Рет қаралды 89,167
#BolBhidu #AtalSetuBridge #AtalSetuTollCost
आधी बातम्या वाचल्या अटल सेतू कसा असेल याच्या, मग उदघाटनाचे फोटो बघितले, मग अटल सेतुवरून प्रवास करणाऱ्यांच्या इंस्टाग्राम स्टोऱ्या बघितल्या, एवढा लांबलचक पूल आठवडाभर जुना झाला नाही आणि तेवढ्यात अटल सेतूवर सेल्फीसाठी गर्दी करणाऱ्या आणि वाहुतकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस कारवाई ही बातमी सुद्धा वाचली. पण या सगळ्यात एक विषय कॉन्स्टंट चर्चेत राहिला, अटल सेतूवरचा टोल. फोर व्हीलरसाठी सिंगल जर्नी अडीचशे, रिटर्न जर्नी ३७५, डेली पास ६२५ आणि मंथली पास १२ हजार ५००. गाडीच्या हप्त्याला तोड देईल, एवढे पैसे टोललाच जाणार एवढं फिक्स.
पण आता आकडा कितीही असला, तरी मुंबईच्या ट्रॅफिकमधून तास-दीड तासाचा प्रवास वाचवायचा म्हणल्यावर गाडी अटल सेतूवरुन जाणार आणि अकाउंटवरुन टोलचे पैसे कट होणार. त्यात अटल सेतूमुळे आणखी एक गोष्ट म्हणजे, २००० साली उदघाटन झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरचा टोल अटल सेतूपेक्षा जास्त आहे. पण हा टोल भरावा का लागतो ? अटल सेतूवर एवढा जास्त टोल का आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/