किती दुखी प्रसंग आहे. खुप वाईट वाटल. ३/४ महिने घरी रहायचं आणि ८ महिने गावापासून लांब रहायचं. किती कष्टमय जीवन आहे.
@VaishaliBorawake-yu5vl3 ай бұрын
खरतर दसरा दिवाळी करून जायला हवे असे आम्हाला मनापासून वाटते,पण शेवटी पोटपण्यासाठी करावे लागते, दादा बाणाई खूपच दुःखी झाले, आजचा प्रसंग पाहून डोळ्यात पाणी आले 🙏🏻
@babanzolekar8923 ай бұрын
हा एकच यू टूब चॅनल आहे. कधीही वाईट कॉमेंट नसतात. खूप छान व्हिडिओ.. आणि वास्तव चित्र दाखवतात व्हिडिओ मध्ये.
@anilkamble43143 ай бұрын
बरोबर 👌....
@saccchibateenin52353 ай бұрын
बरोब्बर 👍😊
@sandipkadam98133 ай бұрын
@@babanzolekar892 बरोबर
@neetajagdale74113 ай бұрын
खरंच खूपच सुंदर video
@hemaghadge31803 ай бұрын
100% बरोबर बोलला
@sandipnerlekar27122 ай бұрын
खुपचं वाईट वाटले. डोळ्यात पाणी आले.पण तुम्ही मुलींच्या शिक्षणाला एवढे महत्त्व देताय बघुन खरंच बरं वाटलं. तुमचे जीवन आणि लष्कराच्या जवानांचे जीवन एकंदर सारखेच आहे.
@NG-hj7zt3 ай бұрын
मन हेलावून टाकणारा episode 😢
@GAMER_141183 ай бұрын
आत्ताच्या कलियुगात शिक्षण फार महत्त्वाचा आहे तुमचे विचार खूप छान आहेत
@leenapage49523 ай бұрын
घरी बिराजी आणि सुला आहेत ... शेती, गाई गुरं सांभाळून सगळ्या मुलांचं बघतात.. त्यांच्या जीवावर मुलं शिक्षण घेत आहेत.आई आणि दादा दोन्ही ठिकाणी मदतीला असतात.. खरंच एकमेकांना सांभाळून तुम्ही कुटुंब सांभाळता. तुमची भरभराट होवो.. मुलाबाळांच भलं होवो.
@laxmansumbe4053 ай бұрын
सुलाताईला सुद्धा सलाम कारण सर्व मुलांचा सांभाळ अगदी चांगल्या पद्धतीने करतात
@anandmk29023 ай бұрын
बानाईंना(अन्नपूर्णा) ला नमस्कार मन सुन्न झालं , डोळ्यात अश्रू अनावर झाले , पुढचा प्रवास खु ,,,,,, प सुंदर होवो,, प्रभु चरणी प्रार्थना,,,, मी आनंद क्षीरसागर नाशिककर
@latagaikwad27173 ай бұрын
दादा आजचा व्हिडिओ पाहुनी खूप वाईट वाटले याला संघर्ष म्हणतात घरदार लेकरं बाळं सोडून प्रपंच्या साठी रानोमाळ धावायचं तुमच्या बाई माणसाचं लयं कौतुक कष्टाला जबाबदारी ला अजीबात मागं नाही मगं ती बाणांनी असु किंवा सुला अर्चना आई आणि तुम्ही त्याच्या साथीची गाडा ओढतायं तुम्हा सर्वांना बारा हत्ती चं बळ येवो तुमचा प्रवास सुखकर होवो
@NandaDeokar.1233 ай бұрын
खूपवाईट वाटलं व व्हिडिओ बघून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं
@sanjaysakhare44313 ай бұрын
हे कष्टमय जिवन आणि तेही मूलांपासून त्यांच्या भविष्यासाठी खरच निशब्द !
