Рет қаралды 15,441
मराठी भाषा आणि मराठी साहित्यातल्या ज्ञात अज्ञात कविता सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्यासातनं हातातली नोकरी सोडत विसुभाऊ बापट यांनी एकपात्री प्रयोगांची सुरुवात केली. गेली चार दशकं विसुभाऊ न थकता, न कंटाळता देश-विदेशात फिरत आहेत. कवितांचे एकपात्री प्रयोग सादर करत आहेत. शेकडो कवितांतले बारकावे आणि त्यातील सौंदर्य उलगडून सांगत आहेत. सुपरिचित कवी, नवोदित कवितांच्या कवितांचे 3 हजारापेक्षा अधिक प्रयोग करत त्यांच्या कवितांचं कुटुंब अधिकच मोठं होत आहे. हजारो कविता मुखोद्गत असलेल्या विसुभाऊ बापट यांनी माझा कट्ट्यावर हजेरी लावली आहे.