यावल नगरपरिषद बांधकाम विभाग अभियंतासह ठेकेदाराचे बौद्धिक दिवाळे..? मुख्याधिकऱ्याचे दुर्लक्ष.

  Рет қаралды 75

Vyas Nagari || व्यासनगरी न्यूज

Vyas Nagari || व्यासनगरी न्यूज

6 ай бұрын

यावल दि.२२
यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भागात म्हणजे न्यू व्यास मुनी नगर उद्यानाजवळ रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर गटारीवर नवीन ढाप्याचे बांधकाम झाले त्याची उंची रस्त्यावर एक फूट उंच असल्याने त्यावरून कोणतेही वाहन जाऊ शकणार नाही तसेच एखाद्या व्यक्तीला, महिलेला सुद्धा चढताना अडचण येईल अशी प्रत्यक्ष वस्तुस्थिती निर्माण झाल्याने सदर ढाप्याचे बांधकाम करताना यावल नगरपरिषद बांधकाम अभियंता आणि ठेकेदाराचे बौद्धिक दिवाळे निघाले आहे का..? तसेच नगरपालिका कार्यक्षेत्रात बांधकाम विभागासह इतर अनेक कामात सुद्धा टक्केवारीमुळे मुख्याधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत का..? असा प्रश्न कॉन्ट्रॅक्टर वर्तुळात व नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
यावल नगरपालिका क्षेत्रात अनेक बांधकामे झाली आणि सुरू आहेत सदर बांधकामे करताना बांधकामे मंजूर प्लॅन,एस्टिमेट,नकाशा प्रमाणे होते आहे किंवा नाही याची खात्री यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता करीत असतो त्यानंतर झालेल्या बांधकामाचे मोजमाप शाखा अभियंता करीत असतो आणि त्यानंतर झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी केल्यानंतर ठेकेदारांना बिल देयक अदा केले जाते.
परंतु यावल नगर परिषदेत असे कोणतेही शासकीय कामकाज न करता ठेकेदार त्याच्या मर्जी व सोयीनुसार पाहिजे त्या बांधकाम साहित्यात,प्रमाणात बांधकाम करून झालेल्या बांधकामाचे स्वतः मोजमाप प पुस्तिका भरून बांधकाम शाखा अभियंता यांच्याकडे देत असतो आणि त्यानुसार बिल निघत असते ही यावल नगरपालिकेतील वस्तुस्थिती आहे.
अशाच प्रकारे न्यू व्यास मुनी नगर उद्यानाजवळ उत्तर दक्षिण तसेच पश्चिम पूर्व अशा रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर रस्त्यावरील गटारीवर एक फुट उंच ढापा ठेकेदराने कोणत्या बांधकाम शास्त्रानुसार बांधकाम केले त्याला बांधकाम क्षेत्रातील बांधकामाची अक्कल म्हणजे ज्ञान नाही का..? हा ढापा बांधकामाचा नमुना मात्र नगरपालिका मुख्याधिकारी व बांधकाम शाखा अभियंता यांना आत्मचिंतन करण्यालायक निर्माण झाला आहे आणि या भोंगळ कारभाराकडे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद शाखा सहाय्यक आयुक्त यांनी आपले लक्ष केंद्रित केल्यास यावल नगरपालिकेतील असे अनेक बोगस कामे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे.

Пікірлер
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
माझं माहेर धुळे येथील माझी माहेरची सोण्यावाणी माणसं नक्की बघा 😘😘😘
3:54
महामंडलेश्वर डाॅ.श्री SHIVLAXMI आईसाहेब
Рет қаралды 456 М.
go green 💚💚
0:19
Dr. Arukula Deepa
Рет қаралды 29
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН