बाणाई, तू कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला मात दिलीस यात तुझे पुर्वजन्मीचे संचित आणि या जन्मातले तुझे चांगले कर्म आहे असेच म्हणावे लागेल. तू खूपच छान आहेस गं! देव तुला नेहमी आरोग्यसंपन्न ठेवो!
@SatyawanLondhe-x9j8 ай бұрын
हा एकमेव चॅयनेल आहे त्याला कोणी च वाईट कमेंट्स करतं नाही सलाम बानाई
@kiranskitchenmarathi97778 ай бұрын
बाणाई आज तुझ्या आजारपणाचा ऐकून खरंच डोळ्यातून टचकन पाणी अगदी 21 मिनिटाचा व्हिडिओ श्वास रोखून मी पहात होते आणि तसतसा डोळ्यातून पाणी वाहत होतं तू प्रत्येक स्त्रीसाठी एक उत्तम आदर्श आहे. तुझ्याकडे पाहून कळतं की बंगला नसेल तरीही चालेल मॉड्युलर किचन नसेल तरीही चालेल खूप महागडे कपडे महागडे दाग दागिने हिंडणं फिरणं असं काहीही नसलं तरी जीवन आपण अगदी आनंदी जगू शकतो. तू माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श म्हणून आहे. आणि खरं सांगू नशीबवान आहेस बाई तू असं कुटुंब मिळालंय तुला तुझे सासू-सासरे असोत किंवा तुझं माहेरची सासरची मंडळी खरंच खूप भारी आहे ज्यांनी तुला एवढ्या मोठ्या आजारात साथ दिली नाही तर आजकालची करोडपती व्यक्ती सुद्धा एखाद्याचं दुखणं विचारायला सुद्धा मागेपुढे पाहते आणि हजार वेळा विचार करते. मी खरं तर एक ते दोन वर्षांपासून तुमचे व्हिडिओ पाहते पण एवढ्या वर्षांपासून कधी तुझ्या चेहऱ्याकडे पाहून असं जाणवलंच नाही की तू एखाद्या एवढ्या मोठ्या आजाराची झुंज दिली आहे आणि ती तू जिंकलीस. बाणाई खरंच ग्रेट आहेस तू😊❤
@SnehalJoshi-p6c9 ай бұрын
बाणाई तू भारतातील सर्वात श्रीमंत महीला आहेस. जी श्रीमंती भल्याभल्यांना पैशाने मिळत नाही ती आज तुझ्याजवळ आहे ती म्हणजे सोन्यासारखं तुझं आयुष्य तुझी प्रेमळ माणसं तुझ्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व मंडळी आणि तुझ्यावर प्रेम करणारी ही मुकी जनावरं आणखी काय पाहीजे हीच खरी श्रीमंती कष्ट करणं रक्ताचा घाम गाळणं दोन वेळचं सुग्रास जेवण आणि रात्रीची शांत झोप सदैव आनंदी सुखी रहा माये 🙏
बाणाई तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात आणि तुमच्या पाठीशी खंडोबा बाळुमामा बिरोबा यांचा आशीर्वाद आहे.एवढ्या मोठ्या आजारावर मात करून आज आपला गोड संसार करीत आहेत तुमचा पुनर्जन्म आहे परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी राहो
@dadaarts65048 ай бұрын
दादासाहेब पडळकर जेजुरी वाशी नवी मुंबई
@pushpakalel5988 ай бұрын
बाणाई तु खुप नशीबवान आहे तुझ्या घरचीमाणस खुप चांगलीआहेत,आणी तु बरी आहेस 😊❤
@Shanta-io4lh9 ай бұрын
खरंच बाणाई ताई तुमचे करू तितके कौतुक कमी आहे आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सलाम आमचा. शिक्षणच महत्वाचं नसत आयुष्य जगण्यासाठी हे आज तुम्ही दाखवून दिलं. आणि मला हे नाही कळत ते @Josh Talks वाले असल्या प्रामाणिक लोकांना का नाही बोलवत, फालतूच्या लबाड लोकांना बोलावतात जे खोटा struggle सांगतात
@petlovers28609 ай бұрын
Yes👍
@sheetalgaikwad46659 ай бұрын
Barobar......Josh talk faltu public la bolavto....ya taiina salam...
