Рет қаралды 17,052
माणसांचे अठरापगड जीवनरंग, त्यांच्यातील तरल नातेसंबंध, गुंतागुंतीच्या भाव-भावना, दैनंदिन जगण्यातलं सौंदर्य, आणि आपल्या सगळ्यांची नाळ एका वैश्विक चैतन्याशी जोडलेली आहे हे जाणवून देणारे काही अर्थपूर्ण विराम...प्रतिमा ताईंच्या दिग्दर्शनातून हे आणि आणखी बरंच काही रसिकांना गेली ३३ वर्षं भरभरून मिळत आलेलं आहे.
'आत्मकथा', 'तुझ्या माझ्यात', 'उंच माझा झोका गं', 'श्रीकृपेवरून', 'जगदंबा', 'याच दिवशी याच वेळी', 'सूर्याची पिल्ले', 'स्मृतिचित्रे', 'Educating Rita', 'अश्रूंची झाली फुले' अशी अनेक दर्जेदार नाटकं आणि 'प्रपंच', 'लाईफलाईन', '४०५ आनंदवन', 'अंकुर' अशा अनेक लोकप्रिय मालिका त्यांनी आजवर साकार केल्या आहेत.
ठाम राहून संहितेत योग्य वाटणारे बदल कसे करावेत, नटांची निवड करताना बाह्यरूपापेक्षा कलाकाराचं 'spirit' पाहणं का महत्त्वाचं असतं, खूप काळ संहिता वाचत राहण्यापेक्षा नटांना लवकर उभं केल्याने काय फायदा होतो, नाटकाच्या गरजेप्रमाणे नेपथ्य कसं तयार करून घ्यावं आणि वापरावं, इतरांच्या कलाकृती बघण्याखेरीज स्वतः केलेल्या नियमित वाचनातून दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती कशी सक्षम होते अशा अनेक रोचक विषयांवर प्रतिमा ताई बोलताहेत, आजच्या भागात.