Рет қаралды 1,158
#कालवण #बटाट्याचेकालवण #झणझणीत #तिखट #रस्सा #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
झणझणीत बटाट्याचे कालवण
बटाटे २
मूठभर कोथिंबीर
मिरची १
लसूण पाकळ्या ८-१०
नारळाचा चव ४ टेबलस्पून
हळद १ चमचा
तिखट २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
चिंचेचा कोळ १ टेबलस्पून
तेल २-३ चमचे
बटाट्याचे काप करून घ्यावेत.
नारळ + मिरची + कोथिंबीर + लसूण थोडे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे.
पातेल्यात बटाट्याचे काप, तयार केलेले वाटण, हळद, तिखट, मीठ व तेल घालावे. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते हलवावे व ते पाणी यावर घालावे. लागल्यास अजून पाणी घालावे. आता हे पातेले गॅसवर ठेवून बटाटे शिजवून घ्यावेत. बटाटे शिजले की चिंचेचा कोळ घालून एक उकळी घ्यावी.
आपले झणझणीत बटाट्याचे कालवण तयार आहे.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040