अशोकजी पत्की सर आणि प्रशांत सर यांच्या जोडीमुळे एका वेगळ्या उंचीची गाणी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. मला आठवतंय की मोरूची मावशी हे नाटक मी १९८८ साली दिवाळी सुट्टीत पाहिलं होतं तेव्हा मी ७ वर्षांचा होतो आणि त्यानंतर लगेचच शाळेचं स्नेहसंमेलन होतं त्यात मी टांग टिंग टींगा हे गाणं सादर केलं होतं आणि माझा खूप कौतुक झालं होतं त्याचा सगळं श्रेय हे पत्की सर, प्रशांत सर आणि विजय सर यांचं आहे 🙏🙏. त्यानंतर कॉलेज ला असताना सुद्धा स्नेहसंमेलनात मी हि पोरगी नाहीच तसली हे गाणं सादर केलं होतं साधारण १९९८ साली. मला मोरूची मावशी, ब्रह्मचारी, एका लग्नाची गोष्ट, चार दिवस प्रेमाचे ह्यातली सगळी गाणी पाठ आहेत. अशोक पत्की सरांनी सुद्धा ब्रह्मचारी नाटकात एक गाणं गायलं होतं ते म्हणजे प्रीतीविण वेडापिसा जीव झाला प्रेमासाठी आहे मी सदा भुकेला. @संकर्षण दादा - प्रशांत सरांनी गायलेल्या सगळया गाण्यांचा एका लाईव्ह कार्यक्रम व्हावा आणि तू त्या कार्यक्रमाचा सूत्र-संचालन करावं अशी कल्पना डोक्यात आली कमेंट वाचणाऱ्यांनी माझ्या कल्पनेला कमेंट लाईक करून दुजोरा द्यावा आणि प्रशांत सरांच्या लाईव्ह गाण्याचा आस्वाद घ्यावा 🙂🙂🙂
@AK-ch5qd2 жыл бұрын
Another best thing of this episode is your comment. Nice👍
@pankajgogte76182 жыл бұрын
अगदी अगदी ..... असा एक कार्यक्रम व्हावाच !!!
@pramodrangnekar87662 жыл бұрын
प्रशांतजी, अशोकजी, सुधीर भट प्रातिनिधिक म्हणून ही नावे घेतो....... तुम्ही मराठी नाट्यसृष्टीत खरंच रत्नांची उधळण केली आहे. एकापेक्षा एक मौल्यवान लेण्यांची दालन बघून आम्ही रसिक दिग्मुढ होऊन जातो. अरे कशाकशाच म्हणून कौतुक करायचं, द्यायला होत. मी किर्लोस्करवाडी घ्या सांस्कृतिक विभागाचा प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले. त्यामुळे अनेकवेळा प्रशांतजींचा सहवास मिळाला. त्यांनी ती ओळख ठेवली आहे याहून मोठ्ठं भाग्य दुसरं नाही. परमेश्वरा मी कृतार्थ आहे.
@preetidesai9364 Жыл бұрын
तुमची कल्पनेला मी दुजोरा देते.कारण तुमची ही कल्पनाच भारी आहे
@ruchaponkshe15782 жыл бұрын
छान संकल्पना . काही episode असे करावे ज्यात आज आपल्यात नसलेल्या कलाकारांच्या आठवणी प्रशांत दादा सांगतील. विजय चव्हाण, पट्या, तारे, सुधीर जोशी, लक्ष्या.... रीमा ताई... कितीतरी...
