डाॅ. श्री. अशोकजी वार्ष्णेय - पुणे महानगर - विशेष मार्गदर्शन व्याख्यान - 13 जून 2023

  Рет қаралды 123

आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्र प्रान्त

आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्र प्रान्त

Күн бұрын

कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्यासाठी सेवा क्षेत्रात कार्य करीत असताना ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणे ही पर्वणी असते -----
------- ही उक्ती सार्थ ठरविणारा कार्यक्रम आरोग्य भारती, पुणे महानगराच्या वतीने बुधवार दि १३ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाला.
निमित्त होते आरोग्य भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री डाॅ श्री अशोकजी वार्ष्णेय यांचेसमवेत कार्यकर्त्यांसाठी वार्तालाप आणि मार्गदर्शनाचे!!!
एम ई एस गरवारे काॅलेजच्या, ए व्ही हाॅलमध्ये बुधवार दि १३ सप्टेंबर २०२३ रोजी, सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत हा मार्गदर्शन आणि वार्तालाप कार्यक्रम संपन्न झाला.
सुरुवातीला आरोग्य भारतीचे पुणे महानगर सचिव डाॅ श्रीकांत खाडिलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर प्रथेप्रमाणे श्री धन्वंतरी पूजन आणि श्री धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
डाॅ श्रीकांत खाडिलकर यांनी मान्यवरांचा परीचय करुन दिल्यावर आरोग्य भारतीच्या मागील वर्षभराच्या कार्याचा आढावा घेतला.
यानंतर आरोग्य भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष डाॅ गिरिष कामत यांनी डाॅ श्री अशोकजी वार्ष्णेय यांचा परीचय करुन दिला.
यानंतर डाॅ श्री अशोकजी वार्ष्णेय यांनी सुरुवातीला उपस्थित सर्वांना आरोग्य आणि दिनचर्या यांविषयी काही प्रश्न विचारून वार्तालापाला सुरूवात केली.
डाॅ श्री अशोकजी वार्ष्णेय यांनी आरोग्य भारतीच्या कार्याची माहिती सांगताना स्वस्थ जीवनशैली, सर्व समावेषी स्वास्थ्य संरचना, ईलनेस टु वेलनेस टु हॅपीनेस, आंतरिक प्रसन्नता या जीवनशैलीविषयक महत्वपूर्ण अशा मुद्यांवर विष्लेषण केले.
तसेच स्वतः पासून सुरुवात करुन, समाजापर्यंत जाऊन, स्वस्थ समाजाची कल्पना साकार करण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी आरोग्यविषयक अनेक उपक्रमांचा परामर्ष घेऊन, आरोग्य भारतीच्या आरोग्य विषयक आयामांचा व्यापक असा आढावा घेऊन आरोग्य भारतीच्या कार्यविस्तारासाठी उपस्थित सर्वांना प्रेरीत केले.
यानंतर आरोग्य भारतीचे क्षेत्रीय संयोजक डाॅ मुकेश कसबेकर यांनी उपस्थितांना आरोग्य भारतीच्या विविध उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यानंतर आरोग्य भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ सुरेश पाटणकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
आभार प्रदर्शन आणि शांती मंत्राने वार्तालाप कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळेस आरोग्य भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कोषाध्यक्ष सतीशजी कालगांवकर, अष्टांग आयुर्वेद काॅलेजचे वैद्य मनोज चौधरी, डी वाय पाटील मेडिकल काॅलेजचे डाॅ अमित पालिवाल, भारती हाॅस्पिटलच्या डाॅ वर्षा वैद्य, डाॅ शुभदा कामत, अष्टांग आयुर्वेद काॅलेज आणि धोंडुमामा साठे होमिओपॅथी काॅलेजचे विद्यार्थी आणि आरोग्य भारतीचे कार्यकर्ते असे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आरोग्य भारतीचे अमेय वाघ, मिलिंद लिमये, राघवेंद्र नायक, ईश्वर हेमके या कार्यकर्त्यांनी व्यवस्था पाहिल्या.

Пікірлер
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 11 МЛН
"मातृदोष, पितृदोष, घराण्याचा दोष"
12:08
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 684 М.
Mahayog Margdarshan महायोग मार्गदर्शन
12:59
Shri Vasudev Niwas
Рет қаралды 15 М.
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 11 МЛН