Рет қаралды 496
स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात ७८ वा. स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
बालचिमुकल्यांच्या नृत्यातून श्रोत्यांना विविधतेतून एकतेचा संदेश.
अ.नगर प्रतिनिधी दिनांक : १५/८/२०२४.
स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आज ७८ वा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. हा कार्यक्रम स्नेहालय एम.आयडी.सी प्रांगणात पार पडला. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध परेड देखाव्याने व टाळ्यांच्या लयबद्ध गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्मड कॉर्पचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मेजर मा. राजेश मुंडेल, केंद्रप्रमुख मा. संजय धामणे, स्नेहालयाच्या सचिव, मा.डॉ.प्रीती भोंबे, इंग्लिश मीडियम स्कूलचे मानद संचालक मा. राजेंद्र शुक्रे , स्नेहालयाचे पालक मा. मिलिंद कुलकर्णी, विश्वस्त मा. राजीव गुजर, मा. संजय गुगळे, मा.डॉ. सुहास घुले, मा डॉ.लोढा, मा. जयकुमार मुनोत, स्नेहालय अनिवासी विभाग संचालक हनीफ शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. वीणा मुंगी, जिजाई हास्य क्लबच्या मा. मनीषा गुगळे व स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये मा. संजय धामणे यांनी कार्यक्रमा मधील नियोजनबद्ध कार्य, विद्यार्थ्यांची शिस्त, सांस्कृतिक कार्यक्रमात बालचिमुकल्यांनी सादर केलेले नृत्य, विद्यार्थ्यांचे इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेत केलेले उत्कृष्ट भाषण ऐकून आपल्या भाषणात गोड कौतुक केले. कार्यक्रमातील श्रोत्यांना संदेश देताना वक्तव्य केले की, भारत हा पुरुष प्रधान देश आहे. कुटुंबात वडिलांना जास्त महत्त्व दिले जाते. आई आपल्या मुलाचे संगोपन करते. जास्त वेळ हा बालकाचा आपल्या आईच्या सहवासात असते. असे असूनही कागदोपत्री नावापुढे आईच्या नावाचा उल्लेख कोठेही दिसत नाही. समाजामध्ये स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना पुढे येण्याची संधी दिली पाहिजे. त्यांच्या नावाचा उल्लेख कुठेतरी व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी उपस्थिती श्रोत्यांना आपल्या नावापुढे पहिले आईचे नंतर वडिलांचे नाव द्यावे असा संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणामध्ये मेजर राजेश मुंडेल यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून संदेश दिला की, आपल्या जीवनामध्ये बालवयातच मोठे होण्यासाठी ध्येय मनामध्ये गठीत करावे, व ते कुठेतरी लिहून ठेवावे, असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्या दिशेने आपल्याला वाटचाल करता येते. आर्मीमध्ये जीवन हे शिस्तबद्ध असल्याने आपले करिअर व जीवनस्तर अधिक उंचावण्यासाठी मदत होते.
बालचिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविधतेत एकता या थीमवर आधारित नृत्याचे सादरीकरण करून भारत देशातील विविध राज्यांची संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. शाळेत वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी सोनू राम सिंग व कोमल राजवानी या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ३८५ विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. राजेंद्र शुक्रे यांनी केले. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका यास्मिन सय्यद, शाळेच्या विद्यार्थिनी कु. समीक्षा महांडुळे, कु.पल्लवी कुमार यांनी केले तर आभार पुनर्वसन संकुलाचे समन्वयक चंद्रकांत शेंबडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समन्वयिका वर्षा मोरे व शाळेतील सर्व शिक्षक वृंद, जनसंपर्क विभाग, पुनर्वसन संकुलाचे कर्मचारी आदीं प्रयत्नशील राहिले.
#independenceday #independenceday2024 #independencedaycelebrations #MarathiNews #Ahmednagar #specialreport #şems #maharashtra #2024 #15august #ahmednagari #अहमदनगरी #अपडेट #स्नेहालय #snehalaya #news #9011112390 #SNEHALAYAEMGLISHMEDIUMSCHOOL #army #school #midc #Ahmednagar #AhmednagarHistory @Ahmednagari
Ahmednagari Contact Mo : 9011112390
KZbin : youtube.com/@a...
Instagram : .... Facebook : www.facebook.c....