@mvj19702 жыл бұрын
वाह. सुंदर आणि श्रवणीय. पत्की काका ८१ वर्ष पूर्ण केलेले आहेत असं बिलकुल जाणवत नाही. प्रशांत दामले आणि अशोक पत्की या जोडी ने अशीच अनेक गाणी करावीत आणि आम्हाला आनंद देत रहावा.👏👏👏🙏
@tejalkhanolkar20272 жыл бұрын
निशब्द करणारा आजचा भाग..... दोघेही दैवी देणगीच घेऊन आलेत... आणि आम्हीही धन्य आहोत यांना प्रत्यक्ष अनुभवतो आहोत... असंच उत्तमोत्तम ऐकायला मिळत राहो..... तुम्हाला दोघांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏... आणि संकर्षण आपणही यांच्या तालमीत तयार झालेले आहात बरं का.... तुलाही खूप खूप शुभेच्छा 🙏
@suruchiwagh27462 жыл бұрын
अप्रतिम भाग 👌🙏 अशोक पत्की सर तुमचं अजरामर नाट्यसंगीत आणि प्रशांत सराचा ताजातवाना आवाज आणि सच्चा सूर त्याच्या जोडीला एका कसलेल्या नटाचा प्रामाणिक निष्ठावंत अभिनय अशा असामींची मुलाखत घेणारा मूळचा काव्यरसिक आणि होतकरू कलाकार ...असा थाट असताना खरोखरीच रंगमंचावर काही लाइव्ह अगदी थेट नाट्यसंगीताचा प्रयोग पाहतोय की काय इतका छान समा बांधला गेला...संकर्षण तुमचं खूप कौतुक प्रशांत दामले आम्हां रसिकप्रेक्षकांना तुमच्या या मुलाखतींमधून असेही पाहता आले आणि तुमच्या व सरांच्या यापुढील मराठी रंगभूमीवरील प्रयोगांसाठी अनेक मनःपूर्वक आणि सदिच्छा 👍आमची पिढी भाग्यवान आहे ज्यांनी वयाच्या 5 व्या वर्षापासून मराठी रंगभूमीवरील प्रशांत सरांचा अभिनय तेव्हाही पाहिला आणि आजंही आमच्या 35 शीत प्रशांत सरांचा अभिनय, त्यांची उर्जा आणि प्रत्येक प्रयोगाच्या सादरीकरणात ताजेतवानं होऊन ते रसिकप्रेक्षकांना फ्रेश करून पाठवण्याची त्यांची हातोटी पाहीली की असं जाणवतं राहतं मनोमन आता सरांचं वय कितीही असो आजंही त्यांचं फक्त नाटक जरी पाहून आलो तरी आपल्याला अजून किती young by heart राहायचंय याची तालीम ते आपल्याकडून नकळत करून घेत असतात एक रसिकप्रेक्षक म्हणून तर नक्कीच; तसंच एखाद्या क्षेत्रात स्वतः जमिनीवर राहून पाय घट्ट रोवून आपल्याला कुठे जायचंय आणि आयुष्यात नेमकं काय, कशाप्रकारे शिस्तबद्धवृत्ती,वक्तशीरपणा अंगी बाळगून मिळवायचंय तसंच त्यापुढे जाऊन ते सातत्यानं कसं टिकवायचंय आणि त्यातसुद्धा कुठेही एकसुरीपणा आणू न देता ते कायमस्वरूपी प्रवाही, तरल, सहज आणि आनंदी, अनुभवसंपन्न राहील याचा वस्तुपाठ देऊन जातात...प्रशांत सर मी तुम्हांला पाहुणा नाटकात दामोदरला अवघ्या 5 वर्षांची असताना प्रथम रंगमंचावर नट म्हणून पाहिलं होतं मुळात गाणं गाणारे नट आहेत म्हणून मी आई वडिलांसोबत नाटकाला यायला तयार झाले ते आजपर्यंत त्याच फक्कड गाण्यांच्या आणि त्याला पूरक किंबहुना तोडीस तोड अभिनयाच्या जोडीला साजेशी नाटकं तुम्ही पुन्हा रंगभूमीवर घेऊन येतअसल्यामुळे माझ्या 5 वर्षाच्या लेकाला आणि आई वडिलांना घेऊन एकत्र ' एका लग्नाची पुढची गोष्ट' च्या 2020 रोजी झालेल्या पहिल्या प्रयोगाला प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात हजेरी लावली होती.आता तुमचा 12,500 वा याच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाचा विक्रमी प्रयोग आहे तेव्हा पुन्हा एकदा त्याला हजेरी लावण्याची आणि नाटक पाहून फ्रेश होण्याची खूप इच्छा आहे ती पूर्ण होईल अशा प्रयत्नात आहे.
