Рет қаралды 17,294
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: २३/१२/२०२४
☀️हवामान अंदाज☀️
👉 ह्या आठवड्यात राज्यातील हवामान थोडं अस्थीर होत आहे, आधी सांगितल्या प्रमाणे १९ डिसेंबर पासून थंडीत घट होऊन सामान्य पेक्षा कमी थंडी राहणार आहे.
👉 दिनांक 26 डिसेंबर गुरुवार पर्यंत काही जागी ढगाळ मात्र कोरडा हवामान अपेक्षित असून गुरुवारी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये काही जागी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र शुक्रवार व शनिवारी राज्यातील हवामान अस्थिर होऊन वादळी पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे
👉 शुक्रवार दिनांक 27 डिसेंबरला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, अकोला, छ. संभाजीनगर, नगर, पुणे, सातारा सांगली या जिल्ह्यात दुपारनंतरच्या वादळी पावसाची तसेच काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे.
👉 दिनांक 28 डिसेंबर शनिवारी ही सिस्टीम पूर्वेकडे सरकून बहुतांश विदर्भाचा सगळा भाग व मराठवाड्याचा सगळा भाग यामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. मात्र पावसाचे प्रमाण व क्षेत्र शुक्रवार पेक्षा शनिवारी कमी राहील याबाबत पुन्हा अचूक अंदाज २५ तारखेला बुधवारी दुपारनंतर देऊ.
👉 मात्र सध्या स्थितीत असे दिसत आहे रविवारपासून सगळीकडे स्थिर हवामान राहणार आहे व पुढच्या आठवड्यात थंडीत वाढ अपेक्षित आहे.