खूप म्हणजे खूप सुंदर. फक्त नवीन अभिनेत्यांनाच नाही तर कलेच्या क्षेत्रात काहीही करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी तुमच्या ह्या मुलाखती उपयुक्त आहेत. फक्त मार्केटिंग साठी ज्या मुलाखती असतात त्यापेक्षा ह्या बघायला खूपच छान वाटते. आत्तापर्यंत जे जे रंगकर्मी तुम्ही बोलावलेत ते सगळे विचारवंत आहेत, आणि त्यांना त्यांच्या कलेविषयी अतिशय आत्मीयता आहे. अजून एक उल्लेखनीय गोष्ट अशी, जी सध्या दुर्मिळ झाली आहे, ती म्हणजे मुलाखत घेणारीची आणि देणार्यांची भाषा सुंदर आहे आणि उगाचच इंग्लिशचा वापर करणे टाळले आहे. अशाच छान छान मुलाखती आमच्यापर्यंत पोचवत रहा!
@vivekkara3 жыл бұрын
हि मुलाखत नसून, acting च ट्युटोरिअल आहे, जे बाहेर तुम्हाला लाखो खर्च करूनही नाही मिळणार. सिम्पली legend !!!
@Right15125 жыл бұрын
प्रभावळकर एक अभ्यासू अभिनेते आहेत हे तर माहित होतं, पण स्वतःच्या अभिनयाचं तटस्थ विश्लेषण किती सुरेख केलंय त्यांनी. मधुराणीचंही खूप कौतुक. मुलाखत कशी घ्यावी, स्वतः किती आणि काय बोलावं याचा वस्तुपाठ वाटली ही मुलाखत. खूप धन्यवाद.
@sandhyakapadi41125 жыл бұрын
नेमक्या शब्दात सांगता येत नाहीये पण मुक्ता बर्वे आणि प्रभावळकरांना ऐकून खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय, श्रीमंत झालेच मी !!!
@jayashreeparchure68593 жыл бұрын
Ditto. आतून बाहेरून कसं तृप्त वाटतंय
@pranjalijadhav90144 жыл бұрын
माझ्या सारख्या या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कलेविषयी असलेला आदर आणखी वाढवण्यात भर पडेल अशीच मुलाखत झाली दिलीप प्रभावळकर सरांची. त्यांनी पात्रांविषयी केलेला छोटा छोटा अभ्यास ऐकून आम्हाला ही कोणतही पात्र उभं करण्यात त्याची मदत च होईल. खूपच छान वाटलं 👍
@snehalphadke84525 жыл бұрын
अप्रतिम उपक्रम. आणि दिलीप सरांची मुलाखत फार आवडली. त्यांची विचार करण्याची पद्धत खूप छान वाटली. माझ्या मिस्टरांचे ते दिलीप मामा आहेत. ते लहानपणी शाळेत असताना बालनाट्यात काम karayche.त्यात त्यांना दिलीप सरानी शिकविले होते. आणि ते त्यांना दिलीप मामा म्हणायचे.
@sayeesathe91065 жыл бұрын
धन्यवाद रंगपंढरी खजिना खुला करून दिल्याबद्दल!!!
@shubhadaabhyankar78744 жыл бұрын
अगं इतके रंगून जातो नं ऐकताना ! मन भरल्या सारखं वाटतं !सांगायचे म्हणजे खालचे इंग्रजी भाषांतर ही छान असते त्या मुळे अनेक भाषक रंगपंढरी ला पोहोचू शकतील ! किती धन्यवाद द्यायचे !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinsuresh29115 жыл бұрын
खूप सुंदर उपक्रम आहे ... मुलाखतीत ली सहजता खरं च वातावरण बौधिक जाणवते
@साहित्यसंपदा5 жыл бұрын
दिलीप प्रभावळकर हे खरोखर उत्तम व्यक्ती आणि माणूस आहेत नुसते अभिनेते नाहीत मी त्यांना रत्नागिरीत भेटलो खूप बर वाटल
@sushamajoshi12225 жыл бұрын
आपला हा उपक्रम खूपच छान आहे......तुम्ही मुलाखतीद्वारे दिग्गज मंडळींना आमच्या घरी आणता....खूप छान छान छान आणि छान.🌷 आपणाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.🌷
@veenashetty92634 жыл бұрын
I a non Marathi person but a huuuuugeee fan of Marathi actors am eternally grateful to you for giving us insights into grt actors
@Bapat12345 жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम. नेहमीचे पठडीतील प्रश्न न विचारता खूप वेगळ्या पद्धतीने रंगते मुलाखत. प्रत्येक भूमिकेमागचे कष्ट आणि अभ्यास ऐकताना त्या कलाकाराबद्दलचा आदर दुणावतो! फक्त रंगकर्मीनीच नाही तर सामान्य माणसाने ऐकूनही त्यातून स्फूर्ती घ्यावी असे आत्ता पर्यंतचे भाग आहेत! तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
@Artpune5 жыл бұрын
Phar chaan episode. Mast madhurani .great dilip prabhavalakar sir
@smitamalkar35835 жыл бұрын
Khup Sundar.....I like the way Dilip prabhavalakar talk and explain everything in lovely language and thought
@jayshreejoshi39925 жыл бұрын
Sunder Mulakhat...Prabhawalkar boltat agdi Sahaj tarihi vaicharik...abhinayat sudha avakta bhavana ,sandarbh soochit karat yetat ha vichar khoopach Patla...very good and very nice Thank you
@sk-sj1ez5 жыл бұрын
Ase thor natyakaleche upasak far kami ghadtat. Dilip sir sarvotkrusth kalakrutiche pradarshan ahet. Thankyou sir
@rohitkulkarni2255 жыл бұрын
This is an amazing interview of a fantastic, senior, honest actor Dilip Prabhavalkar.