@artisardesai37822 жыл бұрын
वाव वा अशोकजी पत्की आणि प्रशांत सर म्हणजे दुग्धशर्करा योग आहे आणि संकर्षण क-हाडेंसारख्या उभरत्या संवेदनशील कवी, कलाकार ह्यांनी चार चांद लावलेत. कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय. हा कार्यक्रम पुढेही चालू ठेवावा ही विनंती.
@abusubodh2 жыл бұрын
धन्य आहोत आम्ही. एखादी कलाकृती बघताना त्याच्या पाठीमागे काय काय घडते ते आत्ता कळले. या एपिसोड मध्ये प्रशांत ची खुर्ची बदलली तिथेच त्याच्या यशामध्ये अशोकजींचा सहभाग किती आहे ते कळते.
@vikasnajpande58632 жыл бұрын
सर्व प्रथम स्मृतिगंध या चॅनल च खूप अभिनंदन,आणि धन्यवाद..आज त्यांनी श्री.अशोक पत्की सर आणि श्री. प्रशांत दामले सर यांची मुलाखत यू ट्यूब च्या माध्यमातून आम्हांला दाखवली..मुलाखत खूप अप्रतिम होती,सोबत श्री.अशोक पत्की सर यांचं कौतुक किती ही कराव तेवढे कमी आहे,त्यांनी टी.वी.सिरीयल ला जे शब्दांक संगीत दिले सोबत नाटक,सिनेमा यांना जे संगीत दिले,ते कधी ही न विसरन्या सारखे आहे,म्हणून श्री.अशोक पत्की यांना खास सलाम आणि खूप शुभेच्छा..सोबत श्री.प्रशांत दामले सर यांनी 12500 नाट्य प्रयोग पूर्ण केल्यानिमित्य त्यांचे खूप अभिनंदन..श्री.प्रशांत दामले सर यांनी नाट्य श्रुष्टी ही त्यांच्या अभिनयातून जी जिवंत ठेवली,त्या करिता त्यांना खास सलाम आणि 100% मार्क्स..सोबत श्री.प्रशांत दामले सर हे खूप उत्तम गातात, त्या बद्दल त्यांचं खास कौतुक आणि सलाम...आणि त्यांचं स्माईल खूप छान वाटत..आजची श्री.अशोक पत्की सर आणि श्री.प्रशांत दामले सर यांची मुलाखत खूप खूप छान होती..दोघांना उत्तम आरोग्य छान मिळो,हिच मनोभावे कामना आणि शुभेच्छा...
@urmilaapte182 Жыл бұрын
हा कार्यक्रम ऐकण्याचा आनंद आणि समाधान खूप मिळालं
@chintanbhatawadekar27732 жыл бұрын
वाह!काव्य,शास्त्र, संगीत आणि विनोद यांची अनोखी मैफल. धन्यवाद अशोक जी,प्रशांतजी आणि संकर्षण.
@bapujoshi2 жыл бұрын
निखळ आनंद देणारी गाणी व चर्चा . पत्की सर , दामले व संकर्षण यांचे आभार व अभिनंदन
@tanujachakurkar82992 жыл бұрын
Sanakrshan you are so lucky ki tumhala ashi diggaj manase amane saamne basun boltat ani tumhi pan tyacha ek avibhajya ghatak ahat ...proude of you
@bharatisoundattikar17982 жыл бұрын
Mazya manat hach vichar aala😊
@kalpananaik51562 жыл бұрын
🌄🙏🌹सकाळची कडक न्याहारी...निशब्द... श्री.अशोक पत्की आणि प्रशांत सर या जोडीला सलाम!! गाणं व शब्दांची जादूच अशी आहे की खूपदा ऐकली तरी ऐकावीशी वाटतात ...👏👏💐
@gajanandeo25552 жыл бұрын
अशोक पतकी यांचे संगीत म्हणजे आनंद व उत्साह देणारे असते।
@suhasmanjrekar89672 жыл бұрын
१२,५०० प्रयोग, अप्रतिम. यामागे किती कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता. कौतुक करावे तितके कमीच.
@anuyabatwe56262 жыл бұрын
खूपच छान वाटले ,सगळ्या मुलाखती उत्तम आहेत ,प्रशांत सराना 12500 प्रयोगाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा .श्री पत्की सरांबरोबरच्या मुलाखती मध्ये खूपच माझा आली,आमच्यासाठी हे छोटेसे सुखच की ही मुलाखत झाली आणि बघायला मिळाली.संकर्षण खूप धन्यवाद,
@vaishalikothari87122 жыл бұрын
वन बाॅय थ्री चे सगळे भाग खुपच सुंदर झालेत, मुलाखत घेणारा व देणारे दोन्ही अप्रतिम, अजून भाग व्हायला हवेत
@jitendrakulkarni56182 жыл бұрын
आपण सगळे महान कलाकार आहात. खूप खूप धन्यवाद सर्वांना आणि सर्वांच्या चाहत्यांना, सर्वांच्या परिवाराला, सर्वांच्या गुरूंना आणि सर्वांच्या शिष्यांना.
@pritigharpure75892 жыл бұрын
1x3 चे सगळेच भाग खूपच छान.संकर्षण तुझे खूप अभिनंदन 💐
@shailajadeshmukh53852 жыл бұрын
अशोक पत्की सर ग्रेट माणूस, मुलाखत नेहमी प्रमाणे छानच झाली 👍🏼
@prashantdeshpande81772 жыл бұрын
Ultimate, Evergreen Combination!! मराठी नाटक आणि प्रेक्षकांचं भावविश्व किती प्रसन्न, मनोरंजक केलंय या जोडीनं.संकर्षण नी मुलाखत सुध्दा खूप खुमासदार केलीय.प्रशांत दामले सारखा चतुरस्त्र कलाकार आमच्या काळात मराठी रंगभूमीला मिळाला हे आम्हा प्रेक्षकांना खूप अभिमानास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा!!
@prabhakardeshmukh36722 жыл бұрын
फारच सुरेख, रिफ्रेशिंग!पत्की काका 81कीं 18?दोन्ही रत्नांची काम्माल आहे!प्रशांत तुला मनापासून शुभेच्छा!
@virendrashinde64262 жыл бұрын
सुधीर भट सर म्हणायचे आणि टुंग ने माझे आयुष्य बदलले
@sushmakakodkar29172 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinaykulkarni33532 жыл бұрын
प्रशांत दामले नी आता पर्यंत नाटकात म्हणलेली सर्व गाणी चाही संग्रह करुन नविन जनरेशन ला भेट दिली तर छान वाटेल
@ujwalakale58022 жыл бұрын
Khup chan.Maze alltime favourites.....😍👌👌👌💖💖💖🙏🙏🙏
@anjaligadgil95242 жыл бұрын
संगीत नाटकांची आपली अजरामर परंपरा ही या दोघांमुळे काही प्रमाणात चालू आहे असं म्हणावं लागेल.अतिशय सहज, सुंदर गाणी आणि तितक्याच सहजपणे त्यांचं सादरीकरण म्हणजे मेजवानीच. आपल्या दोघांना मनापासून धन्यवाद.
@sujatashah53092 жыл бұрын
खर तर हा भाग संपुच नये असे वाटते आपण काहीही न करता आपल्याला मात्र खुपच आनंदी ....
@maheshpaithankar5332 жыл бұрын
अशोकजी आणि प्रशांतजी म्हणजे RD आणि किशोर दा सारखी सुपरहिट जोडी. या दोन्ही जोड्यानी कधी निराश केलं नाही. या मालिकेतील प्रत्येक भाग प्रशांतजींच्या नाटकांसारखाच रंजक होतो आहे,त्यात उत्सवमूर्तीप्रमाणेच , संकर्षण तुमचाही सिंहाचा वाटा आहे.
@vaishalishetye95812 жыл бұрын
Khup majja aali hi series baghayla. Khup Sunder kalpana hya mulakhati.
