Рет қаралды 2,143
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा | Uttarvahini Narmada Parikrama
Bharat Bhramanti BT | उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा | Uttarvahini Narmada Parikrama
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा!
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा एक पवित्र और आध्यात्मिक यात्रा है, जिसमें नर्मदा नदी के उत्तरवाहिनी मार्ग पर चलना शामिल है। यह परिक्रमा लगभग 21 किलोमीटर की दूरी पर फैली हुई है, जिसमें गुजरात से गुजरना होता है।
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा का महत्व:
1. *आध्यात्मिक महत्व*: नर्मदा नदी को हिंदू धर्म में एक पवित्र नदी माना जाता है, और इसकी परिक्रमा करना एक आध्यात्मिक अनुभव है।
2. *प्राकृतिक सौंदर्य*: परिक्रमा के दौरान, आप नर्मदा नदी के सुंदर दृश्यों और आसपास के प्राकृतिक सौंदर्य का आनंद ले सकते हैं।
3. *सांस्कृतिक महत्व*: परिक्रमा के दौरान, आप विभिन्न संस्कृतियों और परंपराओं को देख सकते हैं और उनके बारे में जान सकते हैं।
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा के लिए तैयारी:
1. *शारीरिक तैयारी*: परिक्रमा के लिए शारीरिक रूप से तैयार रहना आवश्यक है, इसलिए नियमित व्यायाम और योग करना चाहिए।
2. *मानसिक तैयारी*: परिक्रमा के दौरान, आपको मानसिक रूप से तैयार रहना होगा, इसलिए ध्यान और मेडिटेशन करना चाहिए।
3. *सामग्री की तैयारी*: परिक्रमा के लिए आवश्यक सामग्री जैसे कि पानी, भोजन, और आश्रय की व्यवस्था करनी होगी।
क्या आप उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करने की योजना बना रहे हैं?
your Queries
#uttarvahini narmada parikrama
#narmada parikrama
#uttarvahini narmada parikrama route
#uttarvahini narmada parikrama 2024
#uttarvahini narmada parikrama route map
#uttarvahini narmada parikrama guide in hindi
#narmada parikrama anubhav
#uttarvahini narmada parikrama gujarat
#uttervahini narmada parikrama
#uttarvahini narmada parikrama route map pdf
#uttarvahini narmada parikrama starting point
#narmada parikrama video
#narmada river
#dham yatra
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
नर्मदेऽ हर' असा नारा देत नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते. पण सर्वांनाच पूर्ण परिक्रमा शक्य होत नाही. त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी परिक्रमा हा एक पर्याय आहे. मात्र तिलकवाडा ते रामपुरा परिसरातील ही परिक्रमा केवळ चैत्रातच असते.
परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. आपल्या आराध्य दैवताला उजव्या बाजूला ठेवून केलेली प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा. अशीच नर्मदामैयाची पूर्ण परिक्रमा ही साधारण छत्तीसशे किलोमीटरची आहे. पूर्ण परिक्रमा पायी करणे हे फार कठीण व खडतर आहे. ज्यांना ही पूर्ण परिक्रमा शक्य नाही, त्यां
च्यासाठी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हाही पर्याय आहे. ही परिक्रमा गुजरात येथील "तिलकवाडा' येथून सुरवात होते. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. अशी ही साधारण 21 किलोमीटरची परिक्रमा आहे. ही परिक्रमा रामपुरा पासुनही सुरू करता येते.
आम्ही ही परिक्रमा रामपुरा ते टिळकवाडा ते रामपूरा अशी पूर्ण केली.
परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात.
परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता आपण आरामात उतर तट पार करतो. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत.
तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छास सेवा देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते.
त्यानंतर नदीपात्रात उतरून सुमारे ३ किमी अंतर चालावे लागते. जर पात्रात पाणी जास्त असेल तर होडीतून तिलकवाडा काठावरील मंदिरात जाऊन तिथून दक्षिण दिशेनं परिक्रमा चालू ठेवावी लागते.
आमच्यावेळेस पात्रात पाणी खूपच पातळी कमी असल्यामुळे प्रशासनाने लाकडी तात्पुरता पूल उभा केला होता.किनाऱ्यावरून सकाळी परिक्रमेला जाताना मंदिरात होणारा घंटानाद, जागोजागी आश्रमात होणारे स्वागत, छोट्या गावांतून जाताना तटावरची संस्कृती पाहता नर्मदामैयाच्या सान्निध्यात आपली परिक्रमा कधी पूर्ण होते ते समजतच नाही. या परिक्रमेत पवित्र नर्मदामैयाचे स्नान व दर्शन घडते. पायी परिक्रमा केल्याचा आनंद मिळतो, तसेच भविष्यात पूर्ण परिक्रमा करण्याची इच्छा जागृत होते.
NDRF व गुजरात सरकारची व्यवस्था ही ( सुरक्षा व वैद्यकीय) चोख आहे.ही परिक्रमा करण्यासाठी यूनिटी कैम्पस मध्ये निवासाची चांगली व्यवस्था आहे. तसेच स्टॅचू ऑफ यूनिटी व सरदार सरोवर डैम ही पाहता येतो.
एकदा तरी अनुभव घ्यावा.
नर्मदे हर ।