श्री केशवराज मंदिर | दापोली | Keshavraj Mandir Dapoli | Must Visit Places | दापोलीतल एक सुंदर ठिकाण

  Рет қаралды 303

AanandYatri Vlogs | Amit Kadam

AanandYatri Vlogs | Amit Kadam

Күн бұрын

श्री केशवराज मंदिर, आसूद बाग, दापोली
#dapoli #vishnu #temple #konkan #konkani #konkanlife #marathi #god #lordvishnu #ratnagiri #vlog #travel #dapolitourism
दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते. तेथून उजवीकडे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज (विष्णूचे) मंदिर आहे. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता; आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोहचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू, इ. वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्षांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. एक विलक्षण मनःशांती लाभते.
गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर साधारण १००० वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून १२ महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे. मंदिरातील विष्णूमूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णूमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी चार आयुधे आहेत.
हे देऊळ पांडवांनी एका रात्रीच बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदीर गावापासून एका बाजूला आहे. सर्वसाधारणपणे विष्णू-विष्णुपत्नी लक्ष्मी यांची देवळे मुख्य वस्तीत असतात आणि शंकराची मंदिरे एकाकी, गावाबाहेर, निर्जन ठिकाणी असतात. परंतु केशवराज मंदिर हे या गोष्टीस अपवाद आहे.
या ठिकाणी कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून उत्सव सुरु होतो, तो त्यानंतर सुमारे ५ दिवस चालू असतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद असतो. दुसऱ्या एकादशीपासून ३ दिवस उत्सव असतो तर त्रयोदशीला प्रसाद असतो. देवधर, दीक्षित, ढमढेरे, दातार, दांडेकर, आगरकर, गांगल यांचे केशवराज कुलदैवत आहे.

Пікірлер: 13
@prashantpatil1069
@prashantpatil1069 4 ай бұрын
Informative video!!!!
@aanandyatri0143
@aanandyatri0143 4 ай бұрын
Glad you think so!
@rekhadehekar7459
@rekhadehekar7459 4 ай бұрын
👌🏼👌🏼छान
@aanandyatri0143
@aanandyatri0143 4 ай бұрын
@dilipayare3611
@dilipayare3611 4 ай бұрын
Nice
@aanandyatri0143
@aanandyatri0143 4 ай бұрын
@saeekarla4379
@saeekarla4379 4 ай бұрын
अमित खुपच मस्त तुझ्यामुळे एक सुंदर असे देवाचे दर्शन झाले
@aanandyatri0143
@aanandyatri0143 4 ай бұрын
♥️🙏🏻
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 ай бұрын
Khoop...sundar.....💓
@aanandyatri0143
@aanandyatri0143 4 ай бұрын
Thank you 🙏🏻
@vaijayantikadam1454
@vaijayantikadam1454 3 ай бұрын
@aanandyatri0143
@aanandyatri0143 3 ай бұрын
😇
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 106 МЛН
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,5 МЛН
First Impression of Pakistan,Entering Lahore , Pakistan Part 1
20:35
Travelling Mantra
Рет қаралды 808 М.
Should You Visit Nagpur? My Honest Review!
18:27
Karl Rock
Рет қаралды 432 М.
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 106 МЛН