इतक्या सोप्या ,सहज ,सुंदर भाषेत मौनाचे सांगितलेले महत्त्व पटले
@swapna.vaidya2 жыл бұрын
किती छान बोलता हो. ऐकत राहावेसे वाटते. अभ्यासपूर्ण लेखन आणि कथन. असेच निरनिराळ्या विषयावर विचारमंथन करा.आम्ही ऐकू.
@devashreemarathe83512 жыл бұрын
धनश्रीताई, अप्रतिम !!!! तुमचं अफाट ज्ञान, विचारांवरील पकड आणि बोलण्यातील confidence, परा ते वैखरीचा प्रवास ह्याची अगदी सहज गुंफण अफलातूनच आहै. अवघड विषय किती सोपा केलात अहो!!!ॐ शांति..... सुंदर !!!
@SoulLove3692 жыл бұрын
मधुर ,रसाळ ओघवती वाणी.. कुठेही वाटत नाही की आता बास हे ऐकायला. साधी सहज सोपी भाषा, उदाहरणं...माझ्यासाठी हाच सत्संग,खूप गरज आहे अश्या सत्संगात राहायची आजच्या काळात...आभार मानू तितके कमीच🙏
@mahadevgaikwad2 жыл бұрын
Kup. Chan
@ravindradeshpande19222 жыл бұрын
आदरणीय सौ.धनश्री ताई,आपल्या सारख्या ज्ञानी व विद्वान व्यक्तींना आम्हास दररोज ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे,या बद्दल आम्ही ईश्वराचे कसे आभार व्यक्त करावेत हे कळत नाही. आपल्या ज्ञानास आमचा साष्टांग नमस्कार मौन या विषयावरील आपल हे सर्वोत्कृष्ट व्याख्यान आहे आपले मन:पूर्वक आभार
मोजकेच पण चपखल शब्द, विचारांमधली स्पष्टता, चौफेर व्यासंग आणि मोहवून टाकणारी वाणी. अप्रतिम!धन्यवाद 🙏
@leledhanashree2 жыл бұрын
Manpurvak Dhanyawad Sir
@suchetakhot5912 жыл бұрын
Khupch chaan
@anuradhadhavale34002 жыл бұрын
@@leledhanashree àà
@itsmesanavi90492 жыл бұрын
खूप खूप छान आहे
@itsmesanavi90492 жыл бұрын
सौं.संध्या कुलकर्णी चाकुरकर
@mohinikhadilkar22652 жыл бұрын
स्तब्ध होऊन मि एक एक शब्द ऐकले खुप धन्यवाद मला ऐकायला मिळाले,श्रवण भक्ति झाली.
@suchetadd55792 жыл бұрын
अप्रतिम खुपच छान मौनाबद्ला सांगिणले ताई परा ,पश्ंती मधयमा , वैखरी छान माहिती दिली है ऐकण्याच आमच भागय म्हणाव लागेल
@vaishaliharsulkar6618Ай бұрын
दुसऱ्यांदा ऐकताना पण तितकेच आनंददायक आहे!! आपल्या प्रतिभेला साष्टांग दंडवत.....
@poojamilind17619 ай бұрын
ताई मी संपूर्ण धनश्रीमय झाले आहे .. तुम्हाला कितीही ऐकल तरी मन भरतच नाहीये ...❤ मी तर अगदी तुमच्या प्रेमात पडली आहे ...
@comfortfoodbysangita42372 жыл бұрын
किती सुंदर अप्रतिम कबीर,गीता,ज्ञानेश्वर, व्यास किती संदर्भात बसवता अस्वस्थता म्हणजे वाचाळता स्वस्थता म्हणजे मौन क्क्या बात
@anjalibhavthankar64152 жыл бұрын
जय श्रीराम!सौ. धनश्री ताई,मौन शब्द बोलणे, किती सोपे,पण त्यात काय दडले;हे,कीती सोप्या शब्दांत सांगितले!खूपच छान!👌💐👌
@shashikantchavan94572 жыл бұрын
वाह वाह...मी निशब्द झालो... ऐकतच रहावे असा विषय व आपल्या प्रत्येक शब्दातून ती वाढत जाणारी गोडी... मनापासून आभार....!!!