@suvarnapatilkupachchan2763 ай бұрын
सिमा खुप शिक आपल्या बाबांच नाव मोठ कर आपल्या आईबाबां खुप सर्व कुटुंब खुप कष्ट करत आहेत ❤❤
@cookwithjaya70903 ай бұрын
खूप वाईट वाटल दीपा आणि सीमा ल पाहून डोळ्यात पाणी आले.बनाई कस सहन करता असेल मुलांचा विरह
@myindia123 ай бұрын
आतापर्यंतचा व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ. पाहताना खूप वाईट वाटले.😢😢😢😢 किती कष्टमय जीवन आहे दादा तुमचं. आठ महिने मुलांपासून लांब राहायचं सोपं नाही. काळजी घ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचा प्रवास सुखाचा आनंदाचा होवो. खूप शुभेच्छा पुढील प्रवासासाठी 🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏
@indumatiraskar4553 ай бұрын
बानाई लहान मुलांना सोडून जाण खरोखरच खूप अवघड आहे गं पण बीराजी सुला आई खुप काळजी घेतात धन्य त्या माऊल्या धन्य तो परीवार 👌👌👍👍
@sashikantgaikwad48233 ай бұрын
खरचं मन भरून आले विडीओ बघून काय करणार परिस्थिती... ला तोंड द्यावेच लागते... 🙏🌹
@kailasbhere2 ай бұрын
😢 खरंच मुलं बाहेर ठेऊन कस राहावं लागते... खूप वाईट वाटलं..❤
@archanat.70773 ай бұрын
खूप भावनिक क्षण...दादा एकदा आम्हाला सर्व मुलांची ओळख करुन द्या...कोण कोणाची मुले आहेत़ ते कळतच नाही...मला वाटते दादू, सीमा अणि दीपा तुमची मुले आहेत़.
@joshnanaik52333 ай бұрын
Yes
@AsmitaskKamble3 ай бұрын
दादा खूप दिवसापासून तुम्हाला सांगावं म्हणत होते की तुम्ही असेच गावाकडे राहा नका जाऊ वाडा घेऊन तुम्ही गावी राहिलेले आम्हाला खुप आवडते तुमचे सगळे कुटुंब एक नंबर आहे
@savitalondhe89273 ай бұрын
बानाई काळजी नको करू बाळूमामा आहेत लक्ष ठेवण्यासाठी सर्वांच्या वरती सुखाचा प्रवास होवो ❤❤❤❤
@NikhilGhutukade3 ай бұрын
धनगरांची अशीच परिस्थिती असते लहान मुलांना सोडून जावं लागतं😢😢😢😢
@girishthakare34843 ай бұрын
प्रेमळ नमस्कार सर्वांना खूप अवघड प्रसंग मन अगदी गहिवरून आले सगळ्याचें चेहेरे उतरलेले कष्टकरी जीवन एकमेकांपासून दूर राहिले खूपच👏✊👍 उरावर दगड ठेवून रहावे लागते एक दोन दिवस त्रास होईल🇮🇳 धन्यवाद बाळु मामाच्या नावाने चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार 🎉🎉🙏🌹💙🍀🌸
@harshawardhanmeshram25153 ай бұрын
कुटुंब खूपच आवडला एकमेकात खूप गोडवा दिसतो असे परिवार असावे
@ManishaBachkar-m7y3 ай бұрын
तुमचे आई दादा 1च no आहे .सुना मुले असून पण स्वता किती काम करतात .त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही .खूप मोठ्या मनाची ,विचारांची आहेत ते .त्यांना उदंड आयुष्य मिळो .
@AjitOak-il7tv3 ай бұрын
मन हेलावून टाकणारा व्हिडीओ.. अश्रू आले डोळ्यातून लगेच. खूप लवकर निघालात वाडा घेऊन. दसरा दिवाळी करून जायचे होते. सांभाळून रहा. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@nandalonkar54183 ай бұрын
संसार ,जीवन, हे सुखानी दुखणी चालायचंच,पण मात्र आपले व्हिडिओ आम्हाला, खूप छान वाटतात, आम्ही धनगर नाही, पन, विठ्लाचे भक्ता आहोत , तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@rupalimali71073 ай бұрын
डोळ्यातून पाणी आले व्हिडिओ खूप छान दाखवला
@SandipBaviskar-m6z3 ай бұрын
तुमचे मुलं नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण करतील अशी प्रार्थना करतो जनार्दन स्वामींच्या चरणी 🌺🌺जय बाबाजी 🌺🌺
@NandaBhagat-kh6wd3 ай бұрын
❤ सीमाला चांगलं शिकवा दादा❤ तुमचा प्रवास चांगला हो❤ लवकर या घर सोडून येताना मन भरून येते❤ बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤👌🏻👌🏻❤️❤️
@PriyaMulay3 ай бұрын
खूपच अवघड क्षण खूप रडू आले खरंच कौतुक आहे मुलांचं आणि आई च ❤❤ किती स्ट्रगल करावे लागते आई वडिलांना त्यांच्या मुलांना सोडून जाताना. खरंच दुःखी प्रसंग आहे हा
@ushatambe14532 ай бұрын
बानाई आश्रम शाळेत खुप कणखर शिक्षण मिळत, तिथली मूल स्वावलंबन शिकतात, आई-वडील नसल्याने माझ संपूर्ण शिक्षण आश्रम शाळेतच झालय, हो त्यावेळेस वाईट वाटत, दुःख होतच पण चांगल जिवन भविष्य चांगल घडण्यासाठी आपल्या सारख्यांना हा मार्ग अतिशय उत्कृष्ट, शेवटी लेकरांच शिक्षण महत्वाच तर तुमच्या कष्टाला खरा अर्थ उरेल
@SangitaPadghan-it5yl3 ай бұрын
तुमचं कुटुंब खुप छान आहे तुम्हाला कोकण ला वाडा जाण्यासाठी खुप सुंदर शुभेच्छा
@JaywantJadhav-fr6ch3 ай бұрын
दादा खरच मनाला खूप वाईट वाटले हा प्रसंग बघून परमेश्वर आपल्या सर्व कुटुंबाला नेहमी सुखात ठेवो हिच इच्छा
@tatyramkshirsagar18553 ай бұрын
तुमची जिद्द व चिकाटी पाहुन मन भरून आल
@piyusalve58003 ай бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली खुप शिकवा सिमाला शुभेच्छा ❤
@rohinipandit46213 ай бұрын
🎉 सगळंच कौतुक करावं तेवढं थोड आहे.....देवा हा विरह कोणाच्याच वाट्याला नको यायला......खूप शुभेच्छा सिधू दादा , बाणाई.🎉 दादा या वर्षी सागरला बरोबर घेऊन जा जमलं तर....खूपच लहान आहे अजून तो...🎉
@poonamjraut3 ай бұрын
जपून रहा हो सगळ्यांनी. शुभेच्छा. 👍🏼🙏🏻
@PratibhaaBiraris3 ай бұрын
दादा तुमचा व्हिडीओ पाहुन आम्हांला पण कष्ट करणे सोपे जाते 🎉🎉 तुम्हाला प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@sunillingalkar54813 ай бұрын
आपला प्रवास आनंदी व सुखरूप होवो. हिच सदिच्छा ❤❤❤👍👍🙏🙏❤❤
@aniketwaghmare85293 ай бұрын
शेवटचा क्षण खूप इमोशनल असं वाटत होतं की आमच्याच फॅमिली मेंबर बाहेर जात आहे ❤
@anitasalunke94033 ай бұрын
चार महिने कसे आनंदाने गेले , संमजलेच नाही. किती सगळ्यांच्या विचार करता तुम्ही, जनावरांना खाऊ घालण्यासाठी घरदार सोडून आठ महिने मनावर दगड ठेवून राहावे लागते तुम्हाला. आज चा विडिओ खुप भावस्पर्शी 😢. मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹.
@jayanthedaoo34163 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा खरंच तुमचं जीवन खुप कष्टाचे आहे तुम्हाला सर्वांना सलाम सदैव देव आणि आई जगदंबा तुमच्या पाठीशी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना
@arunanangare50473 ай бұрын
खुप भावनिक क्षण आहे मन हेलावून गेले पाहताना खुप वाईट वाटले माझ्या डोळ्यात पाणी आले दादा आणि बानाई तुमचा सर्वांचा प्रवास सुखाचा होवो .
@AshawiniGhuge3 ай бұрын
बाणाई ताई चे ईमोशन्स बघून डोळ्यात पाणी आले😢😢
@meenapatil5313 ай бұрын
भावूक प्रसंग आहे मुलांना सोडून जाणे एवढे सोपे नाही
@mk791393 ай бұрын
दसरा 3 - 4 दिवसांवरच आला होता सर्व मेंढपाळ बांधवांनी दसरा करून घर सोडायला पाहिजे होतं .घरातल्यांबरोबर सोनं लुटून मग परतीचा प्रवास सुरू करायला हवा होता 😢 मन खट्टू झालं पण पुढील प्रवास सुखाचा आनंदाचा व निर्धोक व्होवो ह्याच तुम्हा सर्वांना शुभेच्छा. 🚩
@SantoshPAldar3 ай бұрын
हृदस्पर्शी प्रसंग . छान व्हिडीओ .
