साहजिकच लोकप्रतिनिधि म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थितित होतो. त्यांची कार्य काय असतात याकडे लक्ष केंद्रित केल तर साहजिकच आज ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडत आहे.यात लोकप्रनिधींची महत्वाची भूमिका,कार्य येते.यामागिल विविध कारणे आहेत. महत्वाच म्हणजे शेतिव्यवसायच हा देशाचा आर्थिक कणा आहे. आणि त्याच व्यवसायसाठी जर सरकार ध्येय,धोरण,काही ठोस निर्णय घेत नाही. तोपर्यंत शेतकरी अशे निर्णय घेतल्याशिवाय व जाब विचारल्या शिवाय राहणार नाहीत. आज ची शेतकऱ्याची परिस्थिती ही मरणाच्या दारात उभी आहे. निसर्ग,महागाई, शिक्षण क्षेत्र,आरोग्य,उदर निर्वाह असो वा अन्य सर्वच ठिकाणी तो हतबल होतोय.थोडक्यात गुलामगिरित,लाचारित त्याचे जीवन जगत आहे,तो दिवसेंदिवस खचत आहे.त्याने गुंतवलेले भांडवल देखील निघत नाही इतकी भीषण परिस्थिति निर्माण होत आहे. तरी देखील लोकप्रनिधि, मायबाप सरकार जर त्याच्या कडे लक्ष देत नसेल,काही ध्येय धोरण ठरवित नसेन तर त्याने निवडून दिलेल्या लोकप्रनिधिला विचारणा करण्याचा त्याला अधिकार आहे,आणि तो विचारणारच.. शेतकारीला शेतकरीराजा म्हणून चालणार नाही तर त्याला राजानपनच हव आहे. (खरोखर राजाला अशी भिक मागयची गरज यायलाच नको, तो आपल्याला मायबाप म्हणतो याची जाणीव असायला हवी.)