Рет қаралды 133,910
'An unparalleled blend of grace, versatility and innovation' असं नीना ताईंच्या अभिनयाचं वर्णन करता येईल. सत्यदेव दुबे, विजया मेहता अशा गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानामध्ये नाटक, चित्रपट, मालिका, वेब सिरीज अशी विविध माध्यमातील अनुभवाच्या आधारे नीना ताई सतत भर घालत राहिल्या आहेत. अनेक वर्षे मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच अशा भाषांमध्ये आणि जगभरच्या अनेक दिग्गज कलाकार - दिगदर्शकांबरोबर काम केल्यानंतरही त्या स्वतःला अभिनयाची विद्यार्थिनीच मानतात. सातत्याने आणि निर्भीडपणे नवे प्रयोग करत स्वतःला आजमावत राहणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री नीना कुलकर्णी सांगताहेत त्यांच्या अभिनय प्रक्रियेबद्दल.