@gamingcyclone2 жыл бұрын
Khup lavkar sampavta rao... Kiti chaan gappa ranglya hotya
@surekhadeshmukh95802 жыл бұрын
आमच्या सासुबाई/आई/गुरु/आणि मैञिण देवाघरि गेल्या शनिवारि च्यार दिवस झाले आले देवाजिच्या मणा तेथे कोणाचे चालेना हेच खरे प्रशांत दामले सर/गुरु/आमचे टि स्कुलचे मास्तर आणि तुम्हिहि सगळे.गुरुच आता या घडिला येवडेच बोलु शकते चला.भेटुच ति वेळ येणारच आहे आणि लवकर येवो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🎵😭😭😭😭😭😭😭😭🏡⛳🎻🥁😎😍🥁
@rsbbpt2 жыл бұрын
Hya saglya episodes madhe Prashant damle ani yenare pahune sahkalakaar hyanchi jevdhi prashansa hote tewdhech shrey sankarshan karhade che sudha ahe...agdi smoothly episode hoto!...sankarshan karhade ha sudha ek uttam kalakaar ahech ki...keep it up!..mastt jhali mulakhat.
अप्रतिम.... मला सांगा सुख म्हणजे नक्की काय.....हे गाणं माझ्या साठी माझ्या मुलाने शिकले आणि उत्तम वाजवतो, खूप खूप छान....
@dhanashreekulkarni38332 жыл бұрын
अप्रतिम, फार फार सुंदर..पत्की काकांना मनःपूर्वक नमस्कार
@ruchakulkarni98792 жыл бұрын
दामले साहेब तुमची सगळी नाटकं परत नाट्यगृहात चालू करा ,आमची काही काही बघायची राहिली आहेत 👍
@vidyashukla75162 жыл бұрын
🤗🤗👌👌hech sukh ahe nakkiiii🙏🙏🙏
@supriyapotnis20902 жыл бұрын
अतिशय सुंदर👌👌💐💐💐
@pramodchoudhary4509 Жыл бұрын
I like this episode because musician Ashok Patki, marathi great drama artist Prashant Damle and Sankarshana karhde are there.
@Sanket_Parab2 жыл бұрын
उषा (नाडकर्णी) ताई राहिल्या की….please continue this series
@asmitakamalwar62632 жыл бұрын
1x3 ha karyakram खूप सुंदर आहे.आम्ही बहुतेक भाग बघितले.छान वाटले.प्रशांत सरांनी म्हटलेलं गाणं आवडलं.कृपया कोणत्या नाटकातलं आहे ते सांगाल का. म्हणजे ते गाणं पूर्ण ऐकता येईल.🙏.
@siddhantisarwadnya58792 жыл бұрын
As usual suprebb, ☺️👌👌👌👌👌
@sonali14012 жыл бұрын
Fvt one ... sukh mhanje nakki kay asata 🙏♥️
@sandhyacheriyil11552 жыл бұрын
Thank you for the best talkshow.
@parshuramkate51012 жыл бұрын
Wow...Chhan ...Uttam... 🙏👍
@gopinathsambare34922 жыл бұрын
खुप छान गप्पा झाल्या, गुंतवून ठेवले कधी संपले कळलेच नाही अप्रतिम
@sharadsapre2 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम..निःशब्द भावनेची.. हे गाणं पूर्ण कुठे ऐकायला अथवा पहायला मिळेल?
@NandanK2 жыл бұрын
Angala shahara aala.. patki is magic
@rameshwalvekar67182 жыл бұрын
संकर्षण, खूप छान घेतोयस मुलाखत. प्रशांत दामले ह्यांना अनंत शुभे:च्छा. फक्त ऑडिओ सुधारण्यास वाव आहे, स्टिरिओफोनीक ऑडिओ करता येईल का पुढील भागांसाठी ?
@pradnyakulkarni76832 жыл бұрын
वा ! सुंदर कार्यक्रम !!👌👌
@dipikajadhav95952 жыл бұрын
अप्रतिम आवाज एकूण खूप fresh वाटते. असंच गाणं बनवा.
@veenakamath33412 жыл бұрын
Ashokji, prashantji ha bhag smarananat rahil, Smaraniya 🙏🙏💯
@mrs.t8172 жыл бұрын
Khup chaan .....
@kirankunte59252 жыл бұрын
Mala Sanga SUKH MHANJE NAKKI KAY ASTAA.....Ashok Patki Saheb and Prashant Damle na pahane Ani aaikane
@sanjyot0710 Жыл бұрын
No words to express
@prashantghaisas37502 жыл бұрын
Patki saheb,very sweet music director
@jaydeepnarule20992 жыл бұрын
प्रेम.. खूप सारं प्रेम!!
@NG-hj7zt2 жыл бұрын
ही मुलाखत हेच सुख आहे आमच्यासाठी🌺🙏
@vidyashukla75162 жыл бұрын
Ni shabd..really good n sweet morning today.thanks a lot everybody.🙏🙏🙏🌷
@veenakamath33412 жыл бұрын
Sankarshan tumhi tar kamalach keli👍
@poojaandhale32102 жыл бұрын
सूर julawe जगण्यासाठी चे lyrics miltil ka... अप्रतिम गाणे
@nishadkulkarni94956 ай бұрын
बहुरूपी नाटक परत कधी करताय ? बऱ्याच जणांच राहिला आहे पहायचं
@muktapanchwagh9942 жыл бұрын
Thank you so much 🙏🙏 backstage mdhun dekhil kunachi zali asti bhet tar aawdla ast..
@anjalimedhekar-surana55102 жыл бұрын
Tumhi kalakarani amcha jeevan khoop smrudhha ani anandadayee kelay
@geetaboramani14062 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌👌
@yout123able2 жыл бұрын
खूपच सुंदर! अजून एक भाग करा असा आग्रह.
@hemalimaye2 жыл бұрын
Waiting for Vandana Gupte in this series.. श्री तशी सौ आणि shh कुठे बोलायचं नाही अशी त्यांची नाटक
@vidhyahemmady9482 жыл бұрын
Wah, wah, wah.
@sugandhajathan37462 жыл бұрын
Khup sagale apratim bhag..pl Vandana Gupte na bolava 🙏
@deeptiwalunjkar49002 жыл бұрын
Mast
@hemalimaye2 жыл бұрын
Sir maharshtra baher chya Marathi माणसानं साठी ही नाटकं youtube var upload kara 🙏
@ganeshbalkrishnahirnaik58702 жыл бұрын
आज तिसरी घंटा वाजवायची राहिली . 😀
@vaibhav19mahajan2 жыл бұрын
Wa wa mejwani
@aniljoshi51332 жыл бұрын
ग्रेट
@aashishbadve3432 жыл бұрын
श्री.मंगेशशेठ कदम
@SagarJagtap-vi5lx Жыл бұрын
🙏🏻
@reshimdeshmukh2 жыл бұрын
Sundar jodi
@blackblack15539 ай бұрын
अरुण नलावडे चे कोणीच नाव घेतलं नाही?
@sampadadandawate24012 жыл бұрын
प्लिज, दुसरा भाग पण करा मन भरलं नाही.
@mrunalmhaskar12972 жыл бұрын
बहार. सकाळी सकाळी तुम्हाला बघणं,ऐकणं हि जादू आहे असं म्हणायला हवं
@sudarshanpise22 жыл бұрын
Too good .. but Haa pan episode khup Chhota hota .. Mala vatat asech he episodes Chalu rahu dya .. who is next now ?
@pranavjoshirao2 жыл бұрын
Sukh mhanje nakki Kay asta suru jhala, tevhach like button dabla gela 😊
@aashishbadve3432 жыл бұрын
सन्माननीय मोहनराव जोशी
@surekhadeshmukh95802 жыл бұрын
दम तो मोठा आसतो
@niwaskulkarni14132 жыл бұрын
मंगेश कदम
@swarvaibhavbyvaibhavkamala99062 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@suhasbhide57732 жыл бұрын
👍👌
@aashishbadve3432 жыл бұрын
15:32 - 1938
@shraddhapendurkar2 жыл бұрын
Arjun bhaag vahyla have ya series che Dhamal
@swapnilpalsule4512 жыл бұрын
प्रत्येक episode मध्ये मंगेश kadm😂 नाव येताय,,, plz बोलवाच आता
@bhaktinagwekar71512 жыл бұрын
Series itaki changli ahe pan episode kiti chhote ahet. Gappa rangat alya ahet asa vatat astanach episode sampto.