@sunandagogate84473 жыл бұрын
Dilipji is very best actor khupech pasand ksretr
@manthanbijwe23895 жыл бұрын
बापरे!!!..फार regret होतंय...मला हे channel एवढ्या उशिरा का कळालं....हे सर्व प्राणवायू सारखं आहे...इकडे महाराष्र्टापासून दूर तिरुवनंतपूरम ला असताना....Thank you so much
@sangitavanju96823 жыл бұрын
l Khup chhan
@nanda123424 жыл бұрын
रंग पंढरी मधील दिलीप प्रभावळकर नावाच्या एका अथांग व्यक्तीमत्वाची भन्नाट मुलाखत ही माझ्या मते तरी प्रत्येक अभ्यासू नटाने अनेकदा पहावीच परंतु ज्या कोणाला नाटय रसिक म्हणून आयुष्यात नाटकांचा आणि अभिनयाचा खरा आनंद मिळवायचा आहे त्या प्रत्येकाने ही अतिशय सुंदर मार्गदर्शिका जरूर पहावी या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन प्रा नंदकिशोर पोफळे
@RangPandhari4 жыл бұрын
तुमच्या सुंदर प्रतिक्रियेने बळ मिळालं, नंदकिशोर जी! उपक्रमाबद्दल तुमच्या सर्कल मधल्या लोकांना जरूर सांगा. धन्यवाद.
@Music.Movies4 жыл бұрын
ज्या भुमिकेला प्रचंड प्रतिभा लागते आणि ज्या भुमिकेमध्ये अभिनेत्याचा कस लागतो, अशा भुमिका दिलीप सरांकडे जातात... किंवा प्रत्येक मिळणार्या भुमिकेत काहितरी नवीन आणि वेगळं करून दाखवायचं, तेही कथानकाला धक्का न लावता आणि सगळ्यांकडून स्विकार होईल अशा रूपात, अशी दिलीप सरांची मेहनत असते....
@champof643 жыл бұрын
Each and every stage performer on this programme is so well learned, and may be not always in the 'academic sense'. But when they talk, there's a flow of words like a river flowing, not a single thought repeating or overlapping; very clear, and intelligent. Making me want to listen to more.
@sanjyot66deuskar273 жыл бұрын
Thank you so much. Khup सुंदर, एका बुद्धिमान कलाकाराची तेवढ्याच sanymani घेतलेली मुलाखत. खूप खूप काहीतरी विलक्षण अनुभव . शेवटी त्यांनी म्हटल तसं, एक subtle, तरल अनुभव 👍🙏
@bipinmore63464 жыл бұрын
किती सुंदर सुरुवात केली दिलीप प्रभावळकर सरांना.......साधा निर्मोही माणूस....🙏🙏🙏
@shubhadaketkar5 жыл бұрын
आजच ही मुलाखत ऐकली, खूप छान मुलाखत घेतलीस मधुराणी
@ADIT000052 жыл бұрын
खूप मस्त. दिलीप explained his acting techniques so well . I will like if others are able to explain so clearly
@milindmasurekar39775 жыл бұрын
मधुराणीची मुलाखत घेण्याची पद्धत तिच्या रोलसाठी चपखल वाटते.दिलीप प्रभावळकरांसारख्या थोड्याश्या बुजऱ्या स्वभावाच्या व्यक्तीला बोलतं करणं व बोलतं ठेवणं तिला चांगलं जमलंय!त्याबद्दल तिचं मन:पूर्वक अभिनंदन!रंगपंढरीच्या आम्हा वारकऱ्यांना पंढरीच्या विठोबाचं दर्शन घडलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही!भूमिकांचं बेअरिंग कायम पकडतांना अद्वैताच्या जवळ जायचं पण द्वैत राखायचं हीच खरी तारेवरची कसरत असते!स्तब्धता ‘बोलकी’ असते हे सत्य आहे!लेखन,गायन,चित्रकला आणि सतत शिकण्याची तयारी दिलीपजींना sky is the limit चा अनुभव देणार हे writing ✍🏻 on the wall आहे!प्रेक्षकांना खिळवण्याची अमोघ शक्ती असतांनासुद्धा सगळ्या प्रेक्षकांच्या reactions identical नसतील ही जाण संतुलित व प्रगल्भ बुद्धीचं द्योतक आहे!🎭☝️🌹🍀💭👀 जे शिकायला मिळालं त्या दृक्श्राव्य अनुभवांसाठी आसुसलेला -प्रा.मिलिंद मसुरेकर विलेपार्ले पूर्व
खूप.खूप वेगवेगळ्या भूमिकांमुळे कायम लक्षात राहतील दिलीप प्रभावळकर 🙏🙏☝️☝️🫡🫡
@dileepbarshikar83233 жыл бұрын
वाह.... हा एपिसोड अतिसुंदर... दिलीप प्रभावळकर खरंच ग्रेट.... कॅरेक्टर च्या विविध छटा काय सुरेख explain केल्यात. ग्रेट.
@archanapatil28775 жыл бұрын
श्री. दिलीप प्रभावळकर यांची खूपच छान मुलाखत . भाग 2ची वाट बघत आहोत .
@ranjitlatasunil19175 жыл бұрын
दिलीपसर म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ.....👍👍👍👍👍👍👍👍
@kaantein4 жыл бұрын
Thank you guys for the subtitles guys. I am sure wasn’t needed but whoever thought of it , my thanks once again. And this host is so gracious.
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for your kind words. We are adding subtitles gradually to all interviews. The intent is to enable the theatre lovers and practitioners worldwide to connect with Marathi thespians and understand their creative processes. - Yogesh Tadwalkar Producer-Director, Rang Pandhari
@kaantein4 жыл бұрын
रंगपंढरी / Rang Pandhari khub aabhar yogeshji. I am a Kashmiri btw so the subtitles help a lot.
@nehakulkarni24314 жыл бұрын
रंग पंढरी मुळे खूप दिग्गज लोकांच्या मुलाखती ऐकायला मिळतात. खूप मनमोकळे पण जाणवतो मुलाखत ऐकताना. पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.
@shridharjoshi80163 жыл бұрын
Souja
@ameetavichare43193 жыл бұрын
प्रत्येक कलाकारचा कुठली ही कला सादर करताना केलेला सखोल अभ्यास या रंगपंढरी द्वारे कळला. खूपच सुंदर शो.
@rajeshwarijoharle68605 жыл бұрын
उत्क्रृष्ठ 🙏 , हृदयस्पर्शी❤️
@vikaskpadale5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हांला पुढील उपक्रमासाठी ✌👍🙏💐
@bapujoshi4 жыл бұрын
मधुराणी गोखले तुम्ही एखाद्या कलावंताला अत्यंत उत्कृष्टरित्या ओपन अप करता तेव्हा तो कलावंत सर्वांगीण दृष्ट्या प्रेक्षकांच्या समोर येतो दिलीप प्रभावळ सारखा सर्वगुणसंपन्न नट अभिनयाचा किती सखोल अभ्यास करतात हे त्यांच्या मुलाखतीतून दिसून येते. ते मानवी मनाचा खूप खोलवर जाऊन सत्य ओळखण्याचा प्रयत्न करतात की काय असं वाटतं आणि ते त्यांना सहज जमतं म्हणून ते उत्कृष्ट नट आहेत धन्यवाद
Thé way this interview is conducted can literally make one learn thé length and breadth of ones mind. It seems that thé interviewer is instigating thé interviewé to open thé layers of his mind. Your sessions are like a universitaire environnement. You are doing a wonderful work.
@sangeetapereira85653 жыл бұрын
मधुराणी फक्त एक चावी लावते नंतर समोरची व्यक्ति अगदी भरभरून मोकळी होते खुपच छान व खुप काही शिकायला मिळते. अप्रतिम मुलाखत.
