Рет қаралды 2,880
"माझी नाट्यसमीक्षा ही मुळात एक ताबडतोबीची प्रतिक्रिया आहे. ती उद्रेकी आहे. परंतु तरीही ती प्रेक्षकांच्या जाणीवेत भर घालणारी, आणि त्यांना निव्वळ बघे न राहता आस्वादक बनण्यास उद्युक्त करणारी आहे."
कमलाकर नाडकर्णी
मराठी नाटकांच्या समीक्षेची परिभाषा बदलणारे आणि ४० वर्षांहून अधिक काळ आपल्या नाट्यपरीक्षणांतून प्रेक्षकांच्या रंगसंवेदना अधिक तीव्र बनवणारे कमलाकर नाडकर्णी ह्यांना नुकतीच देवाज्ञा झाली.
कमलाकर सरांच्या निधनापूर्वी काही महिने रेकॉर्ड केलेल्या ह्या मुलाखतीत कमलाकर सर त्यांच्या समीक्षालेखन प्रवासाबद्दल आणि प्रक्रियेबद्दल सविस्तर बोलले आहेत. समीक्षेचे एकंदर नाट्यव्यवहारातले स्थान, वृत्तपत्रीय समीक्षेची तुलनात्मक वैशिष्ट्यं, रंजक आणि उद्बोधक समीक्षालेखनातील महत्त्वाचे घटक, आणि नाट्यप्रयोग ते समीक्षा प्रकाशन ह्या दरम्यानचे विविध टप्पे अशा सर्व बाबी उदाहरणं आणि रंजक किस्से सांगत कमलाकर सरांनी विषद केल्या आहेत.
ही दुर्मिळ मुलाखत नक्की पहा आणि इतरांबरोबर शेअर करा.
आपल्या सर्वांच्या नाट्यजाणीवा विस्तृत केल्याबद्दल आणि नाटक पाहायची नवी दृष्टी दिल्याबद्दल रंगपंढरीतर्फे कमलाकर सरांना आदरपूर्वक श्रद्धांजली! 🙏🌺