@pradipwaman67303 ай бұрын
खूपच भावुक प्रसंग आहेत. मन हेलावून टाकणारा प्रसंग.
@swaradanargolkar98843 ай бұрын
व्हिडीओ बघताना खूप भरून आलं, खूप रडू आलं. दादा तुमच्यामुळे आम्हाला धनगरी जीवन खूप जवळून बघता येतं. तुमच्या पुढल्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा🎉
@prakashmandave98103 ай бұрын
खुप वाईट वाटले सिदू भाऊ.डोळे भरून आले.आमचे पण आई वडील आम्ही लहान असताना उस तोडण्यासाठी 6 महिने बाहेर जायचे...तेव्हा आम्ही पण धायमोकलून रडायचो....खुप भावुक.
@RajendraNangare-mn2uq3 ай бұрын
सिमाला आणि बाणायला पाहून डोळ्यात पाणी आले दादा एकत्र कुटुंब छान वाटत होते आजचा विडीओ 👌🏻👌🏻
@krishnanarsale71383 ай бұрын
तुमचा हा प्रवास पाहताना मला नेहमीच एकादा जुन्या चित्रपटातली दृश्य पहातोय की असाच भास होतो.
@chitrakale72893 ай бұрын
खूप भावनिक क्षण आहे तुमचा प्रवास सुखाचा आनंदी होओ
@VanitaPawar-x4u3 ай бұрын
व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटले कोकणच्या प्रवासाला आनंदी शुभेच्छा
@kaustublondhe48123 ай бұрын
हृदय हेलावलं,बाणाई तूम्ही जे जीवन जगलात ,ते कष्टप्रद तर.होतच पण खरोखर गौरवास्पद आहे.जे जगलात ते जगलात हा परस्थीचा भाग पण तूम्ही मुलीला शाळेत वस्तीगृहात ठेऊन शिक्षणाच महत्व जाणलात,तूमच कौतूक करावं तेवढं थोडंचआहे.काळ बदलेल फरस्थीतीही बदलेल पण तूमच्या श्रमाच्या रक्ताळलेल्या पाऊलखुणा इतिहास घडवतील यात शंकाच नाही.
@Appel123-si7qt3 ай бұрын
नमस्कार दादा आपणास नवरात्र चया शुभेच्छा 🎉🙏 सर्व जण आंनदात रहा हीच आई जगदम्बा मां ला प्रार्थना 🙏माझी पहली कमेंट आहे
@rajeshkadam39232 ай бұрын
Khup chan video dada. vayit pan vatla ani abhiman pan vatato tumcha. khup kasht karta.GBU
@KetanBMore3 ай бұрын
सिदुभाऊ आज बाकी डोळ्यात पाणीच आणलं तुम्ही आमच्या
@amarkamble31673 ай бұрын
शब्दच नाहीत राव काय कमेंट करावी काय लिहावं काय सुचत नाही धन्य तो परिवार धन्य तुम्ही धन्य तुमची मुलं
@balushelke97963 ай бұрын
भावस्पर्शी... मुलांना खूप शिकवा. प्रवासाला शुभेच्छा.