@sunandagadade26539 ай бұрын
अगदी बरोबर.जी लोक गरीब असतात त्यांना इतर लोक विचारात घेत नाही
@maggyjadhav95949 ай бұрын
Khar ahe
@parthshimpi28879 ай бұрын
बानाई तुला सलाम
@BalasoSalunke9 ай бұрын
स्वतःचं दुःख सांगून बरेच युट्युबर फेमस झाले. पण स्वतःचं दुःख लपवून आजपर्यंत जवळ पास पाऊणे चार लाख सबस्क्राबर लोकांचे मनोरंजन करणाऱ्या बाणाई ताई ला मनापासून मानाचा मुजरा 🙏आज हे वास्तविक पाहुण्यांमुळे आम्हाला समजलं. पाहुण्यांना मनापासून धन्यवाद 🙏 कॅन्सर हा आजार काय आहे याचा प्रत्येय मी अनुभवला आहे. माझ्या आईला झाला होता. आत्ता व्यवस्थित आहे.
@chhayadongre4099 ай бұрын
बlणाई तुझ्या सासू सासऱ्या सारखे काळजी घेणारे सासू सासरे सर्वांना मिळोत.आणि तुझ्यातल्या चांगुलपणाच्या फळ म्हणून इतक्या मोठ्या आजारातून तू बरी झालीस बाळू मामाची कृपाच आहे.तुझे पुढील आयुष्य निरोगी जावो हीच प्रार्थना🙏
@startinglife38259 ай бұрын
ही साधी भोळी माणसं किती भारी आहेत देवा यांचे विचार किती छान आहेत कोणतेही शाळा विद्यापीठाच्या डिग्रीची गरज नाही यांना....❤
@ManishaThube-mb5vt9 ай бұрын
बाणाई ऐकून डोळे भरून आले. परमेश्वर तुला आणि तुझ्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो. 🙏
@rajendradevkate7 ай бұрын
सासऱ्याच्या रुपानी बाळूमांमा चा अर्शिवाद होता 🙏💛❤
@rameshnarayankale37359 ай бұрын
आज संपूर्ण व्हिडिओ पाहताना खरेच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कुटुंब काय असते हे हाके पाहुण्यांनी समाजाला दाखवून दिले. बिराजी, दादा आणि सर्वच हाके कुटुंब कौतुकास पात्र आहेत. नाहीतर इतक्या कमी वयात पत्नीला, सुनेला दुर्धर आजार झाला की तिला माहेरी पाठवून देणारे हिणकस वृत्तीचे लोक जागोजागी दिसून येतात. तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. सर्वावर उत्तम संस्कार आहेत. म्हणून आम्हा सर्वांना तुम्ही आवडता. तुमच्याकडून समाजाला खूप काही शिकायला मिळते. यासाठी तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील. परमेश्वर आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी भरभराट देवो हीच प्रार्थना.
@kalpanarane8029 ай бұрын
Right
@UshaJakkal-jb3ue9 ай бұрын
बनाई तुम्ही तुमच्या साध्या सोप्या भाषेत सांगितलेले ऐकलं व तुमच्या सर्व भावना आमच्यापर्यंत पोचल्या. तुमची जीवनातील पुढील वाटचाल सुखद व आरोग्यदायी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏
@srushtibhagwat25459 ай бұрын
इतके दिवस झाले मी तुमचे व्हिडिओ पाहतेय बानाई ताई... इतकी प्रसन्न..नी मेहनती आहे.. त्यामागे एवढा मोठा संघर्ष आहे हे पाहून खूप वाईट वाटले... कॅन्सर हा आजार कसा आहे मला चांगल माहीत आहे...पण तुम्ही जिद्दने त्यावर मात करून... एवढे आनंदात.. एवढे कष्ट करून कायम हसू असते चेहऱ्यावर... तुमच्या जिद्दीला सलाम ताई...❤❤
@manjulajanawad55929 ай бұрын
किती सोज्वळ किती समाधानी किती मुग्ध आहेस बाणाई आणि तुम्हा कुटुंबीयांचे प्रेम , सहकार आणि कसा जीवनाचा आनंद घ्यावा हे प्रत्येकाने शिकायसरखे आहे .🙏
@VandanaShinde-ct1zn9 ай бұрын
बाणाई ताई तू इतकी निस्वार्थी 'निरागस आहेस परमेश्वर तूला कधीच काही होऊ देणार नाही.
बाणाई तू खूप संयमी आणि धीट आहेस. बाणाई तुझं मन खूप शुद्ध आणि सात्विक आहे आणि म्हणून ईश्वराने तुला साथ देऊन हे आजारातून बरे केलं. आमच्या आणि ईश्वराचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील😊❤
@shraddhabhosle11149 ай бұрын
बाणाई तु खूप धाडसी आहेस तुझ्यावर बाळुमामाची कृपा होती म्हणुन हे सर्व पार पडल आणि तु आता सुखरूप आहेस🙏🌹👍🏻❤️
@ravigaikwad98119 ай бұрын
Great Work! Great Banai ! Great. Thinking
@simpkn9479 ай бұрын
बानू ताई तुझा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आलं..देव तुला सुखी समाधानी समृध्द दीर्घायुष्य देवो. देव चांगल्या माणसाचं कधी वाईट करत नाही..
@suvarnakhandagale91459 ай бұрын
Banaai आलेलं जन्म जाणार आहे पण आहे तोपर्यंत सगळ्यांशी चांगल वागावं,चांगल रहावं,म्हणजे आपलंही चांगल होत हे तुझे तत्त्वज्ञान खूप छान,शिक्षणानेच शहाणपण येत असं नाही हे तू दाखवून दिले,तुझ्या आणि तुझ्या उपचारांसाठी झटणाऱ्या मामांसह सर्वांना kdak सलाम,धन्यवाद पाहुणे ..🙏🙏🙏💐💐💐
@ranjanadeokar22089 ай бұрын
बाळुमामां.चा.अशिर्वाद.सदैव.आपल्या.पाठीशी.आहेत
@rohinibhosale16889 ай бұрын
बाळुमामांचे आशीर्वाद सदैव बानाईच्या पाठीशी आहेत
@sangitaumbarje21959 ай бұрын
मी बार्शी ला राहते तुझ्या तोंडून बार्शी चे नाव ऐकून खूप आनंद झाला. भगवंताची बार्शी . भगंवत तुला नेहमी नीरोगी आयुष्य देवो. खुपचं प्रेमळ आधी साधी भोळीमानस आहात तुम्ही देवाचा आशीर्वाद कायम राहो तुमच्यावर
@meghashewade81749 ай бұрын
किती वेदना सहन केल्या ग माय तु😢 🥰 देव तुझ्या पाठीशी राहो
@shraddhashetye23879 ай бұрын
बाणाई.... काय आहेस ग तू!!!! खंडोबाचा आशिर्वाद आहे तुझ्यावर... तुला उदंड आयुष्य लाभो ...
@user-ed6tp6wi5f9 ай бұрын
बाणाई ताई तू खरंच खूप ग्रेट आहेस तुझे विचार खूप चांगले आहेत तू कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात केलीस ताई तू खूप खंबीर आहेस. तुझे पुढील आयुष्य खूप सुखमय जावो ही महादेवा च्या चरणी प्रार्थना 🙏तुमची पूर्ण फॅमिली च एक नंबर आहे कराव तेवढं कौतुक कमी आहे देवाने खरंच असा आजार कुणाला ही देऊ नये 🙏🙏
@sunitajanrao77059 ай бұрын
खरंच बाणाई तुझे विचार खूपच सुंदर आहेत,,,मी पण कॅन्सरला हरवले आहे ,,, हा आजार कोणालाच नकोय,,,तू ग्रेट आहेस...
@ahilyabansode74419 ай бұрын
खरच तुमचे सासरे ग्रेट आहेत....नाहीतर खूप कमी सासरची लोक असतात जी सुनेला लेकी सारखं जीव लावतात.....👍
@santoshjadhav67979 ай бұрын
खूप मनाला वेदना देणारी घटना तुमच्या बरोबर घडली पण देवाच्या आणि तुम्याच्या घरातील देवा सारख्या माणसांमुळे तुम्ही कॅन्सर सारख्या आजारावर यशवी रित्या मात केली खूप अभिमान वाटला आज तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा तुमचे मामा तर मला पहिल्या पासूनच खूप दमदार असे व्याखिम्हत्व असे आहेत देव त्यांना. आणि थुमा सर्वांना असेच सुखी आणि आनंदी ठेओ ही प्रार्थना जय जवान जय किसान
@vidulajagtap16909 ай бұрын
बानू ताई तू आज मला रडवलस किती त्रासातून तू कॅन्सर सारख्या आजारावर मात केली ह्या आजारात घरच्यांशी साथ तुला लागली तुझे सासू सासरे, दीर, अर्चना सर्व देव माणसे आहेत, खरेच तू खूप भाग्यवान आहेस तुला एवढे चांगले सासर मिळाले.बाळू मामा ने तुला वाचवले तू एक चांगला संदेश दिला कुणाचे ही वाईट करू नये तुझ्या चांगल्या कर्माचे फळ मिळाले
@namratakudoo9 ай бұрын
कोणतेही background music नाही …इतर लोक सांगतात तस ..खोटेपणा नाही सांगण्यात …कोणतीतरी जवळची व्यक्ती आपले मन मोकळे करते आहे असे वाटले ऐकताना …बाणाई तुम्ही खूप सहन केले आहे ..देव तुमच्या सोबत आहे आणि सदैव राहिल 🙏
@SushamaKashikar9 ай бұрын
बाणाई तुम्हांला दीर्घायुष्य लाभो. परमेश्वर सतत तुमच्या पाठींशी आहे. सलाम तुम्हांला. 🙏💐
@anuradhasawant1329 ай бұрын
बांणाई तुझ्या सारखी सर्वांनी आदर्श घ्यावा असं तुझं वागणं,बोलन आहे.धन्यते आईबाप आणि सासुसासरे तुला खुप चांगले आयुष्य लाभो.
