी लहानपणी असले भातुकली वगैरे खेळ खेळले नाही मी स्वतः तबलावादिका आहे वयाच्या अडीच वर्षापासून मी तबला वाजवते आज माझं वय 68 आहे सर्व दर्शना आठवले
@SnehMadhurya Жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण ❤👌👌
@saishtodankar8033 Жыл бұрын
Asha unique kavita fakt tumcha channel var post hotat.
@archanasahasrabuddhe5014 Жыл бұрын
संकर्षण व्हाया स्पृहा तुमचा कार्यक्रम पुण्यामधे कधी आहे
@mahadevKolse-oo7qu Жыл бұрын
खूप सुंदर कविता ताई
@ashasawant948 Жыл бұрын
पितळेची इवलीशी भांडी खुप वर्ष जपून ठेवली होती. चिमुकल्या चीनी मातीच्या कप बशा गेल्या वर्षीच शेजारच्याच छोट्या बहिणी ना दिलया.पंच्याहत्तर वरषांचया मला अजून मोह आवरत नव्हता .😂
@manishajadhav9116 Жыл бұрын
खूपच सुंदर ❤
@prabhakarfanse4784 Жыл бұрын
Wish yr show with sankarshan in pune at 12AM so that.many.sr.citizens like me.can.witness. Aam 83 Prabhakar Fanse Panchvati pune
@manojmisal878511 ай бұрын
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड ही कविता ऐकायची आहे तुमच्या कडुन
@darshanaathavale237 Жыл бұрын
स्पृहा ताई तुमच्या कविता खूपच छान आहेत पण मी कधी लहानपणी हा असलं भातुकली वगैरे खेळले नाही मी स्वतः तबलावादिका आहे. मी स्वतः वयाच्या अडीच वर्षापासून तबलावादन करत आहे आता माझं वय 68 पूर्ण आहे.
@saishtodankar8033 Жыл бұрын
Tumi khup chan acting karta . Tumcha pudha project chi vat baghtoy.