@sushmashete73963 ай бұрын
सिध्दूबाळा व परिवार तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर दसरा झाल्यावर जायला पाहिजे होतं पण आता तुमच्या सगळ्या बांधवांचे नियोजन असल्यामुळे लवकर निघावे लागत आहे तरी आता पुढचा प्रवास तुमचा चांगला होऊ द्या तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा मुलांना आणि परिवाराला सोडून जायचं म्हणजे काळजावर दगड ठेवून जाण्यासारखं आहे आम्हाला पण खूप वाईट वाटते
@sandhyadhote12463 ай бұрын
सिद्धू दादा आपण एकाच जागी का रहात नाही सगले खुब मेहनत व कष्ट करता गुना गोविन्द नी एकत्र खुब आपुलकी ने रहता। देव नही तुमच्या परिवार वाला सुखी ठेव। ❤
@lataadhangle74813 ай бұрын
खरंच खूप भावनिक क्षण आहे माझ्यासोबत डोळ्यात पाणी आलं
@STROMERJP3 ай бұрын
आज videoबघताना डोळ्यातून पाणी आले कोकणात जाण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉
@manishapatil98133 ай бұрын
मन खुप दुःखी झाले दादा banai रडत होती. पण माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. असे वाटले की मी तिथे आहे . 😭😭😭खूप वाईट वाटले. दीपा तर थांबतच नव्हती. खूप कठीण आहे तिथून निघणे. मुलाबाळांवर इतकी दिवस आनंदात घालवले. खूप छान दिवस गेले. 😔सांभाळून प्रवास करा पुन्हा भेटू वाड्यावर. 🙏
@manjushakulkarni21813 ай бұрын
खूप वाईट प्रसंग आहे लेकराला सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी निघाला दादा आणि बानाई तुमची काळजी घ्या आणि रोज कोकणातील हिडिओ टाक
@balasahebkshirsagar13433 ай бұрын
किती वाईट प्रसंग आहे हा मला तर रडायलाच आले
@yashauti54223 ай бұрын
दादा आजचा व्हिडिओ पाहून माझ्यापन डोळ्यात पाणी आले. खूप भावनिक व्हिडिओ. तुमच्या वाड्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
@GaneshMahadika3 ай бұрын
असा क्षण परत बगणे नाही..... दादा तुमाला ग्रँड सॅल्यूट.....
@vandanasomwanshi36153 ай бұрын
दादा आम्ही धनगर नाहीत पण मी नेहमी तुमचे विडिओ बघते आजचा व्हिडीओ बघून खुप वाईट वाटल आणी डोळ्यात पाणी ही आलं
@vidhyapatil70833 ай бұрын
दादा व्हिडिओ च्या निमित्ताने तुम्ही तर आमच्या बरोबरच आहात आणि आम्ही तुमच्याबरोबर पण घरातल्यांना सोडून वेगवेगळे जायचं म्हटल्यावर किती जीवावर धोंडा ठेवावा लागत असेल❤❤❤❤
शिक्षणाला पर्याय नाही.जवळ ठेवण्यापेक्षा शिक्षणाचे महत्व हाके कुटुंबीयांनी ओळखले आहे.कष्टमय जीवन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जगत आहेत.कौतुकास्पद.
@TulashiramKalamkar3 ай бұрын
मुलांच्या उज्वल भविष्यआ साठी काळजावर दगड ठेवावा लागतो. खूपच भावनिक प्रसंग.
@SunitaSalgar-h1p3 ай бұрын
आजचा व्हिडीओ मनाला खूप हेलावून टाकणारा होता 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
@prakashjadhav2423 ай бұрын
खरच मन भरून आल खूपचं कष्टाचं जीवन आहे तुमचं पण तुम्ही ते आनंदात जगतात
@jayashreewagh96003 ай бұрын
शुभ यात्रा दोघांना ❤❤ सागरला सोबत घेऊन नेले असते लहान आहे अजून.. घरदार सोडून जाणं म्हणजे काळजावर दगड ठेवून जाणं दिवाळी झाल्यावर गेले असते सण जवळ होता
@Shruti2004-SDA3 ай бұрын
खरच खूप ग्रेट आहात तुम्ही ❤️🥹
@bablushingole98413 ай бұрын
खूप भावुक क्षण सिद्धू दादा.सीमा ला आत्या सारखी म्होटी अधिकारी बनव.
@SuwarnaLodha3 ай бұрын
वाड्याला जाताना चा प्रसंग बघवत नाही छान परिवार आहे प्रवास सुखकर होवो❤🎉
@vishakhanikam3213 ай бұрын
मुलांना सोडून आठ महीने लांब राहायचं म्हणजे. खुप कठीण असतं.पण खरच तुमचा प्रवास खुप खडतर आहे.❤❤
@ravikiranbhuse6243 ай бұрын
हंबरली गाय आज वासराच्या ओढीन .. संसारासाठी वासराचं दावं तोडील.
@sunandadrode69783 ай бұрын
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुमचा प्रवास सुखरूप होवो🎉🎉❤❤
@anupamapawar16903 ай бұрын
दिवाळी झाल्यावर जायचं ना कोकणात.तुम्ही कोकणात जायला निघाले पण आम्हालाच वाईट वाटलं.
