Рет қаралды 32,013
"अभिनय करताना तुमच्या व्यक्तिरेखेचा शेवट जिथे आहे त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूने सुरुवात करायची. म्हणजे ह्या दोन टोकातला ताण आणि प्रवास अधिक उठावदारपणे प्रेक्षकांपर्यंत पोचतो."
सुनील बर्वे
आपलं चिरतरुण, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय घेऊन अभिनेते सुनील बर्वे गेली ३० वर्षं नाट्यरसिकांचं मनोरंजन करत आहेत.
'अफलातून', 'मोरूची मावशी', 'चारचौघी', 'हॅलो इन्स्पेक्टर', 'इथे हवंय कुणाला प्रेम', 'श्री तशी सौ', 'बायकोच्या नकळत', 'सूर राहू दे', 'व्यक्ती आणि वल्ली, 'तिसरे बादशाह हम' अशा अनेक नाटकांतला त्यांचा प्रसन्न वावर प्रेक्षकांना नेहमीच हवाहवासा वाटत आलेला आहे.
अभिनयाखेरीज एक कल्पक, प्रयोगशील निर्माता म्हणून सुद्धा सुनील सर प्रसिद्ध आहेत. अनेक जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन करून त्यांना नव्या पिढीपर्यंत पोचवणारा 'हर्बेरियम' हा उपक्रम, निवडक मराठी नाट्यदिग्दर्शकांना घेऊन केलेली परदेशी रंगभूमीची अभ्यास-सहल, 'अमर फोटो स्टुडिओ' सारखे नवीन पिढीला रंगमंचाकडे आकर्षित करणारे नाटक; तसंच COVID-19 च्या काळात नाट्यकलाकारांसाठी सुरु केलेला 'ऑनलाईन माझा थिएटर (OMT)' हा मंच असे नवनवीन प्रकल्प ते नेटाने निर्माण करत असतात.
आजच्या भागात ऐकूया सुनील सरांच्या अभिनय आणि निर्मिती प्रक्रियेविषयी.