Рет қаралды 61,298
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल. ज्ञानेश्वरीत काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. भगवदगीतेवर आत्तापर्यंत अनेक टीकाग्रंथ निर्माण झाले. परंतु, त्या सर्व टीकांमध्ये लोकप्रिय आहे ‘ज्ञानेश्वरी’. ज्ञानेश्वरीस तिची रचना, विस्तारित आशय व काव्यात्मता यांमुळे गीतानिरपेक्ष स्वतंत्र अनन्य स्थान लाभले आहे. खरे ज्ञान सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’चा प्रपंच केला. म्हणोनि मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे । । अलौकिक नोहावे । लोकांप्रती ।। हे ज्ञानेश्वरीचे प्रयोजन होते. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’त गीतेवर भाष्य केलेल्या पूर्वसुरींबद्दल आदरभाव व्यक्त केला आहे. व्यास, शंकराचार्य, रामानुजाचार्य, यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात, ‘तैसा व्यासांचा मागावा घेतु | भाष्यकारा वाट पुसतु ।।’ त्यातून ज्ञानेश्वरांचा नम्र भाव दिसतो. जेव्हा ज्ञानेश्वरांनी बोलीभाषेतून ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला तेव्हा संस्कृत भाषेला ज्ञानभाषेचे व राजभाषेचे स्थान होते. ज्ञानेश्वर ज्ञानभाषेइतकेच लोकभाषेचेही अभिमानी होते. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’त जागोजागी मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त होतो. ‘माझा मऱ्हाटीची बोलू कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके ।। ऐसी अक्षरे रसिके मेळविन’ ( www.thinkmahar...)
The Dnyaneshwari, also referred to as Jnanesvari, Jnaneshwari or Bhavartha Deepika is a commentary on the Bhagavad Gita written by the Marathi saint and poet Sant Dnyaneshwar in 1290 CE. Dnyaneshwar lived a short life of 22 years, and this commentary is notable to have been composed in his teens.