@nandajadhav77973 ай бұрын
खूप छान विडीओ आहे तुमचा
@kiranstory-sn9rz3 ай бұрын
ताई मोटार सायकल वर प्रवास करताना साडिचा पदर व्यवस्थित घ्या खुप छान विडिओ बनविला आहे, खूप वाईट वाटत आपल्या पोटच्या मुलीला, मुलांना सोडून जावेसे वाटत नाही,, तुम्हाला शुभेच्छा ताई दादा 🎉🎉
@pushpashewale27843 ай бұрын
दादा चे सर्व कुटुंब आदर्श कुटुंब आहे.
@shobhasonawane74423 ай бұрын
खूप वाईट वाटतंय तुमचा प्रवास सुखाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤😊
@monalimhanavar90633 ай бұрын
आमचं पण लहान पण आस aasharam शाळेवर गेलं आहे... आम्हाला तर वडील पण नव्हते आमची फकत मम्मी च येत होती.. खूप वाईट आहे हे आस सोडून राहणं.. अशी वेळ येऊ वाटतं कोणावर पण..❤❤❤ खूप प्रेम तुमचा मुलांना
@monalimhanavar90633 ай бұрын
आता मी इंजिनीरिंगग केल आहे कोणती पण शाळा असुद्या जिद्ध असली पाहिजे
@balasahebbagat89263 ай бұрын
या चार महिन्यांतील ही व्हिडिओ क्लिप लय मनाला भिडणारी आहे. माय लेकीचा मिलाप खूपच काळजाला भिडला. डोळ्यात अश्रू आले राव, मी ही दोन मुलांचा बाप आहे. लेकरापासून लांब राहणे किती कष्टदायक असते हे आई बाप च जाणतो. पण माणसाला त्याची परिस्थिती नुसार हेलकावे खावे लागतात. स्वतः बरोबर मुक्या जनावरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करावी लागते. ' शाळेच्या वाटेवर आपल्या लेकराची चातकासारखी वाट बघत असलेली मायमाऊली जेव्हा आपलं लेकरु समोर आल्यावर जो अश्रूंचा बांध फुटला ते पाहताना आम्ही सुद्धा 😢 रडलो. हा व्हिडिओ ने आम्हाला रडवून टाकलं. धन्यवाद हाके भाऊ!
@vitthalvajeer80193 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान विचार आहेत तुम्हचे 👌👌
@poonamskitchen8963 ай бұрын
खूप वाईट प्रसंग आहे दादा पण लेकरांच्या भविष्यासाठी
@leenadhawade75513 ай бұрын
आजचा वीडियो मन हेलावून टाकणारा होता , नकळत आमच्या ही डोळ्यातून पाणी वाहू लागले 😢
@DhritiAniAaji3 ай бұрын
काय खूप इमोशनल झाले चार महिने असे गेले कळलेच नाही घर अंगण शेत यांची बघायची सवय झाली होती सागर राहील काय तुमची सवय आहे आता आम्हाला सागर लवकर दिसणार नाही ❤
@sunandasuryavanshi53343 ай бұрын
❤बांनाई खूप प्रेमळ आहे...
@rupalipatilvlogs2933 ай бұрын
बाणाई ताई खूप अवघड असते मुलाना सोडून राहणे, 🥹🙏, सगळा जीव आई चा मुलानं मध्ये असतो,, मी गेले या सगळ्यातून आपण कुठे ही राहुदेत जीव मात्र आपल्या लेकरा मध्ये अडकतो 🥹🙏,, पण जीवनाच्या संघर्षामध्ये त्याना सोडून राहावा लागते,, 🥹🙏तुमच्या दीपा मध्ये मला माझी लहान मुलगीच अरु च दिसली आणि डोळ्यात पाणी आले,🥹🙏
@khandushirke3213 ай бұрын
खरच डोळ्यात पाणी आले❤
@savitaingawale36813 ай бұрын
दादा मी आज पहिल्यांदा कमेंट करतेय आज mla आमचे लहान पणीचे दिवस आठवले . आम्हाला आमची आई असच सोडून ऊस तोडणी ला जायची 😔
@anjalijadhav86953 ай бұрын
वीडियो baghatana आमचे डोळे पाणावले तर विचार नाही करवत तुम्हाला किती जड झालं असेल खूप छान वीडियो
@PratimaKasare3 ай бұрын
खूप वाईट वाटते dada वहिनी तुमचा प्रवास सुखाचा होउदे