@vaishalisamant76362 жыл бұрын
अतिशय आनंद होत आहे , तुमच्या जिभेवर सरस्वती वास करित आहे ,काय वर्णन करू? शब्द अपुरे पडतात,
@padmaheda433 Жыл бұрын
Aplyatil sarasvatila trivaar vandan
@aparnaambike25802 жыл бұрын
धनश्रो ताई काय बोलु निःशब्द झाले तुमचे मौन ऐकुन. U tube ला खरंच धन्यवाद तुम्हाला सविनय नमस्कार व खुप खुप शुभेच्छा .
@sharayulele10732 жыл бұрын
धनश्री ताई, मौन ऐकताना फार आनंद झाला....किती ओघवती वाणी आहे तुमची.....खुप खूप धन्यवाद........शरयू लेले
@pornimadeshpande82912 жыл бұрын
गोड मनांत झिरपणांरा आवाज " वाणी " सुंदर निरुपण 🙏🏻🙏🏻
@dipalidumbre14692 жыл бұрын
अप्रतिम वक्तृत्व. गाढा अभ्यास. सुंदर मांडणी , आवाज. माझ्या आवडत्या धनश्री ताई तुम्हास तुमचे कार्याबद्दल शुभेच्छां..🙏
@shubhashripathak23482 жыл бұрын
अप्रतिम निरूपण, ओघवती वाणी. मी विपश्यनेला दहा दिवस गेले असता आपण सांगितलेल्या मौनाचा अनुभव घेतला आणि मी स्वतःला ओळखायला लागले. कुठल्याही गोष्टीला चांगली अथवा वाईट कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही कारण कुठलीही गोष्ट कायम नाही, ती अनित्य आहे. आपलं निरूपण मनाला खूप भावलं. धन्यवाद.
@sandhyakapadi41122 жыл бұрын
धनश्रीताई, तुम्हाला ऐकलं आणि मध्यमेचच मौन आलं 🙏🏻 हाच मनःपूर्वक साष्टांग दंडवत.
@varshatare30762 жыл бұрын
धनश्री ताई तुमच्या परा वैखरी ला नमन करते!खूप सुंदर थेट ह्रदया ला भिडणार वक्तृत्व!!
@anuj.h.kulkarni28262 жыл бұрын
शब्द च नाही तुमच कौतुक करायला. खूप छान हा शब्द सुद्धा खूप छोटा आहे. खरच खुप छान
@bhauraogodse52762 жыл бұрын
स्वर्गीय राजीव भाई दिक्षितांच भाषण जेवढ मला अभ्यास पुर्ण नेहमीच वाटतय त्याप्रमाणे तुमचं भाषण मला वाटतंय......माझ्यासमोर खुप मोठा ज्ञानाचा साठा तुम्ही उपलब्ध करून दिलाय म्हणून तुम्हाला नम्रपणे वंदन करून मनापासून धन्यवाद
@medhavelankar91572 жыл бұрын
मी हे ऐकून मौन झाले, पण मन विचार करू लागलं, किती सुंदर अभ्यास आहे, फक्त ऐकतच राहावं,जोपर्यंत तुम्ही मौन होणार नाही🙏🙏🙏 धन्यवाद
@mohinikhadilkar22652 жыл бұрын
खूपच छान निरूपण प्रवचन मौन ह्यावर
@ananddeshmukhmavlankar52132 жыл бұрын
भाषेवर कमालिचे प्रभुत्व! दैवी देणगी.सुंदर विवेचन
@charutakale47452 жыл бұрын
आजच्या काळात सर्व सामान्य माणसाला संस्कृत समजणे तुमची निरूपण ऐकल्याने शक्य होते आहे, ताई ह्या कलियुगात तुमचं बोलण हे दीपस्तंभ प्रमाणे आहे, कठीण विषय मंत्रमुगध होवून ऐकता येतो, सरसवती चां वरद हस्त तुमच्यावर असाच राहो🙏🏻🙏🏻
@manjushajoshi46302 жыл бұрын
खूपच छान. अप्रतिम. मनाला खूप शांत वाटते. मन अंतर्मुख होऊन जाते.👌👌💐
@sunitakulkarni69564 ай бұрын
माझ्या प्रजेने मी मौन समजून घेतले. प्रत्येक वाक्य अत्यंत मार्मिक,चपखल व तीक्ष्ण की आंतरिक मौन अकस्मात फुललं. ❤❤❤❤...
