VASAI FORT TUNNEL 553 FEET

  Рет қаралды 22,156

शोध महाराष्ट्राचा Shodh Maharashtracha

शोध महाराष्ट्राचा Shodh Maharashtracha

6 жыл бұрын

वसई भुयार दर्शन आणि दुर्गभ्रमण
TUNNEL TRAIL & HARITAGE WALK
विशेष आभार
मा. श्री. धनंजयशास्त्री वैद्य गुरुजी
मा. श्री. ह्रषीकेश वैद्य गुरुजी
शुभम राऊत
आमची वसई
रचना :-
तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर होती.
बुरूज:-
किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.
अंतर्गत रचना:-
वसईच्या किल्ल्याचा पोर्तुगीज नकाशा (इ.स. १६३०).
किल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही.
हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात उसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली.
सद्यस्थिती:-
वसईच्या किल्ल्यातील चिमाजी अप्पांचा पुतळा
किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बऱ्याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.

Пікірлер: 37
@elisonmusical8990
@elisonmusical8990 3 жыл бұрын
युवा पिढीला वसई शहराचं ऐतिहासिक महत्व पटवून देण्यासाठी हा खुपच चांगला उपक्रम आहे.
@shodhmaharashtracha5974
@shodhmaharashtracha5974 3 жыл бұрын
हो त्याच उद्देशाने सुरुवात केली आहे मराठा आरमार kzbin.info/www/bejne/fmqVpYqEbqipgqM मराठा शस्त्र kzbin.info/www/bejne/o3Pbmo2Phqx-mZo भारताचे ३५ झेंडे kzbin.info/www/bejne/pIWtgKaAeb9sfNk रायगड kzbin.info/www/bejne/joipe4uiiZWejbM जुनी नाणी नोटा kzbin.info/www/bejne/aqrKYqGBhcx4d8U
@anitakoli8475
@anitakoli8475 3 ай бұрын
Khup Apratim Chan Mahiti sangitli Aaplya thor itihasachi sir aaple manapasun aabhar 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👍👍👍👍👍Jay Shivray Jay Jijau 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abrahamkamble6915
@abrahamkamble6915 Жыл бұрын
सर माहिती अत्यंत अभ्यासू व उत्तम महत्वा ची आहे आपले अभार स्वाभीमान व अभीमान वाटावा असा आपला इतीहस समजवून घेताना आप ली भारतीय हिदू संस्कृतीची शांत ता व स्वच्छता ठेवा
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 4 жыл бұрын
*प्रथम "शोध महाराष्ट्राचा" साठी खूप अभिनंदन आणी शुभेच्छा ! गायकानी गीते पण अशी सुंदर गायली आहेत,की बाहुंमध्ये स्फुर्ती संचारते! मन आनंदून जाते!* *"आमची वसई" संस्थेचे पण आभारी आहोत,कारण आपल्यामूळे वसई भुयार दर्शन आणी दुर्गभ्रमण महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोचले ! आणी अखेर सांगता "अशी पांखरे येती"ह्या आपल्या लाडक्या माननीय बाबुजींच्या गाण्याने केलीत ! खरंच धन्यवाद !! थोडक्यात---* *वसई भुयार दर्शन आणी दुर्गभ्रमण !* *महाराष्ट्र-प्रेमीला सुखावेलच मनोमन !!* *🚩🚩🚩जय शिवराय ! जय महाराष्ट्र!🚩🚩🚩* *🌿🌿🌿विश्वास मालशे (कल्याण प,)🌿🌿🌿*
@shodhmaharashtracha5974
@shodhmaharashtracha5974 3 жыл бұрын
मराठा आरमार kzbin.info/www/bejne/fmqVpYqEbqipgqM मराठा शस्त्र kzbin.info/www/bejne/o3Pbmo2Phqx-mZo भारताचे ३५ झेंडे kzbin.info/www/bejne/pIWtgKaAeb9sfNk रायगड kzbin.info/www/bejne/joipe4uiiZWejbM जुनी नाणी नोटा kzbin.info/www/bejne/aqrKYqGBhcx4d8U
@rameshgowari4038
@rameshgowari4038 3 жыл бұрын
गुरूजी तुमचे खास अभिनंदन. तुमच्या मुळे वसईचा खरा इतिहास जाणून घेता आला.तुमचे विवेचन व कॅमेरा यांची संगती जुळली नाही. पण छान माहिती पट.
@mumbaikarvishalYoumeall
