माझ्या मनातलं स्वप्नातलं आयुष्य तुम्ही प्रत्यक्ष जगत आहात. तुमचे प्रत्येक vlog मी अगदी मनापासुन पाहते, वाट बघत असते आतुरतेने नव्या vlogची. भाग्यवान व नशीबवान म्हणजे काय ते तुम्हाला पाहुन, ऐकुनच कळेल. स्वच्छ, स्पष्ट उच्चार, घराशी, निसर्गाची, झाडाझुडांशी व प्रत्येक प्राणीमात्रांशी भावनीक नाते, सगळ्यांबद्दल कृतज्ञता भाव मनाला खूपच भावते.
@Jayshriram-t1o3 ай бұрын
मी पण वाट पाहतो.... खूप गोड आहे स्वानंदी ची जीवनशैली❤
@snehalchaudhari86073 ай бұрын
Mala hi khupcha aavdtat vlog ❤🎉
@singiskingsingisking95053 ай бұрын
Mi koknat jatoy job sodun
@surendradeogadkar89993 ай бұрын
Khup Sundar
@goatfarm123 ай бұрын
माझ्या पण
@gunvantshah36463 ай бұрын
भाग्यवान आहेस स्वानंदी तू ! निसर्गाच्या सान्निध्यात राहून एक स्वच्छंद जीवन जगते आहे.इतक्या लहान वयात तू गायन, चित्रकला, पाककृती, घरकाम,शेतीची कामे,गुरांबद्दल असलेली ओढ ,लागणी व प्रेम वै.क्षेत्रात पारंगत आहे.तुझे प्रत्येक विडिओ आवर्जून बघतो व बघतांना असा भास होतो की मी आपल्या घरातील एखाद्या सदस्याचा च विडिओ बघतो आहे. तू खूप प्रगती कर.तुझ्या विडिओ द्वारे आम्हा सर्वांना निसर्गाच्या विविध छटांची व गावातील वातावरण ची नवनवीन ओळख घडवीत रहा हीच इच्छा!!
@snehajagushte29818 күн бұрын
Ho khup chhan
@namitaupadhye41823 ай бұрын
याला म्हणतात श्रीमंती. जिथे गाई म्हशी बेडूक घोरपड कुत्रा पक्षी असती तिथे देवाची वसती. खूप सुंदर ब्लॉग ❤❤❤
@mohankumbhar34533 ай бұрын
Tuze.gav.konte.te.sag.tula.bhetaiyache.aahe
@sagarkadam75913 ай бұрын
प्रचंड भाषेवर प्रभुत्व , शुद्ध , क्या बात है , असच कोकणावर प्रेम करत रहा . कोकण सुंदर आहेच पण तू तुझ्या सुंदर शब्दांनी अजून सुंदर बनवत आहेस. छान जगताय तुम्ही 😊keep it up !!!!!!
@insecuresoul54903 ай бұрын
भाषेवर प्रचंड प्रभुत्व!
@ameyagore99583 ай бұрын
स्वानंदी, मी गोरे , गोरेगावला (मुंबईत) राहतो. तुझे blogs नियमितपणे पाहतो. मला गाव (नेटिव्ह प्लेस) नसल्यामुळे गावाकडील वातावरण उपभोगू शकत नाही. तुझे व्हिडीओ पाहिले की खूप समाधान वाटते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवतो. तुझ्या कडे लांझ्याला यायची खूप इच्छा आहे. बघू कधी जमतंय ते. तुझ्या भविष्यातील उपक्रमाला मनापासुन आशीर्वाद. तू शहरात राहणारी असून तुला गावची खूप ओढ दिसते ते पाहून तुझा अभिमान पण वाटतो करण हल्ली गावच्या मुलींना पण श हराची ओढ असते म्हणून तुझे अधिक कौतुक करतोय.👍
@abhaydatar40533 ай бұрын
अमेय, तू आमच्यासारख्या कित्येकांच्या भावना बोलून दाखवल्यास.
@kalindisamudre95152 ай бұрын
खूप सुंदर घर आहे.
@dipalisushant9202Ай бұрын
किती सुंदर ग..स्वानंदी...मला खूप खूप हेवा वाटतो ग तुझा..
@Priya171883 ай бұрын
लग्नाआधी मी गावी अगदी अशाच वातावरणात लहानाची मोठी झालेय. तेव्हा वेगळं असं काही वाटायचं नाही. आणि आता लग्नानंतर नाईलाजास्तव शहरात राहावं लागतंय पण तुझे व्हिडिओज पाहून माझं माहेर आठवत.🥹🤗❤️
@VarshaJagdale-i8q3 ай бұрын
Majh pn asch jhaly khup miss kartey mi majya gavala🥺
@Priya171883 ай бұрын
@@VarshaJagdale-i8q कोणतं गाव?
@Priya17188Ай бұрын
गुळवणे (ता. चिपळूण) तुमचं गाव कोणतं?
@hetalpatel18583 ай бұрын
कोकण को हमेशा जीवित रखना कोकण को देखने से जो एक सुकून मिलता है वह कहीं नहीं मिलता है और हर एक कोकण वासी को मेरी बिनती है कि कौन-कौन को बचाएं रखना उसे कभी भी शहरी विकास की तरफ मत लेकर जाना कोकण की जिम्मेदारी अब तुम्हारी है आने वाली हर पीढ़ी की है । हमारा तो पहले गांव था अब सिटी हो गया बचपन में जब हम पूरे जंगल में घूमते थे तो किसी का डर नहीं था रहता था लेकिन जब से यह गांव शहर बन गया तब अब गांव से बाहर निकालने का भी एक डर लगता है । हमारे पास थोड़ी जमीन बची है उसमें मैं हर तरह के पेड़ ,फूल, फल , और थोड़ा सा अनाज हल्दी मैंने एक ही पैड मे तीन तरह के आम लगाया है । अभी भी यह जारी है । मुझे कुदरत से बोहोत लगाव है । थैंक यू कोंकण 🌹🙏
@letslearn96753 ай бұрын
स्वानंदी... तुझ्या नावात आणि तसाच वागण्यात बोलण्यात राहण्यात आनंद ओथंबून वाहताना दिसतो.... उगाचच कुठेही दिखाऊपणा नाही, जे जसं आहे तसंच तु दाखवते आणि सांगते ही आईने केलेल्या नर्मदा परिक्रमेविषयी बनवलेल्या व्लॉगपासून मी नियमितपणे तुझे व्हिडिओ बघतं असते. आणि खरंच तुझे व्हिडिओ नकळतपणे एक आंतरिक समाधान, आनंद देतात...खुप दिवसांपासून तुझं घर आतून ही बघायला मिळावं अशी प्रचंड इच्छा होती आणि आजचा हा व्हिडिओ बघून खुप प्रसन्न वाटलं... तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि बाप्पा तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ह्या सदिच्छा 😇😊💐
@फक्त्तमराठी3 ай бұрын
सध्याची कोकणातली नंबर वन वलॉगर आहेस तु
@Amit-n1v3 ай бұрын
कोकणी रानमाणूस सर्च करा
@फक्त्तमराठी3 ай бұрын
@@Amit-n1v नक्कीच तो तर आहेच
@nazimmulla27813 ай бұрын
Ranmanus no 1
@aratikarkhanis84563 ай бұрын
Krushnai Gazane is also good.Shubhangi Keer is most worst But Swanandi is the best.❤
@mahendragovekar11633 ай бұрын
I have stopped watching shubhangi keer...Swanandi is best
@shriprasaddate49293 ай бұрын
कुंड्यात झाडं लावून निसर्गात राहण्याचा आभास निर्माण करणार्या माझ्यासारख्या शहरी लोकांना ही तर मेजवानीच होती.
@sameerapednekar39613 ай бұрын
Eye soothing!! ⭐😍 ग.दि.मा नी लीहीलेल आणि सुधीर फडके यांनी.. स्वरबद्ध केलेल गाण आठवल तुझ घर 🏡 पाहून.."गवत उंच दाट दाट, वळत जाय पायवाट, वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे......कल्पनेत जो स्वर्ग असे..तो मनास सापडे...माझीया (आजोबांचे) प्रियेचे झोपडे..❤!! अत्यंत गोड आठवण स्वानु!!!.....हे "स्वानुभव".. खूप छान निसर्गाच्या सान्निध्यातल्या 🏡.Keep vlogging girl and stay blessed always ❤
@anantparab32003 ай бұрын
किती सुंदर शब्दात व्यक्त केले आहे आपण. देव बरे करो
@SanjayKanitkar3 күн бұрын
स्वानंदी ताई तुम्ही अगदी अगदी नैसर्गिक आयुष्य जगत आहात तुम्ही शेतात गोठ्यातील गाई गुरासुद्धा सहज व आनंदाने बागडता व फार सुंदर जीवन आनंद मिळवत आहात फारच सुंदर
@monikabhaware9333 ай бұрын
जस तू म्हणालीस की एखाद्या चित्रा त किंवा कवितेतील वर्णन असता तसच तुझा पूर्ण घर परिसर आणि कोकणातील जीवन आहे.. एखाद्या लेखकाने,कवियत्रिने किंवा चित्रकाराने कल्पना करावे तसे.... अतिशय सुंदर ❤
@swami11113 ай бұрын
समाधान समाधान आणि निव्वळ समाधान वाटते तुझे व्हिडिओ पाहून स्वानंदी. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे ही कविता अठवते. खूप छान व्हिडिओ 🤗🤗☘️🪴🌴🌳🌲🌼🌻🌸💮🌿🌱🌾🏞️
@Vasaitalukanews3 ай бұрын
तुझं हे अतिसुंदर निसर्गरम्य नयनरम्य परिसरात वसलेल घर पाहून मन प्रसन्न झालं. किती नशीबवान आहेत तुझे आई-वडील आणि किती नशीबवान असेल तो जो या घराचा जावई बनेल 😀❤
@kalpanapadwal93543 ай бұрын
अप्रतिम शब्दात नाही व्यक्त करू शकत असेच निसर्गाच्या सानिध्यात जीवनाचा आनंद घ्या. शुभंम भवतु.
@krushnahatagle48323 ай бұрын
स्वानंदी ताई खरच किती छान जीवन जगत आहेस तु....असं घर आणि हे जीवन आम्ही फक्त गोष्टीच्या पुस्तकात आणि पहीली ते चौथीच्या मराठी च्या पुस्तकात अनुभवलंय...आधुनिक जिवनातील सगळी सुखं एकीकडे आणि तु जे life जगतेस ते एकीकडे....👏खुप सुंदर....कुणालाही हेवा वाटेल असं जगतेस ....😊❤👏
@AnantJagdhane3 ай бұрын
निस्वार्थ भावनेने जे काही निसर्गाने आपल्याला भरभरुन दिले आहे त्याचे आपण जतन संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे
@manjireesathaye58923 ай бұрын
हिरवाकंच, सुस्नात झालेला परीसर निवांत, आश्वासक, देखणं वातावरण..... माणूस, प्राणी सर्वांच्या आयुष्यात शांतता घेऊन येतं.. याचं लोभसवाणं दर्शन या vlog मधून होतंय. 🤗🤗 पर्जन्य संगीत आता शांत होत जाणार,याची हुरहुर वाटतेय. पण त्याची जागा पक्ष्यांचं कूजन घेईल, याची ग्वाहीही मिळतेय. 😊😊
@rajeshpawaskar92413 ай бұрын
स्वांनंदी तुम्ही कोकणातल्या फार थोड्या लोकांपैकी एक आहात जे एव्हढ्या सुंदर रम्य ठिकाणी नशिबान राहतात आणि आमच सगळ व्यवस्थित आनंदान चालू आहे असे सांगतात .ह्या साठी तुम्हाला प्रणाम🙏 आणि तुला सदैव आशिर्वाद🙌
@dhananjayralegankar32203 ай бұрын
तुझे प्राक्तन थोर, म्हणुन तुला ह्या सुन्दर घरात व सुन्दर परिसरात राहिला मिळतय. खूप खूप शुभेच्छा! श्री. स्वामी समर्थ! श्री. स्वामी महाराज तुझे कल्याण करो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
@manjiriadvant27013 ай бұрын
खुप सुंदर. 👌🏽. तुझी बोलण्याची पद्धत आणि एकूणच कोकणी वातावरण मनाला ताजेपणा देऊन जाते. आणि तुझं 'ऐका ना ' फारच गोड.
@chintanbhatawadekar27733 ай бұрын
अतिशय सुरेख चित्रीकरण.छान कोकणी घर,चित्रमय निसर्ग,सुंदर नेटकी परसबाग सगळं छान.एखाद्या सुरेख ललित लेखाचे वाचन केल्याचा अनुभव..अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@vardaparanjpe56223 ай бұрын
मस्तच तुझे vlogs खूपच सुंदर असतात माझं सासर माहेर दोन्ही कोकणातली त्या मुळे तुझे विडीओ खूप जवळचे वाटतात अशीच विडीओ करत रहा गाणं चालू ठेव कारण गाता गळा आणि शिंपता मळा ठेवला तर तो फुलत रहातो
@vilaskhaire36173 ай бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल सजलेल स्वप्नातील घर आणि आजुबाजूचा निसर्गरम्य परिसर खूपच सुंदर धन्यवाद
@abhaydatar40533 ай бұрын
तू अगदी बरोब्बर बोललीस स्वानंदी. एकजण आंब्याचं झाड लावतो आणि फळे पुढची पिढी खाते. आता तू आणि तुझ्या बाबांनीही पुढच्या पिढीसाठी आंबा लावलाय. तू यात वर्णन केलेलं जुनं घर तुझ्या एका व्हिडीओ मध्ये पाहिल्याचं आठवतंय. तो साकवही आठवतोय. सगळं किती सुंदर आणि शांत आहे. तुझे छंदही किती वेगवेगळे आणि सुंदर आहेत. आजोबांनी बांधलेलं हे नवीन घरही खूप खूप आवडलं.
@vikaspowar73103 ай бұрын
सुंदर, सुरेख, शांत, प्रसन्न, आल्हाददायक...
@ChandrakantPashte-j9e3 ай бұрын
स्वानंदी, मी तुझे सुरुवातीपासूनचे सगळेच विडीयो बघीतले आहेत. तू लाजा तालुक्यातील तर मी राजापूर येथील असून आपल्या कोकणातील सृष्टीसौंदर्य तू या माध्यमातून ईतर लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाली आहेस. तुझी विविध प्रकारातील गाणी(लोकगीत, भावगीत,शास्त्रीय गायन आणि चित्रकला) या सर्वात तू पारंगत असून शुध्द मराठी भाषेवर असामान्य प्रभुत्व आहे. मी कोकणातील माझ गत आयुष्य तुझ्या विडीयोच्या माध्यमातून पुनः अनुभवतोय. तुला खूप खूप शुभेच्छा!
@vishalpawar68183 ай бұрын
वर्षाराणीचा आशीर्वाद लाभलेल्या हिरव्यागार कोकणात तू राजकन्येसारखी बागडतेस. ❤
@SAM-bu5su3 ай бұрын
Wahh surekh lihilay tumhi
@vishalpawar68183 ай бұрын
@@SAM-bu5su धन्यवाद
@sudhapatole55973 ай бұрын
Apratim Ghar Parisar Sunder Durshan Kelly Ati Uttam Blog
@mangeshghag89163 ай бұрын
स्वानंदी स्वर्गाहुन सुंदर आपलं कोंकण..... किती किती रमणीय, मनमोहक, आल्हाददायी वातावरण......... जगण्याची मजा उर्जा कोकणातच ❤
@PallaviJadhav2623 ай бұрын
आतापर्यंत पाहिलेले तुझे सगळे व्हिडीओज आवडले होते पण आजचा व्हिडीओ मला खूप जास्त आवडला ❤❤ खूप नशीबवान आहेस तु स्वानंदी तुला रोज इतके सुंदर आणि शांत निसर्गरम्य आयुष्य जगायला मिळते ❤❤
@Thenostalgicmaharastrian3 ай бұрын
खरंच अगदी चित्रसारख आयुष्य जगतेस तू ...हेवा वाटतो तुझा ...एवढा छान परिसर आणि आयुष्य आहे तुझ तुझ्यासाठी normal असणार आयुष्य आमच्यासाठी किती special आहे शब्दात नाही सांगू शकत ....कारण तुझ आयुष्य जगणं स्वप्नवत आहे आमच्या सारख्यांसाठी...खूप छान छान video काढ तुझी you tube फॅमिली खूप मोठी होऊ देत ....आणि आम्हला असेच छान छान video पाहायला मिळू देत ...खूप आभार मनावेसे वाटतात की तू तुझ you tube chanel सुरू केलस...स्वाठला lucky समजते की हा परिसर आपली जन्मभूमी नसल म्हणून काय झालं तुझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून जागून घेतेय तेवढं🥺खूप खूप प्रेम तुला❤
@omkarpatil8954 күн бұрын
आपल्या रोजच्या कामांमधून वेळ काढून एवढा चांगला बगीचा फुलवण मस्त खुप छान.
@vaijayantikelkar39693 ай бұрын
स्वानंदी, खरचं तू खूप भाग्यवान आहेस. अशा वातावरणात तुला रहायला मिळतय. खूप छान आहे परीसर. बघून प्रसन्न वाटते.
@fighterlionheartarmyvlogs3 ай бұрын
फार सुंदर घर आहे, ज्या घरात थोरा मोठ्यानं आदर दिला जातो, पशू पक्ष्यांना प्रेम केल जात, झाडांना निर्गचा संगोपन केला जातो, कला , सौंकर, संस्कृती,आधारभाव, प्रेमभाव, रियाज करत असलेली एक सुकन्या ज्या घरात असते ते अति सुंदर असते वन्य प्राणी लाही प्रेम करते थी स्वानंदी आणि जो पाऊस पडत होतो तो देवाचा आशीर्वाद होता नेहमी खुश रहा मुलगी शिकली आणि स्वानंदी झाली देश प्रगत होणारच, तुझ खूप आभार.
@UjwalaSAWANT-u4j29 күн бұрын
आवडल तुमच घर आणि परीसर .आमचे पण कोकणात घर आहे. जास्त रहायला जमत नाही. गणपती आणि होळीला जातो.
@shilpakalghatgi7433 ай бұрын
अप्रतिम च शब्द नाही नेहमी प्रमाणे स्वानंदी गोड आणि निसर्गसाठी अस जीवन जगणे खूपच सुंदर
@snehaiswalkar8033 ай бұрын
स्वानंदी तुझे सगळेच ब्लॅाग एक से बढकर एक आहेत तुझ्या ब्लॅाग ची मी आतुरतेने वाट पहात असते निसर्ग काय आहे ते तू प्रत्यक्षात अनुभवत आहेत तुझ्या प्रत्येक कार्याला सलाम 🙏❤️🥰🙌🏻
@vijaypowar52253 ай бұрын
खरंच तुझा हेवा वाटतो अशा वातावरण आणि संस्कारात वाढलीस आणि राहतेस फारच सुंदर निसर्गरम्य परिसर आहे स्वानंदी तुझा जबरदस्त 👌🏼👌🏼
@life-is-energy4823 ай бұрын
खरचं यार...आयुष्य असावं तर अस...सहज साधं , निसर्गाच्या कुशीत ल...लहान पणीपासून डोळ्यासमोर रंगवलेले चित्र ..आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं❤😊😊
@ManishaNene3 ай бұрын
तुझ्याकडे कलागुण खूप छान आहेत आणि तू त्या निसर्गात रमतेच ते बघून खूप आनंद होतो
@vijaypatil45593 ай бұрын
स्वानंदी तू खूपच गोड व साधी सरळ आणि कष्टाळू मुलगी आहेस. छान कोकणी घर,चित्रमय निसर्ग,सुंदर नेटकी परसबाग सगळं छान जस तू म्हणालीस की एखाद्या चित्रा त किंवा कवितेतील वर्णन असता तसच तुझा पूर्ण घर परिसर आणि कोकणातील जीवन आहे. तुमचे प्रत्येक vlog मी अगदी मनापासुन पाहते, वाट बघत असते आतुरतेने नव्या vlogची.
@vaishalipandit58163 ай бұрын
अशा निसर्गरम्य वातावरणात राहतेस आणि आम्हालाही सुदंर दर्शन घडवतेस तुझ्या मंजुळ सुमधुर आवाजाला तो निसर्गही सुंदर दाद देतोय असं वाटतं, तुझं प्राणीमात्रावरच प्रेम त्यामुळे तुमच्यात एक भावनिक जवळीक निर्माण झालीय. सारंच अप्रतिम शब्दांच्या पलीकडच👌🏻👌🏻❤️❤️
@eknathtalele3073 ай бұрын
लाईफ एन्जॉय करायचं असेल तर असं वातावरण हवं. निसर्ग सहवास, शुद्ध हवा, आणि पशु पक्षी . किती सुंदर हवामान! स्वानंदी बेटा रियली व्हेरी नाईस व्लाॅग.
@hetalpatel18583 ай бұрын
स्वानंदी मतलब जो हमेशा नंदी के साथ और आनंद में रहने वाली भगवान की कृपा बनी रहे आप पर 🌹🙏
@sunitasuryawanshi21363 ай бұрын
Swanandi...cha arth nandi ke sath asa nahi hot......swatah ananadi.... khush asnari....jashi ti kharech aahe❤❤
@chhayakatkar95993 ай бұрын
स्वानंदी घर आणि परिसर अगदी स्वप्नात पाहतो किंवा एखाद्या कादंबरीतील असावे असेच आहे आणि तू ते व्यक्त ही खूपच छान करतेस,मला तुझी भाषा शैली आणि तू पण खूप आवडतेस.
@User1976valid3 ай бұрын
Nice .. sagale boltat kokan khup Chan .. pan festival zhale ki most young generation back to Mumbai … people like you real saver for kokan .. very nice initiative 👍
@manasivaishampayan43013 ай бұрын
स्वानंदी तू खूपच गोड व साधी सरळ आणि कष्टाळू मुलगी आहेस. प्रत्येक आईला तुझ्यासारखी मुलगी हवी. तुझं निसर्ग प्रेम प्रामाणिकपणा सुरेल गायन आणि कलावंताचा हात साऱ्याच गोष्टी मनाला भावणाऱ्या
@vandanalimaye46793 ай бұрын
स्वानंदी, तुझ्यासोबत हा कोकणातला नितांतसुंदर निसर्ग असा अनुभवणं अतिशय आनंददायी आहे.सोबत तुझं गाणं असतं तर मजाच आली असती.घर-परिसर सुंदरच!!!......
@smitawalvekar98423 ай бұрын
खरच किती सुंदर समृद्ध जीवन तू जगतेय swanandi. माझ्या करता तर हे सर्व स्वप्नवत आहे.❤😊
@madhukarsupekar37013 ай бұрын
आनंदाचे डोही आनंद तरंग ❤ सुख म्हणजे आणखी काय असते याची अनुभूती व पुनर्प्रत्यय
@sayalikulkarni46183 ай бұрын
Tu khup nashibvan ahes karan tu kokanat etkya sunder thikani rahates pratek gosht jagtes tithli tuze vlog pahnarya pratekachya swapnatal ayushya tu jagti ahes Ani amhala pn Anand det ahes khup chan Kam krtes tu ganpati bappa tuz khup chan Karo Ashi me tyala vinanti krte ashich amhala khup chan chan videos dakhv thanku so much swanandi
@chandrakantkhopade39423 ай бұрын
स्वानंदी खूप सुंदर परिसर हिरवागार परिसर आहे आणि तुझ अदबशीर बोलण मनाला आनंद देत
@hemantdevkar6036Ай бұрын
माणूस तंत्रज्ञानाने कितीही प्रगत झाला तरी त्याला अशा निसर्गाशिवाय पर्याय नाही...त्याला शेवटी निसर्गाच्या पायाशीच यावं लागेल... उत्तम ब्लॉग आहे तुझा पाहून खूप प्रसन्न वाटलं...
@NarendraNaik-g8w3 ай бұрын
मी रोज सकाळी लवकर काम आटपून पहिला तुझा vlog बघते. मन अगदी प्रसन्न होऊन जात. ❤
@sunitavelhankar10713 ай бұрын
किती सुंदर आहे हे सर्व वातावरण, फुलं, कमळाच्या तळ्याकाठी रियाजाला बसणं ही कल्पनाच किती काव्यात्मक आहे अशीच लिहित रहा ❤
@keshavpawar9963 ай бұрын
कोकणातील निसर्गरम्य परिसरात सर्व प्रकारच्या भाज्या, फुले याची लागवड केली आहेस. फारच छान वाटले.
@PrashantKumbhar-te9wh3 ай бұрын
आज सकाळी गुहागर येथील वेळंब या माझ्या गावाहून परतलो. कोकणातील सारी गावं मला एकसारखीच वाटतात. जवळपास अकरा वर्षांनी गावी गेलो होतो.काहीही बदल जाणवला नाही. आणि या गोष्टीचा आनंद आहे.आमचं कोकण कोकणच राहूदे हिच ईश्वरचरणी प्रार्थना!
@SatyaajitAWagh-n7t3 ай бұрын
स्वानंदी, तुम्ही जे आयुष्य जगताय तश्या आयुष्याचं मी नेहमीच स्वप्न बघत असतो. माझं स्वप्न आहे, कोकणात समुद्र किनाऱ्याजवळ, भातशेतीने, नारळी-पोफळी, सुपारीच्या बागांनी वेढलेले, गर्द वनझाडीत लपलेले एक सुंदर कौलारू घर असावे. कोकणात शेती करून तिथेच आयुष्यभर रहावे. काही महिन्यापूर्वी तुमचा एक vlog बघायला मिळाल्यानंतर मी तुमचे सगळेच vlogs आवर्जून बघत असतो. You are literally living life of my dreams. तुम्ही कोकणवासीय खरंच खूप भाग्यवान आहात.
@pravinsannake17793 ай бұрын
सर मी सर्व ब्लॉग अवर्जून पाहत आस्थो. तुम्हा सर्वांची कॉमेंट वाचणे खूप आनंद देथो..विशेष करून तुम्ही दिलेली प्रतिक्रिया अगदी माझा मनातील आहे.समाधान हेकी मला जे नेहमी वाटत आहे तीच प्रतिक्रिया तुम्ही दीलिथ..खूप. मनातून संतोष वाटला. आभारी आहे स्वानंदी चे आपण...खूप मस्त वाटले सर....🙏🙏🙏
@anmolshedge75653 ай бұрын
स्वानंदी तुझा video बघितला की संपूर्ण दिवस कसा स्वानंदीमय होऊन जातो. मनाने मी तुझ्या सोबतच असते. मी पण कोकणातच राहते. माझं बालपण निसर्गात गेलं. माझ्या सारखी एक निसर्ग वेडी, हळवी मुलगी आहे. तुझ्यात मी मलाच बघते. तुझ्या गाण्यात, तुझ्या चित्रात मी हरवून जाते. हेच स्वर्गसुख अजून काय पाहिजे. तुझा हा निरागस पणा कधीच सोडू नकोस. अगदी अशीच रहा कायम. तुला भेटायची खूप इच्छा आहे. 🥰🙌
@sudamshimpi65153 ай бұрын
अप्रतिम. तुम्ही सर्वच खुपच भाग्यवान आहात. ईश्वराच्या सान्निध्यात राहून पावन झालात.धन्यवाद. जय गजानन.
@meenaaware93043 ай бұрын
खूप सुंदर आहे निसर्ग सौंदर्य मी, नेहमी, पाहते तुझे ब्लॉग, खूपच, छान आसतात
फारच छान...तू खूप भाग्यवान आहेस. तुला अश्या निसर्गाच्या सान्निद्यात रहायला मिळतय.
@shirishbelsare21213 ай бұрын
अतिशय सुरेख व्हिडीओ मी मागे पण एखादा म्हणालो होतो स्वानंदी,बाळा किती भाग्यवान आहेस की अशा सुंदर वातावरणात रहाण्याचे भाग्य तुला लाभले खुप छान घर,परीसर माझं किती जुन स्वप्न आहे की अस घर आणि तेही कोकणात असाव.पण........
@shilpa4553 ай бұрын
पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणतात तो हाच असावा आणि आमची स्वानंदी देवी स्वरूप 🙏🙏
@jayashirurkar2762Ай бұрын
❤ खूप छान निसर्ग
@ravikantsakpal41513 ай бұрын
खूप खूप छान व्हिडीओ. निसर्ग सौंदर्याने नटलेले घर व परिसर.
@anjalikhanapure75923 ай бұрын
स्वानंदी स्वानंदी.... तुझा प्रत्येक ब्लॉग म्हणजे एक दिवा स्वप्नच आहे माझ्यासाठी... बोलो गं घरी कधीतरी
@anitasalunke94033 ай бұрын
सुंदर माझे गाव, सुंदर माझे घर. खुप नशिबवान आहात तुम्हीं सगळे. इतका सुंदर निसर्ग तुमच्या अवती भोवती आहे. त्यात आणखी भर म्हणजे निर्मळ, सात्विक,प्रेमळ, मनमिळावू स्वानंदी❤ अश्याच मुली सर्वांना मिळो. मला मुलगी नहीं याची खंत सतत वाटते. तुझे व्हिडिओ बघितले की समाधान मिळते. तु नेहमी अशीच आनंदी राहा हिच श्री स्वामी समर्थ महाराजांचा चरणीं प्रार्थना 🙏🙏🙏🌹
@rajeevkulkarni21673 ай бұрын
खूप छान! प्रसन्न वातावरण..
@archanadandekar65833 ай бұрын
जय श्रीराम,स्वानंदी मी तुझा विडीओ नेहमीच,न चुकवता बघते,मला निसर्ग तुझे बोलणे व बाकी सगळेच आवडते! मी साठ वर्षांची आहे,मी माझे मिस्टर विरार पालघरला राहते, मला तीन लग्न झालेल्या मुली ,पाच नातवंडे आहेत,आमचेही असेच मोठे घर शेती आहे!स्वानंदी तुला भरभरुन शुभेच्छा!
@swaradanargolkar98843 ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ. मला माझ्या म्हातारपणी असं शांत, निसर्गाच्या जवळ जाणारं आयुष्य, आनंदाने जगायला आवडेल.
@anitapajgade38153 ай бұрын
Malahi
@sakshisurve6413 ай бұрын
खूप छान आहे तुझे घर आणि घराभोवती चा परिसर मला माझे माहेर आठवते तुझे सगळे vlog मी पाहते तुला खूप खूप शुभेच्छा आणि आयुष्य भर अशीच हसत राहा तुला खूप खूप आशीर्वाद
@sudeepdongre3 ай бұрын
अप्रतीम ! पृथ्विवरील देवभुमी म्हणजे कोंकण मि ही त्या देव भुमीत रहातो, पण त्याला आता बर्या पैकी सीमेंटची लागण झाली आहे. (कर्जत/रायगड). तरीही आम्ही बरीच फुल व फळ झाडे घरा भोवती लावली आहेत. पण खरे नशीबवान तुम्हीच, कारण तुम्हाला प्रत्यक्षपणे स्वर्गात रहाण्याचे भाग्य लाभले आहे. असेच निसर्गावर प्रेम करत रहा आणी दुसर्यानाही शिकवा. धन्यवाद !
@asmitabhandare43533 ай бұрын
किती छान... निसर्गाच्या सानिध्यात...खूप मोकळं ,निरोगी आनंदी ....कष्ट असले तरी त्याचं फळ फार सुरेख आहे....रोज काही तरी नवे असणार. मस्त...❤
@maulidk95953 ай бұрын
स्वानंदी म्हणजे स्वतः आनंदी राहण्यासाठी इतरांना आनंद देणे.... आजच्या काळात तुमच्या सारखी मुलगी भेटन दुर्मिळच म्हणता येईल... तुझा व्हिडिओ पाहिला तर निखळ निःस्वार्थ प्रेम वाटत कोकण आणि तुझ्या वागण्या बोलण्याबद्दल... निसर्ग आणि कोकण पाहायचा असेल तर तुझा व्हिडिओ पाहिलं तरी खूप काही भेटून जाईल..!
@rajanimasurkar81843 ай бұрын
Kup Sundar ❤❤❤❤❤❤❤❤
@octopus18603 ай бұрын
घराचा vlog खूप सुंदर झालाय. तुझे ब्लॉगमध्ये सहजपणे वावरण्याचे मला कौतुक वाटते. घरही साक्षात निसर्गाच्या कुशीत आहे. एकदम मस्त. असाच vlog सुरू ठेव.
@OnkarBhasar3 ай бұрын
ऐका ना व्हिडिओ खूप छान होता
@sachinraut98963 ай бұрын
😀😀
@insecuresoul54903 ай бұрын
😅😅😅
@vaishalikanekar79033 ай бұрын
खूपच सुंदर volg आजूबाजूचा परिसर तर अप्रतिम स्वानंदी तू भाग्यवान आहेस हे स्वर्गसुख असच जप
@shivanikadam79993 ай бұрын
१.ranmanus २.swanadani sardesai ३. Red soil ४.krushnai gazne Osm all channel
@mimarathi98363 ай бұрын
Swanadi तुझे आभार मानावें तितके कमीच खरंच तु कीती छान आयुष्य जगतेस, निसर्गाच्या सानिध्यात राहणे, आपल्या कोकण ची जीवन शैली स्वीकारणं आणि त्यांचं मनमुराद आनंद घेणं....तु एखादा होम स्टे का नाही सुरू करत , आम्हांला तुमच्या सोबत कोकणातील माणसाच्या आयुष्यात असलेली दैनंदिन जीवनातील धड्पड कुतूहलानं पहायला मिळेल आणि स्वालंबन राहुन स्वतःचं आयुष्य कसं व किती छान जगावं हें खरंच तुझ्याकडून शिकाव लागेल......
@adesh6513 ай бұрын
खरी लाइफ तर तू जगत आहे ताई ❤. आमच आयुष्य तर शहरातील धावपळीत चाल 😂
@ashokmasurkar78144 күн бұрын
आजकाल गाईगुरांवर प्रेम करणार्यांना शेण सारवण करणार्यांना गावंढळ म्हणतात,खरच तुझ खूप कौतुक प्राण्यांवर प्रेम करणारी तू स्वतःही खूप प्रसन्न आणि प्रेमळ वाटतेय.
@subhashkulkarni91963 ай бұрын
हेवा वाटतो हे सगळ पाहून ...!! खरंच नशिबवान आहेस, अशा निसर्गा सानिध्यात राहते आहेस..❤
@shitalsathe19162 ай бұрын
जुन्या बालभारती च्या पुस्तकामध्ये आश्या कोकण वातावरणाचे वर्णन same असेच केलेलं असायच. तो धडा सर्वांचा आवडता असायचा. मोकळ्या वेळात तोच तोच धडा वर्षभर वाचायला आवडायचा. खूप छान होते ते दिवस तुझा हा व्हिडिओ बघून खूप सर आठवलं. मस्त कोकणात एक तरी मैत्रीण असावी तुझ्या सारखी.❤❤❤
@sujatakulkarni67563 ай бұрын
तु पुण्यात कुठे राहते.गावी कधी येते तुझे व्हिडिओ खूपच छान असतात स्वानंदी
@mazelikhan3627Ай бұрын
सुंदर परिसर आहे सगळा पक्षी, प्राणी झाडं,फुलं खूप छान वाटलं पाहून
@UnorthodoxFellow3 ай бұрын
कोकणात नक्की कुठे ते तर सांगितलच नाहीत.
@bharatkumarpatil45013 ай бұрын
घर, परिसर, आमराई, गोठा, सर्वच काही तुझ्यासारख सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@BushanJoshi3 ай бұрын
जबरदस्त खूपच सुंदर घर परिसर गुर या सर्वांचा तू एक आत्मा त्यामुळे सर्वच व्हिडिओ कायमच बघायलाआवडतील ❤❤ तुला कायमच सदिच्छा. मंगलमूर्ती मोरया
@shubhadagole88793 ай бұрын
माझ्या स्वप्नातील घरात व भोवतीच्या बागेत ,तू शब्दशः जगत आहेस, हे बघूनच खूप भारी वाटते. त्यात तू गाण्याचा व चित्रकलेचा रियाज करतेस! क्या बात स्वानंदी! सगळे स्वप्नवतच!❤
@kishorpatil32373 ай бұрын
अप्रतिम फारच सुंदर निसर्ग सौंदर्य
@parthapaul38792 ай бұрын
Simply wonderful nature at its best.
@pune16543 ай бұрын
किती भारी आहे तुझे आयुष्य.मस्त निसर्गाच्या सानिध्यात जगतेस .तू खूप भाग्यवान आहेस
@MahendraAdsil7 күн бұрын
अतिशय सुंदर vlog आणि घराचा परिसर
@SGKulkarni2 ай бұрын
खुप छान वर्णन करायची शैली आहे ताई.आपल्या पुर्वजांबद्दल कृतज्ञता,उगाच कुठेही पाल्हाळ नाही,सर्वांबद्दल मनस्वी प्रेम खराेखर तुला ईश्वरी वरदहस्त आहे.खुप आशीर्वाद
@nitinkshirsagar87673 ай бұрын
नेहेमीप्रमाणे उत्तम सादरीकरण - निसर्गाशी एकरूप होऊन जीवन आनंदी ठेवले आहेत - परमेश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो 👍🙏
@ramakantvengurlekar99172 ай бұрын
अतिशय सुंदर नीसर्ग खूपच छान खूप आवडली
@varshakshirsagar8543 ай бұрын
तुझे घर खूप सुंदर आहे. तुझा हळदीचा ब्लॉग पाहून मीही माझ्या कोकणातल्या शेतात हळद लावली. खुप छान हळद आली आहे.त्या हळदीच्या पानात मोदक उकडले होते मी या गणपतीत.खूप सुगंधित झाले.असेच छान छान ब्लॉग बनव. धन्यवाद
@harshatamhankar163 ай бұрын
खूप छान वाटल तुझा vlog पाहून. किती नैसर्गिक आणि सगळे प्राणी, पक्षी, फुले, फळे. मस्तच ग स्वानंदी😊
@pratikshajadhav7166Ай бұрын
स्वानंदी तू खूप भारी आहेस मला तू खूप खूप आवडते एकदम लाघवी आहेस आणि सगळ्यांना जीव लावतेस माहिती तर एवढी मस्त देते सगळ्यांचच तूला खूप कौतूक तूझ्या आवाज खूप गोड आहे कधीही थकलेली किंवा कंटाळलेली दिसत नाही तूला खूप आशिर्वाद ❤❤❤