@giridharkulkarni10832 жыл бұрын
खुप सुंदर प्रवचन.मंत्रमुग्ध करुन टाकलंत.यावर श्रीज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील एक ओवी आठवली . कां साडेपंधरया रजतवणी l तैशी स्तुतींची बोलणी l *उगियाची माथा ठेविजे चरणी* l हेचि भले*ll
@77swatee2 жыл бұрын
आदरणीय सौ.धनश्री ताई,आपल्या सारख्या ज्ञानी व विद्वान व्यक्तींना आम्हास दररोज ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे,या बद्दल आम्ही ईश्वराचे कसे आभार व्यक्त करावेत हे कळत नाही.आपल्या ज्ञानास आमचा साष्टांग नमस्कार
@archanadesai25472 жыл бұрын
अगदी खरं आहे. 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👏👏👏😍😍😍
@alkalembhe71282 жыл бұрын
धनश्रीताई खरच किती सुंदर की संपूच नये असे वाटते 🙏🙏🙏
@nishadeshpande49102 жыл бұрын
Asech mala pan vatte
@anitatak22362 жыл бұрын
अतिशय सुंदर मार्मिक थेट हृदयाला भिडणारे...वक्तव्य... असेच गुरु तत्व यावर ऐकायला आवडतील
धनश्री ताई ....तुमची व्याख्याने /विचार इतके सहज असतात की ,त्यामुळे अनेक वेळा भावना उत्कट होतात ...
@sujatadalvi8411 Жыл бұрын
मौनाबद्दल असा विचारच केला नव्हता. आपणास साष्टांग दंडवत.
@jyotishiwalkar911611 ай бұрын
धनश्रीताई अप्रतिम व्याख्यान. मी सकाळी सव्वा तास पायी फिरते . तेव्हा मी हेडफोन वापरून तुमचं हे व्याख्यान ऐकलं. वारंवार हे व्याख्यान ऐकावं व मनात ते विचार साठवून आचरणात आणायला सुरूवात करावी असा विचार येतो. हे व्याख्यान मी नकळत मौनातच ऐकत होते व मनात आनंदीत होऊन निशब्द होत मनातच तुम्हाला दाद देत होते . आणि नंतर लक्षात आलं की हे तर मध्यमेतलं मौन! मौनाचे सगळे फायदे अतिशय सुरेख उदाहरणांतून तुम्ही समजावले आहेत. As usual तुमचं खूपच सुरेख व्याख्यान ऐकण्याचा योग आज आला. खूप धन्यवाद.
@manishaphadke39882 жыл бұрын
निःशब्द .....अतिशय मधाळ वाणी आणि प्रचंड अभ्यास .. ऐकताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतो
@vrushalipathak33382 жыл бұрын
अप्रतिम....किती किती पैलू उलगडले...ताई. खरोखर एखादी गोष्ट समजून घ्यावी ती तुमच्या कडूनच.....फार छान. परमेश्वर आमचे आयुष्य तुम्हास देवो व तुमच्या कडून असेच ऊत्तमोत्तम कार्य घडो ह्याच शुभेच्छा
@neeshakiran2 жыл бұрын
अनुपम, अप्रतिम, मौनावर बोलताना वाणीवरचे प्रभुत्व विशेष जाणवले पण एकंदरीत भाषेचा, वकृत्वाचा गाढा अभ्यास आहे निश्चितच.ऐकताना खुप आनंद दिलाय.खुप धन्यवाद.
@pradnyamoghe72002 жыл бұрын
ताई , तुमची ओघवती शैली आणि गाढा व्यासंग आहे तुमचा ...आणि व्याखानं सुद्धा खूपच श्रवणीय असतात तुमची ... खूप छान वाटतात ऐकायला ... तुमची वाणी पण खूप मधुर आहे ..
@nirmalashewale71962 жыл бұрын
जबरदस्त.. अभ्यासपूर्ण व्याख्यान.. खूप आवडलं धनश्री ❤️ताई🌹
@smitamulye8636 Жыл бұрын
नमस्कार धनश्री ताई तुमचे सर्व vdo खुप सुंदर मनापासून आवडीने ऐकते.छान वाटते.
@neelamkulkarni38322 жыл бұрын
अतिशय सुंदर साध्या सोप्या शब्दात मौन समजवलेत ... खरोखर ऐकत राहावे असे बोलणे आहे तुमचे..
