Рет қаралды 28,808
चला चला र चला गड्यांनो
चला चला र चला
धन्य जिजाऊ धन्य शिवबा
धन्य सह्याद्री झाला 2
रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला
लगबग चहुकडे सारी
सारी नवीन कारागीरी
झेंडे पताका अब्दागिरी
चमकती नव्या तलवारी
हत्ती वरती नवी अंबारी
दिवाळी वाटे मला. ||१||
गागाभट्ट पंडित अन्य
राज्याभिषेक करती धन्य
दूर करतील सारे दैन्य
हाच राजा सर्वामान्य
असा न होणार छत्रपती
अन आधीकधी न झाला. ||2||
हिरे माणिक मोती सोन
तोलुन बत्तीस मन
घडविल ते सिंहासन
शिवकल्याण विराजमान
छत्रपतीवर छत्र धरती
चौरया ढळती झुला ||3||
चला चला र चला
चला चला र चला