@rutujadhanawade38049 ай бұрын
स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे तुम्हाला दीर्घायुष्य भेटो. तुमचं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आल. खूप छान स्वभाव आहे तुमचा
@pushpalatajadhav23329 ай бұрын
कोणतीही उच्च पदवी नसताना आयुष्याचा खरा अर्थ तुम्हाला कळला. जर सगळ्यांनी तुमच्यासारखा विचार केला की जाताना काहीही न्यायचं नाही रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने परत जाणार. त्यामुळे आहे तोपर्यंत सगळ्यांशी गोड बोलून राहावे. तर आयुष्यात कोणी दुःखी होणार नाही.
@kumudghorpade72439 ай бұрын
बाणाई तुला उदंड आयुष्य लाभो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना !!!!!
@SugrivSurwase6 ай бұрын
ताई खरच तु महान आहेश मि एक मराठा तरी पण मि तुमचा प्रत्येक वेडीव बघत आसतो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला निरोगी आणि सुदृढ सुखाचे आयुष्य मिळो हिच देवाला प्रार्थना करतो
@chhayasubhedar67109 ай бұрын
माझी धिटाची बानाई..... खूप आनंद झाला.. आणि वाईट पण वाटले.... बाणाई तुझा हाच प्रामाणिक स्वभाव खूप काही सांगून जातो....देव तुझ्या कायम पतीशी आहेच...आणि राहो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❤
@krishnanarsale71389 ай бұрын
शिक्षण नसतानाही उच्च शिक्षिताला लाजवेल असा संदेश दिला शेवटी तुम्ही वहिनी साहेब, आता तर नक्कीच तिथे येऊन तुमचं दर्शन घ्यायला हवं माऊली.
@neetajagdale74119 ай бұрын
खरंच बाणाई किती धाडसी आहेस एवढ्या मोठ्या आजारावर मात केलीस.. आणि किती कष्ट करतेस.. खरंच आमची आम्हालाच लाज वाटते.
@aaishwaryasangle27939 ай бұрын
21 मिनिटे पूर्ण श्वास रोकात व्हिडिओ पहिला आज, आज कळलं की या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि निर्मळ मनामागे दुःखाचा डोंगर लपवलेला होता, सलाम आहे बानाई ताई तुला, देव तुला असच हसत हसत म्हातारे करो, नेहमी अशीच हसत रहा ताई ❤❤❤
@gitanjalipatelhantodkar95779 ай бұрын
बनाई ची कहाणी ऐकून डोळ्यात पाणीच आले, बाणाई आमचा सर्वांचा तुला आशीर्वाद आहे,तू कायम स्वास्थ्य राहणार,किती चांगले विचार आहेत ग तुझे,देव तुला उदंड आयुष्य दे,कायम हसत रहा,आता पर्यंत आम्ही तुला लक्ष्मी,अन्नपूर्णा,या रूपात बघत होतो,कॅन्सर वर मात करून तू तुझ दुर्गे च रूप दाखवल,❤❤❤❤
@eindustry22649 ай бұрын
बानू ताई तुला सलाम 🙏🙏🙏🙏🙏👍🏻👍🏻
@rnjeetamore29229 ай бұрын
बानाई ताई तु एवढे निस्वार्थी पणे सगळ्यांचे करतेस,कसे तुला काही होईल .खरंच खुप ग्रेट आहात तुम्ही बाळूमामा सदैव तुम्हा सगळ्यांच्या सोबत राहो🙏♥️
@medhaapte2926Ай бұрын
बाणाई तुझा हा सगळा खडतर प्रवास कौतुकास्पद आहे. तुझ्या कुटुंबातील सगळयांनाच सलाम! सगळ्याच गोष्टी पैसा आणि शिक्षण यांनीच साध्य होतात असं नाही. कुटुंबात एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी असली तरच एवढा कठीण प्रवास साध्य होऊ शकतो.
@minalbandgar77439 ай бұрын
काय बोलावं कळतच नाही , इतका संघर्ष करून सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणे सगळ्यांना नाही जमत, तुमची फॅमिली खूप महान आहे.
@tathastukokanАй бұрын
ताई तुमच्या वर आलेला प्रसंग ऐकून तुम्ही त्यातून धिरान बाहेर पडलात..आज तोच प्रसंग माझ्यावर आलाय. ऐकल हा आजार तेव्हा मी कोसलेच..तुमचे शब्द ऐकुन मला आता धीर आला..जगेन मरेन माहिती नाय..काय का असेना अचानक हा व्हिडिओ समोर आला..खरंच धीर आला..असाच आणि कोणी असेल त्यालाही तुमच्या ह्या व्हिडिओ ने बल मिळू दे..खूप छान धन्यवाद..देव बरे करो तुमचे..बाळू मामाच्या नवं चांगभलं
@latagaikwad27179 ай бұрын
तुमचं नशिब खूप चांगले बाळु मामा ची कृपा तुम्ही बर्या झाल्या तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@annapurnarecipes88169 ай бұрын
बाणाई तुम्ही कॅन्सर सारख्या आजारावर मात केली आणि तरीही एवढी कष्टाची कामे करत आहात कोणतीही तक्रार न करता. सलाम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.तुमच्या मुळे अशा खूप लोकांना आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
@seemabhagwat63909 ай бұрын
बाणाई तुला उदंड आयुष्य लाभो तु एक आपल्या धनगर समाजाची आदर्श स्त्री आहेस मी अहिल्याबाई होळकरांच्या वंशाची आहे म्हणजे माहेरची
@crazyyoverDance.8 ай бұрын
पैसा तर अशावेळी महत्वाचा असतोच पण आपल दुःख कळु न देता साथ देणारी n यातून बाहेर काढणारी सोन्यासारखी माणसं भेटण पण नशिबाचे काम आहे .नी अजूनही तुम्ही त्या माणसांना विसरला नाहीत . हे खूप मोठं आहे. इथून पुढचे दिवस तर तुमचे खूप चांगले असणार आहेत ❤
@geetagurav34149 ай бұрын
परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद बानाई ला पूर्ण बरे केले आणि घरच्यांना सलाम खूप कष्ट करून बानाई ला बरे केले ❤❤ बानाई चे विचार खूपच महान आहेत ❤❤❤सलाम माऊली तुला ❤❤❤❤
बानाई तुझी हिंमत म्हणून आज तू जिंकू शकली,आता तर आता त्याच हाताने किती काम करते❤
@suhaskendale95699 ай бұрын
बाणाई बाळूमामा आणि आई तुळजाभवानीचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तुम जियो हजारो साल.धन्य आहेस तू बाणाई.
@ujwalashelar24519 ай бұрын
बाणाई खूप धाडसी आणि भाग्यवान आहात, वडीललांसारखे सासरे मिळाले.❤
@pratibhalokhande39729 ай бұрын
बनाई 💞तुझे पुण्य आणि घरच्यांची साथ ❤इतका मोठा आयुष्यातील टप्पा तू पार केलास अग किती शिकायचं तुमच्या कडून ❤त्या देवाचे आभार ज्यांनी तुमच्या सारखी माणसं आम्हला आयुष्यात कस जगायचं हे शिकवायला पाठवली ❤खूप प्रेम तुला ❤सागर la गोड पापा❤ आणि अर्चनाला खूप आशीर्वाद खूप गोड मुलगी आहे ती ❤️❤️उदंड आयुष्य लाभो सगळ्यांना हीच मनापासून इच्छा ❤❤
@janardanbavdhane53019 ай бұрын
सर्व कुटुंबाच सहकार्य आणि बाणाईचा कणखरपणा अप्रतिम
@anitagawade52289 ай бұрын
डोळ्यात पाणी आले खूप च धाडसी बाणाई ताई 😊
@jayatirmare30719 ай бұрын
खरोखर खूप अंतःकरणाला भिडणारे शब्द आहे अश्या आजारावर मात करण्यासाठी खूप मोठे धैर्य लागते
@vaishalibhoir22339 ай бұрын
बानाई नशीबवान या शब्दाचा अर्थ आता समजतो. इतके चांगले आणि समजदार नातेवाईक मिळणे (सासू, सासरे,दिर,आजी,आई,वडील आणि इतर) तू जे सांगितले ते ऐकून डोळ्यात पाणी तर आलच पण तुम्हा सगळ्यांच कौतुक पण वाटल. असच एकमेकांना साथ द्या आनंदात रहा ही बाळूमामांच्या चरणी प्रार्थना.
@kaminikadam28629 ай бұрын
बानाई तुम्हाला स्वामी खूप ताकद देतील....काळजी घ्या आणि खूप सार प्रेम..खूप strong आहात तूम्ही...तुमच्या कुटुंबांचा सुद्धा खूप कौतुक..येवढ्या कठीण वेळीस सुद्धा तुमची खूप चांगली साथ दिली.❤❤❤
@baburavkapse6759 ай бұрын
खरच या माऊलीचा संघर्ष व विचार खूपच प्रेरणादायी आहेत
@meenakshivyas74229 ай бұрын
निःशब्द 😊.. फक्त्त Salute बाणाई तुला आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला 🙏
@pradipbadhe67109 ай бұрын
कुणाचे वाईट केले नाही तर देव आपलं पण वाईट करत नाही,--- चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार----दिर्घयुष्य लाभो तुम्हा सर्वांना👍🙏
@lalitaarwade94489 ай бұрын
आता बाणाई एवढं सहज सांगते पण खरचं सलाम आहे तुझ्या कष्टाचं . आणि तुझ्या पुर्ण कुटुंबाला देखील सलाम . तुमच्या फिरत्या आयुष्यातून एवढं ट्रिटमेंट घेणं अजिबात सोप नाही . माझा तुला आणि तुझ्या कुटुंबाला आशिर्वाद आहे . सुखी रहा .
@WanderEchoVlogs79589 ай бұрын
खूप तुम्ही धाडसी आहात. माझी आई सुद्धा या आजारातून बरी झाली आहे डॉक्टरांनी पंधरा दिवस जगेल असं सांगितलं होतं. ट्रिटमेंट पूर्ण केल्या नंतर आज 17 वर्षे होऊन गेली आजुन माझी मम्मी या आजारापासून मुक्त आहे. ...
@balushelke97967 ай бұрын
साधी माणसं... पण जगण्यातला अफाट तत्वज्ञान. खरंच मनापासून सलाम बाणाई- सिदू दादा आणि तुमच्या परिवाराला.
@prathameshalhat98829 ай бұрын
माणसं चार पुस्तकं शिकली की स्वतःला फार शहाणं समजतात पण हि माणसं अडाणी असून मोठं मोठ्या degree घेतलेल्या लोकांनी ह्याच्या कडून संस्कार शिकले पाहिजे. आणि कोणा बदलही कृतज्ञ आणि ऋण कसं व्यक्त करावं ह्याच्या कडून शिकलेल्या लोकांनी शिकावं. बाकी मी तुमच्या पुढे खूप छोटा आहे . जय महाराष्ट्र ❤ जय मराठी संस्कृती. धन्यवाद
@bhaiyya30899 ай бұрын
बाणाई ताई तुम्ही खरंच नशीबवान आहात .या दूर्धर आजारातून बाहेर पडलात .आई वडिलांसारखे सासू सासरे व भावासारखा दीर एकूण सर्वच कुटूंब खबीरपणे उभं राहिलं व तुम्ही सुद्धा प्रचंड आत्मविश्वासाने या दुखातून बाहेर पडलात .अर्थात पुनर्जन्मच झाला म्हणा की .. ताई तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना
@AvantiNikam-x1l9 ай бұрын
बाणांनी तू आणि तुझे सगळे जीवलग कुटुंब ,तुम्ही सगळ्यांनी आलेल्या प्रसंगाला खूप धीराने व खंबीरपणे तोंड दिलात.तुम्हा सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते. बाणांनी तुला खूप खूप दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बाळूमामा तुझ्या सदैव पाठीशी आहे.
@SaiBochare-t5b8 ай бұрын
सलाम सलाम सलाम असा परिवार ला
@RukminiKale-jw3sc9 ай бұрын
पूर्ण विडिओ रडून बघितला ,सलाम ताई तुला ,देव तुला असच हसत ,खेळत ठेऊदेत, आणि तुज्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करुदेत ,हीच परमेश्वराकडे पार्थना❤
@GangaShelke-vw6bs9 ай бұрын
खरंच बानु ताई खुप भाग्यवान आहेस तू तुला यवडी भारी कुटुंब भेटलय आणि तु खुपच भारी आहेस देव तुला नेहमी सुखी ठेवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे ❤❤❤❤❤❤
@rohidaschaudhary20229 ай бұрын
बानाई तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@Princess509279 ай бұрын
बाणाई तुमचा आजचा भाग पाहून खूप दुःख वाटले परंतु तुमच्या कुटुंबाने तुम्हाला याप्रसंगी खूप मोठा आधार दिला यासाठी त्यां चे आभार मानावे तेवढे कमीच आहे तुमचे कुटुंब पाहून मला खूप आनंद वाटतो कारण तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला असे एकत्र कुटुंब राहायला मिळा ले आणि तुमच्यातले प्रेम पाहून खूप खूप समाधान वाटते
@sunandagadade26539 ай бұрын
खूप दीर्घायुष्य आपणांस लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.बाळूमामा सदैव आपल्या पाठीशी आहेत
बनाई तुला,तुझ्या कुटुंबाला आणि या जगातील सर्व लोकाना स्वामी समर्थ यानी सदैव सुखी ठेवो
@rupayadav84498 ай бұрын
Baanai taai tu aashicha hasat khelat god bless you 💖
@vandananavale65599 ай бұрын
खरचं बानाई खुप नशिबवान आहे असले सासर माहेर मिळाले जीवाला जीव देणारी मानस मिळाले.
@SumanRandive-q8c9 ай бұрын
खरच बानाई परमेश्वर पाठिशी आहे तुझ्या तुला तुझ्या कुटुंबाला उदंड आरोग्य दायी आयुष्य लाभो 😊
@rohidaschaudhary20229 ай бұрын
तुमचे कुटुंब म्हणजे एक समाजाला आदर्श कुटुंब असे आहे
@leenashinde38419 ай бұрын
आज पुन्हा एकदा मनात घालमेल झाली ,माझ्या मोठ्या वहिनींना कँन्सर झाला होता नऊ वर्षे ऊपचार सुरू होते ़ते जे सगळं आम्ही अनुभवलंय यावरून हा आजार कुणालाही न होवो हि देवाकडे प्रार्थना ,बानाई तुम्हाला छान निरोगी दिर्घायुष्य मिळो हि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@rohiniwalimbe26659 ай бұрын
बाणाई तुझ्या कुटुंबीयांना माझा सलाम तू खरंच भाग्यवान आहेस कुटुंब मिळाले बाळुमामाची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो.
@javedsubhedar41599 ай бұрын
Great 👍 God with you 🙏
@manjuufoodcreations3699 ай бұрын
बाणाई तुमच्या धाडसाला सलाम..तुमच्या सगळ्या कुटुंबाचे खूप प्रेम आहे तुमच्यावर..त्यांना पण सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rekhakotwal30089 ай бұрын
बाणाई आमची लाडाबाई..तू म्हातारी कोतारी होणार आहेस. भरपूर आयुष्य तुला आई तुळजाभवानी ने आणि बाळु मामांनी दिलं आहे.. अजुन दोन पिढ्या तुझ्यातली अन्नपूर्णा देवी बघणार आहेत. श्रीस्वामींच्या कृपेने तू ठणठणीत बरी झाली आहेस..लाखो लोकांचे चांगले आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत..🙏🏻🙏🏻तू काही दिवसांनी विसरून ही जाशील बाळा, तुला नक्की काय झाले होते ते ते..!!❤❤
@supriyamohite16009 ай бұрын
बाणाई खूप धाडशी आहेस घरातले सर्व लोक खूप प्रेमळ आहेत येवढं दुःख सहन केलस पण कधी चेहऱ्यावर दाखवलं नाहीस तुला खूप खूप आयुष्य लाभो बाळू मामा सदैव पाठीशी आहेत
@chaitraredkar12779 ай бұрын
बाणाई, तुम्ही किती प्रसन्नपणे रहाता. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. हाके कुटूंबिय विशेषतः आपल्या सुनेची मुलीप्रमाणे काळजी घेणारे दादा यांच्याविषयी खूप आदर वाटतो. कॅन्सरच्या उपचारासाठी खूप धैर्य आणि आशावाद लागतो. तो तुम्ही दाखवलात त्यामुळे बाणाई बरी झाली. तुमच्या या पोडकास्टमुळे खूप जणांना उर्जा मिळेल.