@mumbaikarvishalYoumeall 3 жыл бұрын
Jay shiva ji maharaj🙏🙏
@vijaymenezes992
@vijaymenezes992 3 жыл бұрын
तुम्हाला वसई किल्ल्याची योग्य व स्पष्ट माहिती असल्यास Sunil Dmello चे वसई किल्ल्याचे दर्शन हा विडीओ KZbin वर बघू शकता.
@The_MixedBag
@The_MixedBag 3 жыл бұрын
सुंदर विवेचन केलेले आहे 👌
@akshatakshirsagar6932
@akshatakshirsagar6932 6 жыл бұрын
Great work.... Words will be less for your appreciation.... Keep going😍✌
@shodhmaharashtracha5974
@shodhmaharashtracha5974 4 жыл бұрын
धन्यवाद
@dharashah361
@dharashah361 3 жыл бұрын
Sunder mahiti.
@9090Account
@9090Account 2 жыл бұрын
Very very informative. Only suggestion there should be a mike attached to the speaker so that the cameraman can take long shots without disturbing the speech.
@vishakhahatkar3807
@vishakhahatkar3807 3 жыл бұрын
कथा छान आहे ,साल ,सन, तिथी अशी इतिहासाची जोड हवी.
@shodhmaharashtracha5974
@shodhmaharashtracha5974 3 жыл бұрын
मराठा आरमार kzbin.info/www/bejne/fmqVpYqEbqipgqM मराठा शस्त्र kzbin.info/www/bejne/o3Pbmo2Phqx-mZo भारताचे ३५ झेंडे kzbin.info/www/bejne/pIWtgKaAeb9sfNk रायगड kzbin.info/www/bejne/joipe4uiiZWejbM जुनी नाणी नोटा kzbin.info/www/bejne/aqrKYqGBhcx4d8U
@chaitnyadham
@chaitnyadham 3 жыл бұрын
Khup khup sundar video
@viveklopes1986
@viveklopes1986 2 жыл бұрын
साखर कारखाना ब्रिटिशांनी काढला होता, पोर्तुगीज यांनी नाही,
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 жыл бұрын
Sunder mahiti
@yogitapatil7050
@yogitapatil7050 2 жыл бұрын
फार छान माहिती मिळाली
@AmetraGhag
@AmetraGhag 4 жыл бұрын
khup chan mahiti.............
@chaitnyadham
@chaitnyadham 3 жыл бұрын
Namskar Aadarniy Guruji
@dineshpatil3249
@dineshpatil3249 5 жыл бұрын
खूपच छान आहे
@shodhmaharashtracha5974
@shodhmaharashtracha5974 4 жыл бұрын
धन्यवाद
@prathammhaskar4345
@prathammhaskar4345 6 жыл бұрын
Mast bhava ...keep it up....
@shodhmaharashtracha5974
@shodhmaharashtracha5974 6 жыл бұрын
yes sure .....thanks lot
@khushalmahajan3097
@khushalmahajan3097 3 жыл бұрын
Me Khushal Arjun Mahajan apla kila
@naynachaudhari4460
@naynachaudhari4460 3 жыл бұрын
खूप छान 👍👍👍
@lalitakothari5278
@lalitakothari5278 3 жыл бұрын
अशोक. चच
@khushalmahajan3097
@khushalmahajan3097 3 жыл бұрын
Very good beta
@khushalmahajan3097
@khushalmahajan3097 3 жыл бұрын
Jay hind Jay marashatat
@khushalmahajan3097
@khushalmahajan3097 3 жыл бұрын
Ami date time Ami lahan hoto
@khushalmahajan3097
@khushalmahajan3097 3 жыл бұрын
Tuti Chagala karkaram very good thanks aseg kam Kar 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
@khushalmahajan3097
@khushalmahajan3097 3 жыл бұрын
Sir very good
@shodhmaharashtracha5974
@shodhmaharashtracha5974 3 жыл бұрын
Maharashtra
@khushalmahajan3097
@khushalmahajan3097 3 жыл бұрын
Me 1975 ya bhuyarat Ami gelehoto
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 24 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 9 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 323 М.
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 24 МЛН