Рет қаралды 8,148
भगवान श्रीशंकरांच्या स्वयंभू आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातल्या ठाणे नगरातील श्रीकौपीनेश्वर मंदिर. सुमारे हजार-बाराशे वर्ष पुरातन अशा या मंदिरातील शिवलिंग महाराष्ट्रातले सर्वात भव्य शिवलिंग मानले जाते. या श्रीकौपीनेश्वराच्या आराधनेसाठी दत्तदास महाराजांनी रचलेले श्रीकौपीनेश्वराष्टक, शिवभक्तांच्या चरणी अर्पण करत आहोत.
संगीतकार : केदार पंडित.
गायक : पंडित संजीव अभ्यंकर आणि पंडित रघुनंदन पणशीकर.
चित्रफीत दिग्दर्शन : नरेंद्र बेडेकर
निर्मिती आणि सेवा : कवी संजीव कोकीळ (खाकी गुलाब)
©सर्व हक्क स्वाधीन: श्रीकौपीनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्ट, ठाणे