Рет қаралды 876,190
#BBCMarathi #RajThackeray #MumbaiPolice #RahulRaj #Encounter
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला सध्या उत्तर प्रदेशात जोरदार विरोध केला जात आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केली आहे.
हिंदुत्वाच्या राजकारणाला हात घालण्याआधी राज ठाकरे उत्तरभारतीय विरोधी नेते म्हणून ओळखले जात होते.
त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं म्हणणं आहे. त्याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा देखील केली. तर, ठाकरे यांना सरकारने सुरक्षा देण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीये.
पण राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आल्याची ही पहिली वेळ नाही. साल 2008 मध्ये रेल्वे परिक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर राहुल राज हा 25 वर्षीय युवक राज ठाकरेंना मारण्यासाठी मुंबईत आला होता.
त्याने बसमधील प्रवाशांना ओलीस धरलं होतं. मुंबई पोलिसांनी राहुलराजचा एन्काउंटर केला. पण, पोलिसांच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi