Temples & Stepwhel of Brahmini Village Rahuri Ahmednagar ब्राह्मणी गाव

  Рет қаралды 1,339

Nagar Trekkers

Nagar Trekkers

Күн бұрын

नगर शहरापासून डोंगरगण - वांबोरी घाटमार्गे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले हे सुंदर गाव
.
गावात पुरातन महादेवाची मंदिरे, बल्लाळी देवीचे मंदिर आणि सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेली बारव देखील आहे, आणखी एक बारव, मुळचे स्थायिक असलेल्या जाधव परिवाराच्या शेतामध्ये आहे, या बारव मध्ये शिलालेख कोरलेला दिसतो तसेच बारवेत उतरल्यावर महादेवाचे मंदिर देखील आहे, सध्या बारवेत पाणी भरले असल्याकारणामुळे मंदिर काही दिसू शकले नाही
.
गावात गेल्यावर एसटी स्टँड समोर एक महादेवाचे हेमाडपंथी शैलीत बांधलेले पुरातन मंदिर आहे या मंदीराच्या परिसरातच अनेक वीरगळ (Hero Stones) आणि जुन्या मुर्त्या दिसून येतात, त्याचे नीट जतन करणे गरजेचे आहे, मंदिर स्थानिक नागरिकांकडून सांभाळले जाते
.
याच मंदिराच्या परिसरात थोडे गावाच्या आत मध्ये पुरातत्व खात्याच्या ताब्यात असणारी सुंदर बारव आहे, या बारावेचा जुन्या काळात पाणी पुरवठ्यासाठी वापर होत असे
.
सध्या सर्व पुरातन मंदिराला रंग देऊन त्याचे मूळपण घालवले असले तरी त्यांच्या भव्यतेची कल्पना आपल्याला लगेच कळून येते
.
एसटी स्टँड वरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर बल्लाळी मातेचे मंदिर आहे या मंदिरात देवीची मूर्ती, गेल्या काही वर्षात मंदिराचा जीर्णोद्धार स्थानिक लोकांनी केला आहे
.
मंदिराच्या मागील बाजूला आणखी एक महादेवाचे पुरातन मंदिर दिसून येते तसेच अनेक वीरगळ, भग्नावस्थेत असलेले नंदी देवतांच्या मूर्त्या , हत्ती व नागाची शिल्पे दिसून येतात
.
हे सर्व पाहिल्यावर गावाची ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी नक्कीच आहे असे समजून येते
.
पौराणिक संदर्भ,
प्रभू रामचंद्र वनवासात असताना या परिसरातून गेले, या परिसरात असताना शिवभक्त प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी शिवआराधना साठी महादेवाची जी ठिकाणे निवडली त्या ठिकाणी आज ही पुरातन महादेवाची मंदिरे उभी आहे
.
देवीच्या मंदिरासमोर जो अमृतानुभव स्तंभ आणि रेड्याची प्रतिकृती आहे त्याचा ज्ञानदेव व मुक्ताबाईंशी असलेला संदर्भ आढळतो, श्री ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत श्री क्षेत्र पैठणच्या वाटेवर असताना मुक्ताई थकतात, तेव्हा या मंदिर परिसरात विश्राम करतात, मुक्ताई ची तहान भागवण्याकरता ज्ञानेश्वर माऊली गंगेचे आवाहन करतात आणि गंगा प्रकट होते. हे गंगाजल आत्ताच्या मंदिराच्या मागे असलेल्या काशीचे पदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलाशयाच्या रुपात पहायला मिळते.. मुक्ताई चा विश्राम पूर्ण होई पर्यंत ज्ञानेश्वर माऊली तिथल्याच एका खांबाला टेकून अमृतानुभव हा ग्रंथ लिहितात. तो खांब आजही तिथे बघायला मिळतो.. त्यांच्यासोबत असणाऱ्या रेड्याची विश्राम करतानाची प्रतिकृतीही मंदिरासमोर दिसते
.
#brahmini #श्रीराम #पैठण #नेवासे #आळंदी #महानुभाव #ShriRam #paithan #Newasa #Alandi #mahanubhav #अमृतानुभव #Amrutanubhav
#rahuri #राहुरी #वांबोरी #vambori #अहमदनगर #संगमनेर #श्रीरामपूर #ahmednagar #ahmednagarbranding #meahmednagarkar #ahmednagarstory #ilovenagar #NagarTrekkers #हेमाडपंथी #hemadpanthi #stepwhells #herostone

Пікірлер: 8
@sonaliwaghe2627
@sonaliwaghe2627 4 жыл бұрын
खूप सुंदर 🙏🙏🙏
@kashish450
@kashish450 6 ай бұрын
beautiful and wonderful
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 ай бұрын
Beautiful..Wonderful. 💓
@GauravshaliEtihas
@GauravshaliEtihas 3 жыл бұрын
खूपच सुंदर बारव आणि मंदिर आहे
@bhavanagouda7879
@bhavanagouda7879 4 жыл бұрын
Wow harry potter theme tune
@trimbakrajdeo4055
@trimbakrajdeo4055 4 жыл бұрын
खुपच छान चित्रण केले आहे फक्त त्याबरोबर त्याच्या माहिती देणारा ऑडिओ हावा होता
@NagarTrekkers
@NagarTrekkers 4 жыл бұрын
अमृतानुभव ब्राह्मणी, राहुरी तालुक्यातील एक गाव, नगर शहरापासून डोंगरगण - वांबोरी घाटमार्गे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले हे सुंदर गाव . गावात पुरातन महादेवाची मंदिरे, बल्लाळी देवीचे मंदिर आणि सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेली बारव देखील आहे, आणखी एक बारव, मुळचे स्थायिक असलेल्या जाधव परिवाराच्या शेतामध्ये आहे, या बारव मध्ये शिलालेख कोरलेला दिसतो तसेच बारवेत उतरल्यावर महादेवाचे मंदिर देखील आहे, सध्या बारवेत पाणी भरले असल्याकारणामुळे मंदिर काही दिसू शकले नाही . गावात गेल्यावर एसटी स्टँड समोर एक महादेवाचे हेमाडपंथी शैलीत बांधलेले पुरातन मंदिर आहे या मंदीराच्या परिसरातच अनेक वीरगळ (Hero Stones) आणि जुन्या मुर्त्या दिसून येतात, त्याचे नीट जतन करणे गरजेचे आहे, मंदिर स्थानिक नागरिकांकडून सांभाळले जाते . याच मंदिराच्या परिसरात थोडे गावाच्या आत मध्ये पुरातत्व खात्याच्या ताब्यात असणारी सुंदर बारव आहे, या बारावेचा जुन्या काळात पाणी पुरवठ्यासाठी वापर होत असे . सध्या सर्व पुरातन मंदिराला रंग देऊन त्याचे मूळपण घालवले असले तरी त्यांच्या भव्यतेची कल्पना आपल्याला लगेच कळून येते . एसटी स्टँड वरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर बल्लाळी मातेचे मंदिर आहे या मंदिरात देवीची मूर्ती, गेल्या काही वर्षात मंदिराचा जीर्णोद्धार स्थानिक लोकांनी केला आहे . मंदिराच्या मागील बाजूला आणखी एक महादेवाचे पुरातन मंदिर दिसून येते तसेच अनेक वीरगळ, भग्नावस्थेत असलेले नंदी देवतांच्या मूर्त्या , हत्ती व नागाची शिल्पे दिसून येतात . हे सर्व पाहिल्यावर गावाची ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी नक्कीच आहे असे समजून येते . पौराणिक संदर्भ, प्रभू रामचंद्र वनवासात असताना या परिसरातून गेले, या परिसरात असताना शिवभक्त प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी शिवआराधना साठी महादेवाची जी ठिकाणे निवडली त्या ठिकाणी आज ही पुरातन महादेवाची मंदिरे उभी आहे . देवीच्या मंदिरासमोर जो अमृतानुभव स्तंभ आणि रेड्याची प्रतिकृती आहे त्याचा ज्ञानदेव व मुक्ताबाईंशी असलेला संदर्भ आढळतो, श्री ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत श्री क्षेत्र पैठणच्या वाटेवर असताना मुक्ताई थकतात, तेव्हा या मंदिर परिसरात विश्राम करतात, मुक्ताई ची तहान भागवण्याकरता ज्ञानेश्वर माऊली गंगेचे आवाहन करतात आणि गंगा प्रकट होते. हे गंगाजल आत्ताच्या मंदिराच्या मागे असलेल्या काशीचे पदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलाशयाच्या रुपात पहायला मिळते.. मुक्ताई चा विश्राम पूर्ण होई पर्यंत ज्ञानेश्वर माऊली तिथल्याच एका खांबाला टेकून अमृतानुभव हा ग्रंथ लिहितात. तो खांब आजही तिथे बघायला मिळतो.. त्यांच्यासोबत असणाऱ्या रेड्याची विश्राम करतानाची प्रतिकृतीही मंदिरासमोर दिसते . इतर जुन्या मंदिराप्रमाणेच या गावातील मंदिरे देखील मुसलमान आक्रमणकारांच्या विख्यात आली होती, त्यामुळे मंदिर परिसरात भग्नावस्थेत अनेक मुर्त्या, शिल्पे आणि वीरगळ दिसून येतात, मुख्य देवीच्या मंदिराला या आक्रमणापासून वाचवण्याकरता बाहेरील बाजूने चुन्याचा लेप देऊन लपवले गेले होते, आणि गाभाऱ्यातील मूर्ती, पीर दर्गा सदृश्य पेटीमध्ये लपवली गेली होती, गेल्या काही वर्षांत जीर्णोद्धार होताना मंदिरावरील चुन्याचा लेप काढून त्याला रंग देण्यात आला... दर्गा सदृश्य पेटी मुख्य देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात आजही पाहायला मिळते
@sanjayhapse6383
@sanjayhapse6383 3 жыл бұрын
1:36 मुक्ताबाईमाता मंदिर
Nirmaldham Aradgaon-Rahuri world's first Sahajayoga Ashram
7:53
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,9 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 70 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 163 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
आपल्या वंशावळी, कुळ, कुलदैवत, देवक पाहिजे आहे का ?
14:16
पांडवकालीन नगद नारायण जन्मभूमी
7:21
धाकटी पंढरी
Рет қаралды 4,4 М.
Muslims debate with a Hare Krishna Monk
20:51
Savya The Monk
Рет қаралды 2,8 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,9 МЛН