@manishasmejwani23752 жыл бұрын
ताई तुम्ही जेव्हा प्रवचन सांगतात तेव्हा अक्षरशः संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते, खूप खूप छान वाटत,🌹🌹🙏🙏❤️🌹🌹
@archanadesai25472 жыл бұрын
अप्रतीम धनश्रीताई..... अतीसुंदर विवेचन. आपलं मौनावरचं विवेचन अंतःकरणी भिडलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. असंच विवेचन करत रहा आणि आम्हाला तृप्त करा. 😍😍🙏🙏🙏👏👏👏👍👍👍👌👌👌😀😀😀
@nandakulkarni92242 жыл бұрын
उत्तम उदाहरण देऊन , जे सांगायच आहे ते पटवून देण्याची हातोटी, शब्दावरचे प्रभुत्व , विषयाचा खोलवर अभ्यास , मनाला थेट भिडले..... अप्रतिम 👌👌
@archanadeshpande65762 жыл бұрын
खूपच गोड आवाज ऐकत राहावे अशी सुंदर वाणी सरस्वती आहे जिभेवर धन्यवाद
@arunkumarrajhans102 жыл бұрын
धनश्री लेले आपलं स्वागत असो तुमची प्रतिक्रिया वाणी, ऐकायला मिळाली मी धन्य झालो, मंत्रमुग्ध करणारी आपलीं वाणी छान झकास आहे
@shankarraut6631 Жыл бұрын
आदरणीय ताईंचे कोणत्याही विषया वरील प्रबोधन अत्यंत अभ्यासपूर्ण आणि श्रवणीय असते आणि ती एक पर्वणीच असते आणि ही सगळी कला अवगत करत असताना ताईंनी फार मोठी साधना तपश्चर्या केलेली आहे असे दिसते.
@anaghabidkar42932 жыл бұрын
अप्रतिम ताई..... आपल्या अत्यंत मधुर अशा वाणीतून मौन विषयी ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच. धन्यवाद 🙏
@neelambariangal42172 жыл бұрын
तुमचा आवाज म्हणजे साजुक तुपातला गोड शिरा तो हि पुजेच्यावेळी करतात तस्सा 😍😍🙏
@pushpadhole73302 жыл бұрын
🙏👌
@jayashreev91392 жыл бұрын
अगदी खरे 👍
@anildeshmane41712 жыл бұрын
👍
@vaishaliambatkar2952 жыл бұрын
Khare ahe
@varshag.83982 жыл бұрын
त्यांचे विचार ऐकून आत्मसात करायचा प्रयत्न करा. साजूक तुपातला शिरा काय?
@parashrammagar52902 жыл бұрын
तुम्ही अत्यंत तल्लीन होऊन सांगता... धन्यवाद... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर
@sangitafitnesstips15802 жыл бұрын
धनश्री ताई पुर्ण भगवद्गीता तुमच्या कडुन समजून घेईची. कृपा करा. अस समजा ह्या आयुष्यातली ही माझी सर्वात मोठी इच्छा आहे. कृपा करा... कृपा करा.. कृपा करा
@shivanimahajan32372 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान.ओघवती वाणी.सुंदरंच 👌
@VINAYMORE100 Жыл бұрын
अप्रतिम मधुर वाणी . प्रचंड आभ्यास साक्षात माता सरस्वती आपल्या मुखातून या ठिकाणी साक्षात्कार देत आहे
@anupamakulkarni87202 жыл бұрын
धनश्री लेले तुमच्या दिव्य चरणी सद्गुरुं क्रुपे विनम्र शिर साष्टांग शतदा दंडवत्। "" मौन " या संज्ञेवरचे आपले भाष्य श्रवण करुन मी धन्य झाले. मी संज्ञा शब्द वापरलाय तो चुक की अचुक ते केव्हातरी सांगावे. माझ्या मते मौन हा विषय नाही च . अप्रतिम वाक्चातुर्य अनुभवलं , प्रसन्नतेने अंर्तयाम फुललं, बुद्धी पटल प्रगल्भ झालं , चित्त संतोषलं . उत्तमोत्तम साधु संत ऋषी मुनींचे ऱ्हद्गत उमगलं , अस्स विविध प्रकारचं ज्ञानाम्रुत तुम्ही पाजलं , त्याबद्दल..... स्तवनीय अम्रुतानंद धन्यवाद.!!! 💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐
@anilbhaikelkar42202 жыл бұрын
धन्यवाद धनश्रीताई. मौन ह्या विषयावर तुम्ही खूप सुंदर बोललात. मी गेले कित्येक महिने आठवड्यातील एक दिवस मौन पाळले आहे. त्याच महत्त्व मला मनातून कळत होत पण शब्द सापडत नव्हते. ते तुम्ही सांगितलेत. तुमच्या सर्व व्याख्यानमाला मी ऐकल्या आहेत.सोप्या भाषेत समजावून सांगता.नविन व्हिडिओ ऐकण्याची उत्सुकता आहे
@Mohantipugade-e8vАй бұрын
तुमच्या चरणकमला ला कोटी कोटी साष्टांग नमस्कार❤
@mahadevkhalure61352 жыл бұрын
मनाच्या गाभाऱ्यात एक चांगले विचार रुजविण्याची सुंदर वाणी आपल्या जवळ आहे.साक्षात सरस्वती मुखातून वाणी उच्चारत आहे असे वाटते...खूप छान ताई...आमचे भाग्य अशी वाणी व विचार ऐकायला मिळते.
@padminipandit98062 жыл бұрын
अप्रतिम आपली वाणी आणि ज्ञान. ऐकून खूप मौल्यवान काही मिळाल्या सारखे वाटते. धन्यवाद.
@manasijoshi5172 жыл бұрын
खूप छान विवेचन धनश्री ताई. ऐकतच रहावे असे वक्तृत्व. सरस्वती देवीची असीम कृपा आहे..👌🙏🙏
@chitragarhwal41392 жыл бұрын
आज 72वर वय झाल्यावर वाणी आणी मौन या दोनही गोष्टी बद्दल खूपच सुंदर ऐकायला मिळेल.धन्यवाद धनश्री
@alkaranade87792 жыл бұрын
काय विलक्षण प्रतिभा आहे.. केवढा व्यासंग आणि ओघवती वाणी.. प्रत्यक्ष ऐकायला खुप आवडेल
@jayantjorwekar56372 жыл бұрын
धनश्री .......शुभाशिष......अतिशय अप्रतिम विचारांचे सादरीकरण.....मी सत्तरीत आहे. म्हणून शुभाशिष दिले. आपलं व्याख्यान ऐकले.देव गाभारा दिसला. शब्दवीणेचे सामर्थ्य अनंत !!!!!!!
@rajendraparanjape5436Ай бұрын
मौन ह्या शब्दाचा खरा अर्थ आज कळला. आणि त्यात सुद्धा चार प्रकारचे मौन. तुम्ही अगदी सहज मला मध्यमाच्या मौनात नेलंत... 🙏🙏
@prakashpawar13926 ай бұрын
अतिशय मधुर, रसाळ, ओघवती वाणी.ऐकतच राहावे,ऐकतच राहावे असे वाटत राहते यातच आपल्या वाणीचे यश आहे.
@ashokchaugule33264 ай бұрын
वानी.वैखरी .मध्यमा. पश्यंती. परा.आणी अनिर्वाच्य.राम कृष्ण हरी माऊली.उत्तम निरोपन होत आहे धन्यवाद
@pralhadakolkar87122 жыл бұрын
खूप छा न. श्रवणीय. श्रीराम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ☘️🦋🕉
@ramakulkarni81872 жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन मनाला मोहवून टाकणारी वाणी समजेल अशा भाषेत सांगणे सगळं छान सांगता.
@kalpanakhatu31232 жыл бұрын
अप्रतिम!अतिशय सुंदर!सहज, सोप्या पद्धतीने केलेल " मौन" या दोनच अक्षरं असलेल्या शब्दाचं विश्लेषण .धन्यवाद धनश्री ताई!!!!
@jayashrijoshijoshi4394 Жыл бұрын
खूपच छान.भरकटलेले मन स्थिर करण्याची दैवी शक्ती आपल्याकडे आहे.आपले अभिनंदन शुभेच्छा आणि आशीर्वाद.
@srushtichinnawar31912 жыл бұрын
वाह खूप सुंदर...अभ्यासपूर्ण चिंतन मौना मागील गुढ अर्थ आज कळाला... धन्यवाद ताई
@rajendradatar96682 жыл бұрын
परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी आणि मौन... अद्भुतम् विवेचनम्
@meandmauli62442 жыл бұрын
शब्दांमधे गोडी आसते , शब्दामधे सामर्थ्य आसते हे आपल्या वाणीतुन प्रकट झालेल्या वचनांमघुन कळते पण मैान देखील बोलके व कर्तृत्व वान आसते हे तुमच्यामुळे कळते . खुप सुंदर 🙏🙏🙏
@anuradhahardikar7997 Жыл бұрын
तुमचे वैखरी शब्द माझ्या परा वाणीत घर करीत आहे अतिशय छान समजवावे आहे ज्याला पुन्हा पुन्हा ऐकत राहावे अन् तसे साधावे. असे वाटते श्रीराम
@HarshitShingne01242 жыл бұрын
खुपच सुंदर वर्णन केले आहे, धनश्री ताई 🙏🙏🌹🌹📿😌
@chandrikakatekar72092 жыл бұрын
खूप छान अनुभव.आपल्या ह्या निरूपण मुळे मौनाचे द्वंद्वव सुटले.खूप खूप आभार
@satishkasture94712 жыл бұрын
धनश्री ताई मौनावरचे विचार अत्यंत उत्कृष्टपणे पणे सोप्या शब्दांत मांडलेत, ऐकतांना नक्कीच आनंद होतो,खुप खुप धन्यवाद,
@vasudhajawadekar47912 жыл бұрын
धनश्री ताई, तुमचा व्यासंग, ओघवती वाणी ,विचार सर्व खूप प्रभावी आहेत. पुन्हा पुन्हा ऐकेन
@vijumanerikar90489 ай бұрын
धनश्रीताई,खूप छान गोड, उत्तम तऱ्हेने समजावता. दररोज तुमचे सांगणे ऐकायला आनंद होतो.👌👍
@anuradhavaidya80372 жыл бұрын
इतके सुंदर विवेचन ऐकुन निशब्द झाले , अनेक शुभेच्छा
@ashwinighatpande3982 жыл бұрын
तुमची वाणी शुद्ध आहे,अत्यंत मधुर आहे आणि तुम्ही जे काही अभ्यासून विचार मांडता ते ऐकत रहावेसे वाटतात! 🙏🙏 अशीच उत्तमोत्तम व्याख्याने आयोजित करण्यात यावीत आणि आम्हाला तुमच्या ज्ञानपूर्ण अमोघ वाणीचा अनुभव घेता यावा!🙏🙏खूप छान!🙏
@narendranehete8929 Жыл бұрын
,,very sweet speech ,,
@Pathak24sarit2 жыл бұрын
धनश्री ताई फारच छान 🙏🙏 अप्रतीम सुंदर व्याख्यान 👍
@rupalipatil64982 жыл бұрын
सगळ्या माहीत असलेल्या गोष्टी परंतु अतिशय योग्य आणि उत्कृष्ट पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏🙏 खूप आवडलं मस्त🙌🙌👌👌
@pa81042 жыл бұрын
धनश्री ताई अतिशय सुंदर रित्या आपण कथन केले तुम्हाला फार फार मनापासून शुभेच्छा
@rajankshirsagar95782 жыл бұрын
धनश्री ताई नमस्कार मौ न मी आई कले खूपच छान व सुंदर दाखले देऊन स्पस्ट केले स मला खूपच आवडले ती अण्णा ना मी योगा मुळे अगोदर पासून ओलखत आहे तुझी वाणी मधुर व सुश्रव्य आहे अनेक। आशीर्वाद राजन क्षीरसागर पुणे शंख। वादक
खूप प्रेम करतो ताई आम्ही तुमच्या वर.....अप्रतिम 😘😘
@komalpatil77769 ай бұрын
खूपच सुंदर विवेचन🙏🙏🙏 माहिती,,,,मराठी भाषा किती प्रगल्भ आहे,,नुसत्या शब्दातून त्याच सुंदर सादरीकरण,,, खूपच सुंदर खुप खुप आभार🙏🙏🙏🙏
@madhurikatre38412 жыл бұрын
धनश्री ताई, अतिशय सुंदर विश्लेषण.आज खऱ्या अर्थाने परा वाणीचा प्रवास.. पोटापासून ओठापर्यंत चा प्रवास उमगला.काय सुरेख शब्दांत सागितले ...अस्वस्थता म्हणजे वाचाळता आणि स्वस्थता म्हणजे मौन.खूप खूप धन्यवाद हृदयातून🙏❣️🌹