@shakuntalaambhore24689 ай бұрын
बाणाई आज चा व्हिडिओ ऐंकुन मला पण खरच तुझ्या धैर्याची कमाल,आज तुम्ही ठीक आहात,खरोखर बाळु मामा तुमच्या पाठीमागे सदैव आहे.❤❤विचार किती उच्च प्रतिचे आहेत, दुसऱ्या न बद्दल चांगले विचार करणे किती मोठे पणा,बाणाई तु सुगरण तर आहेच पण कुटूंबात सर्वाची प्रिय पण आहेस हे तुझ्या माहिती वरून समजलं,आतापुढील आयुष्य सुखात जाईल हीच सदिच्छा ❤❤
@sangeetachavan63239 ай бұрын
बानाई या आजारपणात तुला जो अनुभव आला,त्रास झाला त्यातून तुला जगण्याचा मार्ग मिळाला. किती सुंदर,सहज विचार तू बोलून दाखवले. कोणत्याही पुस्तकांपेक्षा चांगले विचार तू तुझ्या अनुभवातून मांडले. तुझ्या जिद्दीला सलाम,तुझ्या सहनशक्तीला सलाम. सासऱ्यांच्या चांगुलपणाला सलाम. आजकाल अशी प्रेमाची मानस दुर्मिळ झाली आहेत. तुझ्यामुळे हे जीवन आम्हाला बघता येत. Thanx to all 😍😍😍😍😍
@sakshijadhav78539 ай бұрын
व्हिडिओ च्या शेवटी खुप प्रेरणा देणारे शब्द बोला तुमच्या धेर्याला खुप खुप धन्यवाद तुमचं कुटूंब खुप छान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ushabagal81479 ай бұрын
बानाई ताई सलाम आहे तुझ्या धाडसाला तु खुपच गुणी आहेस परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो
@manishamane2409 ай бұрын
बानाई तू खूप नशीबवान आहेस तुझ्यासोबत एवढी चांगली मानस आहेत तुमचं कुटुंब सारखं असच हसत राहो 🥰
@jyotsnavispute57128 ай бұрын
Great..Banai..तुझा व तुझ्या कुटुंबाचा अभिमान वाटतो
@pradnyabhosale60939 ай бұрын
बाणाई तुझा रोजचा खडतर प्रवास आणि आनंदाने उत्साहाने एवढं कष्ट करतेस हे पाहून तर तुझं करावं तेवढं कौतुक कमीच होतं पण आज तू जे सांगितलं ते ऐकून अजून आदर वाढला एवढ्या लहान वयात कुठलीच तक्रार न करता आनंदाने जीवन जगत आहे तुला आणि तुझ्या कुटुंबाला सलाम आहे तुला उदंड आयुष्य मिळो हीच प्रार्थना आहे ❤❤❤❤एक आदर्श स्त्री कशी असावी तर ती तू आहेस तुझ्यापासून खूप स्त्रियांना प्रेरणा मिळते
@anuradhapendharkar51669 ай бұрын
बाणांनी खरच खूप नशीबवान आहेस. खूप चांगली माणसं मिळाली आहेत तुला. तुम्ही सगळे असेच खूश, आनंदी, निरोगी रहा. देवाचा हात आहे तुमच्या वर.
@shreeganesha1729 ай бұрын
सोबत चांगल कुटुंब किती महत्वाचं आहे.... कधी वाटलं नव्हतं असही काही असेल घडलेलं... असेच छानं राहा तुमचं कुटुंब तुमची ताकद आहे... सासू सासरे नं च खास कौतुक इतकं छान केल त्यांनी....
@nitachavan18929 ай бұрын
सलाम आहे बानाई तुला एवढ्या रानावनात उन्हात काम करत असतेस स्वामी तुला असेच सुखात आनंदात राहू देत स्वामी तुझ्यावर आशीर्वाद राहू दे स्वामींचा बानाई
@RadhaRasoi-149 ай бұрын
आजच्या काळात अशी सर्वसाधारण सरळ माऊली बघायला भेटते मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते खूप बरं वाटतं बाळूमामा तुमची खूप प्रगती करोत