@manishatatpalliwar57983 жыл бұрын
खुप सुंदर आणि शिकायला मिळाले खुप खुप धन्यवाद
@supriyabrahme41322 жыл бұрын
खूप उत्तम मुलाखत. प्रभुराणी ताई, तुमच्या या कार्यक्रमाला मी subscribe केले आहे. रोहिणी ताई हट्टंगडी यांची मुलाखत सुद्धा खूप छान आहे.
@RangPandhari2 жыл бұрын
सुप्रिया जी, तुम्हाला आमचा उपक्रम आवडला याचा मनापासून आनंद आहे. कार्यक्रम असाच पहात राहा आणि इतरांनाही बघायला सांगा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@surekhalimaye83064 жыл бұрын
मी आताच सुरुवात केली "रंग पंढरी"बघायला।खूपच छान वाटतंय।जितकं एखादं नाटक बघताना रमतो आपण तितकेच या मुलाखती बघताना पण रमून जायला होते।आता पर्यंत दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत जास्त उंचीची वाटली।मधुराणी तू मोठमोठया कलाकारांना बोलतं करतेस ही तुझी हातोटी खरोखरच कमालीची आहे।तुमच्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा।
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद सुरेखा जी!
@bharatikulkarni79602 жыл бұрын
अतिशय मनमोकळी मुलाखत.....
@radhasarang3 жыл бұрын
धन्यवाद... खूप सुंदर series मधुराणी मॅम.. अप्रतिम.
@vijayg.deshmukh4143 жыл бұрын
दिलीप प्रभावळकर, मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील दी ग्रेट 👍👍👍
@hemantagnihotri40245 жыл бұрын
Rang Pandhari chi sound and picture quality ,presentation, anchor, sarvach "THE BEST".
@svksskkanitkar3 жыл бұрын
Wow, amazing , wonderful , Great actor Dilip Prabhavalkar !!!
@jdasharathi15 жыл бұрын
आजचा संवाद खूप आवडला..... अभिनंदन
@vilasjoshi67965 жыл бұрын
सुंदर अफलातून करामती, मस्त संकल्पना रंगपंढरी
@omalane38263 жыл бұрын
मस्त आहे.
@vidyashukla75162 жыл бұрын
Khup sundar.aabhar🌷🙏
@Dr.AmbadasDeshmukh4 жыл бұрын
Fantastic Interview.. Yogesh Sir.. Dilip Prabhavalkar Sir and Madhurani Madam..
@anaghavahalkar53793 жыл бұрын
Thank you Rang Pandhari. Very nice interview! waiting for more and more episodes
@dare_to_dream203 Жыл бұрын
तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकत रहावे. हा संवाद थेट आमच्या बरोबर होत आहे असं वाटतं. मुलकातीमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी बोलण्यास जास्त वाव दिला उगीचच प्रश्नाचा भडिमार केला नाही. हे देखील भावलं.
@mugdhagupte38524 жыл бұрын
Khupach Chan & so much knowledge Nd information! One of the best episode!
@suhasjoshi32433 жыл бұрын
खुपच सुंदर प्रस्तुती
@sadashivjoshi33193 жыл бұрын
या मुलाखती मधून कलाकारांचे अंतरंग कीती समदध आहे हे कळले: समाधान वाटले
@swaradaranade87134 жыл бұрын
मधुराणी , तुम्ही खूप छान मुलाखत घेता !
@cheetababar4263 Жыл бұрын
रामराम श्री दिलीप प्रभावळकर साहेब आमचे लाडके आवडते कलाकार खूप आभार धन्यवाद
@sandhyafanse48553 жыл бұрын
Very nice programe👌👌
@LightersWorld5 жыл бұрын
Khup mast.. Worth watching.. Learned a lot
@mukundgalgali58504 ай бұрын
दिलिप प्रभावळकरांचे अनेक पैलुहि आज कळले छान संवाद
@mukundgalgali58504 ай бұрын
अनेक कामातून मिळालेल्या अनुभवातून पुडे आलेले भरपुर मेहनत केलेले या संवादातुन कळते
@yogeshrajguru98924 жыл бұрын
Madhurani when u r listening to the response of the interviewer u r completely listening and that also from heart. So that makes the opposite person to open up ,even without,totally and he also reacts from heart. I have found lots of common points,though expressed differently,between Vikram and Dilip in understanding of craft. That’s the beauty of honest actor.kindly interview Sachin khedkar. Love
@vinayakraikhelkar4 жыл бұрын
वाह, अप्रतीम. खूप शिकायला मिळालं
@mayureshg23974 жыл бұрын
ranga pandhari is a great initiative. its like a curriculum for young aspiring actors. The format of questions seeking maximum responses is meticulously researched.
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for your encouraging words!
@danceforever59404 жыл бұрын
Awesome personality & interview
@VishalVNavekar4 жыл бұрын
रंग पंढरी कार्यक्रमाचा हा भाग पहायचा राहूनच गेला होता! मराठीतल्या श्रीमंत परंपरेची साक्ष देणारा कार्यक्रम म्हणजे रंग पंढरी!
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks विशाल जी! 🙏
@VishalVNavekar4 жыл бұрын
@@RangPandhari एकवेळ विशल्या म्हणा पण ते जी नको! 😁 प्रतिक्रियेसाठी आभार, असेच उत्तमोत्तम भाग आम्हाला बघायला मिळोत 😊😊
@sangeetapereira85653 жыл бұрын
Apratim mulakhat superb feel like never end up only
@swaradaranade87134 жыл бұрын
दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत खूप छान झाली!
@amolraut83034 жыл бұрын
Jaberdast...fantastic
@sujata51154 жыл бұрын
जबरदस्त मुलाखत
@vijayhibare98413 жыл бұрын
Exllent
@sunriseindia6994 жыл бұрын
रंग पंढरी चँनेल खूप उशीरा कळले, पण बर जहाले एका पाठोपाठ एकेक आत्मचरित्र वाचतोय, खूप छान, अभिनंदन
Khupach सुंदर. Fakta ekach sangayach ahe. Ek tar vividhata asate kinwa vaividhya asata. Vaividhyata ha shabda chuk ahe
@RangPandhari5 жыл бұрын
Thanks for the correction.
@swatichittal26623 жыл бұрын
Atishay sunder
@vilasadhyapak49632 жыл бұрын
Very Nice !
@sanjayyedke73894 жыл бұрын
प्रत्यक्षात रंगकर्मी जगणे म्हणजे दिलिप प्रभावळकर.
@aratipuranik42823 жыл бұрын
Madhurani madam, खूप छान, दिलीप sir, my favorite 🙏
@subhashghodke65293 жыл бұрын
रंगपंढरी.. खूप छान
@kyogesh215 жыл бұрын
Wow...just too good .
@rajendrakumarvaidya6402 Жыл бұрын
Khup chaan
@krupakulkarni49085 жыл бұрын
Please पुढच्या release ची तारीख declare करत जा. खूप उत्सुकता आहे. प्रभावळकर नंतर कोण?
@16bhushan5 жыл бұрын
सुंदर उपक्रम
@sunandagaikwad54864 жыл бұрын
मस्त
@thesky24063 жыл бұрын
खूप छान
@sunitayadav21603 жыл бұрын
Sir you're great 🙏🌹
@gaurikulkarni4285 жыл бұрын
Apratim 🌹
@rajaramdidgikar36823 жыл бұрын
Aprateem.
@anujabal47974 жыл бұрын
Beloved Dilip Prabhavalkar is great actor Ilike his acting in Chimnrao Natogoti Sarakarnama and many other films And serials Gangadhar Tipare is best of him
@kasturimore52565 жыл бұрын
Amazing
@baburaoshirsat4904 Жыл бұрын
मुलाखत छान घेतली. अभिनेते प्रभावळकर तर अभ्यासू नट
@sharmilakulkarni35663 жыл бұрын
Apratiiim !
@smitaghate3344 Жыл бұрын
अप्रतीम 🙏
@vandanakulkarni13615 жыл бұрын
माझी ऐकच तक्रार आहे.,सौ.प्रभुलकरांची तयारी कमी पडते. दिलिप प्रभावळकरानी ऐनकाउंटर चित्रपटात फार सुंदर भूमिका केली होती. ज्याची मुलाखत घ्यावयाची त्याची पूर्वतयारी केली तर या सर्व मुलाखती वजन्दार होतील
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for your feedback.
@prachipawar64794 жыл бұрын
Madhurani tai me khup khup khup khuppppp abhari ahai tuzi tai ; kharch kharch tu khup chan mulakhat ghetes ani hya rang Pandhari hya madhyamatun ek manus mhnaun tey kay ahet hey sagle (actor actress )ashtapailu ahet kharch Ani me gel 4 days me sagle episode baghital me Me abhari ahai tumchi karan Khar sangte mala saglech avdta je me baghital episode sagle kalkar mala avdat pan Mohin joshi chi me fan hote Ani neena Kulkarni hyachi me fan navte Pan me jeva sgale baghital interview teva kalal ki nahi me ata neena Kulkarni chi pan fan zale Plus tai tuiz serial pan chan chalu ahai me avrjun baghet Bas ti ashich chnagly track var asvi plus tashich ti veglet ani bore honya adhi ani chnagl ending ni sampvali Ani parat session 2 rangpadhrich tu start karva Thank you