Рет қаралды 117,357
#SantoshJadhav #SidhuMoosewala #SalmanKhan
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी संशयित शूटर संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. त्यामुळे पुण्याचे पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्वाशी असलेले संबंध पुढे आलेत. यापूर्वी पुणे पोलिसांनी सौरभ महाकाळ आणि नवनाथ सूर्यवंशी या संतोष जाधवच्या मुख्य साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी संतोष जाधवला अटक केली. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांचे सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतलेल्या लॉरेन्स बिश्णोई गँगशी संबंध आहेत. इतकंच नव्हे तर संतोष जाधव हाच बिश्नोई गँगचा महाराष्ट्रातला प्रमुख हस्तक असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी स्पष्ट केलंय. मात्र, यावरून पुण्याशी असलेले गुन्हेगारी विश्वाचे संबंध पुन्हा अधोरेखित झालेत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi